मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी अगदी आशूडी.. Proud पण किमान अस्मिताला चौकटीबाहेरचे काम दिलेय, हे ही नसे थोडके. नियमाला अपवाद. ( तोही नियम सिद्ध करण्यासाठीच बहुतेक Proud )
चनस, ते गाणं पहिल्यापासूनच डोक्यात जातं. इतकी वर्षं गेली हम आपके येऊन. पण समाजाची मानसिकता तसूभरही बदलेली नाही. निदान टिव्ही मालिकाविश्वाची तरी..

एक जुनी सीरीयल आणि एक संजय कुमार जमान्यातला सिनेमा आहे असा. त्यावरुनच बनवलिये असं दिसतंय नवं कही नाहीये.

ऑगी Rofl
साने पर्फेक्ट

आशू, मी हेच लिहिणार होते. बर या बयाला एवढा वेळ कुठुन मिळतो काय माहीत हे सगळं करायला.
नुसती शीर्षक गीतातच काम करताना दिसते Proud
(एका मालिकेच्या बीबीवर दुसर्‍या मालिकांची चर्चा सुरू झाली की मीच ओरडते ना लोकांना? Proud )

मला ओगी बघायचय, मला ओगी बघायचय.:अरेरे: पण हाथवे वाल्यानी कार्टुन नेटवर्क बन्द ठेवलय.:राग:

नको ते झी चॅनेल आता.

>>>प्रत्येक मालिकेत मंगळागौरीचे आचरट नाच, बेसूर गाणी, गणेशोत्सव, राखी पौर्णिमा, वटसावित्री, गुढीपाडवा हे >>>आलेच पाहिजे..

ह्या ह्या ह्या ह्या ह्या .... Proud

रीया, ती कामं रोज केल्याशिवाय सुटका आहे का? म्हणून शीर्षकातच करवून घेतात बिचारीकडून. तरी पण पिवळ्या, हिरव्या टिकल्या शोधायला वेळ असतो. अरे हां, शोधलं की सापडतंच! Lol

यात काय मजा नाय राव.. सुरुवातीपासुनच असा किस नाय पाडायचा.. आधी सगळ्यांनी कौतुक करायचं, मग हळुच कोणीतरी निगेटिव्ह बोलायला लागनार, मग हळु हळु ती संख्या वाढत जाणार, अन मग शेवटी सगळेच निगेटिव्ह बोलणार, यातच धागा रंगतो नाय का.. :दिवे:

मला या मालिकेचे प्रोमोज लै आवडलेले.. असली लपवा छपवी भारी वाटलेली.. पण मला ही मालिका अजिबात बघायला मिळत नाही.. त्यामुळे कोणीतरी रेग्युलरली बघणार असेल तर डिटेल्ड अपडेट्स देत जा प्लीज Happy

प्रोमोवरून विषय इंटरेस्टिंग वाटलेला, प्रत्यक्ष मालिका बंडल!!

बरं, मला एक सांगा चोवीस तासामधले तेवीस तास यांच्या मालिकेचे प्रोमो टीव्हीवर झळकत होते. हीरो हिरवीण कोण हे सर्वांनाच माहिती होतं, मग तरीही पहिल्या एपिसोडला हिरवीणीचा चेहरा पहिली पंधरा मिनिटे दिसूच नये म्हणून तो द्राविडी (हो! तेलुगु तमिळ सिनेमात असला हिरवीण एन्ट्री सीन हमाखास असतो) प्राणायाम कायको???

दाखवा की त्यांची थोबाडं!!!!

गुप्तहेरांनाही असतो संसार हेच त्याचं सार! >> आशूडी Lol

आणि एका ठिकाणी साडीत फायटिंग, गुंड पायाशी असं पण आहे ना शिर्षकात? Proud

अरे हां, शोधलं की सापडतंच!
>>
Rofl

चिमा, प्रोमोजच फक्त मस्त होते बाकीच सगळं भंगार

ए प्लीज लिहीण्यापेक्षा आपापल्या मोबाईल फोनवरून बोललेलं रेकॉर्ड करून टाकलं तर भावना नेमक्या पोहोचतील. व्हिडीओ अपलोड केले तरी चालतील. (पात्रांचा अभिनय करून दाखवावा लागेल ही अडचण )

काय बंडल आहे. इथे कोणी वकील नाहीये का?

Section 26 in The Indian Contract Act, 1872

Agreement in restraint of marriage, void.—Every agreement in restraint of the marriage of any person, other than a minor, is void.

कोणीही तुमच्याशी "तुम्ही कधीही लग्न करु शकत नाही" असा करार कितीही रुपयांसाठी केला तरी तो वॅलिड नसतो.

रिया.. खरंय खरंय.. Lol

ज्या गोष्टीवर अख्खं कथानक बेतलेलं आहे ती गोष्टच बेसिकमध्ये गंडलेली आहे. Happy

एक मोठ्ठा लूपहोल.
तो मेहता का कोण जेव्हा जय कडून चेक घ्यायला त्याला रस्त्यात गाठतो, तेव्हा सांगतो की मला देव चा काल फोन आला म्हणून मी चेक घ्यायला आलो. वयनी समोर आहे म्हणून काही बोलत नाही.
मग हा मेहता देवचा इतका बर्‍यापैकी ओळखिचा माणूस आहे तो चुकून सुद्धा जय चं लग्न झालं आहे असं बोलून जात नाही कसा? Uhoh

या मालिकांमधले सगळे बोलायच ते बोलत नाहीत आणि नको ते भरपुर बोलतात. स्पेशली हिरवणी...

आदिती सारखा एखादा प्राणी खरच अस्तिवात असेल तर मला तशी बायको पाहिजे आहे Happy

मला ती जाऊ आवडली, नाव माहिती नाही कुणाला माहिती असल्यास सांगा..

ठसकेबाज आहे, व्हॅम्प म्हणून भरपूर स्कोप आहे तिला पुढे, तसेही आजकाल रडणा-या सुना नि अशा व्हॅम्प यानाच जास्त काम असते...

त्या जावेसारखी सेम टु सेम माझी एक चुलत जाव आहे.... म्हणजे रियल लाईफ मधे असे लोक असतात हे मला पटु लागलय... Wink

Pages