हेल्मेटसक्ती

Submitted by प्रकाश घाटपांडे on 12 November, 2014 - 22:55

अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्‍या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेल्वे चे रुळ ओलांडु नयेत असा नियम मात्र आहे.>>> हा नियम तरी का पाळावा जर हेल्मेट घालण्याचा नियम पाळायचा नसेल तर? रेल्वे रुळ ओलांडणारे सगळेच थोडीच मरतात? नीट डावी उजवीकडे बघून क्रॉस करतात किंवा शूर(?)पणे ट्रेन येताना दिसत असूनही क्रॉस करतात. मग जे मरत नाहीत रुळ क्रॉस करुन गेले तरी, त्यांच्याकडून दंड का गोळा करावा?

रेल्वे क्रॉसिंग असो वा हेल्मेट असो वा इतर वाहतुकीचे नियम असो, हे नियम पाळल्याने १ जण जरी वाचला तरी त्याच्या कुटुंबाच्या आयुष्याचं भलंच नाही का?

>>>>> लंडन ला पण इतकी गर्दी असताना असले चौक ओलांडायचे भुयारी मार्ग नाहीयेत. सिडनी मेलबर्न ला पण नाहीयेत. तिथे लोकांना खरच उपयोगी पडेल अश्या गोष्टींवर पैसे खर्च केलेत, नगरसेवकांना खायला मिळावे म्हणुन नाही. <<<< तुमच्या पुढच्याच वाक्यात खरे तर तुम्हीच बरेचसे उत्तर दिलेत... लंडनचे नागरीक मग ते पादचारी असोत वा वाहनचालक, कसोशीने सिग्नल व नियम पाळतात, भारतात पाळत नाहीत, व न पाळण्याकरता तुम्हीच पुढल्या वाक्यात मान्डलेले तर्कट मांडतातच, शिवाय असलेले नियमही पाळत नाहीत. तेव्हा लंडनचे उदाहरण इथे गैरलागू आहे.

<<<<< भारतात नियम पाळणारे मात्र मुर्खच>>>>>>> रस्ता ओलांडायला भुयारी मार्गच वापरावा असा कुठलाही नियम नाहीये जिथे भुयारी मार्ग आहे तिथे सुद्धा. त्यामुळे नियम तोडण्याचा प्रश्नच येत नाही. रेल्वे चे रुळ ओलांडु नयेत असा नियम मात्र आहे. <<<<<
महाशय, जिथे बॅरिकेड्स्/रस्ता विभाजक आहे, तिथे वेगळ्या नियमाची आवश्यकता वाटू शकते? भुयारी रस्ता केला जातो तेव्हा नियमही केलेला असतो, नसतो हे कशाच्या आधारावर म्हणता? उदाहरण द्याल का?
पुण्यातिल प्रसिद्ध पहिला पादचार्‍यांचा भुयारि मार्ग आबासाहेब गरवारे यांनी दिलेल्या देणगीतून बांधला आहे, व त्याच्या कामावर खर्चावर त्यांची ( त्यांच्या कंपनीची) पूर्ण देखरेख होती. तुम्हाला अजुनही असे म्हणायचे आहे की तो पुल पैसे खाउन बान्धला? असेल तर कुणी खाल्ले? कुणी दिले? कशाकरता?

हवेत शब्दांच्या गोळ्या झाडू नका हो प्लिजच..... हवे तर फायरिन्ग रेन्जवर जाऊन् हव्व्या तेवव्हड्या गोळ्या झाडा.... Proud

@लिम्बु - तुम्ही गरवारे पुलाचे उदाहरण का देताय?

गेल्या ४ वर्षात बांधल्या गेलेल्या डहाणुकर कॉलनी आणि पौड रोड वरच्या ३ भुयारी मार्गांच्या बद्दल बोला.
गरवारे भुयारी मार्गाच्या इथे रस्ता ओलांडुच शकणार नाही अशी सोय केली आहे. तशी बाकीच्या ठीकाणी का नाही केली?

नशीब आपले की दरवर्षी वा वर्षातून दोनतिनदाही झेब्राक्रॉसिन्गचे पट्टे आखले जातात>>>> तुम्हाला असे वाटतय खरच की त्यात पैसे खाल्ले जात नाहीत?

एकाच रत्यावर वर्षात २ वेळेला डांबराचे थर दिले जातात ( गरज नसताना ), आजुबाजुची घरे एक फुट खाली गेली ह्याच्या मुळे. असे का केले जाते असे तुम्हाला वाटतय?

हवेत शब्दांच्या गोळ्या झाडू नका हो प्लिजच..... हवे तर फायरिन्ग रेन्जवर जाऊन् हव्व्या तेवव्हड्या गोळ्या झाडा....>>>>>>खडकी जवळ आहे.:फिदी:

टोच्या, मला माहित असलेले उदाहरण दिले...
पण तुम्ही म्हणता तसे बाकी ठिकाणि असले तरी पैसे खाणारे कोण? नगरसेवक + प्रशासन + बिल्डरच ना? त्यातिल नगरसेवकान्ना कोण निवडून देते? नागरीकच ना? अन प्रशासन व बिल्डर काय आभाळातून पडलेले अस्तात? ते ही तुमच्या आमच्यातले माहितीतले "नागरीकच" ना? म्हणजे पैसे खाणारे भारताचे नागरीक (इंग्लंडचे नव्हेत) , अन ते खातात म्हणून बाकीच्या नागरिकान्नी नियम पाळू नयेत हा युक्तिवाद काही कळला नाही बोवा मला...
लोक पैसा खातात कामामधे म्हणून मी सार्वजनिक वा वैयक्तिक जागी स्वतःच्या देहाच्या महत्वाच्या अवयवाबाबतचे सुरक्षिततेचे नियमही पाळणार नाही, कारण नियमच पैसा खायला केले जातात असे काहीसे विचित्र तर्कट आहे तुमचे. उद्या याच न्यायाने दर इंजेक्शनला नविन सुई हा नियम डॉक्टर्सनी मोडला तर?
मान्य की भारतात नियम बनवला की त्याचा वापर पैसे खाण्याकरताच काही लोक करतात. पण म्हणून स्वहिताचे नियमही पाळणे नाकारायचे? हा तर तद्दन इंग्रजीसत्तेविरुद्धच्या असहकाराचा/कायदेभंगाचा नमुना झाला (बर का झकोबा... ).

बाकीच्या नागरिकान्नी नियम पाळू नयेत हा युक्तिवाद काही कळला नाही >>>>>> अहो असा काही नियमच नाहीये.
जिथे रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग आहे तिथे रस्त्यावरुन क्रॉस करु नये असा काहीही नियम नाहीये. त्यामुळे नियम मोडायचा काहीच प्रश्न येत नाही.

आणि मी हे उदाहरण का दिले होते ते बघा सुरुवातीला. कोणीतरी असा दावा केला होता की पोलिस आयुक्त, कायदेमंडळ हेल्मेट सक्तीचा नियम करतात ते काय मूर्ख आहेत का?
माझे त्यावर उत्तर होते की ते "खूप" हुशार आहेत. पण तुम्हाला वाटत असेल की हे लोक हेल्मेट सक्ती सारखे नियम लोकांच्या भल्या साठी बनवत आहेत तर ते तसे नाहीये. त्यामागचे एकमेव इंटेंशन पैसे खाणे हेच आहे.
हेच सांगण्यासाठी मी भुयारी मार्गाचे उदाहरण दिले.

उद्या याच न्यायाने दर इंजेक्शनला नविन सुई हा नियम डॉक्टर्सनी मोडला तर?>>>>
रोग्याला मुभा आहे डॉक्टरला सांगण्याची की मला नविन सुई नको म्हणुन. कींवा मी घरची माझी पिढीजात सुइ घेउन आलो आहे तिच वापरा सांगायची. हेल्मेट सारखी तिथे रोग्यावर सक्ती नाहीये. तुमचे उदाहरण चुकीचे आहे.

ण म्हणून स्वहिताचे नियमही पाळणे नाकारायचे>>>>>>> स्वहीताचे वाटले तर लोक हेल्मेट घालतीलच, त्यासाठी सक्तीची गरज नाही.

मान्य की भारतात नियम बनवला की त्याचा वापर पैसे खाण्याकरताच काही लोक करतात>>>>>>> असे नाहीये. पैसे खाण्यासाठीच नियम बनवले जातात. आधी नियम आणि मग पैसे खाणे असा प्रकार नाहीये. पैसे खायला मिळावेत म्हणुन शोधुन शोधुन असले नियम बनवले जातात.

>>> त्यामागचे एकमेव इंटेंशन पैसे खाणे हेच आहे. <<<< अहो यावर मी आधीच सांगितले आहे की त्यांना एरवीही पैसे खाण्याकरता आधीच भरपुर कुरण उपलब्ध आहे जसे की पी.यूसी सर्टीफिकेट..... त्यावर नै कधी "जनजागृती/विरोध" वगैरे झाला तुमच्या त्या सूज्ञ पुणेरी(?) नागरिकांकडून?
मग इथेच का? ते ही हेल्मेटउत्पादकांचे हित/पोलिसांचे पैसे खाणे वगैरे तद्दन ठिसूळ मुद्दे धरुन विरोध?

जसे की पी.यूसी सर्टीफिकेट..... त्यावर नै कधी "जनजागृती/विरोध" वगैरे झाला तुमच्या त्या सूज्ञ पुणेरी(?) नागरिकांकडून?
मग इथेच का? ते ही हेल्मेटउत्पादकांचे हित/पोलिसांचे पैसे खाणे वगैरे तद्दन ठिसूळ मुद्दे धरुन विरोध?>>>> अहो पीयुसी ६ महीन्यात एकदा करायला लागते. हेल्मेट २०० मिटर वर भाजी आणायला गेलो तरी वापरायची सक्ती केलीय. हेल्मेट्च्या आणि पीयुसीच्या सक्ती मधुन होणार्‍या त्रासात जमिन आस्मानाचा फरक आहे.
आणि आता पियुसी मधुन मिळणारे पैसे कमी वाटतायत म्हणुन ही नविन हेल्मेट ची सक्ती.

टोच्या, मला माहित असलेले उदाहरण दिले...<<<

लिंबूभाऊ, हाच तर प्रॉब्लेम आहे. तुम्हाला एक भुयारी मार्ग माहीत आहे म्हणून तुम्ही त्याचा अनुभव सगळ्या भुयारी मार्गांना जोडताय.

मी टोल पाळणे व हेल्मेटसक्ती पाळणे ह्याबाबत शहरवासीयांच्या फक्त भावनांची तुलना केली तर कोणी म्हणाले मोशीला या आणि तपशील तपासा, टोल हा विषयच नव्हता.

डहाणूकर कॉलनीत तर एक पूलही बनवला आहे रस्त्याच्यावरून. त्या पूलावर जायला चक्क लिफ्ट आहे लिफ्ट! त्यात आधी एक लिफ्टमन असायचा. आता तेथे बारा वाजलेले आहेत त्या यंत्रणेचे! किती पैसे खिशात गेले हे विचारायला कोणी नाही.

टोचा ह्यांनी लिहिलेले पन्नास + पन्नास पायर्‍या हे अगदी चपखल आहे. अनेक भुयारी मार्ग करताना बिनडोकपणा नावाचा गुण नियोजनासाठी वापरण्यात आला हे स्पष्ट आहे.

>>>अहो यावर मी आधीच सांगितले आहे की त्यांना एरवीही पैसे खाण्याकरता आधीच भरपुर कुरण उपलब्ध आहे जसे की पी.यूसी सर्टीफिकेट..... त्यावर नै कधी "जनजागृती/विरोध" वगैरे झाला तुमच्या त्या सूज्ञ पुणेरी(?) नागरिकांकडून?
मग इथेच का? ते ही हेल्मेटउत्पादकांचे हित/पोलिसांचे पैसे खाणे वगैरे तद्दन ठिसूळ मुद्दे धरुन विरोध?<<<

आपल्या प्रतिसादात एखाद्या शब्दापुढे कंसात प्रश्नचिन्ह देऊन प्रतिसाद सर्कॅस्टिक करण्याची जुनाट पद्धत आता मोडीत काढा लिंबूभाऊ!

प्रत्येकाला अधिक श्रीमंत व्हायचे असते. पी यू सी मध्ये पैसे खाऊन झाल्यावर आता भरली बुवा पोटे असे म्हणत यंत्रणा गपगार का राहणार आहेत? हेल्मेटवाले आहेत ना पैसे चारायला? त्या पैशांचा मोह त्या यंत्रणेला न व्हायला ती काय 'भूक नसताना शिकार न करणारी' जनावरे थोडीच आहेत?

>>>> हेल्मेट २०० मिटर वर भाजी आणायला गेलो तरी वापरायची सक्ती केलीय. सक्ती मधुन होणार्‍या त्रासात जमिन आस्मानाचा फरक आहे <<<<
साहेब, मला नक्की माहिती आहे की आख्ख्या आयुष्यात मी एकदाच मरणार आहे, कधी ते माहित नाही, पण एकदाच मरणार हे नक्की. तर ते मरण टाळायला मात्र आयुष्यभर मला सावधच रहावे लागते, त्या असंख्य सावधगिरीतला एक भाग म्हणून मी हेल्मेट १९९५ पासून वापरतोय. अन तसेच सूज्ञ म्हणविणार्‍या नागरिकांनीही वापरावे अशी अपेक्षा तेव्हा पासूनच करतोय. पण आजवर कोणीच सक्तिशिवाय सावधगिरीचा हा उपाय पाळत नाही. मग कायदा आला, तर तो स्वतःचेच मरण पुढे ढकलण्यासाठी पाळला तर बिघडते कोठे?

साहेब, मला नक्की माहिती आहे की आख्ख्या आयुष्यात मी एकदाच मरणार आहे, कधी ते माहित नाही, पण एकदाच मरणार हे नक्की. तर ते मरण टाळायला मात्र आयुष्यभर मला सावधच रहावे लागते, त्या असंख्य सावधगिरीतला एक भाग म्हणून मी हेल्मेट १९९५ पासून वापरतोय>>>>>>>>

अहो इथे मरणारा माणुस "मी" आहे. तुम्ही का काळजी करताय? मला वाटले तर घालीन ना मी हेल्मेट.

मी आधीही लिहीले होते, माझ्या अपघाताचे सरकार वर एक पैश्याचे तरी बर्डन आहे का? मला काय फुकट हॉस्पिटल सेवा देते सरकार का मी मेलो तर माझ्या घरच्यांना १० लाख देणार आहे सरकार ( किंवा तुमचे पोलिस आयुक्त )?

परदेशी राहणार्यांनी तिथे हेल्मेट न घालता (सक्ती असतानाची गोष्ट करतोय) कितीवेळा घरा बाहेर पडले होते ? आणि कितीवेळा दंड भरलेला हे स्पष्ट करावे

हा सरळ सरळ मायबोलिकरांचा, त्यांच्या बुद्धिमत्तेचा अधिक्षेप/अपमान आहे असे नाही वाटत? अशी गरज नाही की येथिल प्रत्येक मायबोलीकर "समाजात" जाऊन तथाकथित मानमान्यता मिळविलेलाच असायला हवा, तरच त्याच्या मताला अर्थ.<<<

अहो लिंबूभाऊ, मुद्दा इतकाच होता की मायबोलीवरची चार दोन टाळकी हेल्मेटसक्तीला विरोध करत नसून पुण्यातील एक खूप मोठा गट ही कृती करत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर पुणेकर हेल्मेटसक्तीचा विरोध करत असतील तर त्याच्यामागे काहीतरी तरी कारण असेल ह्याचा बाकीच्यांनी विचार करायला पाहिजे ना?

आता मला सांगा, हेल्मेट वापरावे असा कायदा आहे व तो पाळला नाही तर आता दंड आकारत आहेत. ठीक आहे? मग अतिक्रमणे हटवली का? सगळीकडे पादचारी मार्ग दिले का? बेकायदा बांधकामे पाडली का? रस्ते सुधारले का? रस्ते रुंद केले का? पर्यायी रस्ते दिले का? शासकीय कर्मचारी असलेले पीएमटी की पीएमपी वाले सर्रास सिग्नल तोडून बस चालवतात त्यांचे निलंबन केले का? हेल्मेट न वापरणारे पोलिस सर्रास दिसतात त्यांचे निलंबन केले का? पुण्यातील रस्त्यांवर अधिकाधिक किती वाहने उतरावीत ह्याबाबत काही निर्णय घेतला का? पार्किंगचे प्रॉब्लेम्स नष्ट व्हावेत म्हणून काही ठोस कार्यक्रम केला का? हेल्मेट वापरूनही माणूस मेला किंवा जखमी झाला तर उपचाराच्या खर्चाचा काही भाग सरकार उचलणार आहे का? मेलेल्याच्या कुटुंबियाला नोकरी देणार आहेत का?

ह्या सगळ्याची उत्तरे जर नाही अशी असतील तर हेल्मेटची फक्त सक्ती करू नका ही नागरिकांची एक मागणी का मान्य होत नाही?

अनेक भुयारी मार्ग करताना बिनडोकपणा नावाचा गुण नियोजनासाठी वापरण्यात आला हे स्पष्ट आहे.>>>>

@ बेफिकीर, अहो बिनडोक पणा नाही, अतिशय हुशार आहेत ही लोक.

पुढे काय करणार ही लोक ते सांगतो आत्ताच. भुयारी मार्ग नागरीक वापरत नाहीत म्हणुन तिथे फेरीवाले आणि भाजीवाले वसवायची नविन टुम काढतील. मग त्या फेरीवाल्यांकडुन हप्ते च हप्ते.
थोडे दिवसांनी आपल्या कार्यकर्त्यांना त्याचे गाळे पाडुन वाटतील ( अर्थात पैसे घेउनच )

अहो इथे मरणारा माणुस "मी" आहे. तुम्ही का काळजी करताय? मला वाटले तर घालीन ना मी हेल्मेट.>>> मान्य आहे हो.
पण मरणारा माणुस हेल्मेट वापरणार्‍याच्या दुचाकीशी धडक होउन गेला, तर हेल्मेट वापरौन पण त्याच्यावर सदोष मनुश्यवधाचा गुन्हा होइल ना?
तेच हेल्मेट असेल तर समोरचा सुरक्षित आणि हाही सेफ.

बेफी मीच बोल्लो हो मोशीला या म्हणुन. ते ही पुणेकरांनी टोल मान्य केला ह्याच वाक्यापुरतं होतं.
अर्थात पुणेकर म्हणजे लिमिटेड टु पुणे शहर असा अर्थ न घेता मी पुणे जिल्हा असा पकडतोय.

पण मरणारा माणुस हेल्मेट वापरणार्‍याच्या दुचाकीशी धडक होउन गेला, तर हेल्मेट वापरौन पण त्याच्यावर सदोष मनुश्यवधाचा गुन्हा होइल ना?>>>>>>

ठीक आहे, सरकारनी असा कायदा करावा की हेल्मेट घातले नसताना अपघातात मेलात तर दुसर्‍यावर गुन्हा दाखल होणार नाही. ( पण मग खायला पैसे कसे मिळतील ? )

विमा कंपन्यांनी ठरवावे की हेल्मेट घातले नसताना अपघातात मेलात तर क्लेम मिळणार नाही.

काहीच हरकत नाही.

विमा कंपन्यांना तसेही वीमा नाकारण्याचे कारण पाहिजे असते ,सक्ती झाल्यास हेल्मेट नव्हते एवढे सिध्द करुन पैसे वाचवायला विमावाले कमी करणार नाहीत.

पुण्यातील वाहतुकीच्या प्रमुख समस्या जशा होत्या तशाच आहेत एव्हाना मनपाचे कार्यक्षम अधिकार्यांनी त्या आणखी वाढवल्या असे म्हणावे लागेल जसे
सदोष डीपी रोड ची आखणी करुन वर्षानुवर्षे जागामालक आणि इतरांचे कोर्टात चालणारे वाद यामुळे नव्याने रस्ते तयार होत नाहीत (झालेच तर ते सरसकट एकाच रुंदीचे होत नाहीत . उदा नदीपात्राचा रस्ता - म्हात्रे पुलाजवळ साधी रिक्षाही जाउ शकत नाही )

भूयारी मार्गाचे टेंडर मागावयचे (कोणताही प्रस्ताव पुणेकरांना विश्वासात न घेता) मग खोदून ठेवायचे आणि विरोध झाला कि आहे त्या स्थितीत काम ठेवायचे मग चर्चेचे गु-हाळ अनेक वर्षे चालते आणि कधी एकदाचा भूयारी मार्ग होतो . अहो पण लगेच वापरता येत नाही त्याचे उदघाटन घ्यायचे अस्ते बाबानो मग अजून ४-६ महिने वाट बघायची या सर्व वेळेत ट्राफीक स्थिती वाईट झालेली असते.

फूट ओव्हर ब्रीज (एफओबी) करण्यामागचे लॉजिक कुणाचे कोण जाणे , जेष्ठ नागरिकांना एवढ्या पाय-या चढणे आणि उतरणे शक्य आहे का याचा विचार व्यायला हवा होता.

सायकल ट्रॅक - ही म्हणजे रस्त्यालगत पथारीवाल्यांची केलेली दुसरी सोय म्हणावी लागेल. पेव्हर ब्लॉक वरुन व्यवस्थित सायकल चालवता येते का ? येत असेल तर कोणी चालवत का नाही ? हे या महाभागांना जाउन सांगितले पाहिजे.

याव्यतिरिक्त रस्त्यावरील तुटलेली चेंबरची झाकणे, उखडलेले पेव्हर ब्लॉक, रस्त्याच्या मधोमध असलेली झाडे, डिव्हायडर आणि कर्बिंगचे उडालेले पेंट, अंधूक झेब्रा क्रॉसींग पट्टे अशा अत्यावश्यक गोष्टींची सक्ती असणे गरजेचे आहे.
मनपा अजिबात काम करत नाही असे नाही, खूपशी कामे चांगलीही केली जातात त्याबाबत नंतर बोलू

हायला काय खरे नाही.

क्रिकेट खेळताना हेल्मेट हवेच असाही एक धागा.

पुण्यातुन गाडी हाणताना हेल्मेट नकोच असाही एक धागा

Proud

>>अहो लिंबूभाऊ, मुद्दा इतकाच होता की मायबोलीवरची चार दोन टाळकी हेल्मेटसक्तीला विरोध करत नसून पुण्यातील एक खूप मोठा गट ही कृती करत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर पुणेकर हेल्मेटसक्तीचा विरोध करत असतील तर त्याच्यामागे काहीतरी तरी कारण असेल ह्याचा बाकीच्यांनी विचार करायला पाहिजे ना? <<
+१ पण लक्षात कोण घेतो?
अवांतर- हेल्मेट उपयुक्ततेचा मुद्दा येतो तेव्हा मला काही आठवड्यापुर्वी सकाळ मधे एक बातमी आली होती. एका प्राध्यापकाचा घरात पाय घसरुन डोक्यावर पडल्याने मृत्यु झाला त्याची आठवण येते.

शिवाय फिलिप ह्युजेस तर हेल्मेट घालून पण बिचारा गेला... (हे तर फारच वाईट झाले) -हे पण अवांतर

या विषयावर माझ्या वडिलांशी बोललो.. त्यांनी एक मुद्दा सांगितला तो मला पटतोय.(लॉजिकल)
तो म्हणजे हेल्मेट न घालणे हे सिगरेट पिण्यासारखे आहे..म्हणजे या निष्काळजीपणामुळे जो परिणाम होइल तो हेल्मेट न घालणार्‍यावर होइल. जर एखाद्याला हेल्मेट न घालता रिस्क घ्यायची आहे तर घेउ द्यावी. हेल्मेट न घालता एखादा अपघातात जाउ शकतो किंवा न जाउ शकतो.. सिगरेट पिणार्‍याची रिस्क ही यापेक्षा नक्कीच जास्त आहे (पॅसिव स्मोकिंग मुळे इतराना पण) पण त्यासाठी पाकिटावर वैधानिक इशारा देउन सोडुन देतात.. कोणी सिगरेट पिताना दिसला तर त्याला दंड करत नाहीत. मग हेल्मेटची सक्ती कशाला?

आणखी एक गोष्ट म्हणजे ही सक्ती ही काही वाहनचालकांची सरकारला काळजी आहे म्हणुन केलेली वाटत नाही. ही सक्ती म्हणजे ट्रॅफिक पोलिसासाठी एखादे कुरण मोकळे करुन देण्यासारखे आहे.एखादा वाहनचालक जर हेल्मेटविना दिसला तर तो धोक्यात आहे यापेक्षा "आपली कमाई" हे पोलिसाला पहिले दिसेल.( दंड किती आहे हेल्मेट घातले नाही तर?)
कायदे जरी जनहितासाठी केलेले असले तरी जनलुटीकडे त्याचा जास्त कल (भारतात) असतो हे दुर्दैवी सत्य आहे.

माझे वैयक्तिक मत हे जरी प्रत्येकाने हेल्मेट/सीटबेल्ट (where applicable) सक्ती असो वा नसो जरुर वापरावे हेच आहे पण असे कायदे करुन जर उगाच जनतेला त्रास देण्याचा उद्देश असेल तर सक्ती ही अन्यायकारक आहे. यापेक्षा How about educating and encouraging people to use helmets..Giving Incentives for safe drivers etc?

माझे मत हेल्मेटसक्तीच्या विरोधात !

mansmi18 .तुमच्या वडिलांचा अनादर करायचा हेतु नाही माझा, तरी माफ करा.
माझ्यामते सिगरेट आणि हेल्मेटची तुलना होउ शकत नाही. सिगरेट हे व्यसन किंवा एखाद्याची आवड असू शकते पण हेल्मेट ही गरज आहे .स्वतःचे डोके सेफ राहण्यासाठी पर्यांयाने जीव वाचण्यासाठी, नाहीतर हेल्मेट कुणीच घातले नसते.

सिगरेट ही वाईटच व त्यासाठीचा तुमचा मुद्दा योग्यच आहे.
पॅसिव स्मोकिंग मुळे इतराना पण >> माझ्या हातात असते तर मी दंड चालु केला असता आणि त्यात चिरीमिरी होणार नाही यावरही लक्ष दिले असते Proud Happy

फिलिपचे उदा दुर्दैवी आहे .त्यातही कुणाचाच दोष नाही.कारण मृत्यु हा कधीही येउ शकतो ,तो आपल्या हातात नाही.पण हेल्मेट न घालता आला तर राहिलेल्या लोकांना कायम खंत राहते हेल्मेट न घातल्याची.

लोकांना कायम खंत राहते हेल्मेट न घातल्याची. > बरोबर नंतर फार पश्च्याताप होतो. Happy

>>> यापेक्षा How about educating and encouraging people to use helmets..Giving Incentives for safe drivers etc? <<<<
अहो झेब्राक्रॉसिन्गवर गाड्या नेऊ नयेत, सिग्नल पाळावेत हे शाळेतही शिकवले जाणारे, व त्याद्वारे तुम्ही म्हणताय ते इन्करेज की फिन्करेज कायसेसे करुनही ह्जारोनी वाहनचालक रोजच्यारोज मी कसा पुढे जाइन च्या रेस मधे सर्रास झेब्रा क्रोसिन्गवर उभी असतातच की... काय उपयोग त्या इन्करेज की फिन्करेजचा?
अहो, एखाद्याने (वा समुहाने) "शेण खाऊ नये" या करता प्रोत्साहन द्यायला लागणे हीच या स्वतंत्र भारताची शोकांतिका आहे, जी "कायदे हे मोडण्यासाठीच" अस्तात या वृत्तीतून आलेली आहे (बरका झकोबा..) तर असले कायदेभन्ग करण्यात ज्यान्ना पुरुषार्थ वाटतो त्यान्ना वाटूदे बोवा, पण असे पुरुष असले हेल्मेट न घालण्याचे वगैरे पुरुषार्थ गाजवून गचकले की त्यान्च्या बायकापोरान्चे काय हाल होतात त्याला कोण जबाबदार? शिवाय वर कुणी म्हणले तसे, ज्याच्या गाडीला धडकुन वगैरे अपघात असेल, तर तो दुसरा गाडीवाला आयुष्यातुनच उठतो.
असो.

>>>> विमा कंपन्यांनी ठरवावे की हेल्मेट घातले नसताना अपघातात मेलात तर क्लेम मिळणार नाही.<<<<
ठरवावे? ऑलरेडी ते ठरलेलेच आहे महाशय, कोणत्या दुनियेत वावरता?
आता पुढच्याच पोस्टीमधे, विमा कम्पन्याही पैशे खातिल अशी शन्का व्यक्त केलीये लगेच.... म्हणजे थोडक्यात काय? की जगाला नावे ठेवत ठेवत, ते कायदे मोडून पैशे खातिल अशी शन्का धरत आम्ही हे कायदे पाळणारच नाही ही वृत्ती अन नक्षलवादी किन्वा माओवादी वृत्ती यात फरकच तो काय आहे? तुमचे कायदे येन केन प्रकारेण येन केन सबबीन्मुळे आम्ही मानणार नाही, ही तद्दन नक्षली वृत्ती आहे असे माझे मत.

Pages