बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कांदा टोमाटो कोशिंबीर ( शेंगादाण्याचे कूट न घालता) वरण भात., मटाराची दिंडे( वाफवून) फुलके,
आळूची पातळ भाजी. खोबरे वगैरे न घालता. पापड भाजून. अगदी कमी तेलातली फ्लावर बटाटा भाजी.
फळांचे तुकडे व कस्टर्ड सेपरेट असे डेझर्ट.

मी इथे एक गोष्ट अवांतर लिहित आहे -

अरू, तुला किती रेसीपी लक्षात असतात आणि पटकन सुचतातही कॉम्बो!
लगेच लिंक पण देतेस तू Happy
मला नेहमी कौतुक वाटतं तुझं

खाण्यावर प्रेम!! Happy

काकडी किसून दह्यातली कोशिंबीर, फ्लॉवर मटार टोमॅटो बटाटा रस्सा, आंब्याचा शिरा / आम्रखंड, पुदिना / कोथिबिरीची चटणी, वरणभात, फुलके, ताक / मठ्ठा , भाजलेले पापड, सुरळीची वडी.

मला वाटतं घरी हे लोक साधंच भाजी पोळी कोशिंबीर भात वरण जेवत असतात. एकदा कडक पथ्यवालं कोणी नाहीलहे बघून जरा चमचमीत मेनू ठेवला तर बरं वाटेल. कमी तिखट पावभाजी, पावाला गरजेनुसार मऊ ठेवता येईल व बटरही हवे तेवढेच, मटार पुलाव, हलकासा लसणाची फोडणीवाला दाल फ्राय किंवा दहीबुत्ती, मोठे गोल गुलाबजाम, हवीतर सोलकढी.
मिळमिळीत मेनू ठेवला की त्यांना 'मोडीत काढल्यागत' वाटतं. आणि साधासा चारी ठाव! बेत त्यांच्यादृष्टीने करायला सोपा (रीड: फालतू) असतो. हे मी स्वत: पाहिलंय, ऐकलंय.
दसरा म्हणून पारंपारिक करायचा असेल बेत तर वरचे छानच आहेत. गडात करंज्या, हयग्ीव, खव्याच्या पोळ्या, दलिया चालेल. भाजी पनीर वापरून केली तर आवडेल.

मिळमिळीत मेनू ठेवला की त्यांना 'मोडीत काढल्यागत' वाटतं.>> पण पचायला जड जेवणही जमत नाही ह्या वयात.

आशूडी + १

अमा <<< पण पचायला जड जेवणही जमत नाही ह्या वयात. >>> too much Happy साठीतली तर लोक आहेत. हल्लीची मी बघितलेली seniors are much stronger than that. Touchwood!

हल्लीची मी बघितलेली seniors are much stronger than that. Touchwood! >> +१००

दसर्याच्या निमित्ताने ठेवणार म्हणून पारंपारिक पण अ-मराठी मेन्यू पण चालेल की उदा: गुजराथी उंधियो आणि फुलके किंवा दाक्षिणात्य पुलीयोग्रे आणि बटाटा भाजी किंवा काश्मिरी पुलाव आणि कोरमा. मजा येईल. डेझर्ट म्हणून 'तिरामिसू' जमल तर बघा. काही जे ना लोकांना फार आवडल्याचा अनुभव आहे.

आजच ऑफिसमधे उपवासाचे खाकरे मिळाले.
कोणाला रेसीपी माहीत आहे का?

या खाकर्‍यांची उपवासाचे एभेळ करायची आहे. काय काय घालता येईल त्यात?
काको आणि राजगिर्‍याच्या लाडूचा चुरा मस्ट!
आणखी काय?

चिमुरीने पिंचीवर काही काही सुचवले होते पण त्यात सगळेच तळणाचे पदार्थ Sad
माझ्याने इतके तळण उपवासाच्या दिवशी सलग खाल्लं जात नाही

का को म्हणजे काय? कांदा कोथिंबीर?? उपवासाला कांदा?

- रताळे उकडून तुकडे किंवा बटाटा, उपासाची शेव आणि फळे (डाळिंब इ) एवढेच मी भेळेत घालेल.

>> भेळेत नको. फारच सात्विक होतंय.

आता राजगिर्‍याच्या लाडवांचा चुरा ज्या पदार्थात घालून त्याला भेळ म्हणायचं ठरलं आहे, त्यात बाकी काही का पडेना! Proud

रिया,

तो बटाट्याचा चिवडा किंवा कीस घालतात, दाण्याची किंवा काजूची जरा जास्त चटपटीत उसळ करून ती घालता येईल.

ओके ही माझी फायनल रेसिपी:

काजू उसळ (चटपटीत, मिळमिळीत चालणार नाही!!!), उपवासाची शेव, उकडलेले रताळे, डाळिंब, कोथिंबीर - आता ह्यात खाकरा चुरून घालणे, वर खजूर चटणी- हिरवी चटणी.

ह्यापेक्षा वेगळी भेळ खाशील तर पापी ठरशील Wink

बटाट्याचा तिखट चिवडा यम्म लागेल Happy
पुरे ना इतकंच? Happy
परवा करते आणि सांगते कसं लागलं ते

येस सिमंतीनी Happy
असचं करते Happy

चटपटीत, मिळमिळीत चालणार नाही!!!) >>> ही उपवासाला चालते का? हो असल्यास रेसीपी द्या प्लिज (सॉरी मी स्वयंपाकाबाबत अगदीच ही आहे)

उपवासाला सात्विकच पदार्थ हवेत ना? डोळा मारा >> मराठीत म्हण आहे - बैल गेला आणि झोपा केला (झोपा म्हणजे बैलाचा तबेला.) उपवासाला सात्विक पदार्थ हवे तर भेळ का विचारतेस? आता विचारले आहेच तर होऊ दे खर्च.. Happy Wink

सीमंतिनी , अगं गणेशोत्सवात नाही का पौर्णिमाने खाकरा भेळचे एरेसीपी दिलेली?
आता उपवासाचा खाकरा मिलतोय तर त्याची भेळ करुन पहावी म्हनतेय.

मी रताळं आणि बटाता दोनन्ही रद्द करुन तळलेले पनीर घालायचे ठरवले आहे Proud

करायला गेलो गणपती झाला मारुती तस चालू आहे. तिला भेळ करायची आहे पण झाझीकी पासून काहीही घालणे चालू आहे. बहुतेक उपवासाचा टाको ह्या रेसिपिवर थांबू.

फराळी पनीर शासलिक बहुतेक..
आता ते राजगिर्याच्या घावनात गुंडाळून खायचं ठरलं की मी सु.डो.मि. (झोपण्यासाठी)

मुळात आधी उपासाचा खाकरा हा काय प्रकार आहे? तो सात्त्वीक आहे की नाही ते चेक करा.

तमिळी लोकांसारखे गहू उपासाला चालणारा खाकरा असेल तर झालंच कल्याण!!!

खाकरा तस पण मी खात नाही त्यामुळे गहू काय नी शिंगाडा काय. खाकरा ऐवजी मी साबुदाणा चिवडा घालून केली असती.

Pages