Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40
क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज कोहली ३ र्या क्रमांकावर
आज कोहली ३ र्या क्रमांकावर यायला घाबरला >> इथे नको लिहूस, गावस्करला कळव http://www.rediff.com/cricket/report/west-indies-struggling-kohli-should...
गावस्कर म्हणाला आणि त्याने
गावस्कर म्हणाला आणि त्याने लगेच पडत्या फळाची आज्ञा घेतली तर
'क्रिकइन्फो'वर आगरकर तर
'क्रिकइन्फो'वर आगरकर तर कोहलीने ३र्या क्रमांकावरच यावं म्हणून हट्ट धरून बसलाय ! असो, कुणाच्याही कोंबड्याने कां होईना, कोहली पुन्हा एकदांचा उजाडणं महत्वाचं !!
आजची त्यांची सुरुवातीची
आजची त्यांची सुरुवातीची बॉलिंग पाहता कोहली मागेच आला ते बरे झाले.. नाहीतर पुन्हा स्लिपकॆच होती आजही..
असो, सॅम्युअलने मात्र सामना रंगतदार केलाय.. ३० चेंडूत ७ धावा .. गेल्या सामन्यात तडफदार शतक मारणारा हाच का तो बंदा ???
१९९-८ .. चला आटोपले ..
१९९-८ .. चला आटोपले .. लौकिकाला जागले ..
वेस्टैंडिजला धोनीसारख्याची गरज होती यावेळी ..
चेंडू बदलल्यावर आलेला वळणारा
चेंडू बदलल्यावर आलेला वळणारा नविन चेंडू व मिश्राचीं लागोपाठ दोन निर्धाव षटकं बघितल्यावर खेळाचा रंग अचानक बदलणार असं वाटलंच होतं. धोनीला निदान भारतात तरी फिरकीबद्दल विश्वास वाटायला लागला आहे, हेंही नसे थोडकें !
अभिनंदन , भारत.
भारत आणी विंडिज मधली शेवटची
भारत आणी विंडिज मधली शेवटची वन-डे. कोहली, रैना, रहाणे मस्त खेळले आणी यादव आणी कुमार चा पहिला स्पेल भन्नाट!
आयला धमाल खूप झाली, आतां थोडा
आयला धमाल खूप झाली, आतां थोडा अभ्यास करूंया >>> भाऊ, जबरी!
<<.... आतां थोडा अभ्यास
<<.... आतां थोडा अभ्यास करूंया >>> पण आतां अचानक परिक्षाच अर्धवट सोडून चाललेत घरीं !!!
वे. इंडीज ८३-३. आता रामदिन खेळतोय. मस्तच फलंदाज आहे हें पोरगं !! खरं तर हा वे. इंडीजचा संघ प्रतिभावान व समतोल आहे; दुर्दैव कीं अंतस्थ कुरबूरी या स्थरावर जावून दौरा अर्धवट टाकायची वेळ यावी !!!
कोहली फॉर्मात परत .. नशीब आज
कोहली फॉर्मात परत ..
नशीब आज तिसर्या क्रमांकावर यायचा शहाणपना केला.. सेंच्युरी प्लेअर आहे तो, वर्ल्डकपला तिसर्या नंबरवरच खेळायचे आहे त्याला.
वेस्टईंडिज मात्र पोलार्डला तिसर्या नंबरवर पाठवून काय सिद्ध करतेय देव जाणे. तिथे सॅम्युअलच योग्य होता, अन्यथा रामदिनला पुढे आणायचे होते, अन्यथा गेल परत आल्यावर ब्रावो, अन्यथा सिमन्स..... पण पोलार्ड ?? वर्ल्डकपची प्लानिंग गंडतेय का?
फिक्स होता सामना. चेन्नई
फिक्स होता सामना. चेन्नई सुपर्रकिंग्ज स्मिथ आणि ब्रावो मुद्दाम शून्यावर आऊट झाले. तसेही स्वताच्याच बोर्डाशी मानधनावरून वाद चालू आहेतच. खेळ झाला छोटा आणि पैसा झाला मोठा !
ऋन्मेऽऽष, खरच की मनाचे श्लोक?
ऋन्मेऽऽष, खरच की मनाचे श्लोक?
खरच आहे.. पाचवा सामना पण रद्द
खरच आहे.. पाचवा सामना पण रद्द झाला.. वेस्टईंडिज उद्या माघारी जाणार.. पैसे दिले नाही तर यापुढे खेळनार नाही अशी भुमिका घेतलिय वेस्टईंडिजच्या खेळाडुंनी.. आणि म्हणुनच ऐनवेळी श्रीलंकेला बोलावणं धाडण्यात आलं. आणि पैसे जास्त मिळणार म्हणुन श्रीलंका पण यायला तयार झाली.. आता १ नोव्हेंबर पासुन श्रीलंका विरुध्द भारत..
बघा भारत लोकांना पैसाचे आमिश दाखवुन कोनालाही बोलवु शकतो.. आणि त्या बिच्यार्यांना पगार पण मिळत नाही..
'क्रिकेटेतर' गोष्टींचाच
'क्रिकेटेतर' गोष्टींचाच प्रभाव क्रिकेटमधे दिवसेंदिवस वाढतो आहे, ही एक शोकांतिकाच ठरणार आहे !
फेरफटका, अर्थातच मनाचे श्लोक
फेरफटका,
अर्थातच मनाचे श्लोक ..
पण पैसा मोठा झालाय हे तात्पर्य तर सत्य आहेच ..
आयपीएल आणि फिक्सिंगचे नातेही कोणी नाकारणार नाहीच ..
पकडले गेलेल्या स्पॉट फिक्सिंग बद्दल मी नाही म्हणत तर त्याही पेक्षा मोठ्या लेव्हलवर चालू असलेल्या पैश्याचा राजकारणाबद्दल बोलतोय
अवांतर - अर्रे वा श्रीलंका येतेय. चला काही चुरशीचे सामने बघायला मिळतील आता
रहाणे आणि धवन कडक सलामी
रहाणे आणि धवन कडक सलामी मिळवून देत आहेत. रोहीत शर्माच्या स्लो स्टार्ट पेक्षा हे चांगलेय. पण विश्वचषकात ऒस्ट्रेलियामध्ये धवन कसा टिकाव धरतो ये तो आनेवाला वक्तही बतायेगा. तरीही आजच्या तारखेला माझ्यामते प्लेईंग एलेव्हन अशी असेल.
१. रहाणे
२. धवन
३. कोहली
४. रैना
५. रोहित शर्मा
६. धोनी
७. सर जडेजा
८. आश्विन
९. भुवनेश्वर
१०. शमी
११. इशांत शर्मा
तळटीप - गेल्या विश्वचषकातील मालिकावीर युवराजसिंगला मात्र १४-१५ च्या संघातही स्थान दिसत नाही.
अवांतर - पाकिस्तानच्या मिसबाहने आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५६ चेंडूत कसोटी शतक फटकावून व्हिव रिचर्डसच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली.
भारत ३६०+ ! पाटा विकेट हें
भारत ३६०+ ! पाटा विकेट हें सांगणे नलगे !!!
]
[ विषयांतर - वे. इंडिज दौरा अर्धवट सोडून गेल्याने ही मालिका शक्य झाली आहे; त्यामुळे, वे.इंडिजकडून भरपाई म्हणून मागितलेल्या रु. २५० कोटींतून श्रीलंकेबरोबरच्या मालिकेत होणार्या नफ्याच्या रकमेची वे.इं.ला सूट दिली जाणार आहे का ?
पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया काय
पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया काय भन्नाट चालू आहे राव! फुल्ल कचरा करून टाकला ऑस्ट्रेलियाचा!
<< फुल्ल कचरा करून टाकला
<< फुल्ल कचरा करून टाकला ऑस्ट्रेलियाचा! >> खरंय . स्वतःच्या खेळपट्ट्या बरोबर घेवूनच दौर्यावर जायची पाळी आलीय ऑसीजवर !!
आज सचिनच्या आत्मचरित्रातील
आज सचिनच्या आत्मचरित्रातील कांहीं उतारे बर्याच वर्तमानपत्रात आले आहेत. त्याच्या नेतृत्वाखालील संघाच्या, जिंकण्याची शक्यता असूनही, सततच्या पराभवांमुळे व्यथित व वैफल्यग्रस्त झालेल्या सचिनची त्यानेच वर्णीलेली त्यावेळची मानसिक अवस्था मनाला चटका लावणारीच !

सचिनही संघ सहकार्यांवर भडकूं शकतो [ अर्थांत, तें फक्त ड्रेसींग रूममधे ! ] हेंही तो एक माणूसच असल्याचा गोड दिलासा देवूनही जातं !!
सचिनने याआधीही त्या ८१
सचिनने याआधीही त्या ८१ सर्वबादचे शल्य बोचत असल्याचे बरेचदा बोलून दाखवलेय.
माझ्या आठवणीप्रमाणे त्या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्येच आपण पुरेसा लीड घ्यायच्या स्थितीत होतो जेणेकरून चौथ्या डावात आणखी कमी टारगेट मिळाले असते. पण आपली तळाला पडझड झाली. कदाचित खेळपट्टी तिथून खराब व्हायला सुरुवात झाली असावी.
चॅपेलनी सचिनला दिली होती,
चॅपेलनी सचिनला दिली होती, द्रविडकडून कप्तानपद स्वीकारण्याची 'ऑफर'
http://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/sachin/articleshow...
हा चॅपेल माझ्याही डोक्यात जायचा. खास करून दादाशी पंगे असल्याने. बरे झाले सचिनने घेतला याला.
भूतकाळातून बाहेर पडा नि
भूतकाळातून बाहेर पडा नि भविष्यातला संघ काय असेल ते बोला
अॅरॉन च्या जागी बिन्नी ? रॉजर बिन्नी निवड समिती मधे आहे हे आजच वाचले. तो अशा निर्णयामधे काय करत असेल ?
लोकेश राहुलने मध्य
लोकेश राहुलने मध्य विभागाविरुद्ध १८५ व १३० धावांची खेळी केल्यामुळे तो पण चर्चेत आला आहे. त्यामुळे सलामीवीर मुरली विजय व शिखर धवन यांच्यासह तिसरा पर्याय म्हणून राहुलला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही तसाच रॉबीन उत्थप्पा हा हि एक पर्याय आहे. बाकी संघ तसाच.. फक्त वेगवान गोलंदाज कोण जातायत आणि ऑस्ट्रेलियात कसे गोलंदाजी करतात त्यावर मॅच चे बरेच निकाल अवलंबुन राहितील.
मोहम्मद शमी आणि वरुण अॅरॉन यांनी अगोदरच जायबंदी होउन नांगी टाकलेली आहे. इशांत शर्मा व भुवनेश्वरकुमार हेच दोघे मेडीकली ठीक आहेत त्यामुळे ते दोघे नक्की. अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नी हा तीसरा गोलंदाज म्हणुन भरवशाच ठरु शकतो आणि वर म्हटल्या प्रमाणे वशीला असेल तर उत्तमच. धोनी स्पेषल रविचंद्रन अश्विन व रवींद्र जाडेजा हे दोघे रवी फीरकी गोलंदाज म्हणुन संघात येण्याची शक्यता आहे
वशिल्यानेच आला असेल असे जरुरी
वशिल्यानेच आला असेल असे जरुरी नाही कारण दुलिप ट्रॉफीमधे त्याने चांगली बॉलिंग केली होती. पण down under त्याचा कितपत उपयोग होईल हे सांगणे फार कठीण आहे. टेस्ट मधे all rounder हवा असेल तर करण शर्मा जास्त योग्य ठरेल कारण तो wrist spinner आहे नि बाऊन्सी पिचेसवर जास्त उपयोगी येईल. तशातही aus बॅट्स्मन लेग स्पिनर चा सध्या धसका घेऊन आहेत :). ODI all rounder सध्या तरी जाडेजा, अक्षर पटेल वगैरेंची वर्णी लागेल असे वाटतेय.
लोकेश राहुल तिसरा म्हणून घेऊन गेले तर बरेच होईल.
असामीजी, ह्या अक्षर पटेलबद्दल
असामीजी, ह्या अक्षर पटेलबद्दल मला खूप आशा वाटते. शारिरीक ठेवण खूप वेगळी असली तरी अक्षरची गोलंदाजी पाहिल्यावर मला अगदीं लहानपणीं पाहिलेल्या विनू मांकडचीच आठवण येते. त्यांच्यासारखाच हा खूप चाणाक्ष, बेरक्या फिरकी गोलंदाज वाटतो !
मला अगदीं लहानपणीं पाहिलेल्या
मला अगदीं लहानपणीं पाहिलेल्या विनू मांकडचीच आठवण येते. >> perfect ! त्याची बॅटींग हा अजून एक plus point आहे.
openning साठी अजून एक promising नाव म्ह्णजे करून नायर (नय्यर). त्याचे technique चांगले वाटले नि temperament पण.
<< त्याची बॅटींग हा अजून एक
<< त्याची बॅटींग हा अजून एक plus point आहे. >> असामीजी, हेंहीं मांकडबरोबरचं त्याचं साम्य लिहायचं चुकून राहिलं; मला वाटतं आपल्या इंग्लंड [ कीं ऑस्ट्रेलिया ?] एका दौर्यात शतक ठोकणारा मांकड हा एकमेव फलंदाज होता !
भाऊ जर मला नीट आठवत असेल तर
भाऊ जर मला नीट आठवत असेल तर कपिल नि काहि प्रमाणात दुराणी वगळता मंकड हा खराखुरा all rounder म्हणता येईल. रिची बेनॉ च्या लेखात भरपूर कौतुक वाचले होते मंकडचे .(बहुतेक बेनॉ चाच लेख होता)
शिखर धवन ला अंपायर ने
शिखर धवन ला अंपायर ने वाचवला.. आणि भारता चा डाव सावरला.....
बाद दिला असता तर जरा मजा आली असती... मॅच मधे थ्रील आले असते..
Pages