निसर्गाच्या गप्पा (भाग २३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 November, 2014 - 14:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.

हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..

तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.

या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...

आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्‍या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..

शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.

तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्‍या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.

(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रभात ! मानुषी तुझ्या परवानगीशिवाय इतरांचीही Happy परवानगी आहे गं पण वेळ देत नाहीयेना .... चटणीवर प्रतिसाद दिला नाही ब्रॅंडेड रुमाल Happy टाकून ठेवणार होते .... असो ! चटणी भाकरीचा फोटू टाकीन ...

>> मला समहाऊ भारद्वाज हा बोजडपणे चालणारा पक्षी फार आवडत नाही.>>

Happy

जमिनीवरुन चालताना बोजड वाटत असेल, पण ज्या नजाकतीने तो झाडाच्या बुंध्यापासून शेंड्यापर्यंत लपत लपत जातो, चाहूलही लागू न देता झाडाच्या फांद्यांवरून फिरत असतो, ती स्टाईल लाजवाब असते. शिवाय त्याचे ते उन्हात चमकणारे सोनेरी / ताम्रवर्णी पंख .... आहा!

गौरी, छान आहे लिंक.. यावर काही माहितीपटही आहेत. सर अटेंबरोंनी अनेक वर्षांपुर्वी प्रायव्हेट लाईफ ऑफ प्लांट्स या पुस्तकात लिहूनही ठेवले आहे हे...

काल अ‍ॅनिमल प्लॅनेट वर अ‍ॅनिमल काऊंट डाऊन हा एक मजेशीर कार्यक्रम होता. एका ठिकाणी एकाच प्रजातीचे जास्तीत जास्त जीव कुठे एकत्र होतात, ते दाखवले होते.

खेकडे, जेलीफिश, फ्लेमिंगो या सगळ्यांना मागे टाकत, टोळांनी ( टोळधाड फेम ) पहिला नंबर पटकावला.

ब्रॅंडेड रुमाल>>>>>>>>>> Proud
बी यांच्या प्रेमळ आग्रहवजा विनंतीस मान देऊन माझ्या सिटाउटाचे फुटू...........
हे किचनातून दिसणारे दृश्य

कमळाच्या कुंडीचा बागकामाची हत्यारं ठेवायला उपयोग केला आहे(आय नो शेम ऑन मी!) आता परत कमळाचे कंद आणणार आहे.

सिटाउटातून दिसणारा अंगणातला कडुलिंब

मानुषी, मस्त जागा आहे. प्रायव्हसी पण आणि ओपन स्पेस पण.. आपल्याला आणि पक्ष्यांनाही Happy

वा!!! मानुषीताई १००० धन्स हं तुम्हाला.

आता हे परवाचे तुम्ही केलेले वर्णनः

आमचा सिटाउट आमचे किचन आणि आमची बेडरूम यामधली मोकळी जागा आहे...झाडं आणि कुंड्यांनी भरलेली. तर आम्ही किचनमधे ब्रेकफास्ट करत असताना काल सिटाउटमधे एकदम खूपच काहीतरी हलल्यासारखं वाटलं तर एक मोठ्ठा भारद्वाज कठड्यावर बसला आणि आमच्या सिटाउटात बागडू लागला. लोखंडी जिन्यावर उडून जाऊन बसला आणि चालत चालत (म्हणजे अहो....छोट्या उड्या मारत....खरंच!) चक्क जिना चढून वर गच्चीत गेला.
इतक्या जवळून भारद्वाज पहिल्यांदाच पाहिला. काय सुंदर दिसतो!
सगळ्या मोठ्मोठ्या खिडक्यांना जाळ्या असल्याने बाहेरच्यांना कळतच नाही की इथे माणसाचा वावर आहे.
थेट समोर खाली अंगणातल्या घुमारदार कडुलिंबावर हे सगळे पक्षी असतात.
बराच वेळ तो सिटाउटात बागडत राहिला आम्ही आतून गुपचुप पहात राहिलो मग मी हळूच जाळीचं दार लोटलं तर तेवड्यात तो गच्चीतून उडून खाली आला होता, त्याला चाहूल लागली.. परत समोर च्या कडुलिंबात उडून गेला आणि घूघूत्कार करत राहिला. बहुतेक त्याच्या मित्रांना घडल्या घटनेचा रिपोर्ट करत असावा.
पण नेमका आय पॅड जवळ नसल्याने फोटो नाही काढता आला.

वर हे वाचल्यावर मला जे जे बघायचे होते ते ते सर्व आता तुम्ही टाकलेल्या फोटोवरुन माझ्या डोळ्यासमोर आले.
आणि ह्यातील एका शब्दावर माझा फार जीव जडला आहे "घुमारदार"!!!!

ती तेवढी एक पणती प्लीज सरळ कराल का माझ्या विनंतीवरुन Happy धन्स.

गौरी, मस्त लिंक.
मंजु ताई, ह्युमर जोरदार..
मनुषी ताई, त्या लोखंडी जीन्यावर बसुन चहा प्यावासा वाटतोय... मस्त आहे जागा आणि झाडं सुद्धा..
बी.. छान निरिक्षण..

थॅन्क्स . बी केली हं पणती सरळ(विनंतीवरून!!!). अरे तुळशीपुढे दिवाळीत ती लावत होते परवाच्या पावसात त्यात पाणी भरलं. म्हणून पालथी टाकली.
दिनेश सायली इथून मला काय काय "निसर्गाच्या करामाती" दिसतात. (माझ्या लेकाला या फ्रेजवरून लहानपणी चिडवायचे.)

मानुषीताई, हे असं स्वतःच घर आणि अंगण पुण्यात होणे शक्य नाही, आता नगर मध्ये स्थाईक व्हावे का? Wink गंमत जाऊदे पण हे असं माहेरचं घर्-अंगण खुप मिस करते मी पुण्यात. आणि हो तुमचं घरही खुप सुंदर आहे Happy

लोकप्रभाचे वाचक, अनिल ओढेकर यांचा अनुभव वाचा..

http://www.loksatta.com/lokprabha/vachak-lekhak-1043250/

बहारिनमधील वाळवंटात ४०० र्वष जुना वृक्ष आहे. कोणत्याही ज्ञात जलस्रोताशिवाय तो निर्जन वाळवंटात उभा आहे. 'ट्री ऑफ लाइफ' असे याला सार्थ नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या वृक्षाच्या आसपास एकही वनस्पती आढळत नाही. एका वर्तमानपत्रात ही बातमी वाचली आणि मला प्रत्यक्ष माझ्या घरात घडलेली अशीच एक घटना आठवली.
गौरी-गणपतीच्या आरासाची पूर्वतयारी म्हणून चाफ्याच्या झाडाच्या मोठाल्या फांद्या तोडून घरात आणून ठेवल्या होत्या. नेहमी आरास केली जाते त्या ठिकाणी या फांद्या जमिनीपासून तीन-चार फूट उंचीवर, भिंतीला खिळे मारून फिक्स केल्या.
त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात काही तातडीचे काम उद्भवल्याने पाच-सहा महिन्यांसाठी घरातील सगळ्यांनाच गावी जावे लागले. साधारण पाच-सहा महिन्यांनी म्हणजे जुलैमध्ये घरी परतलो. बरेच दिवस घर बंद असल्यामुळे तसेच नुकताच पाऊस होऊन गेल्यामुळे दार उघडताच कुबट वास अपेक्षित होता. घरात प्रवेश करताच प्रत्यक्षात मात्र सुगंधाची दरवळ अनुभवायला मिळाली. त्याहीपेक्षा सुखद घटना म्हणजे चाफ्याच्या फांद्या फुलांनी अक्षरश: डवरलेल्या होत्या.
डिसेंबरनंतर जानेवारी ते जून संपूर्ण कडक उन्हाळा. घरदार खिडक्यांसह संपूर्ण बंद. पाणीच नाही तर ओलसरपणाचाही मागमूस नाही. अशा पूर्ण विपरीत परिस्थितीत चाफ्याच्या फांद्यांनी हा सुखद धक्का दिला होता. अकल्पित म्हणावी अशीच ही घटना. एरव्ही पुरेसे ऊन मिळावे, वेळचे वेळी पाणी घालावे, मधून मधून पोषक खतांचा नैवेद्य दाखवावा, कीटकनाशकांची फवारणी करावी तरीही एखादे लाडके आणि लाडावलेले रोपटे बाळसे धरेलच अशी खात्री नसते. मग चाफ्याच्या या फांद्यांचे पोषण केले कुणी?
'फानुस बनके हवा
जिसकी हिफाजत करे
वो शमा़ क्यूँ बुझे
खुदा जिसे रोशन करे'
कोणत्या अदृश्य शक्तीचं हे वरदान होतं? निसर्गाने काय तजवीज केली असावी ?
विज्ञाननिष्ठ, तर्कशुद्ध वगैरे विचार करू शकणाऱ्या मनाला पडलेले प्रश्न अशा वेळी मती गुंग करून टाकतात हे खरं!

आणि मला प्रत्यक्ष माझ्या घरात घडलेली अशीच एक घटना आठवली. >>>>> दिनेशदा - तुमचेच घर ना, मग अगदी अग्दीच शक्य आहे हे - झाडाला देखील कळतेच की कुठल्या घरात फुलावं ते !! Happy

शशांक, माझा नाही अनुभव हा... श्री अनिल ओढेकर यांचा.

बाकी माझ्या घरात ग्लासमधे पाण्यात ठेवलेल्या बेसिल आणि पुदीन्याला मूळे फुटतात आणि मग ते कुंडीत लावावे लागतात.... असे प्रत्येकवेळी घडते !

आता नगर मध्ये स्थाईक व्हावे का? >>> मीहि विचार केला आता मानुषी कडे रहायला जावे का? (थोडे दिवस तरी??) Happy

मस्त घर आहे.

दा, खुपच छान. चाफा / बेसिल / पुदिना. कोणाच्याही घरी का असेना असे नवजीवन म्हणजे चैतन्यच ना Happy

मानु..कसलं गोड घर आहे तुझं,,, आत्ताच यावसं वाटतंय... Happy

दिनेश, फारच सुंदर आहे अनुभव अनिल यांचा.. प्लेझेंट सरप्राईज यालाच म्हणत असावेत..

मी पण माझ्या बोटांची ग्रीन फिंगर टेस्ट घेऊन बघते... उद्या टाकीन पुदिन्याच्या काड्या पाण्यात( तुझं स्मरण करून ) .. हीही!!!

वर्षू, अगदी सहज जगतो पुदीना..

माझ्याघरी मिरचीच्या रोपट्यावर बारीक हिरवे किडे झाले होते. मी ग्लास क्लिनींग स्प्रे असतो त्याच्या बाटलीत (अगदी थोडेच सोल्यूशन उरले होते त्यात ) भरपूर पाणी ओतले ( एकाला दहा या प्रमाणात ) आणि त्याच बाटलीने स्प्रे केले. किडे गायब !

ही आमच्याकडची बाटली असते तिचा स्प्रे म्हणजे टार्गेट केल्यासारखा एका जागी जातो ( त्याला स्प्रे नाही म्हणता येणार ) त्यामूळे अगदी नेमक्या जागी स्प्रे करता येते.

आपल्याकडचे लिक्वीड सोप पण असे वापरता येतील.. अर्थात खुप माईल्ड सोल्यूशन करावे लागेल.

श्री अनिल ओढेकर अनुभव खरच खुपच सुखद आणि आश्चर्य चकीत करणारा आहे..
काही प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात... फक्त अनुभुती मिळते...

दिनेश, फारच सुंदर आहे अनुभव अनिल यांचा.. प्लेझेंट सरप्राईज यालाच म्हणत असावेत.. +१००
अगं मुलींनो अगदीच ठांकू बर्का! छोट्या गावात रहाण्याचे फायदे!
कुणाकुणाला यायचंय...सगळ्यांनी या. करू आपलं नगरी गटग!
आणि हो ते पुदिन्याचं......... जेव्हा कुंडीत रोपण्याजोग्या काड्या असतात ...पुदिन्याला मी निवडून झाल्यावर त्या काड्या परत रोपते. मस्त पुदिना मिळतो.

वॉव मानुषीताई खुपच सुंदर आहे तुमचं घर. तुम्ही नगरला कुठल्या भागात रहाता.

मला खुप माहीती नाही पण मी सावेडी येथे दत्तमंदीर आणि एम. आय.डी.सी. येथे वॉटरपार्कला गेले होते आणि माझ्या मैत्रिणीकडे विनायकनगरजवळ, तो जुना एस्.टी. स्टँड आहे त्या बाजुला, एवढेच माहीतेय नगर मला.

छान छान फोटो आणि सुंदर माहीती.

मानुषीताईंच्या त्या सुंदर घरातल्या किचनमधे त्यांच्या हातचे चविष्ट जेवण जेवण्याचा आनंद पण भारीच असतो. Happy

मानुषीताईंच्या त्या सुंदर घरातल्या किचनमधे त्यांच्या हातचे चविष्ट जेवण जेवण्याचा आनंद पण भारीच असतो. स्मित>>>>>>> हं.....नलिनी लब्बाड Wink
अन्जू मी दिल्ली गेट परिसरात रहाते. दिल्ली गेटच्या बाहेर.
आणि हो मला एक गोष्ट जाणवायला लागलीये. फोटो खर्‍या घरापेक्षा फारच छान वाटताहेत बहुतेक!
प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट!

'फानुस बनके जिसकी हिफाजत हवा करे
वो शमा़ क्यूँ बुझे जिसे रोशन खुदा करे' >>>>> वाहव्वा, क्या बात है !!! बहोत बढिया, बहोत बढिया .... Happy

सद्या किरण पुरंदरे यांचे पक्षी आपले सख्खे शेजारी वाचते आहे... मस्त पुस्तक आहे..

यात ते सांगतायत शिक्रा हा पक्षी फक्त पाणी पिण्यासाठी झर्‍यावर येत नाही तर उष्णतानियमन करणे ही त्याची महत्वाची गरज असते. (म्हणजे पोटाचा भाग पाण्यात बुडवुन शरीराचं तापमान कमी करणे)..

Pages