निसर्गाच्या गप्पा (भाग २३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 November, 2014 - 14:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.

हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..

तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.

या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...

आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्‍या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..

शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.

तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्‍या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.

(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोखंडी ग्रील म्हणजे बॉक्स ग्रील ज्यात तुला कुंड्या ठेवता येतील. असो..
तुझ्या गच्ची चा / बागेचा फोटो टाक .
दा Happy
हेमाताई नाही दिसत ना सध्या +++१

जिप्स्या, खरेतर वरच लिहिणार होते की आता सगळे नीट झाले की परत हॅमॉक टांगणार आणि मग जिस्प्याला सकुसप बोलावणार म्हणुन, पण आवरले स्वतःला. Happy

साधना, आता तूला उभ्या दिशेने झाडे लावाली लागतील. म्हणजे एक स्टँड घ्यायचा. त्याच्या सभोवताली पण किंचीत कोनात कुंड्या किंवा बाटल्या ठेवायच्या. आणि त्यात भाजीपाला लावायचा. कमी जागेत जास्त रोपे मावतील.

साधना , फक्त जिप्स्यालाच का बरं आमंत्रण्??????हाँ????

जिप्स्या.. फूलगोभी के पराठे, चटपटे पकौडे ट्राय कर... Happy

हं...... छाने वर्षूचं येल्लो येल्लो फुलपाखरू.
आमच्याकडचा पावसाळा(!!) आज बहुतेक संपेल. आत्ता जरा जरा फिक्कट ऊन पडलंय.

आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.+१११११
या धाग्यावर मी तासनतास घालवु शकते.

साधना , फक्त जिप्स्यालाच का बरं आमंत्रण्??????हाँ???? >>>>>>वर्षूदी, तिने दिलंय कि आमंत्रण. जिप्स्या आणि सकुसप. सकुसपमध्ये तुम्ही सगळे आहातच कि. वेगळं आमंत्रण कशाला? Wink Happy

जिप्स्या.. फूलगोभी के पराठे, चटपटे पकौडे ट्राय कर..>>>>>नाही आवडत. Sad Sad

होय गं रिया.. त्या फु पा चे पंख कुणीतरी कुरतडल्यासारखे दिसत होते.. Sad

बर्बरं जिप्स्या.. सकुसप.. Happy

अर्र्र्र. फू गो न आवडणारा तूच पहिला बंदा रे जिप्स्या..

वर्षु दी, गोड आहे फुलपाखरु...
वर्षु दी मनोगत आवडल्या बद्द्ल धन्यवाद..
सुरेख Happy

वर्षू, मस्त टिपलेय फुलपाखरू.

आजच्या लोकसत्तामधे झांबियातील एका हत्तीच्या पिल्लाने, त्याच्यावर हल्ला करणार्‍या १४ सिंहांना पळवून लावल्याची बातमी आहे.
त्याची क्लीप यू ट्यूबवर आहे, अवश्य बघा.

पंख तुटलेली फुलपाखरे दिसण्याचे कारण म्हणजे, काही पक्षी त्यांचे पंख धरतात. पण पक्ष्यांना त्याची "चव" न आवडल्याने किंवा त्या पंखात विषारी द्रव्य असल्याने त्यांची सुटका होते. पंख तुटल्याने फुलपाखराचे फारसे नुकसान होत नाही, ते उडू शकतेच.

ची क्लीप यू ट्यूबवर आहे, अवश्य बघा.>>> हो दा. परवा बातम्यात दाखवत होते. छान आहे ती. अगदी जगण्यासाठीचा संघर्ष वगैरे नाहि म्हणता येणार. पण प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर काय होऊ शकते हे छानच टिपले गेलेय त्यात.

मला पराठे नाही आवडत भाजी आवडते
जिप्स्या नको सांगूस नाही तर मी आधीच ४-५ भाज्या खाते त्यातली पण एक कमी होईल Uhoh Sad

जिप्सी आणि रीया, या उनाड मूलांना माझ्याकडे पाठवा बघू,
महिनाभर फ्लॉवर सप्ताह करेन.

फ्लॉवरचे लोणचे, भजी, पराठे, पुलाव, दबदबीत, पुलाव, बिर्यानी, तंदूरी गोभी, खिचडी, ग्रांते एवढेच नव्हे तर आईस्क्रीमही खाऊ घालेन.

असलं काही समोर ठेवलं, तर ओळखताही येणार नाही त्यांना !

fsk.jpg

फ्लॉवर किसून केलेली "साबुदाणा" खिचडी. नीधपची रेसिपी आहे.

या दोन मुलांनी सर्व भाज्या खाल्ल्या नाहीत तर वाढ कशी होणार त्यांची ?

फु गो न आवडण्याचं कारण म्हणजे............... विटयामीन 'अ' का? (अळी) Biggrin खो खो>>>>>>>>>>>>
सायली................:खोखो:

मी फक्त कोबी आणि फ्लॉवरचे पराठे नाही खात.
फ्लॉवरची भाजी आवडते.
तरिही दिनेशदा तुम्ही मला तुमच्या पद्धतीने भाज्या खाऊ घालणार असाल तर -
मलाना कारलं आणि वांगं सोडून कोणतीच भाजी आवडत नाही Proud

Pages