Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40
क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकदिवसीय सामन्यातलं रायुडूचं
एकदिवसीय सामन्यातलं रायुडूचं पहिलं व धडाकेबाज शतक. अभिनंदन. विश्वचषकाची तारिख जवळ येत असताना भारतीय खेळाडू फॉर्मात येणं आश्वासक वाटतंय.
असामीजी, अगदीं खरंय. अर्थात, दत्तू फडकर, रंगा सोहोनीपासून चंदू बोर्डे, मोहिंदर अमरनाथ, रॉजर बिनी... आतांचा जडेजा... अशी ऑलराऊंडर्स म्हणवून घेणार्यांची एक लांबलचक रांगही आहेच !!
जाम बोर होतेय मॅच बघायला..
जाम बोर होतेय मॅच बघायला.. श्रीलंका टफ का देत नाहीये.. बॉलर फालतू आहेत ठिकाय, पण बॅटसमननी तरी मारावे ३००+
लोकेश राहुलला नेण्याची घाई
लोकेश राहुलला नेण्याची घाई आतातरी करु नये.
धवन आणि रहाणे ओपनिंगला आहेत. जरुर पडली तर रोहीत शर्माही ओपन करु शकतो किंवा मिडील ऑर्डरमध्ये खेळू शकतो. मिडल ऑर्डरला कोहली, रैना, रायडू, धोनी हे कन्फर्म असतील. जाडेजा, अश्विन नक्कीच असतील. बॉलर्स मध्ये भुवनेश्वर कुमार, शमी (तोपर्यंत रिकव्हर होईल अशी अपेक्षा), इशांत शर्मा (हरे राम!) आणि कदाचित बिन्नी आणि अॅरन. एक्स्ट्रा विकेटकिपर म्हणून सहा ऐवजी दिनेश कार्तिक कधीही चांगला. तो केवळ बॅट्समन म्हणूनही खेळू शकतो गरज भासल्यास. अक्षर पटेलही जाईल बहुतेक.
दुर्दैवाने या सगळ्यात युवराज सिंग आणि गंभीरला चान्स मिळेलसं वाटत नाही. दोघांचाही अनुभव खूप महत्वाचा ठरु शकतो.
मीसींग युवराज सींग ऑल्वेज....
मीसींग युवराज सींग ऑल्वेज....



अक्षर पटेलही जाईल बहुतेक.
अक्षर पटेलही जाईल बहुतेक. ...>>>> तो हवाच !
फक्त आश्विन, जडेजा, अक्षर पटेल असे तीन फिरकी एकाचवेळी आपण ११ मध्ये नाही खेळवू शकत.
येणारा ऑस्ट्रेलिया दौराच सांगेल की कोण सरस ठरतेय त्या कंडीशनमध्ये.
मला वाटते कि लोकेश, मिश्रा चा
मला वाटते कि लोकेश, मिश्रा चा उल्लेख टेस्ट च्या संदर्भात आहे नि अक्षर पटेल वगैरे ODI साठी.
एकेकाळी, ऐंशीच्या दशकात,
एकेकाळी, ऐंशीच्या दशकात, झिम्बाब्वे नंबर नऊचा आणि श्रीलंका नंबर आठचा संघ होता .. या मालिकेत तो तिथेच वाटतोय !
<< या मालिकेत तो तिथेच वाटतोय
<< या मालिकेत तो तिथेच वाटतोय ! >> या मालिकेची जाहिरात तर " The World Champions v/s The World Champions " , अशी केली जातेय 'स्टार'वर !
मला वाटतं कोणत्याही मालिकेसाठी क्रिकेटच्या प्रत्यक्ष सरावाइतकीच मानसिक तयारीही आवश्यक असावी. ' बोलावलं भारतानं, चला खेळूया जावून तिथं', असं म्हणत अचानक उठून येवून आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचाच हा परिणाम असेल !!!
धोनी कुठे कसा कधी जायबंदी
धोनी कुठे कसा कधी जायबंदी झाला? त्याला विंदू दारासिंग आणि मयप्पनचा धक्का लागला का?
श्रीलंकेचे खेळाडु बहुतेक आता
श्रीलंकेचे खेळाडु बहुतेक आता हा दौरा करण्यास राजी नव्हते. त्यांचा रेस्ट टाइम होता. आणि खेळाडुना विचारात न घेताच श्रीलंकन बोर्डाने ह्या दौर्याला होकार कळवला कारण भरपुर पैसाचा ओघ ह्या दौर्यातुन श्रीलंकन बोर्डाला मिळणार आहे आणि त्यातुन श्रीलंकन बोर्डाची नुकसानात चाललेल्या होडीला चांगलाच आधार मिळणार आहे. असे ऐकीवात आले
वाचायला ऑड वाटेल पण हे सत्य
वाचायला ऑड वाटेल पण हे सत्य आहे. अॅलिस्टर कुक (२९४ धावा- एडबस्तन सन २०११), मायकेल क्लार्क (३२९ धावा – सिडने २०१२) व ब्रेडन मॅकुलम (३०२ धावा – वेलिंग्टन २०१४) यांनी भारताविरुद्ध २१व्या शतकातील तीन सर्वोच्च धावसंख्या उभारल्या. आणि गम्मत म्हणजे तिन्ही वेळा इशांत शर्माने या परकीय खेळाडूंचे झेल त्यांच्या डावाच्या अगदी सुरवातीला सोडले आहेत. नंतर भारताविरुद्ध या तिन्ही खेळाडूंनी धावाच पाउस पाडला.
व्हॉट अ कोइंसीडन्स भिडू….
जबरी ऑब्झर्वेशन दिदे. हे
जबरी ऑब्झर्वेशन दिदे. हे माहीत नव्हते. स्लिप मधे असावा इशांत. त्याला तिथली सवय नाही.
रोहित शर्माची अजून एक डब्बल
रोहित शर्माची अजून एक डब्बल सेंच्युरी.... श्रीलंकेच्या बॉलिंगचा परत एकदा धुव्वा...
कमाल केली दुसर्यांदा
कमाल केली दुसर्यांदा दुहेरीशतक करणारा पहिला फलंदाज ठरला
२५० होणार का???
२५० होणार का???
Current partnership 106 runs,
Current partnership 106 runs, 7.4 overs, RR: 13.82 (Uthappa 12, RG Sharma 91)
२५० झाल्या...
२५० झाल्या...
View dismissal RG Sharma c
View dismissal RG Sharma c Jayawardene b Kulasekara 264 173 33 9 152.60
The Indian team gives Rohit
The Indian team gives Rohit Sharma a guard of honour as he walks back with the highest ODI score ever, and the second-highest List A score. He was on 4 off 16 when he was dropped by Thisara Perera. He got to his 50 off 72, 100 off 100, 150 off 125, 200 off 151 and 250 off 166. Phew
RG Sharma c Jayawardene b
RG Sharma c Jayawardene b Kulasekara 264 173
२६४ एका पुर्ण संघाची एकदिवशीय सामन्याची धावसंख्या वाटु लागली आहे
रोहितचं अभिनंदन ! रोहितला
रोहितचं अभिनंदन !
रोहितला अधुनमधून दुखापतग्रस्त होणं/ संघाबाहेर असणं खूपच लाभदायक ठरत असावं ! नंतरचं त्याचं पुनरागमन नेहमीं दणकेबाज असतं !!
<< He was on 4 off 16 when he was dropped by Thisara Perera. >> आतां वर उल्लेखिलेला ईशांत शर्माचा विक्रम परेरा मोडतो का हें पहाणंही रंजक ठरेल !
रोहितच्या विक्रमावर चंदू बोर्डे म्हणाले कीं आतां बाऊंडरी लाईन अधिक दूर नेण्याची वेळ आली आहे. मला वाटतं, बर्याच ठीकाणीं याकरतां स्टेडियमच नविन बांधावे लगतील; यापेक्षां, आत्तांच्या चौकाराला २ धांवा व षटकाराला ४च धांवा असा नियम अधिक सोईचा व स्वस्तात पडणारा होईल !
समजा, श्रीलंकेचा डाव २६४च्या आंतच संपला , तर कुणाचाही पाठींबा न घेतां रोहितने सामना जिंकला, असं म्हणायचं का !!
२६४ आणि टोटल ४०४ !!!!!! आवरा
२६४ आणि टोटल ४०४ !!!!!! आवरा !!!!! टू मच...
समजा, श्रीलंकेचा डाव २६४च्या
समजा, श्रीलंकेचा डाव २६४च्या आंतच संपला , तर कुणाचाही पाठींबा न घेतां रोहितने सामना जिंकला, असं म्हणायचं का !!

पुढच्यावेळेला बहुदा श्रीलंका
पुढच्यावेळेला बहुदा श्रीलंका फक्त रोहितलाच खेळायला देणार. तो आउट झाला की भारताचा डाव संपला म्हणुन समजतील
असे नाही चालत हो. नॉन
असे नाही चालत हो. नॉन स्ट्राईकर समोर मैदानात हवाच.. तिथे बाहेरून पाठिंबा नाही चालत
हा मग रोहित आउट झाल्यावर नॉन
हा मग रोहित आउट झाल्यावर नॉन स्ट्राईकरला पण घरी पाठवतील.
53/4 (11.1 ov) > बहुतेक भारत
53/4 (11.1 ov) > बहुतेक भारत एका रोहित डावाने जिंकणार आहे
<< असे नाही चालत हो. नॉन
<< असे नाही चालत हो. नॉन स्ट्राईकर समोर मैदानात हवाच.. >> रन आऊट करायला !!!
New Zealand 262 & 231 (70.3
New Zealand 262 & 231 (70.3 ov) > बघा संपुर्ण टीम ने टेस्ट मधे देखील रोहित शर्माची बरोबरी करु शकले नाही
Rohit Sharma changing his
Rohit Sharma changing his gear :
1st 50 - 72 balls.
2nd 50 - 28 balls.
3rd 50 - 25 balls.
4th 50 - 26 balls.
5th 50 - 15 balls (Top Gear)
Pages