निसर्गाच्या गप्पा (भाग २३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 November, 2014 - 14:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.

हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..

तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.

या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...

आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्‍या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..

शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.

तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्‍या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.

(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतेय...

मानुषी, काय सुरेख वर्णन गं. आणि चक्क भारद्वाज भेटीला आला म्हणजे मज्जाय.

यमुना एक्स्पेसवेवरून जाताना काही ठिकाणी पाण्याच्या उथळसर जागा आहेत. तिथे भलेमोठ्ठे पक्षी दिसतात. पण गाडी इतकी वेगात असते की लक्षात येऊन थांबावं तर अर्धा किलोमीटर दूर गेलेलो असतो.

मानुषी.. एकदम भारी आहे घर! मस्त आलेत फोटो! नुसती घराबाहेर नजर टाकली तरी फ्रेश वाटत असेल...:स्मित:
दा, अगदी सुगंधी अनुभव!! Happy

सुप्रभात निगकर्स!
ठांकू मामी शांकली!
आमच्या नगरात हल्ली एक्झॉटिक(!) फ्रूट्स मिळायला लागलीत.
उसगावात अव्हाकाडो भरपूर आणि कीवी कधी तरी खाल्ले.
इथे आमच्या फळवाल्याकडे कीवी दिसले. पण रेट ऐकून घेण्याचं कॅन्सल केलं.
लगेच नवरोबा दुसर्‍या दिवशी जाऊन किवी घेऊन आले. २/३ दिवसांनी म्हणजे आज १ कीवी कापण्याजोगा वाटला. कापला खाल्ला. वॉव सो टेस्टी & ब्युटीफुल्ल! हे पहिले वहिले कीवीज इन आवर नगर!


हे किवी बाहेरून आपल्या चिक्कू सारखं दिसतंय अगदी!
गुलबक्षीचं फूल निरांजनात ठेवायची कल्पना मस्त आहे.. Happy
आत्ता ही पोस्ट लिहिताना खारीचा अगदी कर्कश्श आवाज आला म्हणून बघितलं, तर त्या दोन खारी खाली बघून अगदी जीव तोडून किंचाळताना दिसल्या. मी पण खाली बघितलं तर खाली दोन मुंगूस ओझरती पळताना दिसली. आणि आमची मनी (हे एक माकडच आहे!! अगदी कार्टूनच!) त्या मुंगसांना बघून तिच्या अंगावरचे केस ताठ करून, कान मागे पाडून आणि जितकं होता येईल तेवढं तिरकं तिरकं होऊन मुंगसांकडे बघत होती. (मनातून खूप घाबरलेली असणारे पण आव असा आणला होता की आता येतेच कशी तुमच्या समाचाराला....!!)

वा नवीन नवीन फोटो छान आहेत.

मानुषी, किवी चांगला दिसत आहे. किवी सहसा जास्त दिवस टिकत नाहीत आणि एकदा गरम पडले की खायच्या कामी पडत नाही. म्हणून लगेच संपवून टाकावेत. किवीचे फक्त दोनच खाप करावेत आणि चमच्यानी खरडून गर खावा. मला ही पद्दत माझ्या एका फ्रेन्च कलीगने सांगितली. किवीचा रस पटकन बाहेर येतो तो अशानी वाया जात नाही. हा हिरवा किवी जो जरा स्वस्त असतो. एक गोल्डन किवी येतो तो किमतीने ह्याच्या दुप्पट असतो. किवी खायचा एक वेगळा चमचाही विकत मिळतो. कधीकधी तो किवीच्या पनेट सोबत आतमधे असतो.

जागु, शांकली धन्यवाद.
शांकली जागु दोघींना पण आज मुंगुस दिसले..
मनुषी ताई, किवी एकदम रसाळ दिसतायत!
बी तुम्ही जी किवी खाण्याची पद्दत सांगता आहे त्या पद्दतीनी आम्ही सीताफळं खातो... Wink Happy

सिताफळ असे फळ आहे की दात, दाढ, जीब, पडजीब, ओठ ह्या सगळयंचा वापर होतो. मला सिताफळ अत्यंत आवडते.

बी तुम्ही जी किवी खाण्याची पद्दत सांगता आहे त्या पद्दतीनी आम्ही सीताफळं खातो... Wink स्मित >>> आम्हीही. पण बी आज कीवी असंच खाल्लं चमच्यानी. अहाहा!
किवी खायचा एक वेगळा चमचाही विकत मिळतो. कधीकधी तो किवीच्या पनेट सोबत आतमधे असतो.>>>> अरे वा!
शांकली अगं काय मजेदार दृश्य असेल. मांजर फिस्कारलेली डोळ्यासमोर आली.
मुंगुसावरून आठवलं.....बहुतेक इथे पूर्वी सांगितलं होतं......पुण्याला ८व्या मजल्यावर घर आहे. माझा लेक एकदम प्राणी,पक्षी,निसर्गवेडा. त्याला एकदा (८व्या मजल्यावरून)खालून जाणारी मुंगुसाची फॅमिली दिसली होती, मलाही दाखवली. मला वाटतं आई बाबा आणि ३/४ पिल्लं होती. मस्त सिन्क्रोनाइज्ड नागमोडी रेषेत चालले होते आणि असेच सकाळच्या उन्हात सोन्यासारखे चमकत होते.

सीताफळ मला पण जीव की प्राण...
कालच नवर्‍याने सीताफळ बासुंदी आणली होती... अप्रतिम लागते..
जागुला शांकली लिहायचे होते बहुतेक..

सायली आधी घराच्या कंपाउंडलगत ४/५ झाडं होती सिताफळाची. तेव्हा खूप सिताफळं खाल्ली(आणि पायरीवर बसून बीया समोर फेकत रहायच्या मग परत झाडं यायची..) तारेचं कंपाउंड काढून पक्कं दगडी कंपाउंड केलं तेव्हा सगळी झाडं गेली. मुलांनाही इतकी आवडायची...........माझी लेक "कंठी झळके माळ सीताफळांची" म्हणायची. अर्थात तेव्हा अगदीच लहान होती. Biggrin

वा मस्त फोटो व माहिती.
किवी / सिताफळे अह्हाहा.
मुंगुस बहुदा, नि.ग वर आपण का नाही. म्हणुन सगळीकडे नि.ग वाल्यांना दर्शन देत फिरताहेत Wink

मानुषी वा काय मस्त फोटो आहेत किवीचे
बी असं खाउन पाहिलं पाहिजे किवी आणि सिताफळ पण

लहानपणी सिताफळाची झाडं होती पण आमच्या पेक्षा पक्षीच जास्त खायचे, खास करुन पोपट.

सिताफळाची झाडे विदर्भात खास करुन अकोला वाशिक वगैरे भागात विपुल आहेत. आणि लक्ष्मीपुजेला सिताफळाचा फार मोठा मान आहे. ही फळे पुजेला हवीतच आणि मिळतातच! आमच्याघरी सिताफळाचे झाड आहे अकोल्याला आणि भरपुर फळे धरली आहेत. ही फळे झाडावर पिकत नाहीत पण चार दिवस गव्हात दडून ठेवली की गाभूळतात.

खंड्या क्लासच!! हा बहुधा तुमच्या पुढे, माझे फोटो काढाच! म्हणून अगदी समोर येऊन बसल्यासारखा वाटतोय!!

मानुषी, आपल्याकडे किवीची लागवड यशस्वी होईल का ? त्याचा वेल असतो आणि तो भयंकर माजतो. न्यू झीलंडला माझ्या लेकीकडे आहे. याची पोपटी गर असलेली ( गोल्डन किवी ) जात असते. तिचा गर जास्त चवदार असतो.
तिकडे ते फळ आडवे कापून, गर चमच्याने खायची पद्धत आहे.

पण वर लिहिल्याप्रमाणे वेल माजत असल्याने तो वारंवार छाटावा लागतो.
मुंगुसाची फॅमिली, एकमेकांच्या शेपट्या तोंडात धरून रस्ता क्रॉस करतात. मुंगुसाप्रमाणेच मीरकॅट हा एक जबरदस्त धाडसी प्राणी असतो. पण आपल्याकडे नाही बहुतेक तो. तो सापांचीच काय, विंचवाची पण शिकार करतो.

आधी न बघितलेला प्राणी पहिल्यांदा बघितला कि प्राण्यांची, खास करून पिल्लांची प्रतिक्रिया मजेशीर असते..

सिताफळं... भारतात सामान्य असणारी वस्तू इथे अप्रूपाची आहे. तुरळक झाडे दिसतात पण बाजारात फळे कधीच दिसत नाहीत.

डायनॅमो नावाच्या एका जादूगाराचे कार्यक्रम डिस्कव्हरी चॅनेल वर दाखवत आहेत. काल त्याचा वाराणसीतला
वावर दाखवला. निसर्गातल्या घटकांवर हा माणूस कसे काय गारुड करू शकतो, तेच कळत नाही.. त्याचे वाराणसीतले काही प्रयोग बघा..

१) एका दुकानातली एक लाल सुकी मिरची त्याने घेतली.. आणि डोळ्यादेखत तिची लाल ओली मिरची केली.
२) एका वाडग्यातल्या मिरीदाण्यांच्या घरमाश्या केल्या.. आणि त्या डोळ्यादेखत उडवून लावल्या.
३) एका साधूच्या कोंडाळ्यात एका कागदाच्या बोळ्याला आग लावली
४) गंगेच्या पात्रात असंख्य पेटते दिवे निर्माण केले..
५) एका लहान मुलाला नुसते बोट लावून अधांतरी उभे केले..

हे सर्व तो उघड्या जागी, सर्वांच्या देखत करतो.

हे चित्रीकरण जुने होते. त्याचे नवे प्रयोग आमच्याकडे बुधवारी रात्री ८ वाजता दाखवणार आहे. भारतातली वेळ बघून ठेवा. आणि दाखवणार असतील तर अजिबात चुकवू नका.

माझ्या घराजवळ एक फुड कोर्ट आहे. ते बघा: तिहे शिशिराचय झाडाभोवती फर्न आणि इतर परावलंबी झाडांनी शिशिराला कसे वेढून घेतले आणि त्यामुळे तो परिसर खूपच सुंदर दिसतो:

हा जवळून काढलेला फोटो:

जो.एस. खंड्या मस्तच. आमच्याकडे रोज संध्याकाळी हळद्या, खंड्या शांतपणे झाडावर दिसतात.

Pages