चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

20/९/२०१४
१)व्यायाम : ०
२)फळे/भाज्या/सॅलडः 0
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :०
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. :०
७)साखर ३ चमचे इ. : १
एकूण-3/१०..............

20/९/२०१४
१)व्यायाम : ०
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. :०
७)साखर ३ चमचे इ. : १
एकूण-५/१०.............. ८-१० दिवस नाही जमलं व्यायाम करायला. आता नको वाटायला लागला.

२२/९/२०१४
१)व्यायाम : ४ बर्‍याचदिवसांनी ४०-४५ मिनिटे बाहेर फिरून आले.
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. :१/२
७)साखर ३ चमचे इ. : १
एकूण-९.५/१०.............. ९.५

माझे अपडेट

१९/९/२०१४ ८ / १०
(बाहेरच खाण झाल)
२०/९/२०१४
९ / १०

२१/०९/२०१४
८ / १०

२२/०९/२०१४
५ / १० (तब्येत बरी नसल्याने नो व्यायाम)

माझे अपडेटस १७ ते २२ पर्यंत
व्यायाम नियमित चालू, वीकांताला जास्त वेळ केला.
फळे व कडधान्ये रोज खाल्ली जात नाहीत. म्हनॉओन मार्क - ७/१०

२३/९/२०१४
१)व्यायाम : ४
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :०
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. :१/२
७)साखर ३ चमचे इ. : १
पण घरी ४ भजी खाल्ली.
एकूण-८.५/१०.............. ८.५

२३/९/२०१४
१)व्यायाम : १
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :० एक वडा खाल्ला.
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. :१/२
७)साखर ३ चमचे इ. : १

एकूण-५.५/१०..............

२५/९/२०१४ ८/१०
१)व्यायाम २
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. :१
७)साखर ३ चमचे इ. : १

९/२२ - ९/२६ : ३०/५०
जिम नाहीयं .. अधुनमधुनच ३०-४० मिनिटं चालणं होतय .. बाकी तरी सुरु ठेवायचा प्रयत्न करतेय..
नाश्त्याला ब्राऊन ब्रेड् परत आलाय

२०१४/०९/२८ = ६/१०

२०१४/०९/२९ = १०/१०

२०१४/०९/३० = ६/१०

अर्रे इथे दोन चार च दिस्ताहेत रेग्युलरली अपडेट टाकणारे..

बाकीचे कुठेत??

चला चला पटपट टाका.. केदार गुर्जींना वेळ मिळाला कि येतील ना इथे, होमवर्क चेक करायला Happy

थंड पडू नका.
सण वार आहेत. रात्री दांडिया नाचलो. भरपुर व्यायाम झाला, असली लॉजिक्स चुकीची आहेत. सकाळचं रूटीन अन जेवणातलं पथ्य चुकवू नका.
उठा!
वजन कमीच आहे, फिटनेस ठेवूया!!

वर्षुतै . .सध्या गडबडलयं सगळं माझ्याकडे .. नवीन अपार्टमेंटमधे जिम नाहीय त्यामुळे फक्त ब्रिस्क वॉक - ३० मिनिट नि बाहेरचं खाणं झालयं.. Sad
उद्यापासुन व्हॅकेशन .. जमेलं तितकं पोर्शन कंट्रोल

आज माझे १०/१०

मागच्या ४ दिवसांचे ३२/४०

आता मला फिट्नेस मोड मधे जायच आहे. केदार चे मार्क्स वजन कमी करण्यासाठी होते. पण नुसतच फिट्नेस साठी ह्यात काय चेंजेस करता येतील? जेवणामधे की व्यायामामधे? म्हणजे नुसतच फिट्नेस साठी व्यायाम कमी केला तर चालेल (सध्या १ तासाचे टारर्गेट असते.) की जेवणाचा पोर्शन वाढवावा?

Aditi and all I think we need a separate thread for staying fit or may be there is one. This thread is for weight reduction.

Pages