मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती - भाग १

Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो वाचले नंतर एअरटेल,
जाहीरात पाहिली नाही,

जाहीरातील महिला वर्किंग वूमन असली तरी जाहीरात हाऊस वाईफना कॅच करू शकते.

म्हणजे अरे हि नवर्‍याची बॉस असूनही जेवण बनवण्याच्या कामाला तितकेच महत्व देते तर त्याला हलके लेखत नाही हे बघून हाऊसवाईफना आपल्या घरकामाचा अभिमान वाटू शकतो..

चुकत असेल तर येथील एखाद्या हाऊसवाईफने करेक्ट करावे Happy

Read all previous posts on this page, not just the last one. Please.>> To whom this post is addressed?

काम करणाऱ्या बायका जेवण बनवण्याला कमी लेखत नाहीत. त्याही त्यासाठीच घरात, बाहेर राबत असतात. वेळ द्यायला जमत नसेल तर स्पेशल स्वयंपाकी अपॉईंट करतात. हे महत्व वाढवणं आहे की कमी करणं?

मग ट्यूबलाईट पेटली माझी >>>
माझी अजूनही पेटलेली नाहीय . मला वाटतं ती मुलगी बाबांना tube बंद करायला सांगतीये . खरं काय अर्थ आहे त्याचा ?
तिला सतराशेसाठ पदार्थ बनवुन नवर्‍याच्या अप्रेझलला उभे राहावे लागते >>>
बायकांनाच हौस असते असल्या गोष्टींची . नवर्यांचे फालतू लाड करून त्यांना डोक्यावर चढवून ठेवायची ..

एक कुठलीतरी अ‍ॅड आहे....ज्योती सुभाष त्यात साउथ इंडियन आजी दाखवल्यात...आणी नवर्याबद्दल बोलत असतात.. की " त्यांना वाटतं मला काही कळत नाही..पण माझ्या दुधात ते औषधाच्या गोळ्या मिसळुन देतात..त्यांना वाटतं माझ्या लक्षात येत नाही...पण ते दुध फार वाईट लागतं . पण ते इतक्या प्रेमाने करतात की त्यांना दुखवावसं वातत नाही " ......
अशी काहिशी अ‍ॅड आहे ती..... पण मस्त वाटते

ऋन्मेष एअरटेलची जाहीरात तुम्ही म्हणताय तसा संदेश कसा काय देईल? एखाद्या कुकींग ऑईलची जाहीरात अस्ती तर समजु शकले असते मी तुमच स्टेटामेंट...

खाणं छान बनवून नवर्‍याला बोलावणं इ. ठीक पण आधी स्वतःच थांबून काम करायला सांगितल्यावर कोणत्याही नॉर्मल नवर्‍याला 'लवकर ये छान छान खाऊ केलाय' म्हणून बोलावलं तर तो आधी खेकसेल 'तूच ना थांबून काम पूर्ण करायला सांगितलंस आणि आता मारे जेवायला लवकर ये सांगतेयस. तुला स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर झालीय का?' Happy

किमान या एका कन्सेप्टसाठी मला ती जाहिरात आवडली.
>>
मला इथंपर्यंतच ती अ‍ॅड आवडली होती.
कोणास ठाऊक का मला असं वाटतं की त्या नवर्‍याचा राग तरीही गेलेला नाही. कित्ती उर्मट सारखं रिअ‍ॅक्ट करतो तो. त्यामुळे तर मला जास्तच नाही आवडली ती अ‍ॅड Sad

हो अनिश्का... त्याच दोघांच्या अजुन दोन अ‍ॅड्स आहेत.. कुठल्यातरी इन्शोरन्स कंपनीच्या जाहीराती आहेत त्या..

अनू येस ती अ‍ॅड मस्त आहे. त्या सगळ्याच अ‍ॅड्स मस्त आहे Happy

ऋन्मेष, मी सध्या वर्किंग वूमन आहे आणि मला हाऊसवाईफ झाले तरीही स्वयंपाक आवड्णार नाही आणि तू म्हणतोयेस तसलं काही वाटणार नाही.

रच्याकने तुला मुद्दाम काड्या टाकायची सवय कुठुन लागलीये? जे सगळे बोलतील त्याच्या दुसरं काहीतरी बोलायचं आणि मग मज्जा बघत बसायची.

अच्छा....आणि अजुन एक आधी यायची ती अ‍ॅड...दरवाजा उघडुन एक आजोबा बाहेर येतात तर एक लाडु आणि त्यावर मेणबत्ती दरवाजात ठेवलेली असते...आणी लगेच दोन स्लीव्हलेस आणि बॉयकट असलेल्या आज्या येतात आणि हॅप्पी बर्थ्डे चिंटु...अस म्हणत त्या ८० वर्षाच्या आजोबांना हग करतात....त्या सर्वांचे चेहेर्यवरचे भाव मस्त दाखवलेत

आशूडी,
मी वरील पोस्टमध्ये कुठलेही मत न मांडता जाहीरात बनवणार्‍याच्या डोक्यात काय असावे असा अंदाज करतोय. माझी स्वताची आई नोकरी करणारी आहे आणि याचा मला अभिमानच आहे Happy

मुग्धटली, (आणि रिया तू पण)

मी ती अ‍ॅड पाहिली नाहीये, किंवा आठवत तरी नाहीये.
ती एअरटेल आहे हे ही माहीत नव्हते.
ते तर "पेट का रास्ता दिलसे वगैरे" पोस्टच्या संदर्भाने मी बोललो. वाक्य घीसेपीटे का असेना ते आजच्या काळातही ट्र्यू आहे असे मला वाटते. यात स्त्री-पुरुष समानतेत घुसायची गरज नाहीये Happy

बेसिकली कुठचीही जाहीरात आठवताच सर्वप्रथम तिचे प्रॉडक्ट आणि त्याचबरोबर ब्रांड पटकन स्ट्राईक होत नसेल तर मला तरी ती जाहीरात फुकट गेली असे वाटते. Happy

एअरटेल च्या जाहीरातीत बायकोची बॉसगिरी आणि तिचा प्रेमळपणा दोन्ही दाखवला आहे. बायका दोन्ही गोष्टी व्यवस्थित कॅरी करतात या अर्थाची जाहीरात आहे.

स्त्री - पुरुष समानता नाही रे...
ते आजच्या काळातही ट्र्यू आहे असे मला वाटते. >>> हेच अगदीच काही ट्रू बी नाहीये हेच आम्ही म्हणतोय.
आणि हीच मानसिकता चुकीची आहे हे आम्ही म्हणतोय Sad

तुमची व्यक्ती (स्त्री वा पुरूष हा मुद्दा नकोच) एकदम मनमिळाऊ, सर्वांना सांभाळून घेणारी, केअरींग (हाऊस वाईफ की वर्किंग हा मुद्दच नको आणूयात इथे) वगैरे असेल तर फक्त ती सुगरण नाही या निकषावरुन तुम्ही तिला मनात स्थान देणार नाही का?
हेच एखादी कट कारस्थानी व्यक्ती सुगरण आहे म्हणुन लगेच ती भारी का?

हा निकष असेल तर अनेक पुरुषांना स्वयंपाक येत नाही तेंव्हा त्यांना सरळ च्या सरळ डुख ठेवून, मनात स्थान न देता वागवायला हवं.

बाय द वे आपण धागा का भरकटवतोय? Sad

मग हीच प्रेमळ बायको नवर्‍याला थांबून कामात मदत का करत नाही?
आज काम निपटवून उद्या सुट्टी मारुन खादाडी बनवता आणि खाता आली असती ना?

मग हीच प्रेमळ बायको नवर्‍याला थांबून कामात मदत का करत नाही?
>>
ती बॉस असते ना म्हणून Happy
ते ठिकेय Happy बॉस कधीच एंप्लॉयीला मदत नाही करत कामात Happy

विनित दवेंचा पॉईंट मला पटला. ती प्रेमळही आहे आणि कर्तव्य तत्परही.
पण याचा एअरटेलशी काहीच संबंध नाहीच.... आणि फार अपेक्षित परिणामही साधला जात नाहीये म्हणजे फेलच गेली ही अ‍ॅड.
तरीही मला वाटलं की नवर्‍याच्या चेहर्‍यावरचे हावभाव बरे असते तर कदाचित कुठे तरी पोहचली असती.

ते आजच्या काळातही ट्र्यू आहे असे मला वाटते >>>> १००% नाही, पण काही प्रमाणात आहे.. पण तेच फायनल असाव अस मला नाही वाटत... फार लांब नको पण मी केलेला स्वयंपाक जर माझ्या नवर्‍याला आवडल्याची दाद त्याच्याकडुन मिळाली तर मलाही आनंद होतो... पण एखाद्या घरात जर बायकोच करीअर उत्तम असेल आणि तिला स्वयंपाक चांगला करता येत नसेल तर नवर्‍याने अथवा सासरच्या इतरांनी त्या गोष्टीचा बाउ करु नये... माझी बायको/सून उत्तम करिअरीस्ट आहे हा मुद्दाही दिल में जगा बनवायला चालेल...

कुणाला काही लागेलस बोलले असेन तर सॉरी

बाय द वे आपण धागा का भरकटवतोय? >>>> ग्रेट रीया... हे उत्तम झाल..

मी_अनु Lol नॉट अ बॅड आयड्या...

आता आपण आवडलेल्या/न आवडलेल्या जाहीरातीविषयी बोलुया..

तुमची व्यक्ती (स्त्री वा पुरूष हा मुद्दा नकोच) एकदम मनमिळाऊ, सर्वांना सांभाळून घेणारी, केअरींग (हाऊस वाईफ की वर्किंग हा मुद्दच नको आणूयात इथे) वगैरे असेल तर फक्त ती सुगरण नाही या निकषावरुन तुम्ही तिला मनात स्थान देणार नाही का?
हेच एखादी कट कारस्थानी व्यक्ती सुगरण आहे म्हणुन लगेच ती भारी का?
>>>>>>>>

मैत्रीणी, इथे बाकीच्या सर्व गोष्टी कॉन्स्टंट ठेवून मग तुलना करायच्या आहेत.
हाताला चांगली चव असणारी लाईफ पार्टनर हा आजही बरेपैकी महत्वाचा गुण आहे. फक्त अपेक्षांच्या प्रायोरीटी बदलल्याने आपण याला बोनस गुण समजू लागलो आहोत.

मुग्धटली, येस्स Happy

अवांतर - हा धागा थोडासा भरकटला तर चालत असावा, पण एकीकडे मतभेद ठेवून बाहेर पडले की ते दुसर्‍या धाग्यावर निघतात. Wink

हाताला चांगली चव असणारी लाईफ पार्टनर हा आजही बरेपैकी महत्वाचा गुण आहे. फक्त अपेक्षांच्या प्रायोरीटी बदलल्याने आपण याला बोनस गुण समजू लागलो आहोत.
>>>
हेच चुकीचे आहे हे माझे म्हणणे आहे Happy स्वयंपाक हा क्रायटेरिया ठेवला तर मल अकधी लग्नासाठी मुलगाच मिळनार नाही मग. मिळायलाही नको Happy
असो! बाकी माझ्याकडुन चर्चा समाप्त Happy
मलाही इथे कजाहिरातींबद्दल वाचायला आवडेल Happy

ए बस झालं ना....ऋन्मेऽऽष बस कर आता...पकायला होतय तीच तीच चर्चा वाचुन....त्याला एकतर काही अर्थ नाही..आणि हे बदलणार नाही.....मेन धाग्याविषयी बोलायच का??? स्त्री पुरुष वादासाठी नवीन धागा उघड हवं तर

स्त्री पुरुष वादासाठी नवीन धागा उघड हवं तर >>> नको नको... सगळे धागे ओस पडतील आणि तिकडे तुंबळ युद्ध सुरु होईल

स्वयंपाक हा क्रायटेरिया ठेवला तर ...... >>>> हेच चुकीचे आहे. आज हा क्रायटेरीया म्हणून फारसा उरला नाही पण याचा अर्थ चांगल्या स्वयंपाक खाल्याने मिळणारा आनंद कमी झाला नाहीये.

असो! आता माझ्याकडुनही चर्चा समाप्त Happy
मला आता जरा ऑफिसचे काम करायला आवडेल Wink

आणि स्त्री-पुरुष वाद कुठे होता यात ... Uhoh
फक्त स्त्री आणि पुरुष वाद घालत होते बस्स ...
हि आता लास्ट पोस्ट नक्की Happy

बेसिकली कुठचीही जाहीरात आठवताच सर्वप्रथम तिचे प्रॉडक्ट आणि त्याचबरोबर ब्रांड पटकन स्ट्राईक होत नसेल तर मला तरी ती जाहीरात फुकट गेली असे वाटते.>> याला अनुमोदन!!
एक चष्म्यांची अशीच जाहीरात होती ज्यात त्या मॉडेलच्या लिपस्टिकवरच लक्ष जायचं पुन्हा पाहील्यावर प्रॉडक्ट समजलं. ( ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे का?)

रच्याकने : एअरटेलच्या बायको बॉस या जाहीरातीसंदर्भात (सो कॉल्ड) तज्ञ लोकांची महाचर्चा वै. झाली होती. शोभा डे, अ‍ॅलेक पदमसी आणि कोणीतरी होतं!! वरचं वाक्य या जाहीरातीला लागू होतं. एअरटेलच्या सगळ्याच अ‍ॅड्स ओढून ताणून भावनांना हात घातल्यासारख्या आहेत. प्रत्येक ठिकाणी ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी वर्क करत नाही!!

काल कुठल्यातरी सुपर्माकेटची दिवाळी सेल ची अ‍ॅड पाहिली. . 'चल खोटी' वाली... भाषांतर जाम डोक्यात गेलं अन ती बाई पण! 'चल झुटी' च 'चल खोटी???????' कैच्याकाही!

हा हा .. चल खोटी .. Proud
मला ते चल झूटी वर्जन पण डोक्यात जाते.. बहुधा त्यातील लोक्स बघताना सांसबहुमालिका कुटुंबाचा फील येत असल्याने ..

Pages