निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.
"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.
हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..
तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.
या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...
आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..
शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.
तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.
(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)
नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
फ्लॉवर किसून केलेली
फ्लॉवर किसून केलेली "साबुदाणा" खिचडी. नीधपची रेसिपी आहे.+++क्या बात है!

या दोन मुलांनी सर्व भाज्या खाल्ल्या नाहीत तर वाढ कशी होणार त्यांची ?
मनुषी ताई
जिप्सी आणि रीया, या उनाड
जिप्सी आणि रीया, या उनाड मूलांना माझ्याकडे पाठवा बघू, महिनाभर फ्लॉवर सप्ताह करेन.>>>>दिनेशदा, ७ दिवस कशाला? चांगल १५ दिवस येतो कि. पण फ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही ते ई-मेजवानीत दिलेले पदार्थ बनवा.
दिनेश ......गुर्जी काय ऐकत
दिनेश ......गुर्जी काय ऐकत नाय!
असो..........गुर्जी तुम्हाला बिलेटेड हॅप्पी अॅनिव्हरसरी! एन्जॉय!
ताटात वाढलेलं सगळं खायचं असतं
ताटात वाढलेलं सगळं खायचं असतं रे बाळा... उद्या ही भाजी करायचीच म्हणून बाजारातून घेऊन येऊ असे नसते रे आमच्याकडे, आज हिच भाजी मिळाली, तिचे काय करू ? असे असते.
एखाद्या भाजीची नावड तयार व्हायला एखादे कारण असते, पण त्या आठवणीला शह देणारा पदार्थ समोर आला, तर परत आवड निर्माण होऊ शकते.
मला काही भाज्या आवडत नसत पुर्वी.. पण आता तशी एखादीच भाजी असेल.
ताटात वाढलेलं सगळं खायचं असतं
ताटात वाढलेलं सगळं खायचं असतं रे बाळा... >>>> कोण कोणाला म्हणेल .... वर्षभराने ......

(No subject)
हल्ली पहाटे सायन किल्ल्यावर
हल्ली पहाटे सायन किल्ल्यावर फिरायला जाणे सूरू केले आहे. किल्ल्या वर जायच्या रस्त्यावर अनेक बहरलेली झाडे अचानक सुकलेली दिसली, एकही पान नाही आणि खोडाचा रंग ही काळा पडलेला. बहुतेक त्या झाडांच्या मुळांशी अॅसिड वैगरे घातले असेल असे वाटते .
मागेच लोकसत्ता मधे याबद्द्ल लिहिण्यात आले होते. मुंबईत अनेक ठिकाणी अशी झाडे आढळून आली आहेत. खूप वाईट वाटले ती सुकलेली झाडे बघून.
किल्ल्यावर फिरताना मस्त वाटते. खूप्श्या खारूताई इकडे तिकडे पळत असतात. पोपट मोठ्या संख्येने आहेत.
सामी, खुपदा जाहीरातीच्या
सामी, खुपदा जाहीरातीच्या फलकांना अडचणीची ठरणारी झाडे अशी "मारली" जातात. हळू हळू सुकत जातात झाडे.
मुंबईत कुणीही एखादी फांदी तोडली तर तो गुन्हा ठरतो. पण असे करणे गुन्हा नसावा.
शशांक, "बाबा आधी तू खा, मग मी खाईन.". असे बोलायला शिकवू या आपण बाळाला !
दिनेशदा, शशांक मानुषीताई,
दिनेशदा, शशांक

मानुषीताई, धन्यवाद
उद्या ही भाजी करायचीच म्हणून बाजारातून घेऊन येऊ असे नसते रे आमच्याकडे, आज हिच भाजी मिळाली, तिचे काय करू ? असे असते.>>>>>तुमच्याकडे जेंव्हा येऊ तेंव्हा रेडी टु इटची काही पाकिटं घेऊन येतो, ज्या दिवशी फ्लॉवरची भाजी असेल त्यादिवशी मी याच्यावर ताव मारेन, हाकानाका.
बहुतेक त्या झाडांच्या मुळांशी
बहुतेक त्या झाडांच्या मुळांशी अॅसिड वैगरे घातले असेल असे वाटते .>>>>हा अतिशय क्रुरपणा आहे.
जिप्स्या... विसरलेच.. तुला
जिप्स्या... विसरलेच.. तुला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा...
मुंबैत रेनट्रीवर कसलातरी रोग आलाय आणि ती सगळी झाडे मरताहेत असे महापालिकेने निवेदन दिलेय.. मला आधी अॅसिड वाटले पण तसे नसावे कारण आजुबाजुची इतर झाडे आहेत आणि फक्त रेनट्रीच जाताहेत.
ताटात वाढलेलं सगळं खायचं असतं
ताटात वाढलेलं सगळं खायचं असतं रे बाळा... >>>> कोण कोणाला म्हणेल .... वर्षभराने
सामी काय मस्त वाटत असेल ना कील्यावर फिरायला..
किती दिवसानी इथे लिहित आहे.
किती दिवसानी इथे लिहित आहे. काल तुम्ही माझी आठवण काढलीत निग वर किती छान वाटल . निग वर मन रमत आणि पुन्हा पुन्हा इथे यावस वाटत ते म्हणूनच.
जवळ जवळ मागचा सर्व महिना भर मी रोमामध्येच होते. पीसी नव्हता त्यामुळे मोबाईल वरच वाचत होते फक्त. तसतर मोबाईल वर मराठी टाईपता येत पण वेळ लागतो आणि तेवढा वेळ ही नव्हता माझ्याकडे. पण आता येत जाईन नियमितपणे.
बाकी धागा मस्त धावतोय. सर्वच फोटो माहिती मन रमवणारी.
जिप्सी, फुगोच्या बाबतीत तुमच्याशी १०० टक्के सहमत. मला ही ही भाजी घ्यायच कधी धाडस होत नाही.
अजून एक फुलपाखरु. ब्ल्यू
अजून एक फुलपाखरु. ब्ल्यू टायगर नाव असावे बहुतेक. शांतपणे बसले होते.

दिनेशदा, साधना हा रोग असेल
दिनेशदा, साधना हा रोग असेल तर ठीक आहे , पण अॅसीड घालून झाड मारण्याचे प्रकार पण होत असतात .
मागे काही झाडांना खिळे ठोकलेले आढळले होते. लोकासत्ता मधे बातमी आणि फोटो आले होते.
सामी काय मस्त वाटत असेल ना कील्यावर फिरायला..> हो सायली मस्त वाटते .:-)
वर्षा मस्त फोटो ....सुरेख रंग
वर्षा मस्त फोटो ....सुरेख रंग आहेत.
हेमा ताई, कीत्ती दिवसांनी..
हेमा ताई, कीत्ती दिवसांनी.. बापरे!
वर्षा मस्त फु.पा..
फक्त रेन ट्री वर.. मला आमच्या
फक्त रेन ट्री वर.. मला आमच्या कॉलेजचा परीसर आठवला.. आपण ही झाडे नेहमी खालून बघतो.. आमच्या वर्गातून त्याचे छत वरून दिसत असे. पण असे न घडो, पण जर ती झाडे नष्ट झालीच तर त्याजागी आपला शिरिष लावला पाहिजे.
वर्षा, छानच फोटो. थोडा क्रॉप केला तर जवळून बघता येईल.
आसिड घालुनही मारतात झाडे.
आसिड घालुनही मारतात झाडे. झाडाचा बुंधा सोलुनही मारतात झाडे.लोकांना झाडे का नकोशी होतात देव जाणे. झाडे नकोशी पण ते स्वतः मात्र त्यांना हवेसे...
कोण कोणाला म्हणेल ....
कोण कोणाला म्हणेल .... वर्षभराने ...... स्मित >>>>>>>>> शशांक दिनश +१०००
दिनेश्,शशांक..
दिनेश्,शशांक..

जिप्स्या.. परत तूच्चे टारगेट ( टारगट असं नको वाचूस चुकून
)
वर्षा, सुंदर आहे फुलपाखरू..
खूप वर्षांपूर्वी माथेरान का कुठल्याश्या दरीत ,' फुलपाखरांचं पीक' येतं असं वाचलेलं आठवतंय अंधुकसं..
अजून कुणाला माहितीये का याबद्दल???
मुंबईत कितीतरी मोठ- मोठ्या वृक्षां वर विषप्रयोग झालेत, न्यूजपेपर्स मधे अश्या बातम्या वाचून इतका जीव कळवळतो ना.. कसली माणसं असतील ती..
वर्षाने सध्या ब्रश, रंग,
वर्षाने सध्या ब्रश, रंग, रंग-पेन्सिल्स सोडून कॅमेरा धरलेला दिस्तोय हातात - फोटोग्राफीही अतिशय सुरेख आहे हां ....
पण चित्रकला ती चित्रकलाच - आणि त्यातून वर्षाची तर एकमेवाद्वितीय ... केवळ सुपर्ब ....
याकडे दुर्लक्ष करु नये ही नम्र विनंती ...
मला पानकोबी पिठ पेरुनच आवडते
मला पानकोबी पिठ पेरुनच आवडते आणि फुलगोभी बारीक निवडून (चिरुन नव्हे) बटाट्याच्या बारीक चकत्यांसोबत एकत्रित फोडणी दिलेली आवडते.
जिप्स्या.. परत तूच्चे टारगेट
जिप्स्या.. परत तूच्चे टारगेट (>>> हेच लिहिणार होते मी पण.
अलिकडे आलेले फुलपाखरांचेह फोटो फारच सुंदर आहेत.
हा मध्यंतरी घरी फुललेला मोगरा.
मला तोंडलीचा फुटवा हवा
मला तोंडलीचा फुटवा हवा आहे...कुणी देउ शकेल काय?
माझा मोगरा गेला...काहिही कारण
माझा मोगरा गेला...काहिही कारण नसताना...जीव जळतोय नुसता...आता नवीन आणावा लागणार
वैशाला माझ्याकडे मिळेल.
वैशाला माझ्याकडे मिळेल. मागच्या जिटीजीत मी आणला होता. पलक कडे चांगला वाढला आहे म्हणाली. अजून कोणी कोणी नेला होता? आणि गुलछडी वाढतेय का ?
जिप्स्या तू दिलेल्या मोगर्याची फांदी अजून निट बाळसे धरत नाहीये. आता जरा उन्हात नेउन ठेवेन.
वैशाली कुठे रहातेस? माझ्याकडे
वैशाली कुठे रहातेस? माझ्याकडे वरील मोगर्याच्या फांद्या वरवर जाताहेत. वेली टाईप. तुला हवे तर देऊ शकते मी.
तोंडली माहिती आहे पण तोंडलीचा
तोंडली माहिती आहे पण तोंडलीचा फुटवा म्हणजे काय ते कळले नाही. माहिती पुरवावी. धन्स.
मोगरा मस्तच!
वाह मस्तच आहे मोना तुझा
वाह मस्तच आहे मोना तुझा मोगरा...
Pages