मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती - भाग १

Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो .. तसच प्रेस्टिजच्या अभि-अ‍ॅशच्या पण काही अ‍ॅड्स आहेत! उगाच त्या दोघांना किचन दर्शन घडवुन कोण घेणारे कुकर वगैरे

त्यांनीच पैसे दिले असतील आम्हाला जाहिरातीत घ्या म्हणून. Proud

एकुणच ती ऐश्वर्या डोक्यात जाते.

एक नवीन तनिश्क जाहिरात पाहिली आई मुलाची, छान आहे .मला अजुन लिन्क देता येत नाही.त्यामुळे कुणीतरी द्या .तन्वी आजमी(लय भारी तील आई)आहे त्यात..नाव आहे तुनळीवर-Tanishq-sunehri diwali.

वर सिनि यांनी सांगितलेली जाहिरात.

https://www.youtube.com/watch?v=68Ok8oAqAzI

त्या मुलाने त्याच्या आईला दिलेले पेंडट आणि चेन मिळुन ५००० त असेल तर मी नक्की घेणार या दिवाळीला. Happy

>>पियु एक घिसपीट वाक्य "मर्दोंके दिल का रास्ता पेटसे होके जाता है"

अगदी अगदी Angry

राजकिय जाहीरातीमध्ये एक " आदित्य ठाकरे" च्या जाहीराती केवळ जाहीराती वाटत नाहीत.
शिवसेनाची हिन्दी जिंगल मस्त ( केसरीया रंग )
बाकी काँग्रेस आणि भाजपा ने वात आणलाय

>> तिला सतराशेसाठ पदार्थ बनवुन नवर्‍याच्या अप्रेझलला उभे राहावे लागते.
कुठल्याश्या ready breakfast product ची add आहे. प्रत्येक जण वेगळं काहितरी करायला सांगतो आणि ती एकटी सगळं हसत हसत करते. add मधे त्यांचे सगळे products एकदम दाखावायचे हा हेतू साध्य होतो... पण हीच परिस्थिती एका ओळखीच्या घरीदेखिल बघितल्यावर त्या घरातील बाईची दया आली.

कुठल्याश्या ready breakfast product ची add आहे. प्रत्येक जण वेगळं काहितरी करायला सांगतो आणि ती एकटी सगळं हसत हसत करते >>>>> तिला हसत हसत न करायला झालय काय सगळ? एकतर तिला स्वतःला काहीही करायच नाहीये... नुसत कॅमेर्‍यासमोर डोळ्यावर न आलेली बट बाजुला करत गॅससमोर उभ रहायच आहे.. दुसरी गोष्ट इडली, वडा, उपमा यासाठी लागणार रॉ मटेरीअल तिला आयत मिळालय... आमच्यासारख आहे का आदल्या दिवशी भिजवा, रात्री अर्धोन्मेलित नेत्रांनी ते वाटुन ठेवा.. वाटल्यावर मिक्सरच भांड धुवा... हे सगळ करुन दाखव म्हणाव तिला हसत हसत आणि बटा सावरत... आम्हाला सकाळी केसांकडे बघायला पण वेळ नसतो..

ती एम टी आर ब्रेकफास्ट मिक्सेस ची जाहीरात दाखवू नये घरात वाईट पायंडा पडतो असे मला सारखे वाटते. आणि एकाच दिवशी चार ब्रेकफास्ट मिक्सेस वापरुन ब्रेकफास्टचा प्रतीदीन खर्च पण खूप येईल Happy

ती एम टी आर ब्रेकफास्ट मिक्सेस ची जाहीरात दाखवू नये घरात वाईट पायंडा पडतो असे मला सारखे वाटते.

>> +१. ते त्यांचं प्रॉडक्ट आहे. त्यामुळे ते जाहिरात करणारच. पण फक्त एकच बाई प्रत्येकाच्या आवडीचा वेगवेगळा ब्रेफा बनवते याऐवजी प्रत्येकजण आपल्याला आवडेल ते स्वतःच्या स्वतः कोणत्याही वेळी बनवुन घेतेय हे दाखवुनही त्यांना 'रेडी टू कुक' हा मेसेज देता आला असता.

असो.. आपण इथे चर्चा करून काही उपयोग नाही. जाहिरात करणार्‍यांना समाज सुधारण्यात किंवा चुकीचे पायंडे मोडण्यात काही इंटरेस्ट नसतो. त्यांना त्यांचे प्रॉडक्ट विकले गेल्याशी मतलब. जे अगदी स्वाभाविक आहे.

तरीसुद्धा..
आता हि जाहिरात अश्या बाईला जास्त अपील होईल जिला असे चारचार ब्रेफा बनवावे लागतात प्रत्येकाच्या आवडीनुसार. त्यामुळे टार्गेट ऑडियन्स लिमिटेड झाला. हेच जर प्रत्येकाला बनवतांना दाखवले असते तर जाहीरात मुले, मुली, गृहिणी, एकटे राहणारे स्त्री-पुरुष, हॉस्टेलाईट्स, टिनेजर्स सगळ्यांना अपील झाली असती हेमावैम.

प्रत्येकाला आवडेल ते खाता यावं आणि ते बनवण्यात बनवणार्‍याला आनंद हे मला पटतं पण आपण सुरुवातीला हे आनंद म्हणून करतो आणि हळूहळू ते रोजचं बनतं तेव्हा सुपरवूमन कॉम्प्लेक्स येतो. सकाळच्या घाईत घरात फक्त कार्ले असताना ते बनवून परत दुसर्‍या आवडीसाठी बताट्याच्या काचर्‍या टाकताना टाईम मॅनेजमेंटचा अभिमान असला तरी मनात थोडी चिडचिड होतेच.

येस्स पियु.. रेडीमिक्स हे वापरायला किती सोपे आहेत हे सुद्धा मांडता आल असत स्पेशली होस्टेलाईट्सना किंवा नोकरीनिमित्त परदेशात रहाणारा एखादा ग्रुप दाखवुन..

इझी टु युझ मध्ये , मिल्कमेड्च्या जाहिराती आवडलेल्या - बेसन लाडू आठवते

एफ एम वर सकाळी ९.३० ते १०.३० कुठलाही चॅनेल लावणे म्हणजे स्वताच्याच मुस्कटात मारुन घेण्यासारखे आहे, तासाभरात सगळ्याचे मिळून एखादे गाणे ऐकायला मिळते . जाहिरातींचा सुळसुळाट आणि आर जे ची निरर्थक बकवास (ब्ला ब्ला ब्ला) , वीट येतो अगदी.

तशा मला गिट्सच्या जाहीराती पण नाही आवडत... सगळ आयत घेउन नुसत पाणी मिसळुन तयार केलेल्या पदार्थाच काय कौतुक? या सगळ्यात तुमच कौशल्य काय, पाणी मिसळणे? त्यातही स्वतःच डोक वापराव लागत नाही.. ते सुद्धा किती घालायच ते पॅकवर दिलेल असत..

एफ एम वर सकाळी ९.३० ते १०.३० कुठलाही चॅनेल लावणे म्हणजे स्वताच्याच मुस्कटात मारुन घेण्यासारखे आहे, तासाभरात सगळ्याचे मिळून एखादे गाणे ऐकायला मिळते . जाहिरातींचा सुळसुळाट आणि आर जे ची निरर्थक बकवास (ब्ला ब्ला ब्ला) , वीट येतो अगदी.

>> मला वाटतं.. आजकाल कुठल्याही.. अगदी कुठल्याही वेळी एफ एम वर हेच होते. Angry
त्यापेक्षा मी "सावन (Saavn)" नावाचे अ‍ॅप घेतले आहे मोबाईलमध्ये.

कौशल्य मुद्द्यापेक्षा वेळ वाचवणे मुद्द्यावर उपयोग हा उद्देश असेल. >>>> अनु.. त्या एकाही जाहीरातीत वर्किंग वुमन दाखवली नाहीये... गिट्स वापरुन सर्वांना तृप्त करुन ती वेळेवर ऑफीसला गेली आहे अस दाखवल असत तर कदाचित पटला असता हा मुद्दा...

>> मेन वील बी मेन
हो... आणि seagrams music cds च्या पण मिश्किल आहेत Wink

FastTrack : move on ची नवीन add आवडली, ज्यात कचरा करणार्‍याला कचराकुंडीत टाकुन देतात. [हे करायला पाहिजे 'स्वच्छ भारत' मधे!!]

पी सी ज्वेलर्स ची जाहिरात पण मस्त आहे.
हिर्‍यांचं सुंदर कानातलं घातलेली एक बाई आणि तिचा नवरा पार्टित एन्ट्री घेतात. दुसर्‍या कपलमधली बाई कानातल्यांची तारिक करते तर तिचा नवरा म्हणतो मग हिर्‍याचं कानातलं घालेल तर काय, नवरा इन्व्हेस्ट्मेंट कन्स्लटंट आहे. त्यावर ई.क. नवरा म्हणतो मी सहा महिने घरी आहे, बायको घर चालवते.
मग हा माणूस म्हणतो - सो यू आर द मॅन ऑफ द हाऊस
ती बाई मह्णते - ईव्हन बेटर, आय अ‍ॅम द वुमन ऑफ द हाऊस Happy

Pages