निसर्गाच्या गप्पा (भाग २३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 November, 2014 - 14:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.

हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..

तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.

या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...

आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्‍या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..

शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.

तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्‍या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.

(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, लक्षात आले. धन्यवाद.

गाजराची झुडपं स्वत:च्या हाताने उपटून गाजरे खाऊन वर्षे लोटली! पूर्वी फिकट गुलाबी/नारंगी रंगाची आणि आताच्या तुलनेत सडपातळ पण आतून भरीव/मांसल गाजरं असायची. ही गाजरं चवीला गोड असायची. आम्ही उकडूनही खायचो. माझी आजी कच्च्या गाजरांचे तुकडे करून साठवणूकीसाठी मांडवावर वाळत घालायची. ऐनवेळी खाऊसाठी हट्ट धरला तर उतरंडीच्या लोट्यातून वाळवलेल्या गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगासोबत आम्हाला द्यायची. ते वाळवलेल्या गाजराचे चिवट तुकडे चघळायला अशी मजा यायची की बास! हल्ली फक्त म्हशींना घालायला म्हणून संकरीत गाजरं केली जातात. चवीला नुसती पांचट. मंडईत येतात तीही संकरीत. आपले कोणते ते जीवनसत्त्व मिळावे म्हणूनच मी ते जबरदस्तीने खातो. Proud

धन्स शशांकजी त्यादिवशी वॉट्सअ‍ॅपवर शेअर केलेले तेंव्हा उजूनेही हे नाव सांगितले होते.

गजानन गाजरे सुकवूनही खातात हे पहिल्यांदाच कळले.

त्या पिकलेल्या ताडफळांना आमच्याइथे ताडफुळं म्हणतात, मोड आलेल्यांना मोडहाट्या, मुळांना तारले.

हे घ्या ताडगोळे.

जागू, तूला जर परत असे कोयता घेऊन शेतात जावेसे वाटले ना तर मी आणि साधना नक्की तूला सोबत करू !

बी, ते ग्लासातले फूल प्रोटीआ. दक्षिण आफ्रिका देशाचे ते राष्ट्रीय फूल आहे. हे फूल फक्त दक्षिण गोलार्धातच सापडते. मी एक लेख लिहिला होता त्यावर.

धन्यवाद दिनेशदा.

जागू, हे फळ पाहिले आहे मी आणि एकदा कळव्याला ट्रिप गेलेली मुंबईत नोकरीला होतो तेंव्हा कलीगने हे फळ दिले होते.

जागु दिनेशना विमान पकडायला वेळ लागेल, तोवर मी आलेच. अगं तुझ्या उरणवरुन एक बाई याय्ची ताडगोळे घेऊन ती नेमकी माझ्या ९.४५ च्या एस्टीत असाय्ची. मी विस रुपयाचे ताडगोळॅ घ्यायचे तिच्याकडुन आणि ऑफिसात गुपचुप सोलुन खायचे. आता मेला ऑफिस टाईमच ९.३० चा केल्यावर ती एस्टीही गेली आणि बाईही. Angry एकदा दोनदा तुझ्या भाषेतल्य अभयाच्या शेंगाही होत्या तिच्याकडे Happy

अरे वा मस्त आहेत सर्व फोटो आणि माहिती.

ताडगोळे इथेही मिळतात. दुपारी उन्हात खायला मस्त लागतात.

अबईच्या शेंगा बाबा आणायचे आम्ही लहान असताना भाजी करायला पण आता आठवत नाही भाजी आई कशी करायची, चव वगैरे काहीच आठवत नाही.

मला सिंगापूरला, सुकवलेले ताडगोळे मिळाले होते. अगदी जुन्या आठ आण्याच्या नाण्याएवढाच आकार. चव तशीच.
ते कृत्रिम होते का ते आठवत नाही.. पण चव मस्तच होती.

जर ताडगोळे सुकवणे शक्य असेल तर आपल्याकडे पण जमायला हवे ते.

अबईच्या शेंगा.

ओक्के साधना.
बघा दिनेशदा साधना कशी लब्बाड आहे. Lol

बी फक्त मिठ घलून उकडायचे तारले.

जागू, ती मूळे पण सुकवतात. मी खाल्ली आहेत. उकडून सुकवतात का तशीच ते माहीत नाही. मी एका तामिळ मुलीकडे खाल्ली होती. सुदैवाने तिला मराठी येत होते, म्हणून तिने मराठी नाव सांगितले. तामिळ नाव माझ्या लक्षात नसते राहिले !

साधना, लहान आहे गं अजून ! ( शिवाय लब्बाड मांजरांची संगत लागलीय तिला Happy )

लब्बाड मांजर,,, Rofl साधना.. आज तुझं काय खरं नाई!!!

जागु.. तुझ्याकडे काय काय गम्मत जम्मत असते गं... मस्त..

हिच्या लब्बाडपणाला कंटाळून मांजर पण सोडून गेली (दिवा घे ग) Lol

वर्षू ताई माझ्या लहानपणी अशा खुप गमती असायच्या. आता गमती समोर असुन पण अनुभवता येत नाहीत वेळेअभावी.

या ताडगोळ्यांची पण मजाच आहे. मुंबईच्या उत्तरेला पश्चिम रेल्वेने गेलो तर खुप दिसत राहतात. पण कोकणात अजिबात दिसत नाहीत ती. सुपारीचे उलट आहे. ती जास्त करून कोकणातच दिसतात.

.

सुप्रभात लोक्स Happy
सध्या चिक्कार बीझी असल्याने इथे जास्त येणे होत नाही. फक्त वरवर चाळतोय. ह्या विकएण्डला निवांत वाचेन. Happy

हाय जिप्सीभौ कसे आहात?
जागू इथल्या बाजारातही गाडीवर कधीतरी ताडगोळे दिसतात.
अंगणातला कढिलिंब(कढिपत्ता) .........त्याचा आता वृक्ष झालाय. असाच एक अजून वृक्ष पुढच्या गेटपाशी सुद्धा आहे. ४/५ लोकांना सांगितलंय की ही झाडे घेऊन जा. पण कुणी फिरकतच नाहीये. एकदा ही दोन्ही झाडं तोडली की नवीन छान पालवी फुटेल.

कंपाउंडवरची जाई

वॉव चक्क दोन्दोन क प चे वृक्ष>??? लक्कीश...

इथे सोसायटी च्या अंगणात इचके मिचके चिटुकपिटुक रोपं आहेत.. एखाद वेळी लागलं तर जाऊन नाजूक हाताने काही पानं घेऊन येते Happy

भाजीवाले जून झालेली फांदी फुकट टाकताना दरियादिली चा आव आणतात Angry

जिप्स्या बिझलाय, कशात ते काय सांगितलं नाईये त्याने Proud

आमच्याकडे कढीपत्त्याचे झाड आहे पण खरे सांगू खूप त्रास होत आहे. बुचाचे पण आहे पण दोन्ही प्रिय झाडे त्रासदायक झाली आहेत. जिथे तिथे कोंब फुटले आहेत. कळत नाही काय उपाय करावा. फरशी फोडून कोंब वर येतात. आम्ही अकोल्याला सहासहा महिने नसतो घरी. घर बंद राहत. घरी गेलो की ढीगभर हीच झाडे फोफावलेली दिसतात. मी तर सुचवेल की ही झाडे अंगणात लावूच नये.

कढीपत्त्याला खप नाही आपल्याकडे. दक्षिणेकडे त्याचा जास्त वापर करतात. आणि रोज बाजारात मोठमोठ्या फांद्या तोडून आणल्या जातात.
मला मात्र इथे अंगोलात मिळत नाही. केनयात बाजारात मिळायचा आणि नायजेरीयात तर माझ्याच अंगणात झाड होते.

हे झाड रोज तोडत राहिले पाहिजे. याची टीकाऊ चटणी होते छान. याने कोलेष्ट्रॉल वर नियंत्रण राहते. नेहमी खाण्यात असावा तो.

अबईच्या शेंगा म्हणजे काय?>>> मागच्या आठवड्यात विचारल असते तर लगेच फोटो टाकला असता ना. ३-४ दिवसांपुर्वीच संपवल्या. घेवड्यासारख्या चपट्ट पण जाडी, रुंदी व लांबी पण जास्त असलेल्या शेंगा असतात ह्या.

जागुच्या लेखनात जाऊन बघ. तिने टाकलीय रेस्पी.

कढिपत्ता अमर आहे. एकदा लावला की त्याची मुळॅ जमिनीखालुन प्रवास करतात आणि मिळेल तिथे डोके वर काढतात. आंबोलीला पाहिलेय मी त्याला असे फिरताना.

बुचाचे झाडहि असे फिरते हे माहित नव्हते.

कढिपत्ता अमर आहे. एकदा लावला की त्याची मुळॅ जमिनीखालुन प्रवास करतात आणि मिळेल तिथे डोके वर काढतात. >>>>> सत्यवचन .... Happy

फिरत फिरत अंगोलाला येऊ द्या कि !
मधुमालतीचा वेलही असाच फिरतो.

मश्रुमचे धागेही असेच जमिनीखालून फिरत राहतात. आपण बघतो ते त्यांचे दॄष्य रुप, पण जमिनिखालीच नव्हे तर झाडांच्या मूळातही असे धागे गुंतलेले असतात. आणि याच धाग्यांचा वापर करून झाडे एकमेकांशी "संपर्क" साधत असावीत, असा एक विचार आहे.
असेलही. मानव इथे यायच्या आधी कोट्यावधी वर्षे वनस्पति इथे आहेत. त्यांनी हे तंत्र विकसित केलेही असेल. सगळेच आपल्याला समजते / समजलेय.. असा भ्रम मानवाने करू नये, हेच बरे..

( एवढे मोठे मलेशियन एअरलाइन्सचे विमान अजून सापडत नाही Sad )

बी.. कुणाला कशाचे तर नकटी ला नाकाचे.. Lol म्हणून आमच्या चिमुकल्या क प च्या रोपांच् इत्कं कौतुक रे

या वेड्यागत वाढणार्‍या झाडा ला काय म्हणायचे आता.. आता तर जमिनीवर पहुडल्यासारखं वाढत आहे... (पनामा ला दरवर्षी एका पार्क मधे उभे आडवे पाहात आलेय या झाडाला..)

Pages