वैयक्तिक अंधश्रद्धा, वैयक्तिक लढा

Submitted by aschig on 28 October, 2009 - 11:33

हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.

जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.

नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास या पुस्तकाचे परिशिष्ट आहे नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र. ते येथे दिले आहे. (धन्यवाद प्रकाश घाटपांडें). त्या अनुषंगाने संभाषण सुरु करु शकु.

https://docs.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit

(२३ नव्हेंबर २००९ च्या पोस्ट वरुन):

अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.

स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.

वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.

(सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आलेले काही वैयक्तिक लढे) :

विश्वास नसल्यामुळे मुलाची मुंज न करणं, मृत्युनंतरचे विधी न करणं, सत्यनारायण न करणं, दृष्ट काढण्याची जबरदस्ती न करु देणं, मासीक पाळी असल्यामुळे डिस्क्रिमिनेट न करु देणं (हे सर्व फार त्रोटक झालं - त्या लोकांच्या भावना पोचण्यासाठी त्यांच्याच पोस्ट वाचाव्या).

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

<पोटात पिल्लु असलेली बकरी खाण्यासाठी कापत नाहित पण नवसासाठी नक्किच कापत असतील.>

का प ता त.

नवसासाठी, तसंच प्रथा म्हणून.

भरतभाई , तेच हो. मटण विक्रि साठी अशी शेळी नाहि कापत लोक. फक्त नवसासाठी (किंवा धार्मिक कार्यासाठी) कापतात (ऑफकोर्स ती पण नंतर खाल्लीच जाते ) हेच तेथे सांगायचे होते.

हे बकरे कापाकापीचा आस्तिक/नास्तिक असण्या नसण्याशी संबंध नाही. स्वतः खाण्यासाठी बकरा कापला तर ते त्यांचे अन्न म्हणून ठिकच आहे ना. पण ज्याला तुम्ही चराचरात व्यापलेला म्हणता अश्या देवाला तुम्ही एखाद्या जिवाचा बळी देणं हे देवाला तरी मान्य होईल का?

अश्विनी, मला वाटत तुम्ही देवाला मानू नक.. आस्तिक नास्तिक दोन्ही देवाला मानू नका पण निदान एक माणूस म्हणून अमाणुष होऊ नका. मला मासाहार करणे फार अमाणुष कृत्य वाटते. ज्यांना देवाने भरपुर बुद्धी दिली आहे ती लोक मुक्या जनावराच्या वेदना समजून सुद्धा मासाहार करतात. मग त्यांना निर्दयिच म्हणावे लागेल. जेवढा प्रतिकार मी मासाहाराचा करतो तेवढच प्रतिकार मी नवसासाठी ... देवीसाठी बकरा कापल्या जाअणार्‍या प्रथेचा करतो. दोन्ही गोष्टी मला अमानुष वाटतात.

तुला माह्तिई आहे मी ब्राह्मण नाही. पण मी जात पात मानत नाही. मी मनुष्य धर्म मानतो. मी चिनी देशात १५ वर्षापासून राहतो आहे पण अजून एकदाही मी मास चाखले नाही. मी खूप ग्रेट आहे असे मी म्हणत नाही पण मास खाणे हे माझ्या बुधीला पटत नाही.

मांसाहारी लोकांना प्लिज लिव्ह अलोन. नाहितर शाकाहार करणार्‍या लोकांना पोटभर जेवायला पण मिळणार नाही>>

हा एक फार मोठा गैरसमज आहे. केवढे तरी रान शेती पिकवायला मोकळे पडलेले आहे. शाकाहारामुळे माणसांच्या तब्येती चांगल्या राहतील. बरेच जीवघेणे रोग हे मासाहार केल्यामुळे अधिक प्रमाणात होतात. परिणामी, जास्त दवाखाने, जास्त औषधी, जास्त डॉक्टर्स आणि नर्सेस ह्याची व्यवस्था करावी लागते. शाकाहाराचे फायदेच जास्त आहे.

बी तस पाहिल तर शाकाहार देखील निर्दयी आहे. एक कोंबड कापल तर एक जीव गेला. पण एक भाकरी खाल्ली तर कि हजार जीव जातात. एका भाकरील हजार दाणे तर लागतात. एक दाणा म्हणजे एक जीव. वनस्पतीच अंड आहे ते. पेरल तर उगवत. वनस्पतीं या सजीव आहेत व त्यांना भावना देखील आहेत. फक्त त्या आपल्याला समजत नाहीत.
प्राण्याच्या वेदना आपल्याला दिसतात. समजतात. त्यामुळे आपल्या जीभेच्या चोचल्यासाठी त्याला कापताना होणारी तडफड आपल्या संवेदनशील मनाला त्रास देते. ही त्यामागची खरी भावना आहे. जीवो जीवस्य जीवनम हे निसर्गाचे चक्र आहे शेवटी.
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले
मज लागी जाहले तैसे देवा||
यातील आर्तता हीच वेदना दर्शवते.

शाकाहार करायचा, तर करा, फालतूची भूतदया त्याला चिकटवू नका.

जगाची दोनतृतियांशापेक्षा जास्त लोकसंख्या मांसाहारी आहे. (७५% वा अधिक लोक मांसाहारी पदार्थांचा समावेश आपल्या जेवणात करतात)

मांसाहारी आहेत म्हणजे वाघसिंहांसारखे मुडदे फाडून खात नाहीत, तर बहुतेकदा प्राणिजन्य पदार्थांचा समावेश वनस्पतीजन्यपदार्थांसोबत असतो, असे आहेत.

माणूस हा मुळातच मिश्राहारी आहे.

लिहिण्यासारखं भरपूर आहे. शाकाहार वि. मांसाहार होऊन गेलंय आधी. तिकडे लिहा अथवा नवा बाफ काढा. इथे अवांतर होईल.

>>बरेच जीवघेणे रोग हे मासाहार केल्यामुळे अधिक प्रमाणात होतात. परिणामी, जास्त दवाखाने, जास्त औषधी, जास्त डॉक्टर्स आणि नर्सेस ह्याची व्यवस्था करावी लागते. शाकाहाराचे फायदेच जास्त आहे.<<

असली मठ्ठ विधाने करू नयेत.

प्रकाशजी, ह्या आधीच्या एक पानाआधी माझी पोष्ट वाचा. मी शाकाहारच का हे लिहिले आहे. अर्थात माझे मत व्यक्त केले आहे.

नाहितर शाकाहार करणार्‍या लोकांना पोटभर जेवायला पण मिळणार नाही>>बी , तुम्ही शाकाहारी आहात,उत्तम आहे.बाकी काही मिश्राहारी आहेत,त्यांच्यावर तुमच्या भावना /अपेक्षा का लादता?
अहो, हरीण गवत खाते.त्या हरणाला वाघ खातो.जर वाघाने हरणाला नाही खाल्ले तर हरणांचीच संख्या वाढेल.तसेच जर सर्व गवत खात असते तर सर्वांना पुरेसे गवत मिळाले नसते.निसर्गाचा समतोल रहाण्याकरिता ही नैसर्गिक अन्नसाखळी आहे.

जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतीला भावभावना असतात हे दाखवून दिले आहे.झाडांशी बोललात /संगीत ऐकवलेत तर त्याला फळे जास्त येतात,हा अनुभव आहे. मग शाकाहार करायचा की नाही?

काही शाकाहारी लोक आस्तिक आहेत.
काही शाकाहारी लोक नास्तिक आहेत.
काही मांसाहारी लोक आस्तिक आहेत.
काही मांसाहारी लोक नास्तिक आहेत.

शाकाहार / मांसाहार हा खायचा चॉईस आहे जसा दुध अंडी खायची कि नाही हा चॉइस आहे. आम्ही तुम्हाला मांसाहारी व्हा असे सांगत नाही. (आताच ४०० र किलो झालेय Sad ) आणि त्याची गरज नाही. पण त्यामागची कारण मीमांसा महत्वाची आहे. आणि मांसाहार करनारे अमानुष कसे कॉय बुवा. शाकाहार करायचा आणि भावाची जमीन कशी लुबाडता येइल याचा प्लॅन करायचे , म्हातार्‍या आईवडलांकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष कराय्चे आणि शाकाहार करायचा. अमानुष म्हणजे नेमके काय ते समजुन घ्या. ती एक वृत्ती आहे. दुसर्‍याला त्रास देणे हा त्याचा एक महत्वाचा घटक आहे.

आणि या सगळ्यात वहावत नका जाउ. याचा अतिरेक जगणे मुश्किल करतो. आपले ही आणि आपल्या बरोबर असलेल्या लोकांचे ही. उदाहरण द्यायचे झाले तर , समजा आपण दोघे एखादे बिझिनेस डील करणार आहोत. आणि सुरवातीला तुम्हाला समजले कि मी मांसाहारी आहे, तुमचा दृष्टीकोन तयार झाला कि मी अमानुष आहे. मग तुम्ही एका अमानुष माणसाबरोबर डील कराल का? मैत्री करताना फक्त शाकाहारी लोक निवडाल का? बस मध्ये बसताना शेजारच्याला विचाराल का कि तु शाकाहारी कि मांसाहारी? समजा तुम्ही उद्या सुपर पावर झालात तर मांसाहार करणार्‍याला तुरुंगात टाकाल का?

या वाटण्याचा मार्ग अश्या रितिने जातो आणि कधी एका वळणावर मी वर दिलेल्या उदाहरणासारखी अवस्था प्राप्त होते .

मी कुणावर शाकाहार लादत नाहीये. मला एक विसंगती .. एक विरोधाभास इथे जाणवत आहे आणि तो खटकत आहे म्हणून मी माझे मत व्यक्त केले. मास खाणे चालते तर बळी देणे का चालू नये. दोन्हीमधे कुणाची तरी हत्या होते आहे.

>>जगदीशचंद्र सेन यांनी वनस्पतीला भावभावना असतात हे दाखवून दिले आहे<<
तुम्हाला जगदीशचंद्र बोस म्हणायचे आहे का?

शाकाहारी, मांसाहारी, मत्स्याहारी, फालाहारी, दुग्धाहारी, वेगनहारी, इत्यादि इत्यादि सर्व प्रकारच्या लोकांना उद्देशून खालील वाक्यः

दुसरा काय खात आहे त्याच्या ताटात वाकून पहात "किती घाण" वा तत्सम शब्दांचा अथवा भावनेचा उल्लेख करणे याहून जास्त असंस्कृतपणा नाही. आपल्याला जे खायचं आहे ते आपल्याला मिळत आहे. दुसर्‍याला जे खायचं आहे ते त्याला मिळू देत. जोपर्यंत समोरचा तुमच्या ताटातलं हिसकावून घेत नाही तोपर्यंत त्याच्या अन्नाबद्दल आपण बोलू नये. देव न करो उद्या असा एखादा दिवस आलाच, तर आपल्याला काय खावं लागेल अणि काय नाही याबद्दल आपण आताच सांगू शकत नाही.

(मी देव मानते बाय चॉईस आणि मांसाहारी आहे बाय चॉइस. धन्यवाद!!!)

मास खाणे चालते तर बळी देणे का चालू नये>>> गुड क्वेशन. आता तुमचा प्रश्न अतिशय क्लिअर झाला आहे. आणि याचे उत्तर द्यायला मला जमेल असे वाटते नाहितर इब्लिस / आस्चिग आहेत्च.

बळी देणे (मांसाहारी) (शाकाहारी लोक नारळाचा बळी देतात म्हणे) याचा सोर्स बघितलात तर : हे असे झाले तर / किंवा असे व्हावे म्हणुन / किंवा माझ्यावर संकटे येवु नयेत म्हणुन / किंवा माझे माझ्या कुटुंबियांचे भले व्हावे म्हणुन केलेले आवाहन ( सो कॉल्ड शक्तिला) आणि त्याची पुर्तता. इथे भुक महत्वाची नाही पण आता बळी दिलाच आहे तर शिजवुन खाउया म्हणुन रांधलेले जेवण त्याचाच दाखवलेला नैवद्य. आपल्या पुर्वापार चालत आलेली प्रथा आहे ( परवडत नाही, मुलाच्या शाळेची फी भरायला पैसे नाहीत) कशी मोदायची. त्यामुळे कोप होइल, काहितर नुकसान होइल म्हणुन बळी द्यायचा.

याउलट, नाक्यावर सकाळीच बकरे कापुन टांगुन ठेवलेले असते. ज्याला खावेसे वाटते तो जाउन घेउन येतो, शिजवतो, मस्त जेवतो आणि दुपारी ताणुन देतो. सगळा राजी खुशीचा मामला.

या दोन उदाहरणात पहिल्यात भीती आणि कंपल्शन आहे तर दुसर्‍यात ऑप्शन आहे. बस्स. इतकेच मला समजावुन सांगता येते.

म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो त्याचे वाईट वाटते.

मास खाणे चालते तर बळी देणे का चालू नये>>> एक उदाहरण म्हणून देते बघ पटतंय का! गावातल्या एका माणसाला मुलगा होतो. त्याची परिस्थितीफार वाईट आहे, शेती नीट पिकत नाही. पण मुलगा झाल्यावर त्याला जावळाच्या दिवशी गावजेवण घालावंच लागतं, त्यासाठी तो शेतीचा तुकडा गहाण ठेवतो. पण आपण जर हे केलं नाही तर आपल्या मुलावर संकट ओढवेल या भितीनं तसंच समाजामध्ये इज्जत रहावी, म्हणून तो हे बळी देऊन गावजेवण घालायचं ठरवतो. त्यासाठी ऋण काढतो, कर्जबाजारी होतो. इथं त्याचं मांस खाणं अथवा न खाणं हा इशू नाही, इशू आहे तो देवदेवतांच्या भितीचा (समजा, देवाला बळी दिला नाही तर देव कोपेल ही गोष्टच चुकीची आहे ना???) आणि त्यानुसार पर्यायानं समाजाच्या असलेल्या कंडिशनिंगचा.

मी बळी दिला नाही तर देव माझ्यावर कोपेल ही यामधली अंधश्रद्धा आहे, आणि हे लढणारे बहुसंख्य लोक अशा अंधश्रध्दांविरोधात लढत आहेत.

मागच्या महिन्यामध्ये राजस्थानमध्ये एका मुलीला "ती देवीचा अवतार आहे म्हणून तिला जिवंत पुरलं गेल्याची बातमी तू वाचली होतीस का? कुठली देवी दोन अडीच वर्षाच्या मुलीला पुरायला सांगणारी असते? हे चुकीचं आहे हे तरी तुला पटत आहे का?

उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म | अशी काहीची श्रद्धा असते. मी त्याचा आदर करतो . पण एकाला बोंबलाच्या वासाने भूक लागते, चक्क लाळ गळते तर दुसर्‍याला त्याच वासाने मळमळत उलटी होते. वास एकच पण भिन्न व्यक्तिंवर त्याचे भिन्न परिणाम. श्रद्धेची ही काहीस असच आहे.

नंदीनी, हो हे चुकीचे आहे हे मी मान्य करतो. मग, अन्न समजून मास खाणे हे मला चुकीचे वाटते आहे माणासाबद्दल. इतर अनेक पर्याय उपलब्द्ध असताना प्राणीहत्या करणे पटत नाही.

मग, अन्न समजून मास खाणे हे मला चुकीचे वाटते आहे माणासाबद्दल. >>> ठिक आहे. तुला चुकीचं वाटते. तू खाऊ नकोस . तुला मांस खायला कुणी जबरदस्ती केली आहे का? पण इतर लोक खात असताना त्यांना "अमानुष" वगैरे देखील तू म्हणू नकोस. तुझा जसा चॉईस आहे तसा इतरांचादेखील आहेच ना???

"बेफि, तुम्ही इग्नोअर्ड! "
^^असं म्हणून इग्नोरास्त्र वापरत नसतात. बी वापरताहेत ते माबोछाप वर्जिनल इग्नोरास्त्र आहे. १००% जेन्युइन Wink

आम्हाला शाकाहारी लोक अमानुष वाटतात . काय ते झाड तोडुन खायचे. जी झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात प्राणीमात्रांची पोट भरतात प्राणीमात्रांन सावली देतात. धरतीवर पाउस पाडतात अश्या झाडांना ही स्वार्थी शाकाहारी लोक तोडुन टाकतात. वर तोड्तात ते तोडतात नविन झाड देखील लावत नाहीत.

421752_370089689685315_2126420913_n.jpg

मग, अन्न समजून मास खाणे हे मला चुकीचे वाटते आहे माणासाबद्दल. >>> ठिक आहे. तुला चुकीचं वाटते. तू खाऊ नकोस . तुला मांस खायला कुणी जबरदस्ती केली आहे का? पण इतर लोक खात असताना त्यांना "अमानुष" वगैरे देखील तू म्हणू नकोस. तुझा जसा चॉईस आहे तसा इतरांचादेखील आहेच ना???

बरोबर, मला कुणी मास खा की प्राणीहत्या कर असे म्हणत नाही. मला निवड स्वातन्त्र्य आहे. बळीच्या बाबतीतही हे लागू पडते. बळी देणे ही एक प्रथा आहे. ती पाळलीच पाहिजे असे नाही.

अंधश्रद्धांबाबत एक गोष्ट करा
१) त्याची यादी तयार करा
२) त्याची वर्गवारी करा
३) त्याचा प्राधान्यक्रम लावा
४) त्याच्या निर्मूलनार्थ व्यवहार्य उपाय सांगा
.
.
आपल्याला प्रत्येक टप्प्यावर एक वाक्यता दिसणार नाही. त्यामुळे किमान समान कार्यक्रम राबवणे सुद्धा अवघड जाते.
अंधश्रद्धांचे बळी हेच अंधश्रद्धांचे वाहक असतात. त्यामुळे हे कार्य अत्यंत संथगतीने चालणार. प्रबोधनाचा मारा/रेटा व कायद्याचा धाक याने पडणारा फरक हा क्षीण आहे. पण मानवी उत्क्रांतीच्या टाईम स्केलवर हा प्रबोधनयुगाचा शतकांचा कालावधी हा नगण्य आहे. हे समजावून घेण्याची गरज आहे.

बळी देणे ही एक प्रथा आहे. ती पाळलीच पाहिजे असे नाही.>>> घूम फिर के वापस वही पर. मी वर दिलेलं उदाहरण वाचलंस का नीट ? जावळाच्या दिवशी गावजेवण घालण्यासाठी शेती गहाण ठेवणारा माणूस तुझ्याच भागातला आहे.अशा माणसाच्या मनामधल्या अंधश्रद्धा दूर करायच्याच नाहीत का? तो त्याचा चॉइस आहे म्हणून त्यानं शेती विकली देशोधडीला लागला तरी गप्प बसायचंय का? तू काय बोलतोस ते तुझ्या तरी लक्षात येतंय का?

जबरदस्तीनं कर्ज काढूजाका होइना बळी देणं हे शंभर टक्के बरोबर आहे असं तुझं मत आहे का???

नंदीनी, नक्कीच मी समजवून सांगेल. पण मग वाढदिवस आहे म्हणून मित्रांना नॉन्व्हेज खाऊ घालणे ऐपत नसताना ह्याचे तू समर्थन करशील का? माझा विरोध दोन्ही बाजूनी आहे. मला बळी नको की.. मासाहारीही नको.

Pages