निसर्गाच्या गप्पा (भाग २३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 November, 2014 - 14:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.

हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..

तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.

या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...

आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्‍या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..

शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.

तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्‍या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.

(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>मला ही जायच आहे पण कधी आणि कोणाबरोबर हा मोठाच प्रश्न् आहे. कारण आमच्या अहोंना तशी खास आवड नाही. मीच त्याला नवीन काही दिसल तर दाखवत असते आणि तो नंतर कौतुक करतो. पण आपणहून पक्षी निरीक्षणाकरता जाऊ अस तो म्हणण्याची सुतराम शक्यता नाही.

स्निग्धा अगदी प्रत्येक शब्द आमच्याकडेही लागू आहे. तर मग आपणच दोघी जाऊ एकदा. Happy पक्षी निरीक्षणांचे कॅम्प्स असतात.

रच्याकने, खालील लिंकवर बीएनएचएसच्या डिसेंबरमधल्या वन डे ट्रेल्सची माहिती आहे. मी मागील वर्षी बर्ड रेस (पक्षीगणनेला) गेले होते. कर्नाळा-नवी मुंबई एनआरआय कॉलनी जवळ फ्लेमिंगो येतात तिथे-शिवडी व शेवटी पवई लेक अशा ठिकाणी दिवसभर हिंडलो. फार मजा आली होती.
या पावसाळ्यात संजय गांधी पार्कातल्या शिलोंडा ट्रेललाही गेले होते. मस्त अनुभव होते.

http://bnhs.org/bnhs/nature-trails-camps/nature-trails

अदिजो.. मस्त आलेत फोटो!! केवढा मोठ्ठा असतो हा पक्षी! एखादा समोर आला तर त त प प होईल!!........

वा! मज्जा आली.

मानुषी, खूप सुंदर वर्णन केले तुम्ही. तुमच्या त्या घराचे तरी निदान फोटो इथे चढवा. बघू त्या ती बाग, जाळीदार खिडकी आम्हाला Happy

अदिजो, सुंदर फोटो दाखवलेस. शेवटचा ग्रेटच! प्डलेली मासे परत उचलून ही लोक खात नाहीत का? आम्ही तर चिवड्यातील शेंगदाणा पडला की परत उचलून खायचो Happy अजूनही Happy

शांकली, सांज मल्लिगो .. खरच गोड नाव.

अदिजो, सुंदर फोटो दाखवलेस. शेवटचा ग्रेटच! प्डलेली मासे परत उचलून ही लोक खात नाहीत का? आम्ही तर चिवड्यातील शेंगदाणा पडला की परत उचलून खायचो स्मित अजूनही स्मित +++ Lol Lol :

सांज मल्लिगो .. गोड आणि समर्पक नाव. धन्यवाद.

पक्षीगण पण मानव निरिक्षण कँप्स घेत असतील का ? आपल्याबाबत त्यांची देखील काही मते असतीलच.. कावळे, कबुतरांनी बरेच संशोधन केले असणार.. आता बुलबुल करताहेत !

वाचतेय. सर्व पोस्टस आणि फोटोज सुंदर.

मानुषीताई श्रीरामपूरला असते तर तुमचे घर बघायला आले असते. आता इतक्या लांबून शक्य नाही.

आम्ही तर चिवड्यातील शेंगदाणा पडला की परत उचलून खायचो स्मित अजूनही स्मित
>>>>>>>>>> बी Biggrin
अरे बी ...माझी तीच जुनी रडकथा आहे...........आय पॅड वर फोटो काढता येतात पण ते माझ्या घरातल्या वाय फाय शी कनेक्टच होत नाहीये. प्रयत्न चालू आहे. माझा कॉम्पवाला लढतोय.
त्यामुळे सध्या ये रे माझ्या मागल्या ...लॅप टॉप आणि टाटा फोटॉन झिंदाबाद. त्यामुळे फोटो सध्या तरी नाहीत .
जुने बघून डकवीन.
अन्जू मला वाटतं डोंबिवलीहून नगर ला येणंही तितकंसं अवघड नाही :स्मितः

आम्ही तर चिवड्यातील शेंगदाणा पडला की परत उचलून खायचो >>>> Proud
पक्षीगण पण मानव निरिक्षण कँप्स घेत असतील का ? आपल्याबाबत त्यांची देखील काही मते असतीलच.. कावळे, कबुतरांनी बरेच संशोधन केले असणार.. आता बुलबुल करताहेत !>>>>> दा, माणसा सारख्या विक्षिप्त, बेभरवशी आणि क्रूर प्राण्याचं [ह्यात काही सन्माननीय मंडळी मात्र अपवाद आहेत हं!]त्यांचं निरीक्षण मला वाटतं खूप प्राचीन असावं... पिढ्यानपिढ्या त्यांना ते ज्ञान मिळत गेलं असावं (हे मा वै म )

फोटोंच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
>>प्डलेली मासे परत उचलून ही लोक खात नाहीत का? आम्ही तर चिवड्यातील शेंगदाणा पडला की परत उचलून खायचो Lol

सुदुपार नेहमीप्रमाणे छान छान वाचतेय... सुंदर सुंदर फोटो पहातेय....
अंबाडीची फूले तोडायला झाली आहेत का? सायलीने दिलेल्या पाकृने चटणी करावी म्हणते ...

मला वाटले ती जास्वंदी आहे का आणि कोवळ्या उन्हात फुललेली झाडे आणखीच सुरेख दिसतात मग ते उन्ह पहाटेचे असो वा तिन्हीसांजेचे.

मंजु ताई, मस्त फोटो,,, छान वाढतय आंबाडीच झाड.. फुलाची चटणी कर.. आणि पानांची भाकरी कर.. Happy
पा.कॄ. बी नी दिलेलीच आहे.. भाजी नाही होणार कमी पडेल..

रच्याकने, आंबाडीच्या बीया, आपल्या गटग मधल्याच आहेत का? श्री येते यांनी वाटल्या होत्या..

@बी - नजरचूक झाली की.... एक खास वर्‍हाडी शिवी Happy .. तू इकडचाच म्हणून जाऊ दे ... अंबाडीची फूले ..... ओळख पाहू .... शिवी ... हलकेच घ्या .... बीभाऊ...

व्वा.. सुंदर सुंदर फोटो आणी माहिती..
आदिजो, फारच सुर्रेख आहेत पक्षी..

मानुषी, मी ही समोरच्या अंगणातले भारदस्त भारद्वाज नुस्तेच चालत इकडून तिकडे जाताना पाहाते.. इतके गुटगुटीत आहेत, म्हणून की काय झाडांच्या लोएस्ट पॉसिबल शाखेवर जेमतेम हुश्श्य करत उडून बसलेले पाहिलेत..
बी Rofl पक्षी बहुतेक ,' हम नीचे गिरे हुए मासे नही उठाते ' असं अमिताभ च्या इश्टाईल मधे म्हणत असावेत..

पक्ष्यांना तेवढी समज नसावी, म्हणजे मासा हा फक्त पाण्यातूनच मिळवायचा ( ताजा, फडफडीत ) जमिनीवरचा उचलायचा नाही... असे त्यांच्या डोक्यात फिक्स्ड असावे.

शांकली, माणसांची संपुर्ण उत्क्रांती पक्ष्यांनी बघितलीय.. ते बहुदा आपल्या आधी होतेच. त्यांच्यातही काही बदल झालेत म्हणा. पण हे प्रकरण ( मानव ) आपल्या डोळ्यादेखत (बि)घडलंय.. असेच त्यांना वाटत असणार.

खूप दिवसांनी इकडे यायला मिळालं आज. केवढं तरी वाचायचं राहिलंय. पण त्याआधी हजेरी लावायचीय, आणि ही लिंक शेअर करायचीय:
https://www.coursera.org/course/plantknows
कोर्सेरा वरचा कोर्स आहे हा. झाडांना कसं दिसतं, वास कसा येतो, स्पर्शज्ञान असतं का, ऐकू कसं येतं अशी सगळी रंजक माहिती आहे. जरूर बघा!

मंजू अंबाडी छाने गं...करच चटणी. माझी फुल्ल टू पर्वानगी Proud
वर्षूकडचे गबदुल(आणि आळशी सुद्धा!) भारद्वाज डोळ्यापुढे आले!

Pages