Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40
क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फक्त 'बाउन्सी' खेळपट्ट्या हा
फक्त 'बाउन्सी' खेळपट्ट्या हा मात्र अडथळा वाटतोय.>> एक्झॅक्टली, हा अडथळा तर आहेच, असणारच, पण एकदिवसीयचे बदललेले स्वरूप पाहता याची दाहकता तुलनेत कमी झालीय असे वाटते.
बाकी संघनिवडीबाबत फारशी चर्चा करण्यात अर्थ नाही, जे खेळाडू गेले वर्षभर खेळत आहेत, सेट झाले आहेत, आणि सध्या योग्य वेळी फॉर्मला देखील आले आहेत (भले भारतीय पिचेस वर का असेना) त्यांनाच निवडले जाणे योग्य आहे. पुन्हा कोणाला दिनेश मोंगिया बनवण्यात अर्थ नाही.
पण येस्स, नवीन खेळाडूंमध्ये अक्षर पटेलला ट्रंपकार्ड म्हणूनही वापरता येईल. चांगला गोलंदाज तर आहेच पण कोणी फारसे त्याला खेळले नसल्याने तो ऐनवेळी चकीत करून विजयात महत्वाची भुमिका बजावू शकतो. रवींद्र जडेजाच्या जागी त्याला अंतिम ११ मध्ये खेळताना बघायला मला आवडेल. अर्थात ऑस्ट्रेलियाचा दौरा दूध का दूध आणि पाणी का पाणी करेलच.
नमन ओझाला न घेतल्याचा मी
नमन ओझाला न घेतल्याचा मी निषेध करत आहे. यंदा ऑस्ट्रेलियाला गेलेल्या अ टीम मधे नमन ने चांगल्या धावा काढलेल्या. उथप्पा नमन मनिष पांडे या तिघांनी देखील चांगली कामगिरी तिथल्या खेळपट्टीवर केली आहे.
शिखर धवन ( एक दोन सामने नाही
शिखर धवन ( एक दोन सामने नाही चालला तर त्याला काढुन रहाणेला घेतील)
रोहित शर्मा ( याला देखील पर्याय उथप्पा ठेवावा लागेल )
विराट कोहली
सुरेश रैना
महेंद्रसिंग धोनी
जाडेजा ( याला का घेतात हेच कळत नाही. बॉलिंग चांगली झाली तर बॅटींग होत नाही. आणि बॅटींग अशीही होत नाही)
अश्विन (किमान बॅट्समन म्हणुन तरी चालेल पर्याय अक्षर पटेल)
भुवनेश्वर कुमार
मोहम्मद सामी
इशांत शर्मा
वरुण एरॉन / उमेश यादव
चार वेगवान गोलंदाजांना एकत्र खे़ळवण्याचे धाडस धोनी करणार नाही कारण ओव्हररेट देखील सांभाळवा लागतो आनि धोनीला याआधी बर्याचदा याबद्दल शिक्षा देखील झालेली आहे.
चार वेगवान गोलंदाज खेळवायला
चार वेगवान गोलंदाज खेळवायला तसे वेगवान गोलंदाज असावेही लागतात.. आणि आपल्या सर्वच वेगवान गोलंदाजांची बॅटींगची बोंब आहे.. वेगवान गोलंदाजांमधील ऑलराऊंडरची कमतरता आपल्याला जाणवणार तिथे.. स्टुअर्ट बिन्नीला त्या द्रुष्टीने तयार करणे चालू होते बहुतेक पण नाही वाटत अजून तो त्या लेव्हलचा..
चार वेगवान गोलंदाज खेळवायला
चार वेगवान गोलंदाज खेळवायला तसे वेगवान गोलंदाज असावेही लागतात.. > अरे वर तर ५ वेगवान गोलंदाजांची नावे लिहिली आहेत. तरी असावे लागतात म्हणतोय्स ?
तरी त्यात मोहीत कुमार धवन कुलकर्णी अशोक डिंडा यांचा समावेश केला नाही
धोनीचा एकंदरीतच कल वेगवान
धोनीचा एकंदरीतच कल वेगवान गोलंदाज अधिक वापरण्याकडेच असतो, असं प्रकर्षाने जाणवतं. शिवाय खेळपट्ट्या बाऊन्सी तर असणारच . त्यामुळे, धोनी चार वेगवान खेळवण्याची शक्यताच अधिक. अगदीं गरज भासलीच तर रैना व रोहितला तो फिरकी गोलंदाज म्हणून वापरूं शकतोच. [ व्यक्तीशः मला मात्र ५ फलंदाज + जडेजा व २फिरकी गोलंदाज + ३वेगवान गोलंदाज असा संघ अधिक बरा वाटतो. कारण बाऊन्सी खेळपट्ट्या फिरकीलाही पोषक ठरतातच ].
जडेजा व २फिरकी गोलंदाज >>
जडेजा व २फिरकी गोलंदाज >> इकडे एक गोच आहे. तिथल्या खेळपट्ट्यांवर लेग स्पिन्नर विशेषतः कर्ण शर्मासारखा जो क्विक आहे तो उपयोगी ठरू शकतो. पण तो असेल तर जाडेजा, पटेल हे त्याच दिशेने बॉल वळवणारे असल्यास एकसूरीपणा येउ शकतो. अर्थात रोहित नि विशेषतः रैना ज्याची बॉलिंग सध्या खूप सुधारली आहे त्याला अधिक वापरून बॅलन्स करता येईल. ह्यात बाकीच्या तीन बॉलरमधील कोणाच्या दहा ओव्हर इतर कोणाला पुर्या कराव्या लागणार नाही हे मुख्य assumption आहे.
<< पण तो असेल तर जाडेजा, पटेल
<< पण तो असेल तर जाडेजा, पटेल हे त्याच दिशेने बॉल वळवणारे असल्यास एकसूरीपणा येउ शकतो.>>पण त्या तिघानाही एकाच वेळीं न खेळवतां अश्विनला खेळवलं जाईलच ना, उलट्या दिशेने वळणार्या ऑफ-ब्रेकसाठी. शिवाय, चेंडू उसळणार्या खेळपट्ट्यांवर वेगवान स्पिनरपेंक्षां 'फ्लाईट'वर भर देणारे गोलंदाज खेळायला अधिक कठीण व फसवे ठरूं शकतात, असंही मला वाटतं.
पण त्या तिघानाही एकाच वेळीं न
पण त्या तिघानाही एकाच वेळीं न खेळवतां अश्विनला खेळवलं जाईलच ना >> तस नाही भाऊ. जास्तीत जास्त दोन स्पिनर्स असू शकतील. सध्या तीन पेसर्स असे धरू. त्यांची बॅटींग यथा तथाच आहे (भुवी वगळता पण It wil be too much to expect him to play role of batsman no 7 where need will be quick hoicks). मग अर्थात दोन स्पिनर्स पैकी एक जण (तरी) बरा all rounder हवा. म्हणजे जडेजा किंवा पटेल select करायला लागणार. मग उरलेला स्पॉट कर्ण ला दिला तर एक सूरीपणा येउ शकतो. आआणि अश्विन आला तर मग leg spinner बाहेर थेवायला लागतो असा गुंता. करण शर्मा all rounder आहे असे म्हणतात पण त्याची बॅटींग अजून एव्हढी क्लिक झालेली दिसली नाहि. maybe there is a hope there.
'फ्लाईट'वर भर देणारे गोलंदाज खेळायला अधिक कठीण व फसवे ठरूं शकतात >> बरोबर पण यादव वगळता तसा कोणी त्या probabales मधे वाटला नाही. जड्डू कधी तरी मस्त flight वगैरे देतो खरा (विशेषत: भारतात खेळताना) बाहेर का टाळतो देव जाणे ? कदाचित धोनीच्या save the runs strategy मूळे ?
दिदे, अहो मी तसे वेगवान
दिदे,
अहो मी तसे वेगवान गोलंदाज म्हटले आहे.
तसे म्हणजे एकतर ते मॅचविनर असावेत किंवा त्यांना फलंदाजी जमावी.
आपल्यात कोणत्याही वेगवान गोलंदाजाला ती जमत नाही.
याउलट जडेजा, आश्विन, अक्षर पटेल या तीनही स्पिनर्सना फलंदाजी जमते. फिरकीला मदत मिळाल्यास ते मॅचविनर ठरू शकतात किंवा २५०+ खेळपट्टीवर त्यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत रोखून धरणेही उपयुक्त ठरावे.
भुवनेश्वर कुमार, सामी यांनी
भुवनेश्वर कुमार, सामी यांनी बॅटींगच्या जोरावर देखील मॅच जिंकवुन दिलेल्या आहेत. बोलिंगवर देखील जिंकवुन दिलेल्या आहे. हेच काय इशांत शर्माने देखील भेदक बॉलिंग करुन मॅच जिंकवुन दिलेल्या आहेत ( आपण फक्त त्याच्या हारुन दिलेल्या मॅचच लक्षात ठेवतो त्यात त्याचा काय दोष?)
२५०+ खेळपट्टीवर त्यांनी अचूक
२५०+ खेळपट्टीवर त्यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत रोखून धरणेही उपयुक्त ठरावे.> आजकाल २५० पर्यंत समोरच्या फलंदाजांना गुंडाळणे कोणत्याही संघाच्या गोलंदाजांना कठीणच आहे. आपण देखील जवळपास सगळ्याच संघांसमोर २८०+ रन्स आपल्यापेक्षा जास्त क्षमतेचे गोलंदाज असुन देखील उभे करतो. जिथे खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते तिथे आपले देखील गोलंदाज समोरच्या फलंदाजीला फेस आणतात. फक्त आपल्या कामगिरीत सातत्य नाही इतकेच.
भुवनेश्वर कुमार, सामी यांनी
भुवनेश्वर कुमार, सामी यांनी बॅटींगच्या जोरावर देखील मॅच जिंकवुन दिलेल्या आहेत.
>>>>>
कुठल्या?
त्यांचा एवरेजच पुरेसा बोलका असावा.. मी चेक नाही केला पण गरज नाही.. जेमतेमच असणार..
बाकी भुवीने मध्यंतरी ईंग्लंडमध्ये कसोटीमध्ये जे केले त्यावर भुलून जाऊ नका.. एकदिवसीय मध्ये सातव्या-आठव्या क्रमांकावर कामाला येईल अशी फलंदाजी आपल्या वेगवान गोलंदाजांमध्ये कोणाची नाही हे तुर्तास फॅक्ट आहे..
मोहम्मद हाफिस वर आयसीआयसीआयने
मोहम्मद हाफिस वर आयसीआयसीआयने बंदी घातली

सईद अजमल नंतर दुसरा पाकिस्तानी बॉलर
विश्वचषक मधे पाकिला झटका
" In a touching tribute,
" In a touching tribute, Phillip Hughes has been listed as "13th man", while Australia's players will all wear shirts emblazoned with Hughes Test number - 408. "It's really special. His family, I think that would make them very proud," Johnson said. I'm very proud to be able to wear that number through this Test. We've named him as the 13th man as well. It's all very special."
क्रिकेटमधे अजूनही धांवांचे/बळींचे विक्रम, पैसे, खुन्नस इ.इ. शिवायही या सर्वांपलिकडचं, हृदयस्पर्शी व वैश्विक असं कांहीं आहेच, याची आश्वासक जाणीव उद्यां सामना पहाताना प्रत्येक क्रिकेटप्रेमीला झाल्याशिवाय रहाणार नाहीं !!
ऑसीज २००-२ , ४० षटकांत
ऑसीज २००-२ , ४० षटकांत !
वॉर्नरचं शतक, क्लार्क -अर्धशतक !
भारताने [ कप्तान -कोहली ] प्रथमपासूनच 'राऊंड द विकेट' मारा चालू ठेवला पण इशांतशिवाय कुणाचा फार प्रभाव पडला नाहीं. लेग-स्पीनर कर्ण शर्मा डावर्या वॉर्नरपुढे बच्चाच वाटला - अर्थात अनुभवाची कमतरता.
इथल्या खेळपट्टीवर मीं एकटाच
इथल्या खेळपट्टीवर मीं एकटाच गोलंदाजी करतोय अणि माझा प्रत्येक चेंडू इथले 'वेल्-लेफ्ट' करताहेत ! मला क्रिकेटमधलं कांहीं कळत नाहीं, हें अचानक आत्तांच कसं यांच्या लक्षांत आलं !!!
व 
तुम्ही इशांत शर्मा आहात असे
तुम्ही इशांत शर्मा आहात असे समजा
कोहली कितीही aggressive cricket खेळायच्या तयारीने उतरला तरी जर बॉलर्स मुख्य प्लॅन फॉलो करू शकणार नसतील तर काय कप्पाळ करणार. कौतुक ह्याचेच कि पूर्ण दिवसभर तो तसाच वागला. नवा बॉल मिळाल्यावर लगेच घेतला. भुवीची कमतरता फारच जाणवली.
<< बॉलर्स मुख्य प्लॅन फॉलो
<< बॉलर्स मुख्य प्लॅन फॉलो करू शकणार नसतील तर काय कप्पाळ करणार.>> टीव्हीवरच्या चर्चेत मॅथ्यू हेडनने याची दुसरी बाजूही मांडली- ' प्लॅन नसण्यापेक्षां कांहींतरी प्लॅन असणं चांगलंच; पण जर तुमचा मुख्य प्लॅन अजिबातच परिणामकारक ठरत नसेल, तर त्यालाच दिवसभर चिकटून रहाणं मात्र घातक ठरूं शकतं !'. आमच्या भागात कांहीं दुरूस्तीसाठी वीजपुरवठा बंद असल्याने चहापानानंतरचा खेळ पहातां नाहीं आला. तरी पण हेडनच्या म्हणण्यातही कांहींसं तथ्य असावं असं आधीच्या खेळावरून जाणवलं. अर्थात, काय बदल शक्य होता हें मात्र नाहीं सांगू शकत. कदाचित, 'राऊंड द विकेट' माराच करायचा, याला बगल देतां आली असती. पण या सूचनेला कांहीं ठोस आधार मात्र नाहीं.
<< तुम्ही इशांत शर्मा आहात असे समजा >> आधीं हवं होतं हें सांगायला; परवांच केंस कापून आलों !
aggressive राहाणे हा कोहलीचा
aggressive राहाणे हा कोहलीचा प्लॅन तर round the wicket जाणे हा बॉलिंग्चा प्लॅन होता. मी पहिल्याबद्दल बोलत होतो. दुसरा परीणामकारक होत नाही आहे हे बघितल्यावर बदलण्यासाठी plan B होता का हे माहित नाही.
परवांच केंस कापून आलों ! >>
ऑसीजच्या ५००+ धांवसंख्येला
ऑसीजच्या ५००+ धांवसंख्येला १७६-२ हें भारताचं प्रत्युत्तर.
ह्या नविन भारतीय खेळाडूंबद्दल खूप विश्वास वाटतो. मोठी नांवं, मोठी धांवसंख्या इत्यादींचा दबाव न घेतां आत्मविश्वासाने खेळतात हीं पोरं !!
३३०-४ ! कोहलीचं शतक !!
३३०-४ ! कोहलीचं शतक !!
कोहलीने आज गेम केला..
कोहलीने आज गेम केला.. डोक्याचा वापर केला.. पहिलाच बॉल मिचेल जॉन्सनचा आला तो बाऊन्सर, कोहली तो डोक्यानेच खेळला.. हेल्मेटवर एक खवडा खाल्ला पण कांगारूंची सहानुभउती मिळवली.. बस्स मग शतक झळकावले पठ्ठ्याने !
त्या बाऊंसरबद्दल मोंगाचा
त्या बाऊंसरबद्दल मोंगाचा मस्त लेख आहे.
फलंदाजी ढेपाळली नाही हे अतिशय
फलंदाजी ढेपाळली नाही हे अतिशय उत्तम झाले. आजच्या दिवसाने सगळे ५ही दिवसाची उणीव भरुन काढली
त्या बाऊंसरबद्दल मोंगाचा मस्त
त्या बाऊंसरबद्दल मोंगाचा मस्त लेख आहे.>>> किधर हे? किधर हे?
तिघांची अर्धशतके, एकाचे शतक,
तिघांची अर्धशतके, एकाचे शतक, छान. छान.
धावा कमी पडल्या तरी अगदीच वाट लागली नाही. अजूनहि साहा नि रोहित शर्मा दोघांबद्दलहि आशा आहे, अजून शंभर धावा काढल्या तर वाईट नाही.
भारताच्या गोलंदाजीला तर विलो चे सगळे कॉमेन्टेटर जाम शिव्या देत होते. एकाने तर म्हंटले कसला स्टुपिड प्लान राऊंड द विकेट चा. अग्रेसिव्ह ठीक आहे, पण अक्कल पण पाहिजे, प्लान बी, प्लान सी पाहिजेत वगैरे.
बाकी रहाणे कोहली पुजारा, विजय सर्वांनी ठोका ठोकी मस्त केली. लायन मात्र डेडली वाटत होता, नि जॉन्सन कधी कधी.
http://www.espncricinfo.com/a
http://www.espncricinfo.com/australia-v-india-2014-15/content/story/8094... हा पाहा तो लेख
छान आहे लेख
छान आहे लेख
हा लेख चुकवू
हा लेख चुकवू नका
http://www.thecricketmonthly.com/story/805225/like-a-pakistani
Pages