हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.
जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.
नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास या पुस्तकाचे परिशिष्ट आहे नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र. ते येथे दिले आहे. (धन्यवाद प्रकाश घाटपांडें). त्या अनुषंगाने संभाषण सुरु करु शकु.
https://docs.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit
(२३ नव्हेंबर २००९ च्या पोस्ट वरुन):
अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.
स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.
वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.
(सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आलेले काही वैयक्तिक लढे) :
विश्वास नसल्यामुळे मुलाची मुंज न करणं, मृत्युनंतरचे विधी न करणं, सत्यनारायण न करणं, दृष्ट काढण्याची जबरदस्ती न करु देणं, मासीक पाळी असल्यामुळे डिस्क्रिमिनेट न करु देणं (हे सर्व फार त्रोटक झालं - त्या लोकांच्या भावना पोचण्यासाठी त्यांच्याच पोस्ट वाचाव्या).
कर्मकांडात बांधली जाते ती
कर्मकांडात बांधली जाते ती फक्त भीती. खरी श्रद्धा कर्मकांडात बांधली जात नाही. श्रद्धा असल्यावर कर्मकांडं केली तरी ठिक, नाही केली तरी ठिक.
राईट गिल्ट येता कामा नये.
राईट गिल्ट येता कामा नये. देवाची भिती काय कामाची?
बेफिकीर, निरुपद्रवी हा शब्द
बेफिकीर, निरुपद्रवी हा शब्द एका मर्यादेपर्यंत सापेक्ष आहे ( दाभोळकर ज्या अंधश्रद्धांविरुद्ध लढले त्या उपद्रवी होत्या हे मान्य करायला हरकत नाही.) ह्याची कल्पना आहे
ज्या गोष्टी मनाविरुद्ध/ सक्तीने केल्या जातात त्यामागे अंधश्रद्धांचा बागुलबुवा ( मी हे केले नाही तर माझ्या बाबतीत वाईट घडेल ) किंवा मग सामाजिक प्रेशर असते ( लोक काय म्हणतील. ) ही दोन कारणे असतात.
एखाद्या गरीबाने मुलांना आनंद मिळावा म्हणून कर्ज काढून सण साजरा केला तर त्याची इच्छा झाली ती, सक्ती नाही. मग त्याला ते निरुपद्रवी वाटेल कारण सण साजरा करण्यातून मिळणारा आनंद अमूल्य आहे असे त्याला वाटत असेल. हा एक वेगळा मुद्दा झाला.
शेवटी सगळी गाडी 'जगा आणि जगू द्या' ह्या तत्वाशी येऊन थांबते
अमूक एका वेळी एखादी गोष्ट साजरी करणे हे समूहभावना जोपासणे आहे असे मला वाटते.
मि काहि महिने जपान ला होते
मि काहि महिने जपान ला होते तिथे हानामि आनि हानाबि असे दोन उत्सव पाहले अजुन एक पाहिला होता त्याला काय म्ह्नतात माहित नाहि पन त्या उस्तवात मि गेले होते.
हानामि म्ह्नजे फुलाचा ऊत्सव{ फुल बघन्याचा ऊउस्व मार्चच्या पहिल्या दुसर्या आढ्वड्यात तिथे चेरिचे फुल ऊमलतात संपुर्न झाड भरुन फुलेच फुले सगळ्या जापान भर अशि झाडे आहेत अनि काहि काहि पार्कभर तर हिच झाडे असतात. या सिजन मधे सगळा जपान रोड वर असतो लेकर बाळ घेऊन तासनतास फुलांच्या झाडाखालि बसुन राहतात खान पिन पन चालु असत पन कचरा, आवाज गोधळ गड्बड औषधाला पन नाहि.हा त्याचा ऊत्सव आनि सण
हानाबि पण असाच ऊत्सव तो ऑगस्ट मधे असतो प्रत्येक शहरात, गावात नदिच्या कडेला मोकळे पार्क असतात तिथे रात्रि दारुचि रोशनाई असते सगळे आकाश प्रकाशाने ऊजळुन निघतो खुप प्रकारच्या डिजाईन आकाशात ऊमटतात निरनिराळि फुल,फुलपाखरे डोळ्याच पारन फिटेल इतके सुंदर{आवाजाचे फटाके नसतात}
आनि हे बघायला सगळे जापनिज पारंपारिक ड्रेस घालुन{किमोनो} जमा होतात त्याचे पार्क मधे बसुन खान पिन चालु असत पन कचरा, आवाज गोधळ गड्बड औषधाला पन नाहि हा त्याचा ऊत्सव आनि सण
अजुन एक असतो प्रत्येक गल्लि मुहल्यातिल पार्क मधे अजुबाजुचे सगळे जमा होतात व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यक्रम होतात.काहि गूहिनि खान्यापिन्याचे स्टाल लावतात.सगळि लहान मुले मोठ्याच्या समोर
आवाज न करनारि रोशनाई ऊड्वतात.धमाल असते. पार्क मधे बसुन खान पिन चालु असत पन कचरा, आवाज गोधळ गड्बड औषधाला पन नाहि हा त्याचा ऊत्सव आनि सण
तिकड्चे ऊत्सव आनि सण एकेकट्याने साजरे करत नाहित सगळा समाज,सगळा देष मिळुन साजरा करतात
या ऊत्सवा मधे कुठेच देव पुजापाठ नसते फक्त चित्तवृत्ती आनंदी ठेवनारे ऊत्सव निसर्गाच्या सानिध्यात.
आगो चि पोस्ट वाचताना का कुनास
आगो चि पोस्ट वाचताना का कुनास ठाऊक एक प्रसंग डोळ्या समोर तरळुन गेला.
एक सुंदर बंगला विद्युतरोशनाईने न्हाउन निघालेला फराळांचा घमघाट सुटलेला संध्याकाळचि वेळ दारात आंगनात पनत्या मांड्लेल्या प्रसन्न वातावरन लेकरबाळ लेकिसुना कोर्याकरकरित कपड्यात नटुन थटुन.
नुसति लगबग आता अंगनात बच्चे मंडळि फटाके फोडायला जमा झालित आनि गेट्वर वॅचमन जोर जोरात काठि
अपटुन ओरतोय ए पळा ईथुन मालका नि बघितलेतर पोलिसात देतिल" मालक विचारतात कायरे कशाला ओरड्तोय' काय नाहि साहेब जवळच्या झोपडपट्टितलि पोर फुसक्या फटाके जमाकरायला येतात.
दे >>>>> हकलुन. त्रास देतात नुसता दुसर्याचा आनंद नासवायचा.येतात
अगो, सुंदर पोस्ट(मागच्या
अगो, सुंदर पोस्ट(मागच्या पानावरची)!
अंधश्रद्धा आणि सांस्कृतिक सोहळे यांची सरमिसळ होते खरी फ्रॉम टाइम टु टाइम.
धाग्याच्या दृष्टीने वैयक्तिक अंधश्रद्धा आणि लढा यांविषयी विचार केल्यास विन सम लूज सम असं चालू आहे.
मासिकपाळीमुळे पाळण्यात येणारं सोवळ ओवळं, विटाळ शीवाशीव या गोष्टींची टीनएजर असल्यापासून मनस्वी चीड येत होती. माझ्या वडलांच्या माहेरी माझे आजी अजोब, काका काकू ते सर्व फार पाळायचे/पाळतात. पण मी आणि माझ्या बहिणीने त्यात ठामपणे विरोध केला आणि आईबाबा दोघांनी आम्हाला सपोर्ट केलं हे महत्वाचं. आम्ही त्या दिवसात जर काही सणवार असले तर सरळ आम्ही दोघी जाणार नाही सांगायचो आणि आजीआजोब आमच्याकडे येत असत तेव्हाही आम्ही काही शीवाशीव पाळत नसायचो. पण या लढ्यात आईबाबांच्या सपोर्टशिवाय काही खरं नव्हतं तेव्हा तो त्यांचाच लढा अधिक म्हणायला हवा.
मी गणपति बसवायला ६-७ वर्षापूर्वी सुरुवात केली तेव्हा आई आणि साबा दोघींनी विरोध नाही केला पण शंका व्यक्त केली की तुला जमणार आहे ना हे अंगावर घेते आहेस ते आयुष्यभर करणं, सोवळं ओवळं वगैरे पण तेव्हा माझा विचार क्लियर होता की मी गणपति बसवणर ते त्या निमित्ताने सगळे देसी फ्रेंड्स घरी येणार, छान पारंपारिक कपडे घालून गोड-धोड जेवण, गप्पा, गाणी, आरती असं गेट्टुगेदर होणार आणी हे सर्व करण्याचा हेतू इथे अमेरिकेत राहताना माझ्या मुलिंसाठी काही आठवणी तयार करणे हा होता/आहे फक्त . मी गणपतिसाठी कोणतेही सोवळे पाळत नाही.
जेव्हा मुली मोठ्या होतील आणी त्यांना किंवा मला कंटाळा येइल तेव्हा मी गणपति ब्सवणे बंद करीन.
आणखी एक लढा जो यशस्वी झाला आहे असा मला संशय आहे
स्मॉल व्हिक्टरी!
माझ्या साबा फार दृष्ट काढतात. त्या इथे येतात तेव्हा दृष्ट काढायला मी त्यांना विरोध करत नाही. २-३ वर्षापूर्वीपर्यंत माझी पण दृष्ट काढली जात होती पण मी त्याला विरोध करायला सुरुवात केली. मुलिंची हवी तर काढा पण माझी नको यावर ठाम राहिले. भार्तातून मला आज अमावस्या आहे तेव्हा मुलिंची दृष्ट काढ असा फोन यायचा तेव्हा दरवेळी नाही म्हणून सांगते. पूर्वी हो म्हणायचे आणि काढायचे नाही. आता स्पष्ट सांगते की माझा विश्वास नाही मी दृष्ट काढणार नाही. यावर्षी सर्वपित्रीला फोनवर पण नाही सांगितलं काही त्यांनी
वैयक्तिक लढे/मानसिक द्वंद्व अजूनही चालू आहेत. नविन घरात राहायला गेल्यावर हाउस वॉर्मिंग पार्टी अर्थातच होणार पण वास्तुशांत करायची की नाही वगैरे.
मी रोज देवाला दिवा लावत नाही. परवचा म्हणत नाही. पण जेव्हा घरात तळणीचं तेल उरतं तेव्हा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ३/४ दिवस समई लावते
या न्यायाने समई फर्क्त वर्षातले ७-८ दिवस लागत असावी पण ती लावते तेव्हा परवचा(शुभं करोती, रामरक्षा) म्हणते आणी ते ऐकताना प्रसन्न वाटतं पण तो लहानपणापासून आई ते करताना बघत वाढल्यामुळे नॉस्टेल्जियाचा भाग झाला हे पण लक्षात येतं.
इथे मनाविषयी काही वाचलं सुरेख यांनी लिहिलेलं. की कोणी शिवी घातली की रागाच्या संवेदना येतात मनात वगैरे त्यावर विचार केला जरा आणी वाटतय की त्यात शिवी देतानाच्या टोनचाच भाग जास्ती. लहानपणापासून एखाद्या बाळाला सोन्या राजा सारखच गोड, मउ लाडाच्या आवाजात नियमितपणे हलकट नालायक वगैरे म्हणत वाढवलं तर त्याला मोठेपणे ते शब्द ऐक्ल्यावर राग येणार नाही. पण शिवीच्या रागीट आक्रमक टोनमध्ये म्हटलेले चांगले शब्द पण मनात्/मेंदूत रागाची भावना निर्माण करतील की. मला नीट लिहिता येत नाही बहुतेक मला काय म्हणायचं ते.
"माझा देवाधर्मावर अजिबात
"माझा देवाधर्मावर अजिबात विश्वास नाही, मी बुध्दीप्रामाण्यवादी आहे पण तरीही मी मायबोली गणेशोत्सवात सहभागी होणार- तेही कसलं compulsion नसताना - स्वेच्छेने"- यामागची भूमिका काय असू शकते- नेटवर्किंग, गंमत यासाठी गणेशोत्सवाचा वापर? आणि तसं करताना गणेशोत्सवाचा म्हणजेच पर्यायाने देवाधर्माचा प्रचार, reinforcement तुम्ही करता आहातच की.
Aschig यावर तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल
म्हणजे घरातील ज्येष्ठ नागरीक किंवा इतर जवळच्या व्यक्तींना दुखवू नये म्हणून विश्वास नसताना काही गोष्टी करणे यालाही तुमचा विरोध आहे कारण तडजोड दोन्ही बाजूंनी व्हावी असं तुमचं मत आहे.
मग कसलंही प्रेशर नसताना, कोणी डोक्यावर बंदूक ठेवलेली नसताना केवळ स्वत:ला इच्छा आहे म्हणून, आवडतंय म्हणून गणेशोत्सवाचं आयोजन करणं हे तुमच्या बुध्दीप्रामाण्यात व दाभोळकरांच्या लढयात बसतं का?
शुम्पि <<<<इथे मनाविषयी काही
शुम्पि
<<<<इथे मनाविषयी काही वाचलं सुरेख यांनी लिहिलेलं. की कोणी शिवी घातली की रागाच्या संवेदना येतात मनात वगैरे त्यावर विचार केला जरा आणी वाटतय की त्यात शिवी देतानाच्या टोनचाच भाग जास्ती. लहानपणापासून एखाद्या बाळाला सोन्या राजा सारखच गोड, मउ लाडाच्या आवाजात नियमितपणे हलकट नालायक वगैरे म्हणत वाढवलं तर त्याला मोठेपणे ते शब्द ऐक्ल्यावर राग येणार नाही. पण शिवीच्या रागीट आक्रमक टोनमध्ये म्हटलेले चांगले शब्द पण मनात्/मेंदूत रागाची भावना निर्माण करतील की. मला नीट लिहिता येत नाही बहुतेक मला काय म्हणायचं ते.>>>>>>
माझहि तुझ्यासारखच झालय नीट लिहिता येत नाही बहुतेक मला काय म्हणायचं ते.
ते शरिर आनि मनाचे शास्त्र आहे अवघड आहे समजाउन सांगने कधितरि सांगायचा नक्कि प्रयत्न करेन
माझ्या पोस्टमधील विशिष्ट
माझ्या पोस्टमधील विशिष्ट भागाबाबत काही लिहिले गेलेले दिसत आहे. बहुधा मी एक दोन वाक्यात अचूक सारांश लिहिला असता तर तसे झाले नसते. 'आता काय होणार' असे वाटून कपाळाला हात लावून बसणे ह्याला मीही अंधश्रद्धाच म्हणतो.
हरकत नाही. अचूकपणे म्हणण्याचा प्रयत्न केला तर मला असे म्हणायचे होते की:
१. श्रद्धा, अंधश्रद्धा, अस्तिक, नास्तिक, उपद्रवी प्रथा, निरुपद्रवी प्रथा ह्या सर्व संज्ञा व्यक्तीसापेक्ष आहेत.
२. त्यासंदर्भात प्रत्येकाची मते ठाम असण्याची शक्यता आहे. (हे कंसातले आता लिहीत आहे, आधी लिहिले नव्हते, की स्वतःची मते तपासणे, बदलणे हे शक्यही आहे व काहीजण ते करतातही, काहीजण नाही करत असेही होतेच).
३. प्रत्येक प्रकारच्या भूमिकेला अडचणीट आणू शकणारे अनेक प्रश्न व त्या प्रश्नांच्या साखळ्या निर्माण होऊ शकतात. (त्यामुळेच, पुन्हा आधी जे इब्लिसांच्या पोस्टबद्दल म्हणालो होतो तेच, की ह्या प्रकारच्या विषयात एक ठाम भूमिकाच घ्यावी लागते. थोडी अशी, थोडी तशी अशी भूमिका येथे कामाची नाही).
धन्यवाद!
अगो उत्त्म पोस्ट .. पण असही
अगो उत्त्म पोस्ट .. पण असही वाटुन गेल की जेंव्हा सराउंडींग गोष्टिच महत्वाच्या होतात तेंव्हा गाभा का होता वा करायचा असतो ह्याच ज्ञान विस्म्रुतीत जात ... व मग उरते ते पोकळ रिवाजांच कवच... डाउन द टाइम लाइन कोणी गाभ्या विषयी प्रश्ण विचारले तर सांगण्यासारख काय असत?
शुम्पी ह्यांनी गणपती उत्सव घरात केला तो एक गेट टुगेदर व इतर सगळी ओब्जेक्टिव्ह होती ती साध्य करण्यासाठी . पण ही ऑबजेक्टिव्ह साध्य करण्याकरता रितिरिवाज विणले तिचा गाभा हा गणपतीची मुर्ती आणि ते दहा दिवस हाच आहे ना... मग ह्या गाभ्याविष्यी प्रष्ण विचारले गेले तर त्याची उत्तरे पुढच्या अनेक पिढ्यात काय असतील?
एकंदरीतच माणसाच्या सोशल गरजा भागवण्यासाठी विणलेल्या रिवाजांचा गाभा खरा आहे का खोटा ह्याने सोशल गरजा भागण्या न भागण्यावर काय फरक पडतो ? तो पडत नसेल तर गाभा खोटा आहे का नाही ह्यावर किती काथ्या कुट करायचा?
'राष्ट्रभक्ती', 'सर्व भारतीय एक' ह्या भोवती स्वातंत्र्यता चळवळ राबवली गेली तोही गाभा खोटा रातर काल्पनिकच ना? केवळ गोष्टि काल्पनिक आहेत म्हणुन त्यावर विष्वास ठेउ नका हे अजुनही पटलेल नाही..
कसलंही प्रेशर नसताना, कोणी
कसलंही प्रेशर नसताना, कोणी डोक्यावर बंदूक ठेवलेली नसताना केवळ स्वत:ला इच्छा आहे म्हणून, आवडतंय म्हणून गणेशोत्सवाचं आयोजन करणं हे तुमच्या बुध्दीप्रामाण्यात व दाभोळकरांच्या लढयात बसतं का?
देविका, योग्य वेळी योग्य प्रश्न विचारलासं!
नेटवर्किंग, गंमत यासाठी गणेशोत्सवाचा वापर? आणि तसं करताना गणेशोत्सवाचा म्हणजेच पर्यायाने देवाधर्माचा प्रचार, reinforcement तुम्ही करता आहातच की.
अगदी खरे आहे.
> Aschig यावर तुमचं मत जाणून
> Aschig यावर तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल स्मित
माझं मत प्रमाण असायची किंवा मानायची अंधश्रद्धा नका ठेऊ
इथे एक सुंदर ग्रे स्केल दिसते आहे. दोन्ही टोकांचे, तारेवरची कसरत करणारे, कधीही कोणत्याही बाजूला पडतील असे वाटणारे तसंच या स्पेक्ट्रमशी आमचं काही देणं-घेणं नाही म्हणणारे.
पण जे काही वैयक्तिक लढे समोर येताहेत ते नक्कीच प्रशंसनीय आहेत. अगो, शुम्पी आणि इतर, लिहील्याबद्दल धन्यवाद - केवळ वाचणारे काहि लोक यातून प्रेरणा घेऊ शकतील.
टोकाची भुमिका घ्यायची असल्यास गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात मदत करणं हे त्यात बसत नाही. पण कंडीशनींग मुळे, त्यातील आनंदामुळे, स्वतःच्या आणि इतरांच्या, यामुळे तसं सहजच केलं जाऊ शकतं. व्हायला हवं का तो प्रश्न वेगळा. कदाचीत अशा चर्चेमूळे त्यांना मदतच होईल स्वतःचे विचार तपासून आवश्यकता पडल्यास बदलण्यासाठी. (वन वे ऑर द अदर). दूसरी एखादी व्यक्ती स्वतःचे विचार लादू पहात असेल तर कदाचीत तसं वागणं जास्त कठीण जाणार.
बी, पण तुम्ही हे प्रश्न विचारताय हे पाहून आश्चर्य वाटलं. नेहमीचा इनोसन्स इथे दिसत नाही.
केवळ वाचणारे काहि लोक यातून
केवळ वाचणारे काहि लोक यातून प्रेरणा घेऊ शकतील>>
अजून तरी काही प्रेरणा मिळाली नाही आहे. उलट तुम्ही तुमचे किती संभ्रमात अहात हे दिसून येत आहे. तुम्ही तुमचे म्हणजे इथे जे जुणी लढ्यात उतरले आहेत ते.
वर जी ग्रे स्केल तुम्ही सांगितली त्यात मी तरी नाही.
दाभोळकर ज्या
दाभोळकर ज्या अंधश्रद्धांविरुद्ध लढले त्या उपद्रवी होत्या हे मान्य करायला हरकत नाही>>>>>>
@अगो - हे गृहीतक ही चुकीचे आहे. कोणाला उपद्रवी होत्या? कोणाला बंगाली बाबा कडे जायचे असेल तर समाजाला काय उपद्रव होतो? कोणी बाबा हातचलाखी दाखवत असेल आणि काही लोकांना ते आवडत असेल तर समाजाला काय उपद्रव होतो?
खरे तर अनिस नी फक्त पॉप्युलिस्ट भुमिका घेतली. म्हणजे जादूटोणा, नरबळी वगैरेंना विरोध करायचा. हे सहज सोप्पे होते. सॉफ्ट टारगेट निवडले.
पण त्यांनी गणेश उत्सवात होणारा उपद्रव अश्या प्रकारच्या दुसर्यांना उपद्रव होणार्या प्रथांना हात घालायचे टाळले. वारी बद्दल पण चकार शब्द नाही, जरी ती सरकार स्पॉन्सर करत असेल तरी.
ह्या पेक्षा वाईट म्हणजे, "होमिओपाथी" च्या नावाने देशात ऑफिशियल बुवाबाजी चालू आहे, त्याबद्दल पण चकार शब्द नाही. जादूटोणा विधेयका पेक्षा होमिओपाथी बंद करण्यासाठी सरकारच्या मागे लागायला पाहीजे होते.
<<<अजून तरी काही प्रेरणा
<<<अजून तरी काही प्रेरणा मिळाली नाही आहे. उलट तुम्ही तुमचे किती संभ्रमात अहात हे दिसून येत आहे>>>>>
बी तुमच्या कडुन मात्र प्रेरणा घेन्यासारखि आहे प्रश्न विचारन्याचि प्रेरना तुम्हि असेच जर प्रश्न विचारत रहाल आनि त्याचि ऊत्तर शोधाल तर तुमचे संभ्रम दुर होतिल.
सुरेख तुम्ही डुप्लिकेट आयडी
सुरेख तुम्ही डुप्लिकेट आयडी बनून इथे लिहित आहात असे मला पुर्वीच वाटले होते पण मी म्हंटले गैरसमज तर नाही ना होत आहे आपला.. असे समजून तुमच्याशी बोलत राहिलो. वरचे वाक्य वाचून वाईट वाटते आहे की तुम्ही इथे किती जणांना फसवत आहात. ह्या व्याकरणाच्या चुका करुन तुम्ही तुमची शैली लपवत आहात.
का कोण जाणे पण मी कोणत्याच
का कोण जाणे पण मी कोणत्याच सणांचा (मी साजरा करत असलेल्या) देवाधर्माशी /पुजेशी /धार्मिकपणाशी संबंध लावला नाहीये. कदाचीत लहानपणापासूनचं कंडिशनींग तसं असेल. माझ्यासाठी सण म्हणजे संस्कृती. त्या सणांशी संबंधीत बरेच उपचार /गोष्टी मी पण करते.
गणपती म्हणजे माझ्यासाठी सार्वजनिक गणपती असतो. सांस्कृतिक कार्यक्रम, देखावे बघणं, कॉलनीत एकत्र येवून मज्जा करणं. इथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नाहीये जवळपास. घरी मी काही करेन कधी असं वाटत नाही. मग मी मायबोली गणेशोत्सवात सहभागी होते. त्यावेळी गणपती म्हणजे देव आहे आणि मी देवाधर्माचं काही करतेय असं मला तरी अजिब्बात वाटत नाही. जसं दिवाळी अंकाचं काम केलं, संयुक्तासाठी उपक्रमात स्वयंसेवक म्हणून काम केलं तसंच गणेशोत्सवात.
मुलाला गणपती खूप आवडतो. सध्या त्याला बहूतेक देव आवडतात. अजून लहान आहे, इतक्यात देव असतो /नसतो हे काही कळणार नाही. त्यामूळे त्याच्यासाठी वर्षातून एकदा महाराष्ट्र सदनाचा गणपती दाखवायला जाते मी सोबत. मुलगा खूप खूश असतो.
दिवाळी म्हणजे दिवे लावणं, नवे कपडे घालणं आणि सगळ्या नातेवाईकांनी एकत्र येणं. आईकडे सगळ्याच सणांना गोडधोड करणं व्हायचं. मला तितकं जमत नाही. मी साजरे करते ते सण म्हणजे गावाकडे दिवाळी. इथे घरी राखी पौर्णिमा. छोटीशी पुतणी येते त्यादिवशी घरी. दोघं बहिण-भाऊ एकमेकांना राख्या बांधतात, नारळीभात खातात आणि खेळतात. दसर्याला, गुढी पाडव्याला काहीतरी गोड करतो. होळीला विकत गुजिया आणतो, मुलगा रंग खेळतो. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि गांधीजयंती या तिन्ही दिवशी काहीतरी गोडधोडाचं स्पेशल बनतं. ईदला शिरखुर्मा आणि बकरीईदला जमलं तर बिर्यानी असते. ख्रिसमस ला केक आणि स्पेशल जेवण. गुरु पुरब ला दिवे लावले जातात आणि गोडधोड केलं जातं (शेजार-पाजार्यांचं बघून). हल्ली मुल्गा म्हणतो म्हणून अष्टमीला पुजा करत नसले तरी चने-पुरी आणि हलवा बनवतो.
हे सगळं करताना/अश्या पद्धतीने सण साजरे करताना मला तरी कुठेही हे देवासाठी आहे असं वाटत नाही.
बी काहि वर्षा आधि मि पाककृती
बी काहि वर्षा आधि मि पाककृती शोधताना मला मायबोलि सापड्लि तिचि मि मेंम्बर झाले
लिखानाचि सवय नसल्यामुळे कधिकाहि लिहले नाहि माझ्याकडे तेव्हा वेळ हि नव्हता महिनोन महिने मि मायबोलि बघायचि पन नाहि.तुम्हाला कशाचे वाईट वाट्ले ते मला अजुनहि समजले नाहि
खोटे बोलने ,फसवने हा माझा धर्म नाहि.
अल्पना ,+१. माझ्या माहेरी तर
अल्पना ,+१.
माझ्या माहेरी तर यातला एकही सण हा धार्मिक पद्धतीने साजरा होत नाही. सासरी काही होतात पण माझ्या स्वतःच्या घरात एकही नाही. गणपती, दिवाळी हे सगळे उत्सव फक्त.
खाण्यापिण्याची गंमत करतो.
दिवाळीत कंदिल लावतोच असे नाही.
माबोवरचे एकेक उपक्रम केवळ गंंमत म्हणून आणि 'आपल्या' माबोच्या उत्सवात सहभागी व्हायचे म्हणून.
उद्या माबोवर ख्रिसमस साजरा व्हायला लागला तर आम्ही मराठी कॅरोल लिहायची स्पर्धा ठेवू आणि त्यात भाग घ्यायला इथल्या लोकांना प्रोत्साहन देऊ.
ईद साजरी व्हायला लागली तर क्रोशाच्या गोल टोप्या विणायच्या स्पर्धा ठेऊ.
आणि डुआयडीवर पण काहीच दवा
आणि डुआयडीवर पण काहीच दवा नाही अनुल्लेखाशिवाय.
>> नेहमीचा इनोसन्स इथे दिसत
>>
नेहमीचा इनोसन्स इथे दिसत नाही.
<<
मला तरी कधीही इनोसन्स दिसलेला नाहिये. येडा बनके पेढा खानेका प्रकार आहे सगळा.
हे, तुम्हाला इमिडिएटली आलेल्या उत्तरातून समजले असेलच.
देवाधर्माची भांग कशी मस्त चढते, अन श्रद्धा म्हटले, की स्वतःच्याच बुद्धीवर विश्वास ठेवता येत नाही, व लोकांनीही तसेच वागावे हे सांगण्यासाठी कशी भारी आर्ग्युमेंट्स करता येतात ते दिसते आहे.
अगदी लढा म्हणजे काय, लढा कशाला म्हणावे इथपासून इनोसन्ट काड्या आहेत.
जपानमधले उत्सव साजरे केलेत
जपानमधले उत्सव साजरे केलेत तेव्हा श्रद्धा म्हणून केलेत का?
सेम साती. आई-बाबांकडे सण
सेम साती. आई-बाबांकडे सण म्हणजे फक्त खाणं-पिण आणि एकत्र जमणं. गोडधोडाखेरीज काही वेगळं म्हणजे सणाला रांगोळ्या काढणं, संक्रांतीला तिळगूळ बनवणं आणि आल्यागेल्याला तिळगूळ देणं, दसर्याला सोनं द्यायला आलेल्या लोकांच्या हातावर गोड काहीतरी ठेवणं आणि स्वतः सोनं न लुटता / कुणालाही न देता फक्त त्यांच्यापेक्षा मोठ्या दोन आदरणीय लोकांना भेटणं (बापू काळदाते आणि सुधाताई काळदाते.. आता दोघंही नाहीत.) दसर्याला झेंडूच्या फुलांचं तोरण लावणं.
सासरी अगदी साग्रसंगीत करातात. पण आमच्या घरी नाही. सध्या तरी दिवाळीला तिथेच जातो म्हणून त्या पुजेत आम्ही पण बसतो. जर माझ्या घरी दिवाळीला थांबलो तर ती पुजा होणार नाही. तिथली एक पद्धत आवडते मला. दिवे लावताना एका लाकडी चौरंगावर दिवे ठेवले जातात आणि घरातली सगळी पुरूष मंडळी मिळून त्यातला मुख्य दिवा पेटवून तो चौरंग उचलतात.. सगळ्यांचे हात लावलेले असतात. सगळे एकत्र आहेत हे दर्शवण्यासाठी.
हे करायला पूर्वी फक्त पुरूष असायचे. मग आमच्या मुली आणि आतागेल्या ५ वषांपासून आम्ही पण. २५ जणं मिळून त्या चौरंगावरचे दिवे पेटवतो आणी मग सगळ्या घरात दिवे लावतो.
नाहि तेंव्हा मि निरीक्षक आनि
नाहि तेंव्हा मि निरीक्षक आनि प्रेक्षकाच्या भुमिकेत होते
पण मला ते सगळे आवड्ले होते कुठलिहि पुजापाठ देव नसताना हि ऊत्सव सण होऊ शकतो हे मि पहिल्यादाच बघत होते
> "होमिओपाथी" च्या नावाने
> "होमिओपाथी" च्या नावाने देशात ऑफिशियल बुवाबाजी चालू आहे, त्याबद्दल पण चकार शब्द नाही
एकूण अंधश्रद्धा इतक्या जास्त आहेत कि दाभोलकर (आणि अनिस) ज्या बद्दल बोलले नाहीत त्या कितीतरी जास्त पटीने असणारच.
होमिओपदी बद्दल इतरत्र चर्चा झाली आहे. इथले अनेक अ-सश्रद्ध सुद्धा कदाचित होमिओपॅथीची औषधं घेत असतील कारण त्यातील खोट दिसायला त्यामागचं तत्व समजून ते कसं अशक्य आहे हे समजून घ्यायला हवं. पण त्यासाठी आधी जिथे चर्चा झाली आहे तिथेच करुया. उदा. http://www.maayboli.com/node/42681
होमिओपाथीचे उदाहरण अश्या साठी
होमिओपाथीचे उदाहरण अश्या साठी की, एकुणच फक्त सॉफ्ट आणि पॉप्युलिस्ट टारगेट निवडली अनिस नी ज्या बाबतीत ९० टक्के समाज फार विरोध करणार नाही. - हे एक.
ज्या जवळजवळ १००% लोकांच्यात मुरल्या आहेत अश्या अंधष्रद्धांना फार काही विरोध केला नाही.
सामाजिक उपद्रव असणार्या अंधश्रद्धांबद्दल मौन पाळणे हे दुसरे.
तुम्ही अमूक केलंत नाहीत
तुम्ही अमूक केलंत नाहीत म्हणून तुम्ही तमुकही करू नका हे किती योग्य आहे?
नसेल त्याना १०० टक्के जमत पण मग १० टक्केही करू नये का?
अनिस कडेच दिलाय का सगळा ठेका?
होमिओपथी किंवा समाजातील इतर काही अंधश्रद्धा तुम्हाला दिसत असतील तर तुम्हिही आवाज उठवू शकताच ना?
एका गावात एक साधु रहात असत ते
एका गावात एक साधु रहात असत ते लोकांना ऊपदेश देत असत कि अंधश्रद्धा ला बळिपडु नका आचरन सुधारा,
स्व्:ताचा शोधघ्या देव तुमच्या मधेच आहे तो शोधा माणसाशि माणसासारखे वागा तोच खरा धर्म अजुन बरेच काहि
हे साधुचे बोलने बर्याच जनांना पटायचे बर्याच लोंकाना नाहि पटायचे
असाच एक साधुचे विचार न पटनारा माणुस साधु कडे गेला व त्याना रागाने शिव्या देऊ लागला साधु त्याला म्ह्नतात शांत पने सांग तुला काय म्ह्नायचे आहे पन तो शांतपने काहि बोलायलाच तयार नाहि.
साधु त्याला एकप्रश्न विचारतात कि तुझ्याकडे पाहुने रावळे कुनि येतात का?
तो रागानेच म्ह्नतो हो येतात ना हा काय विचारायचा प्रश्न झाला
मगसाधु त्यालाअजुन एकप्रश्न विचारतात कि ते पाहुने रावळे काय भेटवस्तु ,मिठाई घेऊन येताकिरिकाम्या हाताने येतात ?
तो अनखिन चिडुन म्ह्नतो न आनायला काय झाल खुप सार घेऊन येतात
मगसाधु त्यालाअजुन एकप्रश्न विचारतात ति भेटवस्तु मिठाई तु स्विकालि नाहिस तर ति कुनाकडे राह्ते
तो ऊत्तर देतो कि अर्थात च आननार्या कडेच
साधु उत्तरतात कि हि जि शिव्याचि भेट तु माझ्यासाठि आनलि आहेस ति मि स्विकारलि नाहि मग ति कुना
कडे राहिलि तुझ्याकडेच ना? तुझि भेट तुला लखलाभ ह्म नहि स्विकाते ऊसका तुह्मे जो करना है करो
वेगवेगळे विषय सुरू झालेले
वेगवेगळे विषय सुरू झालेले आहेत एकाचवेळी
तुम्ही अमूक केलंत नाहीत
तुम्ही अमूक केलंत नाहीत म्हणून तुम्ही तमुकही करू नका हे किती योग्य आहे? >>>>
माझे अनिस बद्दलची मते जरा अवांतरात गेली आहेत. पण वर कुठेतरी दाभोलकरांच्या कार्या बद्दल कोणी तरी लिहीले होते, त्या निमित्ताने मी हे लिहीले होते.
एखादी इमारत पाडायची आहे असे ध्येय ठेवायचे आणि रंगाचे पोपडे काढायचे फक्त असे काहीतरी अनिसचे झाले आहे. पायालाच धक्का मारायची गरज आहे / होती. म्हणुन मी होमिओपाथीचे उदाहरण घेतले. कारण ती बुवाबाजी सरकार मान्यतेने चालते आणि समाजातला सुशिक्षीत वर्ग करतो. काही होमिओपाथ वैदू आणि साबुदाणा औषध म्हणुन घेणारे लोक सुद्धा अनिसचे मेंबर असतील. त्यांनी कुठल्या आधारावर नरबळीला विरोध करायचा.
तसेही आधी ह्या धाग्यावर एकुणच मिळमिळीत भुमिका घेउ नये असे मत (माझ्या मते इब्लिस नी ) मांडले होते, त्याला ही मी सहमती दिली होती.
अनिस नी फारच मिळमिळीत आणि तडजोड करणारी भुमिका घेउन नुकसानच केले.
Pages