क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तर कुणाचाही पाठींबा न घेतां रोहितने सामना जिंकला, असं म्हणायचं का ! >> शिवाय नुसता आवाजी मतदान न घेता प्रत्यक्ष खेळून जिंकला असेही म्हणावे लागेल Wink

रोहितचे अभिनंदन.. ऑस्ट्रेलियातही तो असाच खेळेल अशी अपेक्षा Happy

एक आलेला मेसेज -

भाजपावरचा राग..,

कुणी व्हॉटसअ‍ॅपवर काढतोय,
कोणी फेसबूकवर काढतोय..
..
...
..
..
या भावाने श्रीलंकेवर काढला. Wink

अजून एक अजून एक

ब्रेकींग न्यूज :
लंकाई राष्ट्रपती का कहना है कि हम तुम्हारे मछुआरे छोड देंगे तुम हमारे खिलाडी छोड दो. Proud

सचिनचे 200
सेहवागचे 219
रोहीतचे 264

तिन्ही सामन्यात 153 रन्सने विजय मिळाला

<< तुम हमारे खिलाडी छोड दो. >> परेरा म्हणाला, मैने आपका झेल छोडा तो आप कहते है अब खेलभी छोडो !! Wink

सचिनचे 200
सेहवागचे 219
रोहीतचे 264

तिन्ही सामन्यात 153 रन्सने विजय मिळाला
Uhoh

सहजच माझ्या लहानपणींच्या क्रिकेट आठवणी जाग्या आल्या; त्यावेळी जर फेसबुक, व्हाटसअ‍ॅप वगैरे असतीं तर भारतावर केलेल्या अशा साहित्याचा अजरामर खजिनाच निर्माण झाला असता ! Wink

<< ...अजूनही वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध वर्ल्ड चॅम्पियन दाखवतात >> फेसबुक व व्हाटसअ‍ॅपवरच्या 'वर्ड चॅम्पियन'ना अजूनही स्कोप देण्यासाठींच असावं !! Wink

जेव्हा रोहीत ने २०० बनवले तेव्हा दोन्ही वेळेला त्याने विराट कोहलीला रन आउट केले होते Wink Biggrin

10425402_882715075120078_3535209787019199970_n.jpg

हायला शेवटच्या व्हाईटवॉश सामन्याचे काहीच कौतुक नाही इथे कोणाला.. एकमेव रंगलेला सामना असूनही

हॅट्स ऑफ एंजेलो मॅथ्यू ... भले भले खचले असते या परिस्थितीत.. पण अंतिम सामन्यापर्यंत स्वत: तरी जिगर कायम ठेवली..

आगामी विश्वचषकासाठी भारताच्या संभाव्य संघातल्या तीस नांवांची यादी प्रसिद्ध झाली !
झहीर, गंभीर, युवराज, सेहवाग व भज्जी याना वगळण्यात आलंय. मुंबईचा केदार जाधव, शर्मा, धवल कुलकर्णी संभाव्य संघात. मला खास आवडलेलीं नविन नांवं- अक्षर पटेल, कुलदीप यादव, उथप्पा [ फलंदाज म्हणून], सन्जु सॅमसन. खटकलेलं वगळणं - चेतेश्वर पुजारा [ मर्यादित षटकांच्या सामन्याना निरुपयोगी, असा छापच बसलाय बिचार्‍यावर !].
संदीप पाटीलने निवड समितीचं हें कठीण काम बर्‍यापैकीं पार पडलंय, असं वाटतं.

भज्जीला वगळण्यात आलंय हा ह्यातला लैच मोठ्ठा जोक म्हणावा लागेल. तो खेळत होता हे मला बर्‍याच वर्षात कळाले. बहुधा एखादा खेळाडू स्वतः ऑफिशियली रिटायरम्नेट घेईस्तोवर त्याला अन्डर कन्सिडरेशन समजत असावेत ::फिदी:

भज्जी संघात होता वाटतं::अओ:

<< भज्जीला वगळण्यात आलंय हा ह्यातला लैच मोठ्ठा जोक म्हणावा लागेल. >> जे निवडीसाठी उपलब्ध होते, विचारात घेतले गेले पण निवडले गेले नाहीत, त्याना वगळले म्हणण्याची प्रथाच आहे; उगीच मला नका हो दोष देऊं !! Wink

भाऊ तुम्हाला नाही दोष देत. त्या तिकडे इन्टरनेत आवृत्ती महराष्ट्र टाइम्स ( मराठीतले पहिले सॉफ्ट पोर्न दैनिक ) मध्ये भज्जीला डच्चू अशी बातमी आहे.

भज्जीला धोनीने संपवला..
सेहवागच्या र्हासालाही तोच जबाबदार आहे..
त्याला संघात आपलेच लाडकेच लागतात..
गंभीर काही माझ्या विशेष आवडीचा खेळाडू नाहीये तसा, पण तो धोनीच्या लाडक्यात असता तर नक्कीच संघात असता.. किमान अधूनमधून खेळत राहिला असता..
अर्थात धोनी एकटाच काही नाहीये यात, त्याच्याही डोक्यावर हात आहेतच..
आयपीएलने वाट लावलीय.. पैश्याचा खेळ सुरू झाला की राजकारण आलेच..
-हे सर्व माझे वैयक्तिक आणि प्रामाणिक मत आहे

मला खास आवडलेलीं नविन नांवं- अक्षर पटेल, कुलदीप यादव, उथप्पा [ फलंदाज म्हणून], सन्जु सॅमसन. >> ह्यातला पहिला वगळता बाकीचे जातील का पण शेवटच्या पंधरा-सोळा मधे ?

गनरल निवड समिती नि धोनीचा ट्रेंड बघता बहुधा असे होईल.
धवन, राहाणे, शर्मा, कोहली, रैना >> हे नक्की आहेत. अजून दोन बॅकप बॅटस्मन हवेत तर रायुडू, पांडे नि तिवारी ह्यातले दोन येतील.
धोनी >> त्याला बॅक अप म्हणून साहा ला पहिली पसंती असते नि एकापेक्षा अधिक बॅकप नेण्याची शक्यता वाटत नाही. (परत रायुडु पण कामचलाऊ किपिंग करतो)
तीन स्पिनर्स >> ह्यातले कोणीही तीन जाडेजा, अश्विन, पटेल, कर्ण शर्मा.
४ पेसर्स >> ह्यातले चार -> शमी, भुवी, यादव, अ‍ॅरन, इशांत, मोहित.

ह्यात साहाच्या जागी उत्थपाला नेले तर कीपर नि बॅटस्मन असा ऑप्शन मिळतो मग, रायुडू, पांडे नि तिवारी मधला एकच नेऊन, एक पेसर अधिक नेलेला बरा. पांडे नि तिवारीच्या सध्याचा विशेषतः पांडेचा फॉर्म बघता त्याला आत्ता खेळवला पाहिजे. It does not hurt that he is fabulous fielder as well. अर्थात Aus दौर्‍यानंतर बरच क्लियर होईल. काहि नावे आपोआप गळतील.

भाऊ, केदार जाधव महाराष्ट्रातून खेळतो बहुधा.

वर्ल्ड कप नंतर लंका किंवा तत्सम संघाबरोबर एक टेस्ट सिरीज खेळून सेहवाग ला त्याची शंभरावी टेस्ट खेळण्याची एकतरी संधी द्यावी असे बापडे मला वाटते जरी तो फॉर्म मधे नसला वगैरे तरी.

९१-९२ च्या किंवा २००४ च्या World Cup अनुभवावरून World Cup येईतो, पिचेस तेव्हधी फास्ट नि बाउन्सी असणार नाहीत. They wil be relatively fast and bouncy (than subcontinental pitches) but will not be true down under pitches. ICC has been very particular about this Happy माझे घोडे Australia नि RSA वर.

<< भाऊ तुम्हाला नाही दोष देत.>> रॉबिनजी, अहो निव्वळ गंमतीत म्हटलं मीं तसं !

ॠन्मेष म्हणतात तसं बर्‍याच जणांच्या लिहीण्या-बोलण्यात येतं व थोडासा 'फेव्हरिटीझम' असेलही धोनीकडे. पण एकजात सारी निवड केवळ त्याच्याच मर्जीनुसार होते किंवा त्याची पसंती गुणवत्ता न पहातांच केवळ 'आपला माणूस' म्हणूनच असते, असं म्हणणं सहज पचनीं नाहीं पडत. [जडेजा हा केवळ धोनीमुळेच संघात आहे असं सुरवातीला छातीठोकपणे सांगणार्‍याना जडेजानेच आपल्या चतुरस्त्र खेळाने खोटं पाडलंच ना ]. शिवाय, विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार असलेला धोनी संघ निवडीत गुणवत्तेचा निकष न लावतां खेळाडू निवडून स्वतःच्याच यशस्वी कर्तृत्वाला खिळ कां घालेल ? एखाद-दुसर्‍या खेळाडूवर कर्णधाराची विशेष भिस्त असणं व त्याच्या समावेशाबाबत तो आग्रही असणं, हें समजण्यासारखं आहे व थोड्या फार फरकाने बहुतेक कर्णधार असं करतच असावेत [ आपल्याच पूर्वीच्या कर्णधारांचीं उदाहरणं देवून नविनच वाद मीं इथं निर्माण करत नाही]. माझ्यापुरतं बोलायचं तर आजच्या ३० नांवांबद्दल मला आक्षेपार्ह असं कांहीं वाटत नाहीं व संदीप पाटील व धोनी अंतिम संघाची निवडही सुजाणपणे व नि:पक्षपातीपणे करतील असा मला विश्वासही वाटतो. [ संदीप पाटील हा कुणाच्या दबावाखाली येणारा तर वाटतच नाही !].
विश्वचषकासाठी शुभेछा.

भाऊ धोनीबद्दल जे लिहिले त्याला अनुमोदन. परत जो कर्णधार आहे त्याला विश्वास वाटेल असे खेळाडू संघात असण्याचा आग्रह त्याने धरणे साहजिकच आहे. भज्जी ला धोनी ने संपवले वगैरे म्हणणे प्रचंड धाडसाचे आहे. भज्जी as a baller म्हणून द्रविड असतानाच प्रचंड ineffective झाला होता. त्याचा 'दुसरा' हा दुसरा न राहता पहिला झाला होता नि कुंबळे च्या निव्रुत्तीनंतर त्याला कधीच खंदा साथीदार नव्हता. He is more responsible for his failure than anyone else. धोनीला भज्जीच्या बाबत दोष द्यायचा तर तो हा की अश्विनचा पर्याय उपलब्ध झाल्यावर त्याने अश्विन ला नेहमीच प्राधान्य दिले. but again in that time period Ashwin was best off spinner available around. त्याच्या variations नि batting skills त्या वेळी तरी भज्जीपेक्षा सरस होत्या. भज्जीच्या controversies नि adopt न करण्याची tendancy त्याला भोवली. तुम्ही त्या वेळच्या भज्जीच्या मुलाखती काढून बघा. He was no ready to admit that there was problem with his balling. He had become more flatter and restrictive rather than wicket taking option which he was suppose to as a lead spinner. He never acknowledged that (at least in public)

आफ्रिकाऑस्ट्रेलिया तिथे फेव्हरेट असणारच, पण शेवटचे आठ नॉकऑट पद्धतीने असल्याने जो हार गया वो घर गया, काही सांगता येत नाही..

आफ्रिकाऑस्ट्रेलिया तिथे फेव्हरेट असणारच >> actually मी सध्याची ऑस्ट्रेलिया RSA ODI series बघून म्हणत होतो. क्लार्क नसताना नि एकाच specific player वर अवलंबून न राहता त्यांनी सिरीज जिंकली त्यावरून.

टेस्टमध्ये आपली परदेशी धूळधाण उडेना पण एकदिवसीयमध्ये जो बदल घडलाय ते पाहता आपल्यालाही बराच चान्स आहेच. कारण आपल्याला तो बदल मानवलाय वा त्या धाटणीचे प्लेअर आहेत आपले. फलंदाजांचा गेम आता जास्त झालाय हा ..

<< ह्यातला पहिला वगळता बाकीचे जातील का पण शेवटच्या पंधरा-सोळा मधे ?>> उथप्पाही जाईल; हल्लीचा त्याचा फलंदाजीतला फॉर्म व परत राष्ट्रीय संघात येण्यासाठी त्याने दाखवलेली जिद्द व चिकाटी बघून तो चांगली कामगिरी करायला उत्सुक व जय्यत तयार आहे असं वाटतं. तसा अनुभवी पण आहेच. त्याला न्यावं असं मला मनापासून वाटतं.
<< अर्थात Aus दौर्‍यानंतर बरच क्लियर होईल. >> असामीजी, १००% सहमत. अंतिम संघनिवडीच्या अंदाजाबाबतही सहमत.
आणि हो, उगीचच फॉर्मचा बाऊ न करतां सेहवागला सन्मानपूर्वक निरोप देणं, हें त्याचं ॠण फेडण्यासारखंच आहे; आज भारतीय फलंदाजांत जो आक्रमकपणा खुलून येतोय त्याचं श्रेय बव्हंशी सेहवागलाच जातं.
<< भाऊ, केदार जाधव महाराष्ट्रातून खेळतो बहुधा. >> अहो, इथं ही विश्वचषकाची पहिलीच ओव्हर मी टाकलीय; एखादा चेंडू असा वाईड जाणारच ना ! Wink
<<... पाहता आपल्यालाही बराच चान्स आहेच. >> ॠन्मेष, खेळाडूंचा फॉर्म पहातां मलाही तसंच वाटतं. फक्त 'बाउन्सी' खेळपट्ट्या हा मात्र अडथळा वाटतोय.

निवडलेल्या तीस संभाव्य खेळाडूंबद्दलची बीसीसीआयची अधिकृत भूमिका [ संजय पटेल] मला महत्वाची वाटते -" I think all of us should be happy that a lot of young cricketers have been considered for this, as a part of the probables. I feel that considering the future after the World Cup is also part of the thought process."

Pages