मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हां, ती एकच एक चांगली गोष्ट आहे या सिरियलीत. शीर्षक गीत सुंदर आहे. शब्द, चाल आणि गायक.

रोहित राऊत- कीर्ती किल्लेदार.

मला नाही आवडलं Sad
सहज गुणगुणावं असं नाही... किर्ते किल्लेदारचे शब्द कळत नाहीत. तिचा आवाज चोरटा वाटतो रोहितच्या आवाजापुढे.

पण रोहितचा आवाज आता किती मॅच्युअर झाला आहे... मस्त एकदम!

नाही पियु ते त्यांना भेटायला येतात तेव्हा जयचे बाबा खालुन पाणी भरलेली बादली घेउन येत असतात.. त्यांच्या घरासमोर आल्यावर या दोघांमध्ये काही संवाद होतात तेवढ्यात शोभा बाहेर येते आणि नेहमीप्रमाणे घा.पा. बोलते.. त्यावर केतकर त्यांच्या सवयीने तिला बोलतात... ती चिडुन निघुन गेल्यावर केतकर खानोलकरांची चौकशी त्यांच्याच जवळ करतात तेव्हा केतकरांना समजत की आत्तापर्यंत आपण ज्या माणसाशी बोलत होतो तेच जयचे वडील आहेत...

कालच्या भागात नेहमीची(च) कन्फ्युजन्स झाली. Sad नेहमी सर्व सिरियल्स मध्ये हेच कसं काय घडतं? Uhoh

सध्या फार संथ सुरू आहे. वहिनी दाखवली नाही की मजा येत नाही.

बाय द वे, त्या काकांना खरे का सांगायचे नाही म्हणे? म्हणजे ऑफीसात लग्न झालेले लपवले आहे हे?

मी गेले १०-१२ भागच पाहीलेत म्हणून माहीत नाही.

बाय द वे, त्या काकांना खरे का सांगायचे नाही म्हणे? म्हणजे ऑफीसात लग्न झालेले लपवले आहे हे?>>>याचेच कारण सर्वजण (लेखकासहित) शोधत आहेत...

याचे एक कारण
... सुबोध भावे आणि केतकर काका नातेवाइक असु शकतात... किवा.. त्यान्च्या मुलाचा मित्र वैगेरे ...

अजुन काहि भाग झाल्यावर हे गुपित बाहेर येइल ... असा अन्दाज आहे .... Happy

>> सुबोध भावे आणि केतकर काका नातेवाइक असु शकतात... किवा.. त्यान्च्या मुलाचा मित्र वैगेरे ...>>

आणि सुबोध भावे जर केतकर काकांचा मुलगा निघाला तर?

आणि सुबोध भावे जर केतकर काकांचा मुलगा निघाला तर?>>>शक्यता कमीय कारण सुभा ची आई त्याची जेवायसाठी वाट बघते रोज...

सुबोध भावे जर केतकर काकांचा मुलगा निघाला तर? >>> केतकर काकांचा मुलगा परदेशात राहतो. तो परत येणार नाही म्हणून केतकर काकू सोबतीला पेईंग गेस्ट ठेवतात.

आता त्या आदितीच्या काकांच्या घरी पार्टी आहे. आणि तो एक माणूस (नाव विसरले) काकांना ओळखतो. काका त्याच्याकडे जयबद्दल विचारपुस करत असतात.

बहुतेक आता काकांना विश्वासत घेतील आणि असे दाखवतील की अदितीला जयचे स्थळ आले आहे आणि म्हणून काका चौकशी करायला त्याच्या ऑफीसात गेले होते. Proud

आता त्या आदितीच्या काकांच्या घरी पार्टी आहे.

>> आदितीचे काका नाही.. घरमालक केतकर.. तिने ऑफिसमध्ये खोटे सांगितले आहे कि ती काका-काकुंकडे राहातेय.

आणि तो एक माणूस (नाव विसरले) काकांना ओळखतो.

>> ऑफिस प्युन तांगडे बहुतेक.

बहुतेक आता काकांना विश्वासत घेतील आणि असे दाखवतील की अदितीला जयचे स्थळ आले आहे

>> शक्य नाही. जर असे केले तर जय आणि आदिती हे दोघे विवाहोच्छुक आहेत असं वाटेल जे ऑफिसच्या नियमांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे दोघांची नोकरी जाऊ शकते असं केलं तर.

केतकर काका पार्टी चालु असताना मध्ये येऊन काय बोलतील आणि त्यामुळे जय-आदिती दोघेही त्याच घरात राहातात हे उघड होईल का हा खरा प्रश्न आहे.

का रे दुरवा..शीर्षक गीत तस छान आहे .पण 'क्वीन 'मधल्या 'हरजाइयां' या गाण्यासारखं मला वाटतं (अगदीच चोरलय अस म्हणत नाहीए).
ऑफिस मधल्याच हल्ली गोष्टी दाखवतात (जे चांगलच आहे) कजाग वहिनी गायब आहे.ती ऑफिसमधे गप्प गप्प असते तीलापण डोळे आलेत बहुतेक .तशी इथे साथच आली आहे, तिकडे त्या मेदे लापण डोळे आलेत.

ही सिरियल मी नेहेमी पाहत नाही. आजचा मेगा एपिसोड येताजाता पाहिला. अदिती आणि जयने काकूंना आणि स्वयंपाकीण बाईंना सत्य सांगितले आहे का ? आजचा एपिसोड बघताना तसे वाटले.

१४ तारखेचा भाग मस्त होता .काका जेव्हा टेप लावतात तेव्हाचे जे गाणे लागते तेव्हाचे सर्वांचे एक्स्प्रेशन्स मस्त.हे ही पहा.
टिक टिक आवडलं का ते सांगा स्पेशली सई फॅन्स. https://www.youtube.com/watch?v=xtLxWiUcOng. .:स्मित:

पथेटिक.. अदितीचा अती चांगुलपणा लई डोक्यात जातो.. Angry
आधी जान्हवीचा जायचा.. पण आता ती डोक्यावर पडल्याने तिला माफ !!!

चंगोच्या फेबु पेजवरून जालिंदर कुंभार यांजकडून साभार:

अदिती खानोलकर : सुरुची आडारकर
जयराम खानोलकर : सुयश टिळक
परशुराम खानोलकर : प्रफुल्ल सामंत
अभिराम खानोलकर : महेश जोशी
शोभा खानोलकर : शीतल क्षीरसागर
चिन्मय खानोलकर : अथर्व नाकती
सदाकाका : किशोर जयकर
सुहास : अमित खेडेकर
अविनाश देव : सुबोध भावे
नंदिनी वळसणकर : विशाखा सुभेदार
अरविंद कदम : सुनील तावडे
रजनी देशमुख : नेहा जोशी
नयना भूरकुटे : नेहा शितोळे
जुई गाडगीळ : अर्चना निपाणकर
अमित बारटक्के : आशिष पाथोडे
तिलोत्तमा तडवळकर : शलाका पवार
सारिका लुकतुके : नेहा कुलकर्णी
देवयानी बारपांडे : कस्तुरी सारंग
नवरे : सुनील गोडबोले
स्वरूपकुमार तांगडे : उमेश जगताप
नानासाहेब केतकर : अरुण नलावडे
माधवी केतकर : मानसी मागीकर
दिलीप दाभोलकर (अदितीचे वडील) : राजन भिसे
अनिता दाभोलकर (अदितीची आई) : प्राजक्ता दिघे
शालिनी तुंगारे(शोभाची आई) : शीतल शुक्ल
शेखर तुंगारे(शोभाचे वडील) : श्रीरंग दाते

हा जय अगदी पिचकवणी का दाखवलाय? :रागः
ती रजनी अशी मागे पुढे करते. एकदा कानठाळवऊन ठेवता येत नाही का याला? Uhoh

जस्ट नॉट जय, ती आदिती पण पिचकवणीच निघाली.
डायलॉग कुणी लिहिलेत? :रागः
ती रजनी इतका भोचकपणा करून तो तुझा बॉयफ्रेंड होता का असं विचारतेय तर ती आदिती गुळमुळित फ्रेंड म्हणून उत्तर देते. मी चांगलं थुत्तरफोड उत्तर दिलं असतं.

Pages