मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे.. अजुन बघताय ही मालिका!
मी पहिले २ भाग बघितल्यावर मराठीची वेबसाईट उघडणंच बंद केल Happy

बोअर असली तरी मालिका बघतात आहे सगळे......... >>> स्मितू आता इंटरेस्टिंग व्हायला लागलीये मालिका... पहिला भाग फारच भडक होता.. आता हळूहळू बघणेबल होतेय..

हाय्य्य्य्य्य साने......... अगं मी बघते ती मालिका......... पहिले दोन तिन भाग जरा झाले बोअर......... पण आता जरा बरी वाटते आहे .....:स्मित:

अगं थँक्स काय????? त्यात........... नांव माहिती होते म्हणुन सांगितले Happy

आता ती वहिनी काही करून या दोघांना पाणी भरण्यासाठी का होईना विरार ला घेऊन जाण्याचा अट्टहास आणि सर्वतोपरी प्रयत्न करतेय.

हो, पण एक लाईन इतर सिरियल्सच्या खाली फिरत होती: "केतकरांच्या घरात अदिती-जयचा संसार सुरू" अशी.. त्यामुळे ती कुठे राहणार, हा सस्पेन्स आधीच फोडलेला आहे.. दर रविवारी विरारच्या घरी जाईल तेंव्हा मात्र पाणी भरेल बहुतेक., जाऊ जमेल तितकी आठवड्याभराची कामं सोशिक अदितीकडून करुन घेईल असं दिसतंय.
अरुण नलावडे आणि श्यामची आई(काय बरं तिचं खरं नाव?) यांना पाहून आनंद झाला. Happy

सायली त्या गोट्याच्या आईचं काम केलेल्या डॉ. प्राची साठे होत्या ना? Uhoh
मानसी मागीकर बहुतेक त्याची बहिण होती. आठवत नाही नक्की Sad

सायली त्या गोट्याच्या आईचं काम केलेल्या डॉ. प्राची साठे होत्या ना? >>> नाही दक्षिणा.. गोट्याच्या आईच काम केलेल्या मानसी मागीकरच त्या...

गोट्याच्या सांभाळणाऱ्या आईचे काम मानसी मागीकर यांनी केलं होतं. जन्म देणारी आई दाखवली होती का नाही ते आठवत नाही.

अरुण नलावडे आणि श्यामची आई(काय बरं तिचं खरं नाव?) यांना पाहून आनंद झाला.>>>>मलापण
माझ्या घरीसुद्धा सुमिचि आईच गोट्या सिरियल मधली म्हणुन ओळखतात .

सुबोध भावे ,अरुण नलावडेयांनी वाद्ळवाट सिरियल मधे मस्त काम केली होती. आय होप कि या सिरियलमधेहि आपल्या सुन्दंर अभिनयाने थोडातरि जीव आणतील .

Pages