मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती - भाग १

Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोक्यात जाणार्‍या राजकीय जाहीराती सुरू झाल्यात.

काँग्रेसची विकासाची भाषा हास्यास्पद वाटते. पण करणार काय, नाईलाज! शेवटी ती जाहीरात आहे, कन्फेशन बॉक्स नाही.

भाजपाच्या दोनेक अ‍ॅड पाहिल्या. भावनेला हात घातलाय खरा, पण केंद्रातले शंभर-सव्वाशे दिवसांचे सरकार महागाई कमी करण्यात अपयशी ठरल्याने आश्वासक वाटत नाहीयेत. त्यावर नरेंद्र मोदींचा चेहरा दाखवणे म्हणजे भाजपाला महाराष्ट्रात चेहराच नाही हे स्वताहून कबूल केल्यासारखेच वाटते.

शिवसेनेची जाहीरात अजून माझ्या पाहण्यात आली नाहीये. पण त्यात बाळासाहेब, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अश्या तीन जनरेशन दाखवायला स्कोप आहे. बस्स यातून घराणेशाहीचा संदेश गेला की फसले.

राष्ट्रवादीची जाहीरात आहे की नाही हे माहीत नाही, मला कुठल्याही प्रकारचे घड्याळ दिसताच मी चॅनेल बदलतो. समहाऊ मला त्यांच्या नेत्यांचा चेहरा फारसा आवडत नाही. प्लीज डोंट माईंड!

मनसेचे इंजिन दिसते अधूनमधून, पण ते निरुपद्रवी वाटते. अरे वा यांचीही अ‍ॅड आहे, एवढेच फीलींग येते. त्यांनी त्यांच्या ब्ल्यू प्रिंटची म्हणावी तेवढी जाहीरात केली नाही असे वाटते. वा माझ्या पाहण्यात कमी आली असावी. पण हाच तर एक मुद्दा आहे त्यांच्याकडे बोलायला.

एअरटेलची जाहीरात छान आणि वेगळी आहे. नवर्‍याला ऑफिस मधे बायकोच्या हाताखाली काम करावे लागते ऑर्डर्स ऐकाव्या लागतात. पण ऑफिसात बॉस असुन देखील घरी गेल्यावर मात्र बायकोच असते. आणि सर्वसाधारण बायको सारखे नवर्‍याला लवकर ये म्हणुन फोन करते.

ही कंन्सेप्ट घेणेच खरतर अभिनंदनपात्र आहे. कुठे तरी बदल होत आहे.

Dell च्या जाहीरातीतील मुलगी बापाला tubelight म्हणते
आमच्या तिर्थरूपानी कानाखाली आव्वाज काढला असता

Dell च्या जाहीरातीतील मुलगी बापाला tubelight म्हणते
आमच्या तिर्थरूपानी कानाखाली आव्वाज काढला असता

एफ एम वर परत काही जाहिरातीनी उछ्छाद मांडला आहे Sad .

आय. सी.आय.सी लोम्बार्ड इन्शुरन्स : इतक्या लांबलचक आणि कंटाळ्वाण्या जाहीराती .अतिशयोक्तीपूर्ण .

भाजपाच्या राजकिय जाहीराती : सगळे इतके आरडाओरडा करून बोलतात . "अछ्छे दिन आनेवाले है ' च्या जाहीराती चांगल्या होत्या.
माफिया राजच्या संदर्भात एक जण म्हणतो " इमानदार अधिकार्‍यांची ही अवस्था तर आमच्या सारख्यांच काय ? "
म्हणजे नक्कि काय ??? तुम्ही इमान्दार नाही ?

रूपसंगम : कोणी लग्नाच्या आदल्या आठवड्यात "शादी का जोडा" खरेदी करायला जाइल ? . लग्न घाईघाईत ठरल तर गोष्ट वेगळी .

बर्‍याच बायका आपले गोरेपण आणि त्वचा कोणत्यातरी शेडकार्ड वर मोजत असतात ती व्हॅसलीन व्हाईट ची जाहीरात अत्यंत भंगार.
व्हॅसलीन थंडीपासून बचाव या त्यांच्या क्षेत्रात का नाही राहत? विंटर लोशन मधे पण गोरेपणा वर्धक गोष्टी का लादल्या जात आहेत? हळूहळू साबण, पावडर, तेल, क्रिम, लोशन ,या प्रत्येक गोष्टी जबरदस्ती गोरेपणा वाढवणार्‍या तत्वांसहितच घ्याव्या लागतील का?

आणि ते फेयर अँड लव्हली तर अमेरिका, सिंगापुर, दुबई वगैरे देशातील फेयर्नेस क्रीम पेक्षा जास्त दर्जेदार आहे...आणी त्याचा पहिला नंबर पण येतो....

प्रिती आता हसायला येतय तुमची पोस्ट वाचुन, पण ही वस्तुस्थिती आहे की जाहीरातीत, कधी कधी मालिकांमधुन वडील, मुलांच्या नात्यांमधे अतीमोकळेपणा दाखवला जातो.... इतकी मोकळीक कुठल्याच घरात नसते....

इतकी मोकळीक कुठल्याच घरात नसते....
>>>
असते, आमच्या स्वताच्या घरात आहे, आमच्याच बापलेकाच्या नात्यात आहे. या धाग्याचा तो विषय नाही, पण लिहेन कधीतरी Happy

भाजपच्या "महाराष्ट्रातले उद्योग परराज्यांत गेल्याने बेकार झालेल्या रिक्षवाल्याची तळतळाटी जाहिरात रेडियोवरून तरी गायब झालीय. सध्या मला टीव्हीचा उपयोग कॉम्प्युटरचा मॉनिटर म्हणून करावा लागत असल्याने टीव्हीवरचे कार्यक्रम पाहता येत नाहीएत. टीव्हीवर आहे का ती जाहिरात अजून? तिथूनही ती गायब झाली असेल तर त्यामागचे रहस्य काय?

tubelight म्हणण्याईतकी अजुनतरी बापलेकीत पाहिलं नाहीय >>> एक्झॅक्टली प्रिती मला हेच म्हणायच आहे... "बाबा तुम्हाला काही कळत नाही" इतपत मी माझ्या वडीलांशी मोकळेपणाने बोलते, पण ट्युबलाईट नक्कीच नाही म्हणत

पहिल्यांदा ते ट्यूबलाईट ऐकले तेव्हा मला वाटलं ती बाबांना सांगते आहे की ट्यूब बंद करा, इतकी रोषणाई केली आहेत तर! Proud मग ट्यूबलाईट पेटली माझी! मग आवडलं नाही ते (अर्थातच).

एअरटेलची जाहीरात छान आणि वेगळी आहे. नवर्‍याला ऑफिस मधे बायकोच्या हाताखाली काम करावे लागते ऑर्डर्स ऐकाव्या लागतात. पण ऑफिसात बॉस असुन देखील घरी गेल्यावर मात्र बायकोच असते. आणि सर्वसाधारण बायको सारखे नवर्‍याला लवकर ये म्हणुन फोन करते.

>> पण ऑफिसात बॉस असली तरी घरी बायको ती बायकोच.. तिला सतराशेसाठ पदार्थ बनवुन नवर्‍याच्या अप्रेझलला उभे राहावे लागते. Angry

खरय Proud
आपलंच बीपी वाढतं
हे त्या जाहिरात वाल्यांना सांगायला गेलो तर ते बीपीच्या गोळ्यांची जाहिरात दाखवतील . त्यापेक्षा गप्प बसुया Proud

टीव्हीवर आहे का ती जाहिरात अजून?
>>>>>>
अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा..... हिच ना, आहे अजून, कालपर्यंत होती.

अवांतर - इथे मुंबईत मराठी रिक्षावाले बघायला मिळायचे वांधे झालेत, त्यामुळे रिक्षावाल्याच्या तोंडी महाराष्ट्र माझा कसेसेच वाटते Wink

मर्दोंके दिल का रास्ता पेटसे होके जाता है
>>>>>>>>
हे एकेकाळी खरेच होते, म्हणून तर वाक्य फेमस झालेय.
अगदी आजही ज्या बायका हाऊस वाईफ आहेत त्यांना हे पटते, ज्या पुरुषांच्या बरोबरीने नोकरी करतात त्यांना नाही पटणार.
जर जाहीरातीचा टारगेट ऑडियन्स हाऊसवाईफ असतील तर(?) ते त्या हिशोबाने जाहीरात बनवणार.

जर जाहीरातीचा टारगेट ऑडियन्स हाऊसवाईफ असतील तर(?) ते त्या हिशोबाने जाहीरात बनवणार.>>> आं???? नीट बघा, ती वर्किंग वूमन आहे शिवाय तिचा नवरा तिच्या हाताखाली काम करतो. किमान या एका कन्सेप्टसाठी मला ती जाहिरात आवडली. त्याच सीरीजमधली दुसरी अ‍ॅड पण ब्रिलियंट आहे.

Pages