Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40
क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्या मालिकेबद्दल माझी एकच
ह्या मालिकेबद्दल माझी एकच तक्रार आहे ती म्हणजे World Cup मधे असतील अशा प्रकारची पिचेस बनवून त्यावर खेळायला हवी होती. म्हणजे काय त्रुटी आहेत त्या बघता आल्या असत्या नि मधल्या सहा महिन्यांमधे त्यावर काहीतरी करणे शक्य होते. world cup च्या आधीच्या tri-series मधे फारसा प्रयोगांना वाव मिळणार नाहिये त्यामूळे crossed fingers करून बसावे लागेल.
राहाणे ची इनिंग जबरदस्त होती. अँडरसन च्या पाठी तो जसा शिस्तबद्धपणे लागला ते बघायला मजा आली. फिनचा शॉर्ट बॉल anticipate करत front foot वर pull करणे class act होती.
फिन मात्र action बदलल्यापासून पूर्वीचा बॉलर वाटत नाही. २-३ वर्षांपूर्वी भारतातल्या दौर्यात flat picthes वर raw असतानाही केव्हढा effective वाटला होता. त्याचा स्पेल wicket taking वाटत असे. action बदलून चांगल्या बॉलर्सची माती करणे हा फक्त आपलाच मक्ता नाही एकूण :(. Broad परत आला कि england च्या बॉलिंगला परत धार येईल. दोन स्पिनर्स घेऊन खेळण्याचा धीर england का दाखवत नाही कोण जाणे ?
आज कुणिच कसं फिरकलं नाही
आज कुणिच कसं फिरकलं नाही ईकडे?
मॅच बघत असतील.. जडेजा
मॅच बघत असतील..
जडेजा पुढच्या दौर्यात सीलेक्षन नक्कि होइल याचि काळजी घेतोय...
क्लीन स्वीप नाही देवु शकले.. तो दिला असता तर इतीहास झाला असता. पण well played!!!
. action बदलून चांगल्या
. action बदलून चांगल्या बॉलर्सची माती करणे हा फक्त आपलाच मक्ता नाही एकूण अरेरे
>>>> लैच हंसलो ....
दोन स्पिनर्स घेऊन खेळण्याचा
दोन स्पिनर्स घेऊन खेळण्याचा धीर england का दाखवत नाही कोण जाणे ? >>> त्यांनी तुझे ऐकले आणि जिंकले.
काल टॉस जिंकून क्षेत्ररक्षण
काल टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेण्याचं धोनीचं खास कारण नाही कळलं.
<< त्यांनी तुझे ऐकले आणि जिंकले. >> पण एकच स्पीनर चालला, हेंही लक्षात घ्यायला हवं !
या दौर्याचा सर्वात दूरगामी परिणाम म्हणजे कोहलीने केलेला प्रचंड अपेक्षाभंग, असं मला वाटतं.
त्यांनी तुझे ऐकले आणि जिंकले.
त्यांनी तुझे ऐकले आणि जिंकले. >> धोनीला सांगायचे का आत्ता ?
मर्यादित षटकांच्या सामन्यांमधे न चालल्यामूळे आता त्याच्या commitment बद्दल काय बोलणार ?
Just give him time to sort whatever is going on with him. Over analysis नको.
शमीचे कालचे यॉर्कर्स खासच होते.
20-20 मधे बघू अलीचे धूणे आणि
20-20 मधे बघू
अलीचे धूणे आणि रूट्स चे रुसणे
आपण टाकलेल्या शेवटच्या ५
आपण टाकलेल्या शेवटच्या ५ ओव्हर्स मध्ये ८१ ! ३० बॉल्स पैकी बहुदा २० फुलटॉस ! अन सगळे एकतर ४ किंवा ६ आणि एका फुलटॉसवर आउट. ही मॅच म्हणजे फुलटॉस स्पेशल आहे. !
आणि काल दोन तर आज तीन स्पिनर्स !
शमी ने शेवटचा चेंडू सोडून
शमी ने शेवटचा चेंडू सोडून सगळीच ओव्हर फुल्लटास टाकली
इतकी ही अक्कल नाही?????
आज पासून २०-२० चेम्पियन ...
आज पासून २०-२० चेम्पियन ... रात्रो मुंबई ईंडियन्स .. दुनिया हिला देंगे हम .. आपला सचिन आला रे ऽऽऽऽ ....
हरली काल मुंबई या
हरली काल मुंबई

या पाकिस्तान्यांना कशाला खेळवतात भारतात
युवराजसिंग च्या 'त्या' सहा
युवराजसिंग च्या 'त्या' सहा षटकारांना सात वर्षं पूर्ण झाली.
कुणाच्या (स्टुअर्ट ब्रॉड) खांद्यावर, कुणाचे (अँड्र्यू फ्लिंटॉफ) चे ओझे!
तेंव्हाचा युवराज preserve
तेंव्हाचा युवराज preserve करता आला असता तर ......
अशा काही खेळाडूंचा फेवरिट
अशा काही खेळाडूंचा फेवरिट कॅप्टन असतो. त्याच्या हाताखाली ते बहरतात. युवराज दादा व द्रविड दोघांबरोबर चांगला खेळला. समहाऊ वर्ल्ड कप नंतर धोनीबरोबर तेवढा नाही (सेहवाग, भज्जी सुद्धा). धोनीचे स्वतःचे असे काही लोक आहेत दुसरे. रैना बहुधा. गौतम गंभीर बहुधा सर्वांपासूनच अंतर राखून असावा असे त्याच्या बॉडी लँग्वेज व इंटरव्यूज वरून वाटते.
फारएण्ड, अगदी खरय. मुरली
फारएण्ड, अगदी खरय. मुरली कार्तिक द्रविड च्या कॅप्टन्सीमधे जितका बहरला, तितका तो गांगुली बरोबर नाही रमला. झहीर गांगुली च्या हाताखाली खूप जास्त सिन्सीअर खेळायचा. मग नंतर arrogance took over.
समहाऊ वर्ल्ड कप नंतर
समहाऊ वर्ल्ड कप नंतर धोनीबरोबर तेवढा नाही (सेहवाग, भज्जी सुद्धा). >> मला आठवते त्याप्रमाणे युवीच्या सगळ्यात consistent and mature innings धोनी बरोबर आहेत. २००७-०८-०९ मधे जवळजवळ भारत invivincible होता भारतात खेळताना धोनीच्या हाताखाली त्याचे मुख्य कारण युवराज चा अफाट फॉर्म होता. गंगूचे क्रेडीट युवीला बाहेर जाउ न देण्याचे.
आता मात्र तो संपलाय असेच वाटते. तीच गोष्ट सेहवागची. त्याला त्याच्या खेळाचे नि त्याच्या effect चे श्रेय नेहमी कमी मिळाले असे वाटत राहीलेय.
तीच गोष्ट सेहवागची. त्याला
तीच गोष्ट सेहवागची. त्याला त्याच्या खेळाचे नि त्याच्या effect चे श्रेय नेहमी कमी मिळाले असे वाटत राहीलेय.
>>>>>>>
श्रेय कमी मिळालेय म्हणजे नक्की काय?
सेहवागची तुलना सचिनबरोबर केली जायची हे एक मोठे श्रेय समान.
जगभरातले कॉमेंटेटर त्याच्या स्फोटक फलंदाजीचे आणि सामन्याला एकहाती खेचण्याच्या क्षमतेचे वारंवार कौतुकच करत आलेत. कसोटीत तो जी वेगवान सुरुवात मिळवून द्यायचा त्याचाही इम्पॅक्ट सर्वच कबूल करायचे.
त्याच्या उमेदिच्या काळात जेव्हा विश्व संघ निवडला जायचा त्यात त्याला स्थान असायचे.
हा, आता आयपीएलच्या जमान्यात धोबीपछाड खेळाडूंनाही अव्वाच्या सव्वा भाव दिला जातो हे खरेय. आणि नेमके याच काळात वयाच्या मानाने त्याचे रिफ्लेक्सेस कमी झाल्याने त्याची फलंदाजीची स्ट्रेंथ गंडलीय. पण हेच आयपीएल तो हिरो असण्याच्या काळात असते तर तो सुपरहिरो म्हणून ओळखला गेला असता.
श्रेय कमी मिळालेय म्हणजे
श्रेय कमी मिळालेय म्हणजे नक्की काय? >> fab फोरनंतर त्याचे नाव घेतले जाते.
कुलदिप यादव ची बॉलिंग बघणे कसले delightful आहे, भाऊ बघताय का ? किती तरी दिवसांनी सटल चायनामन बघितला ?
fab फोरनंतर त्याचे नाव घेतले
fab फोरनंतर त्याचे नाव घेतले जाते.
>>>>>
हे फॅब फोर ते सारे मिडलऑर्डरचे खेळाडू आहेत वा त्या खेळाडूंच्या समान वयानुसार वा सिनिअॅरीटीनुसार वगैरे वगिअरे मुळे एकाच ग्रूपमध्ये टाकून म्हटले आहे. याचा अर्थ सेहवागचा नंबर पाचवा असे होत नाही. त्याचा एवरेज सुद्धा दादा-लक्ष्मणपेक्षा जास्त असावा.
पण येस्स, या धोनीच्या राज्यात
पण येस्स, या धोनीच्या राज्यात सेहवागची जाम उपेक्षा होतेय ... माझा तरी सेहवाग प्रचंड आवडता असल्याने मला धोनीची चीड येते या कारणासाठी ..
हे फॅब फोर ते सारे
हे फॅब फोर ते सारे मिडलऑर्डरचे खेळाडू आहेत वा त्या खेळाडूंच्या समान वयानुसार वा सिनिअॅरीटीनुसार वगैरे वगिअरे मुळे एकाच ग्रूपमध्ये टाकून म्हटले आहे. याचा अर्थ सेहवागचा नंबर पाचवा असे होत नाही. त्याचा एवरेज सुद्धा दादा-लक्ष्मणपेक्षा जास्त असावा >> माझ्या आठवणीप्रमाणे सेहवाग २००१ च्या ODI series पासून संघात regular झाला. द्रविड नि दादा ९७ पासून, लक्ष्मण ९९ पासून (पण तो २००१ च्या त्याच सिरीजनंतर १००% in धरला हाऊ लागला. ९९ च्या down under series मधे त्याला ओपन करायला लावल्यामुळे त्याने अल्टिमेटम दिला होता सिडनीतल्या त्या इनिंगनंतर). त्यामूळे ज्या काळाला fab 4 चा काळ मानतात त्यात सेहवाग होताच. पण fab 4 हि term coin झाली तशी fab 5 नाही. तू माझे वाक्य परत वाचलेस तर त्याला श्रेय मिळाले नाही असे मी म्हटले नाहि पण ह्या चौघांएव्हढे नाही असे आहे. अर्थात हे general feeling आहे. इथे मोजण्याची फूटपट्टी नाही तेंव्हा असो.
असामी, मग फॅब फोर एकीकडे आणि
असामी,
मग फॅब फोर एकीकडे आणि सेहवाग एकीकडे असे समजूया
अर्थात हे general feeling आहे. इथे मोजण्याची फूटपट्टी नाही तेंव्हा असो. >>> ओके, सहमत.
एव्हढी चँपियन्स लीग झाली
एव्हढी चँपियन्स लीग झाली (एकदाची!) तरी हा धागा गप्प होता. आजपासून भारत - वेस्ट ईंडिज सिरिज (ODI) सुरू झाली तरी ईथे शांतता? सगळे क्रिकेटप्रेमी ठीक आहेत ना?
अरे सगळे फक्त चँपियन्स लीग
अरे सगळे फक्त चँपियन्स लीग खेळले.. आता देशासाठि खेळताना ये रे माझ्या मागल्या!! विशेषतहा सुरेश रैना.. चँपियन्स लीग मध्ये वाघ वाटला होता...
बंडल सामना झाला .... सात
बंडल सामना झाला ....
सात तासांच्या खेळात एकच मजेशीर घटना घडली ...
.. कोहली पुन्हा २ धावांवर स्लीपमध्ये कॅच देऊन गेला
.. बहुधा अजूनही अँडरसन स्व्पनात येत सावा 
कोकण्या, रैना चा जुना
कोकण्या, रैना चा जुना प्रॉब्लेम आहे, चांगला फॉर्म कॅरी न करण्याचा. आज ९ वर्षं तो संघात आहे, पण अजुनही 'यंगस्टर' कॅटेगरीतच मोडतो. कारण त्याच्यावर अवलंबून नाही रहाता येत. (संघात ९ वर्षं घालवल्यावर म्हणजे १९९८ मधला तेंडुलकर, २००५ मधले द्रविड आणी गांगुली).
रहाणे छान खेळत होता, पण दुर्दैवी पद्धतीनं रन-आऊट झाला. धवन ने ईंग्लंड मधे विजय च्या बाबतीत तिसर्या कसोटीत साऊथअँप्टन ला केले होते. रनिंग बिटवीन विकेट्स च्या बाबतीत पार्टनर बरोबर सामंजस्य हवं.
खूप दिवसानी आलो इथं...
खूप दिवसानी आलो इथं... इतरांसारखाच !
<< कुलदिप यादव ची बॉलिंग बघणे कसले delightful आहे, .. किती तरी दिवसांनी सटल चायनामन बघितला ?>> असामिजी, अगदीं सहमत. He looks a 'natural' ! अक्षर पटेलही खूप बरा व 'बेरक्या' फिरकी गोलंदाज वाटतो.
मला सुनील नरैनचं खूपच वाईट वाटलं; किंबहुना त्याची 'अॅक्शन' सहज, सरळ आहे म्हणूनच अधिक फसवी आहे असंच वाटायचं. तो यातून बाहेर येवून पुन्हा चमकावा.
वेस्ट इंडीज जेंव्हां ' आयला धमाल खूप झाली, आतां थोडा अभ्यास करूंया', ह्या मूडमधे असते, तेंव्हां इतरानी सावध रहायलाच हवं; सध्या त्यांचा तो मूड दिसतोय.
' आयला धमाल खूप झाली, आतां
' आयला धमाल खूप झाली, आतां थोडा अभ्यास करूंया' >>
आवडले वाक्य. हा मूड किती दिवस राहतो हे बघायचे फक्त. रामदिन मात्र सध्या जबरदस्त फॉर्ममधे आहे. अक्षर पटेलबद्दल अनुमोदन, तो डोमेस्टिकमधे कशी करतो बघायला आवडेल.
आज कोहली ३ र्या क्रमांकावर
आज कोहली ३ र्या क्रमांकावर यायला घाबरला
नवोदित रायडूची ढाल केली.
आशा करूया आज मिडल ऑर्डरमध्ये जुन्या चेंडूवर स्पिनर्सचा योग्य तो सामना करत फॉर्म आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे आत्मविश्वास परत मिळवेल.
Pages