वैयक्तिक अंधश्रद्धा, वैयक्तिक लढा

Submitted by aschig on 28 October, 2009 - 11:33

हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.

जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.

नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास या पुस्तकाचे परिशिष्ट आहे नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र. ते येथे दिले आहे. (धन्यवाद प्रकाश घाटपांडें). त्या अनुषंगाने संभाषण सुरु करु शकु.

https://docs.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit

(२३ नव्हेंबर २००९ च्या पोस्ट वरुन):

अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.

स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.

वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.

(सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आलेले काही वैयक्तिक लढे) :

विश्वास नसल्यामुळे मुलाची मुंज न करणं, मृत्युनंतरचे विधी न करणं, सत्यनारायण न करणं, दृष्ट काढण्याची जबरदस्ती न करु देणं, मासीक पाळी असल्यामुळे डिस्क्रिमिनेट न करु देणं (हे सर्व फार त्रोटक झालं - त्या लोकांच्या भावना पोचण्यासाठी त्यांच्याच पोस्ट वाचाव्या).

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निवांत पाटील | 3 October, 2014 - 12:52 बी हा प्रतिसाद फक्त तुमच्यासाठीच होता. दिलात का त्याला उत्तर? तुमचा अप्रोच अजुन पर्यंत खुप इनोसंट वाटत होता म्हणु तो प्रतिसाद लिहला. द्या ना त्याव्र उत्तर.

कि उतर दिले तर तुमचा देव तुम्हच्यावर कोपेल अशी भीती वाटते? तसे असेल तर तसे लिहा. आणि ऐपत न्ससताना जेवण घालणे व्हेज किंवा नॉ व्हेज काय फरक पदतो. दोन्ही ठिकाणी पैसेच जातात ना? कि व्हेज चंचोके देउन येते.

निवांत, माझ्या पीसीवर सिंगापूरचे टाईमस्ट्म्प आहे. त्यामुळे तुमचे मजकुर नक्की कुठले ते ठरवता येत नाही. तुम्ही परत लिहा.

याच आठवड्यात झालेल्या एका चर्चेच्या अनुरोधाने:

आस्तिक असुन अस्तिक असल्याचा अहंकार आणि नास्तिक असुन नास्तिक असल्याचा अहंकार तर व्यक्त होत नाही ना आपल्या पोस्ट्स मधुन. आणि विशेष करुन अंधश्रध्दाळु असल्याचा आणि नसल्याचा. आणि मग आपले आपले अहंकार कुरवाळण्यातली मजा ... मस्त मस्त.... तसे असेल तर शहाणे करुन सोडावे सकळजनहे हे बाजुला पडेल बरं.... बी बघा तुम्हाला कसोटी लावुन Wink

बी रिपिट पोस्ट तुमच्याकरता:
मास खाणे चालते तर बळी देणे का चालू नये>>> गुड क्वेशन. आता तुमचा प्रश्न अतिशय क्लिअर झाला आहे. आणि याचे उत्तर द्यायला मला जमेल असे वाटते नाहितर इब्लिस / आस्चिग आहेत्च.

बळी देणे (मांसाहारी) (शाकाहारी लोक नारळाचा बळी देतात म्हणे) याचा सोर्स बघितलात तर : हे असे झाले तर / किंवा असे व्हावे म्हणुन / किंवा माझ्यावर संकटे येवु नयेत म्हणुन / किंवा माझे माझ्या कुटुंबियांचे भले व्हावे म्हणुन केलेले आवाहन ( सो कॉल्ड शक्तिला) आणि त्याची पुर्तता. इथे भुक महत्वाची नाही पण आता बळी दिलाच आहे तर शिजवुन खाउया म्हणुन रांधलेले जेवण त्याचाच दाखवलेला नैवद्य. आपल्या पुर्वापार चालत आलेली प्रथा आहे ( परवडत नाही, मुलाच्या शाळेची फी भरायला पैसे नाहीत) कशी मोदायची. त्यामुळे कोप होइल, काहितर नुकसान होइल म्हणुन बळी द्यायचा.

याउलट, नाक्यावर सकाळीच बकरे कापुन टांगुन ठेवलेले असते. ज्याला खावेसे वाटते तो जाउन घेउन येतो, शिजवतो, मस्त जेवतो आणि दुपारी ताणुन देतो. सगळा राजी खुशीचा मामला.

या दोन उदाहरणात पहिल्यात भीती आणि कंपल्शन आहे तर दुसर्‍यात ऑप्शन आहे. बस्स. इतकेच मला समजावुन सांगता येते.

म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो त्याचे वाईट वाटते.

निवांत मी तुमचे मत वाचले. माझा विरोध दोन्ही बाजूने आहे हे मी त्रिवार सांगत आहे. माझी बुद्धी दोन्ही कृत्य नाकारते आहे.

मि सर्वा चि माफि मागुन एक ऊपाय सुचवु एछिते बी चे म्ह्नने मान्य करुन सर्वा नि मांसाहारा सोडन्याचा संकल्प
करा
पैशाचि पन बचत होईल.आनि बी च्या मनाला शांति पन लाभेल चर्चा पुढे सरकायला मदत हिहोईल

तुमचा मांसाहार सोडन्याचा संकल्प बघुन कदाचित बी अंधश्रद्धा सोड्न्याचा संकल्प पन करतिल कुठ्ले सोपे आहे
ते तरि कळेल.

मी पुर्वि मांसाहार करायचि खुप वर्ष झालि सोडले परिनाम फुकटे खानारे कमि झाले जे घरिकरुन खाऊ शकायचे नाहि ते माझ्याकडे चोरुन खायचे वरुन कुनाला सांगु नको पन म्हनायचे
दुसरे म्ह्नजे पैशाचि बचत पन झालि/ होतिय.

बी, परवडत नसताना मांसाहारी पार्टी किंवा श्रीखंड पुरीची पार्टी यात कसा फरक? मांसाहार महाग हे प्लीज सांगू नका.

अमितव, पार्टी कुठलीही असो ती जर परवडत नसेल तर करु नका हे मलाही म्हणायचे आहे.

माझा मुद्दा वळण घेऊन घेऊन परत परत त्याच जागेवर येतो आहे. माझा उद्देश हाच आहे की बकर्‍याचा बळी देणारी अंधश्रद्धाळू व्यक्ती जी चुक करते आहे तिच चुक मासाहारी बुद्धीप्रामाण्यवादी करत असते. हा.. पण तुम्ही जर शाकाहारी बुद्धीप्रामाण्यवादी असाल तर नक्कीच तुमचे म्हणणे बरोबर आहे. जी व्यक्ती स्वत: मास खाते त्या व्यक्तीला बकरीच्या बळी जाण्या विरुद्धा बोलायचा कणभरही हक्क नाही.

वैदिकांचे पशुपालन आणि यज्ञ या दोन्ही गोष्टी परस्पर पुरक होत्या. यज्ञात पशुचा बळी दिला जाई. मारलेल्या पशुची वपा म्हणजेच चरबी काढून यज्ञात आहुती म्हणून टाकली जाई. यज्ञात मारलेल्या पशुचे मांस खाण्यासाठी तर चरबी अग्नी भडकाविण्यासाठी वापरली जाई. अग्नी भडकावण्यासाठी इतर कोणत्याही ज्वलनशील पदार्थाची माहिती वैदिकांना नव्हती, हे सिद्ध करण्यासाठी वपेच्या वापराचे उदाहरण पुरेसे ठरावे. प्रारंभकाळी यज्ञाचा एकच प्रकार होता. कालांतराने त्याचे दोन प्रकार झाले.
१ श्रौत यज्ञ
२. स्मार्त यज्ञ
स्मार्त यज्ञात पशुच्या जागी प्रतिकात्मक कणकेचे पशु आले. व वपा म्हणजेच चरबीच्या जागी तुप आले. तथापि, श्रौत यज्ञ हेच यज्ञाचे मूळ रूप असून त्यात पशुबळी अनिवार्य आहे. मनुष्याचा बळी देऊन यज्ञ करण्याची परंपराही वैदिकांत होती. अशा यज्ञास नरमेध म्हणत. (नरमेधाचा उल्लेख खुद्द ऋगवेदातच असून, या विषयी आपण या लेखमालेत पुढे पाहणार आहोत.) प्रारंभी यज्ञ हा दैनंदिन जगण्याचा भाग होता. नंतर त्यात कर्मकांड शिरले. यज्ञाला उत्सवाचे स्वरूप आले. यज्ञ हा श्रीमंतीच्या प्रदर्शनाचा एक भाग ठरला. राजसत्तेची महत्ता ठरविण्यासाठीही यज्ञाचाच वापर होऊ लागला. पण हा काळ फार नंतरचा. या विषयावर श्रीकृष्णविषयक प्रकरणात मी सविस्तर लिहिणार आहे. तूर्त आपण वेदांतील यज्ञाबाबतच बोलू या. ऋगवेद काळात अग्निहोत्र अर्थात यज्ञ करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य होते, असे दिसून येते. सार्वजनिक स्वरूपात होणारया यज्ञाचे विधि ब्राह्मणांच्या हातूनच पार पाडले जात.
यज्ञात बळी दिले जाणारे पशु
यज्ञात बळी दिल्या जाणारया पशुंत गाय हा प्रमुख पशु होता. त्याचे कारण गायींची उपलब्धता हेच होते. या शिवाय बैल, घोडे, बकरया व विविध प्रकारचे पक्षीही यज्ञात मारले जात१. बैल मारून करण्यात येणारया यज्ञास शूलगव असे म्हटले जाई. हा यज्ञ रुद्राला प्रसन्न करण्यासाठी करावा, अशी वेदाज्ञा आहे. शूलगवासाठी वापरण्यात येणारा बैल घरच्या गायीचा गोरहा असावा. तसेच हा यज्ञ आर्द्रा नक्षत्रावर करावा, अशी शास्त्राज्ञा आहे२. ही कर्मे गृहस्थ्याने म्हणजेच सांसारिक पुरुषाने करावयाची आहेत. राजसूय यज्ञ चक्रवर्ती सम्राट राजाने करावयाचा आहे. या यज्ञात काळे कान असलेल्या म्हणजेच श्यामकर्ण घोड्याचा बळी दिला जाई. पांडवांनी राजसूय यज्ञ केल्याची कथा महाभारतात येते. या सर्व प्राण्यांची वपा म्हणजेच चरबी काढून यज्ञात आहुती म्हणून वापरली जाई. यज्ञपशु ज्या खांबाला बांधला जाई त्याला यूप असे म्हणत व जेथे पशू कापला जाई त्या जागेला सुना असे म्हणत.
ब्राह्मणांच्या गोमांसभक्षणाचे पुरावे
वेद वाङ्मयात गायीच्या हत्येची परवानगी होती. गायीच्या मांसास वेदांत गव्य असे म्हटले जाते. परंतु त्या काळी ब्राह्मण मांसभक्षण करीत होते का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. क्षत्रियांना आजही मांसभक्षणाची शास्त्रोक्त परवानगी आहे; परंतु ब्राह्मणांना नाही. सांप्रतकाळातील महाराष्ट्रातील एक गणमान्य पत्रकार कुमार केतकर यांनी काही वर्षांपूर्वी सकल ब्राह्मण अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना +ब्राह्मण पूर्वी मांसभक्षण करीत होते+ असे विधान केले होते. तेव्हा अधिवेशनातील ब्राह्मणांनी केतकरांना सभास्थानावरून हाकलून लावले होते. त्यानंतर केतकरांनी हा विषय ताणला नाही. ब्राह्मण खरेच मांसभक्षण करीत होते का, याचा कोणताही पुरावा तेव्हा केतकरांनी दिला नव्हता. या सर्व पाश्र्वभूमीवर हा मुद्दा खरया अर्थाने महत्त्वाचा ठरतो. केतकरांसारख्या विद्वान ब्राह्मणांस प्राचीन काळच्या ब्राह्मणांच्या मांसभक्षणाचे पुरावे माहीत नसतील, असे म्हणवत नाही. तथापि, केतकरांनी ते देण्याचे टाळले असे दिसते. केतकरांनी पुरावे दिले नसले, तरी मी ते आता देणार आहे. होय, यज्ञात मारलेल्या पशुचा खूर, हाडे आदी अखाद्य भाग वगळून उरलेला सर्व भाग खाण्यासाठीच वापरला जात असे. क्षत्रिय-वैश्य-शुद्रादि त्रैवर्णिकांसह ब्राह्मणही मांसभक्षण करीत असत. ऋगवेदाचा भाग असलेल्या आश्वलायन सूत्रात३ ब्राह्मणांच्या मांस भक्षणाचे पुरावे जागोजागी आढळतात. आश्वलायन सूत्राचे श्रौत आणि गृह्य असे दोन भाग आहेत. गृह्य म्हणजे घरगुती, पारिवारिक. आश्वलायन गृह्य सूत्रातून ऋग्वेदी ब्राह्मणांनी करावयाची दैनंदिन व नैमित्तिक कर्मे सांगितली आहेत. यातील सर्व नियम हे ऋग्वेदी ब्राह्मणांसाठीच आहेत. त्यामुळे हे गृह्य सूत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याकाळी ऋग्वेदी ब्राह्मणांची सर्व कर्तव्य कर्मे आश्वलायन गृह्य सूत्रांनी बांधलेली होती, त्यामुळे ऋगवेदी ब्राह्मणांना अश्वलायन ब्राह्मण असेही म्हटले जाते.
आश्वलायन गृह्य सूत्राच्या २३ व्या खंडात ब्राह्मणांनी यज्ञाचे पौरोहित्य करताना पाळावयाच्या नियमांचा उल्लेख येतो. त्यातील एक सूत्र असे :
न मांसश्नीयुर्न स्त्रियमुपेयुरा क्रतोरपवर्गात ।।सूत्र : २१।।
अर्थ : यज्ञाचे पौरोहित्य करणारया ब्राह्मणाने यज्ञाचे आमंत्रण स्वीकारल्यापासून यज्ञ समाप्त होईपर्यंत मांस भक्षण करू नये. तसेच स्त्रीसोबत संभोग करू नये.यज्ञ समाप्तीपर्यंत मांसभक्षण करू नये, असा आदेश या सूत्रात देण्यात आला आहे, याचाच अर्थ त्याकाळात ब्राह्मण मांसभक्षण करीत होते. ब्राह्मण मांस खात नसते तर, अश्वलायनाने असा आदेश दिलाच नसता. यज्ञाचे आमंत्रण स्वीकारल्यापासून यज्ञ समाप्तीपर्यंत मांस भक्षण करू नये, हा नियम फक्त पौरोहित्य करणारया ब्राह्मणांसाठी आहे. इतर ब्राह्मणांसाठी नाही. पौरोहित्य न करणारे ब्राह्मण यज्ञकाळातही मांस खाण्यास मोकळे आहेत, असा त्याचा दुसरा अर्थ होतो.
आपस्तंभ सूत्र काय म्हणते?
आश्वलायन सूत्रातीला मांसभक्षणाचा हा उल्लेख असला तरी गायीच्या मांसाचा स्पष्ट उल्लेख नाही. हे मांस गायीचेच असेल, असे ठामपणे म्हणता येत नाही. ते कोणत्याही प्राण्याचे असू शकते. यातून ब्राह्मण मांस खात होते, हे सिद्ध होत असले तरी ते गायीचे मांस खात होते, हे काही सिद्ध होत नाही. त्यासाठी वेदवाङ्मयाचाच भाग असलेल्या आपस्तंभ सूत्राकडे आपण वळू या. आपस्तंभ सूत्रात गायीच्या मांसाचा स्पष्ट उल्लेख येतो. हे सूत्र असे :
धेनवनडुहोर्भक्ष्यम (प्रश्न १, पटल ५ सूत्र ३०)
अर्थ : गोमांस भक्ष्य आहे. (सोप्या मराठीत अर्थ : गायीचे मांस खाण्यासाठी योग्य समजावे.)
मनुस्मृतीतील पुरावे
ब्राह्मण हे गायीचे मांस खात होते, याचे इतके पुरावे वेदवाङ्मयात आहेत की, त्यांचे संकलन केल्यास अनेक खंड होतील. या सर्व पुराव्यांत न पडता ब्राह्मणांना परमवंद्य असलेल्या मनुस्मृतीतले उल्लेख पाहून हा विषय संपवू या. ब्राह्मण ज्याचा महर्षि असा उल्लेख करतात, त्या मनुने + सर्व प्राणी हे खाण्यासाठीच असतात. देवाने प्राणी हे भोजन प्रित्यर्थेच तयार केले आहेत+ असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. मनु म्हणतो :
प्राणस्यान्नमिदं सर्वं प्रजापतिरकल्पयत ।
स्थावरं जंगमं चैव सर्वं प्राणस्य भोजनम् ।।
(मनुस्मृती अध्याय : ५ श्लोक २८)
याही पुढे जाऊन मनू म्हणतो की, मांस खाल्याने, मद्य प्राशनाने तसेच मैथुन केल्याने दोष लागत नाही. मनूचा हा श्लोकार्ध असा :
न मांसभक्षणे दोषो न मद्ये न च मैथुने ।
(मनुस्मृती : अध्याय ५. श्लोक ५६.)
असाच निर्वाळा याज्ञवल्क्यही५ देतो. याज्ञवल्क्याच्या व्यवहाराध्यात म्हटले पुढील श्लोक आढळतो :
प्राणात्यये तथा श्राद्धे प्रोक्षितं द्विजकाम्यया ।।
देवान् पितृन् समभ्यच्र्य खादन्मांसं न दोषभाक् ।।
अर्थ : श्राद्धात, यज्ञात आणि खाण्यासाठी पशु मारावेत. त्याने पाप लागत नाही.
प्राणिहत्येला वैध ठरविण्यासाठी वैदिक शास्त्राने अनके श्लोकांची रचना केली आहे. त्यापैकी एका श्लोकात तर असे म्हटले आहे की, वेदांच्या आज्ञेनुसार प्राणी मारण्यात आले तर या कृत्यास हत्या समजली जाऊ नये. हा श्लोक असा :
या वेदविहिता
हिंसा न सा हिंसा प्रकीत्र्तिता ।।
अर्थ : वेदांच्या आज्ञेनुसार करण्यात आलेल्या पशु हत्येला qहसा समजण्यात येऊ नये४.
लोकहितवादी दाखविली सत्य सांगण्याची हिम्मत
बौद्ध धर्माच्या रेट्यामुळे ब्राह्मणांनी स्वत:च्या वाङ्मयात गुपचूप बदल करून. जुने ग्रंथांतील उल्लेख दडवून ठेवले. जुने ग्रंथ बाहेर काढून त्यांचा खरा अर्थ जगासमोर आणण्याची हिम्मत ब्राह्मणांनी दाखविली नाही. दयानंद सरस्वतीसारख्या दुराभिमान्यांनी तर्कवितर्क करून नवीनच अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. वेदांत हिंसा लिहिलीच नाही, असा दावा करताना दयानंदानी वेदांचे काव्यात्म आणि सांकेतिक अर्थ लावले. त्यांचा हा उपदव्याप निंद्य आणि बहुजनांची दिशाभूल करणारा आहे. या उलट लोकहितवादी यांनी +वेदकाळी ब्राह्मण गायींसह इतर सर्व प्राण्यांचे मांस खात असत+ हे सांगण्याचे धाडस दाखविले आहे. लोकहितवादी म्हणतात : +श्रौत यागात (याग म्हणजे यज्ञ) हिंसेवाचून बोलणेच नाही. गृह्यकर्मात (गृह्यकर्म म्हणजे नवरा बायकोने मिळून करावयाचे कर्म) अश्वलायनांनी हिंसा लिहिली आहे. यावरून गाय, बैल, बकरी, पक्षी इ. प्राणी यज्ञशेषद्वाराने (यज्ञशेष म्हणजे यज्ञ केल्यानंतर उरलेले) भक्षणार्ह झाली होती व त्याविषयीचा कोणत्याही प्रकारचा निषेध किंवा शंका सूत्रकत्र्याच्या मनात आली असेल, असे म्हणवत नाही. ... आता हे सूत्र वेदास अगदी सन्निध आहे इतकेच नव्हे, तर वेदतुल्य आहे असे सर्व ब्राह्मण समजतात४.+ इतरही अनेक विद्वानांनी ब्राह्मणांच्या गोमांस भक्षणाविषयी लिहिले आहे. तथापि, मी येथे लोकहितवादी यांच्या लेखनातील पुरावा दिला आहे. कारण लोकहितवादी स्वत: ब्राह्मण होते. तसेच एक मोठे समाजसुधारक या नात्याने त्यांनी रोखठोक लिखाण केलेले आहे. या पाश्र्वभूमीवर विधानाला आपसुकच विशेष महत्त्व प्राप्त होते.

<अंधश्रद्धाळू लोकांचे बकरे मग बुद्धीवादी जीवांना मिळतील. बकरीचे मास खाऊन खाऊन बुद्धी तल्लख होऊन मग सगळ्या गोष्टींची शास्त्रिय कारणे चुटकीसरशी मिळतील. माणसाला मन उरणार नाही. जेवढे मन होते तेवढी बुद्धी वाढेल. जर कुणी विचारले की बकरी बिचारी तडफडून मरते आहे. तिच्या पोटात बाळ आहे ते तरी वाचवा. तर हे म्हणतील "अहो, जिवो जीवस्य जीवनम". मग विचारणारी व्यक्ती सुद्धा मांस खायला सुरवात करेन आणि होता नव्हता सर्व समाज १०० टक्के बुद्धीप्रामाण्यवादी होईल.>

मांसाहारी लोक बुद्धिप्रामाण्यवादी असतात आणि बुद्धिप्रामाण्यवादी लोक मांसाहारी असतात असा अर्थ मला लागला. शिवाय बुप्रा आणि मांसाहारी दोघांना मन अर्थात भावना नसतात.

कृपया बी यांनी ही पोस्ट वाचू नये.

<मास खाणे चालते तर बळी देणे का चालू नये. दोन्हीमधे कुणाची तरी हत्या होते आहे.>

<माझा विरोध दोन्ही बाजूने आहे हे मी त्रिवार सांगत आहे. माझी बुद्धी दोन्ही कृत्य नाकारते आहे.>

<माझा उद्देश हाच आहे की बकर्‍याचा बळी देणारी अंधश्रद्धाळू व्यक्ती जी चुक करते आहे तिच चुक मासाहारी बुद्धीप्रामाण्यवादी करत असते.>

हळूहळू बींचे मतपरिवर्तन होते आहे. लगे रहो लोक्स.

तुम्हाला जगदीशचंद्र बोस म्हणायचे आहे का?>>> हो प्रकाशजी. लिहिण्याच्या भरात चूक झाली.दुरुस्ती केली आहे.
धन्यवाद!

माझे मत :-

१) मांसाहारी लोकांनी स्वताच्या मनाला प्रामाणिकपणे विचारले तर त्यांनाही हेच उत्तर मिळेल की शाकाहाराचा पर्याय उपलब्ध असताना केवळ जीभेचे चोचले पुरवण्यासाठी मांसाहार करत कोणाचा जीव घेणे हे अमानुष आहे.

२) वनस्पती खाणे म्हणजे देखील सजीवाचाच जीव घेणे हा मुद्दा मला थोडा पातळ वाटतो. आपण सारेच, साधे गार्डनमध्ये चालतो तेव्हाही ज्या सहजपणे पायाखाली जे गवत तुडवत चालतो, ते तर आपण खायलाही वापरत नाही.

३) अंधश्रद्देच्या नावाखाली पशूचा बळी देणे हे अमानुष कमी आणि मुर्खपणा जास्त आहे. अमानुष कमी कारण मुर्ख व्यक्तींना आपण काय करतोय याची अक्कल नसते. जसे वेड्याने खून केल्यास त्याची मानसिक अवस्था लक्षात घेतली जाते आणि गुन्ह्याचे गांभीर्य कमी होते तसे आहे हे.

४)बळी देणे वा तत्सम अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्यांचा राग करण्याआधी त्यांची कीव करत सहानुभुती देणे जास्त गरजेचे.

५) मागच्या दोन पानभर चर्चेत न आलेला एक मुद्दा म्हणजे आपण जोराने हुंकार घेत श्वास सोडतो तेव्हाही वातावरणातील काही सूक्ष्म जीव मरत असतील. या क्रुत्याला पाप-पुण्य, मानुष-अमानुष, सहज-अनैसर्गिक, कुठे टाकावे याबाबत मी संभ्रमात.

तळटीप - मी स्वता शुद्ध मांसाहारी आहे. मी नास्तिक आहे. मी आजवर बळी दिलेला नाही. Happy

इब्लिस महाराज, आमच चुकलंच जरा. व्हॉट यु सी बिफोर , आय सि नाउ. Happy आणि हो त्या स्पेलिंगच्या मुद्द्याला संपुर्ण अनुमोदन.

मि सर्वा चि माफि मागुन एक ऊपाय सुचवु एछिते बी चे म्ह्नने मान्य करुन सर्वा नि मांसाहारा सोडन्याचा संकल्प
करा>>>> भीक नको खरं कुत्रे आवर चा खरा अर्थ आज उमगला.

तुमचा मांसाहार सोडन्याचा संकल्प बघुन कदाचित बी अंधश्रद्धा सोड्न्याचा संकल्प पन करतिल कुठ्ले सोपे आहे>>> तुम्ही बी च्या अंधश्रध्दाळु पणाची एवढी नका काळजी करु. तो आणि त्याची अंधश्रध्दा.

बस्स झाले . आजचा दसरा पावला अम्हाला. Happy

तळटीप - मी स्वता शुद्ध मांसाहारी आहे. मी नास्तिक आहे. मी आजवर बळी दिलेला नाही.

>>

पुन्हा तिच चुक. बळी देणे म्हणजे फक्त देवीसमोर बकरा कापणे असा त्याचा अर्थ होत नाही. जेवणात मटन, मासे, खेकडे खाणे ह्यात त्या त्या प्राण्यांचा अप्रत्यक्षरित्या तुमच्याकडून बळी गेलेलाच असतो.

मागच्या दोन पानभर चर्चेत न आलेला एक मुद्दा म्हणजे आपण जोराने हुंकार घेत श्वास सोडतो तेव्हाही वातावरणातील काही सूक्ष्म जीव मरत असतील. या क्रुत्याला पाप-पुण्य, मानुष-अमानुष, सहज-अनैसर्गिक, कुठे टाकावे याबाबत मी संभ्रमात.

>> ज्या गोष्टी आपण निसर्गतः टाळूच शकत नाही त्याबद्दल मी तरी कुठलाच खेद बाळगत नाही.

पुन्हा तिच चुक.
>>>>>>>
पुन्हा कशी ??
माझी तर या धाग्यावरची ती पहिलीच पोस्ट होती. Uhoh

.

बळी देणे म्हणजे फक्त देवीसमोर बकरा कापणे असा त्याचा अर्थ होत नाही. जेवणात मटन, मासे, खेकडे खाणे ह्यात त्या त्या प्राण्यांचा अप्रत्यक्षरित्या तुमच्याकडून बळी गेलेलाच असतो.
>>>>>>>>
माझा मुद्दा क्रमांक (१) वाचा. मांसाहार हा अमानुष प्रकार आहे हे मी कबूल केले आहेच. नव्हे तो आहेच. पण मी क्षत्रिय असल्याने मांसाहार केल्याने आम्हाला पाप लागत नाही हे देखील तितकेच खरे आहे Happy

.

ज्या गोष्टी आपण निसर्गतः टाळूच शकत नाही त्याबद्दल मी तरी कुठलाच खेद बाळगत नाही.
>>>>>>>>
भले पुर्णपणे टाळू शकत नसला तरी त्याची तीव्रता नक्कीच कमी करू शकता. हुंकार शक्य तेवढ्या कमी तीव्रतेने भराल तर तुलनेत कमी जीव मृत्युमुखी नाही का पडणार? विचार करा !

वडिलांचा नवस फेडण्यासाठी, एका महाविद्यालयीन युवकाला, आपल्या जन्मापासून अपमानित जगणं जगावं लागलं. डोक्यावरचे केस वाढवून, अंगावर आसुडाचे फटके ओढत, असाह्यपणे दारोदार भिक मागत फिरावं लागलं. अंधश्रद्धेच्या या जोखडात अडकलेल्या एका पोतराजाची मानवी हक्क अभियानच्या कार्यकर्त्यांनी मुक्तता केलीये. ‘झी मीडिया’चा हा विशेष वृतांत...

‘रामा झाडे’ला आता नवी ओळख मिळालीयं. त्याचं दिसणं, त्याचं असणं हे आता खऱ्या अर्थानं नवंच आहे. मानवी हक्क अभियान कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे, भीतीपोटी जोपासलेली अंधश्रद्धेची जळमट त्यानं कापून टाकली आहेत. गेल्या १८ वर्षांपसून तो हे अंधश्रद्धेचं ओझं डोक्यावर घेऊन वावर होता. महिलांप्रमाणे वेणी घालूनच त्याला कॉलेजला जावं लागायचं. त्यामुळे सतत त्याला अपमानित वाटायचं. ‘कॉलेजमध्ये गेलो की एकटाच बसायचो. केसांमुळे लाज वाटायची. कोणी जवळ येत नव्हतं. मित्र नव्हते. अभ्यासही करू वाटत नव्हता. केसांचं टेन्शन यायचं’ असं आपल्याबद्दल सांगताना रामा झाडे सांगतो.
सामान्य जगणं नाकारणारी ही पोतराज प्रथेची अंधश्रद्धा, पुत्रप्राप्तीच्या नवसापोटी काही मागासलेल्या समाजात आहे. एखाद्या कुटुंबात मुलगा होत नसेल तर नवसाने झालेल्या मुलाला देवीला सोडलं जातं. तोच हा पोतराज.. स्वतःच्या अंगावर आसुडाचे फटके ओढत... पोटाची खळगी भरण्यासाठी आत्मक्लेश करून घेत... असुडाच्या फटक्यांमुळे होणाऱ्या जखमाही, त्याला पोटभर अन्न देवू शकत नाहीत. त्याचबरोबर शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा आणि देवीच्या कोपाच्या भीतीने पोतराजाला त्यातून बाहेरही पडता येत नाही.
‘माझ्या वडिलांना मुलगा होत नव्हता. म्हणून माझ्या वडिलांनी नवस बोलला होता की जो मुलगा होईल तो देवीला पोतराज म्हणून सोडला जाईल. म्हणून मी जन्मलो कि माझी केस वाढवली आणि पोतराज म्हणून सोडलं, वडिलांनी... पोतराज असणाऱ्या वडिलांसोबत बाहेर मागायला जातो, वाजवतो, प्रत्येकाच्या घरी जावून धान्य मागायचो’ रामा सांगतो.
केज तालुक्यातल्या नाहोली गावच्या रामा झाडेया बारावीत शिकणाऱ्या पोतराजाची कहाणी कळंबच्या ‘मानवी हक्क अभियान’च्या कार्यकर्त्याना मिळाली. या कार्यकर्त्यांनी अगोदर त्यांचे प्रबोधन केले. त्याच्या कुटुंबीयांच्या मनातील भीती दूर केली आणि रामाचे कळंबमध्ये केस कापले.
‘रामा अपमानित जीवन जगत होता. त्याने हे अपमानित जगण सोडावं म्हणून, त्याने उच्चशिक्षित व्हावं म्हणून आम्ही त्याला समजावण्याचं ठरवलं आणि त्याचे केस कापले... हीच आमची डॉ. नरेंद्र दाभोळकरांना आदरांजली असेल’ असं मानवी हक्क अभियाचे कार्यकर्ते बजरंग ताटे सांगतात.
रामाच्याच मागच्या वर्गात शिकणारा त्याचा भाऊ बालाजी झाडेही रामाच्या केस कापण्याच्या परिवर्तनशील उपक्रमाने आनंदित झालाय. तो सांगतो, ‘पूर्वी रामा खूप तणावात असायचा, केसं कापल्यावर आता खूश झालाय. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला स्पष्ट दिसतोय.’
अशिक्षित, गरीब आणि मागासलेल्या समाजात, अंधश्रद्धा, आजही आपलं अस्तित्व टिकवून आहेत. कोप होण्याच्या नावाखाली, चालत आलेल्या अनिष्ठ प्रथा मुळं, अनेक कुटुंबं, उध्वस्त होत आहेत. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, कायद्यासोबातच. प्रबोधनाची ही मोठी गरज आहे. सामजिक कार्यकर्त्यांनी, अशा प्रकारे पुढे येवून अंधश्रद्धेचे ‘केस’ कापायला हवेत तरच दक्षिण भारतातून आलेल्या या पोतराज प्रथेचं उच्चाटन होऊ शकतं.
माहितीचा स्रोत
www.24taas.com
महेश पोतदार, झी मीडिया, उस्मानाबाद

सुरेख तुम्ही लिंक द्या आणि हवं तर थोडक्यात माहिती द्या की कशाबद्दल आहे. पूर्ण आर्टिकल पोस्ट करु नका हे ऑलरेडी एकदा सांगितलंय. धन्यवाद.

बी, <<जी व्यक्ती स्वत: मास खाते त्या व्यक्तीला बकरीच्या बळी जाण्या विरुद्धा बोलायचा कणभरही हक्क नाही.>> या logic ने जी व्यक्ती श्रीखंड-पुरी खाते तिला परवडत नसताना श्री.पु. ची पार्टी उकळणाऱ्याविरुद्ध बोलण्याचा तसूभरही अधिकार नाही.
बळीचा बकरा/ (अष्टसात्विक) गावजेवण जे अंधविश्वासातून, बळजबरीने केलं जातं त्यात मला काहीही फरक दिसतं नाही.

Pages