चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार कान पकडला गेल्याने परत जोमात सुरुवात झाली आहे आज पासून परत ७५% च्या वरती जाणार ...
उद्यापासून चागले + Regular updates देते Happy

मंजूडी हाय सोडीयममुळे वाढलेले वजन म्हणजे खूप मीठ, लोणचं , खारट पदार्थ खाल्ल्यावर शरीरात सोडिअमचं प्रमाण वाढतं.
मग ते डायल्यूट करायला शरीरात बरेच पाणी साठवून ठेवले जाते. लघवी कमी होते.
काही जणांचे शरीर याबाबतीत फारच सेंसिटीव असते. या लोकांचे एक दोन वेळा चमच्मीत खाल्ल्यावर सहज अर्धा एक किलो वजन वाढते.
आणि सोडिअम कमी केल्यावर पाणीही लघवीतून निचरा होऊन वजन उतरते.
आजकाल बहुतांश पॅक्ड पदार्थावर सोडिअम कंटेंटही लिहिलेला असतो.

ओके!
पण मग घरी केलेल्या पक्वान्नांशी याचा काही संबंध नाही ना? Wink
कारण गणपतीत वाढलेले वजन पुन्हा नेहमीच्या आहार-व्यायामाने नॉर्मलला आले आहे. मला वाटले होते अधिक कष्ट घ्यावे लागतील.

केदारदा , मला चक्क घेतलसं लिस्ट मधे.. Wink

माझा अपडेट - ९/११
एकुण - ९/१० - व्यायामात फक्त ३० मिनिट चालणं

रीया ,
गणित वगैरे काही नाहीये Happy

व्यायाम केलास तर ४ गुण
गोड नाही खाल्लस तर १ गुण
प्रोटीन्स खाल्ले तर १ गुण
फळे खाल्ली तर १ गुण
वेळेवर जेवण अन झोप १ गुण
बाहेरच नाही खाल्ल तर १ गुण

आता यातल जेवढ जमल त्याचे गुण घ्यायचे

आता माझ काल फळ खाण जमल नाही पण बाकी सगळ जमल तर ९/१० गुण झाले

केदार- या वेळी मनाशी ठरवलेलं पूर्ण करायचंच असा निर्धार आहे. अनेक फायदे होत आहेत. चला कर्म करत राहूया Happy

साती अक्का,
घामट्ट लोकांच्या सोडियम एक्स्ट्रॅक्शनबद्दल सांगा की? काही लोकांना आपोआपच जास्त मीठ लागतं, असंही असू शकतं का?

)मेडिसिन गल्ली बाहेरचा( इब्लिस

एक जनरलाईज्ड निरिक्षण.
किनारपट्टीजवळच्या सगळ्याच स्वयंपाकात आंबट जास्त, अन मीठ कमी असा लोकल स्वयंपाक सापडला.
याउलट देशावर/डोंगरात मीठ जास्त असते स्वयंपाकात.
हे पारंपारिक स्वयंपाकाबद्दल आहे.
कुणी हे नोटिस केलंय का आधी?

माझे अपडेट्स तय्यारेत..
२०१४/०१/०९ ते २०१४/१०/९= ६०/१००
(व्यायामाला वेळ मिळाला नाही.. बाकी चालणं भरपूर झालं.. पण व्यायामाच्या दृष्टीने नाही..

काल सर्व बरोब्बर जमलं..
२०१४/११/९ = १० / १० यस्स्स!!! Happy

माझं नाव प्लीज काढा लिस्ट मधून.. उगीच हे ते जमत नसल्याचा गिल्टच जमा होतोय. मी मला जमेल तसं करत राहीन व्यायाम आहाराचे..
सो लाँग पीपल .. Happy

बस्के ,
रिगरसली करणार्यांच्या लिस्ट मधे तुमच नाव नाही आहे Happy

पण एक मात्र नक्की, गिल्ट चांगली गोष्ट आहे . तो आला म्हणजे प्रॉब्लेम आहे हे समजलय. मग उपाय सोपा असतो Happy

गिल्ट चांगली गोष्ट आहे . तो आला म्हणजे प्रॉब्लेम आहे हे समजलय. मग उपाय सोपा असतो <<+११

त्यासाठीच बर्‍याचश्या गोष्टी केल्या जात आहेत. जस बेकरी प्रॉडक्ट न खाणे, प्रोटीन खाणे इथे लिहायच्या म्हणुन केल्या जाताहेत. लिहीण्यासाठी म्हणुन १५ मिनीटाचा का होइना वॉक केला जातोय.

बाकी चालणं भरपूर झालं.. पण व्यायामाच्या दृष्टीने नाही.. << म्हणजे काय वर्षू?

माझे आजचे ९/१० .

११/९/१४
१)व्यायाम : २
२)फळे/भाज्या/सॅलडः ०
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे इ. : ०
एकूण-६/१०..............१८० / २४०

११/९/१४: ९/१० Happy

१)व्यायाम : ३
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे इ. :१

केदार जाधव , ते तर झालंच, मी म्हणतेय तो वरचा ४३ नंबरही उडवून टाका. Happy
गेल्याच आठवड्यात कळले, माझं थायरॉईड बिनसलंय. भयण्कर निरूत्साह वाटत होता , १०-१२ पाउंड वजनवाढ झाली त्यामुळेच. औषधं चालू केली आहेत. हळूहळू सगळं मार्गी लावायचंय, पण आत्ता या धाग्याचे प्रेशर नाही जमण्यासारखे. Happy

माझे कालचे मार्क ११/९/२०१४ = १०/१०
Happy

१)व्यायाम : ४
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे इ. : १

I am following the rules but cravings for any sweet thing cannot stop.I am walking 4 km daily and doing exercise for 15 min.but how to handle craving for sweet??

आज चे अपडेट.. २०१४ /०९/१२ = १० /१०

बस्के.. अगं.. काळजी घे... प्लीज अशी डिसअपॉइंट होऊ नकोस... आपली कंडीशन नीट समजून घे डॉक कडून आणी हळूहळू , डॉक च्या सल्ल्यानुसार कर व्यायाम इ. ..

१२/९/१४
१)व्यायाम : ०
२)फळे/भाज्या/सॅलडः ०
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे इ. : ०
एकूण-४/१०..............१८४ / २५०

१३/९/१४
१)व्यायाम : ०
२)फळे/भाज्या/सॅलडः ०
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे इ. : ०
एकूण-४/१०..............१८८/ २६०

Pages