मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशुडे एकदम बरोबर. आणि त्या जानी सारखे हिला पण मोजकेच ड्रेस आहेत वाटतं :रागः
एकच एक ती रंगिबेरंगी ओढणी आणि वर हिरवं पिवळं काहीही. Sad

मला या सिरियलित नंदिनी खुप आवडली. कसलं गोड काम केलंय.

मला रजनी आवडते आहे भारीच!
तिचं 'जय्!' अशी हुकमी हाक मारण्याचं बेअरींग मस्त आहे.

काल पहिल्यांदाच ह्या मालिका काही मिनिटे पाहिली. साबा कृपेने पार्श्वभूमी माहित झाली. ती सारखी जयच्या मागे मागे असते ती रजनी का? सुबोध भावेला म्हणते की जयची आणि माझी टीम असू दे वगैरे.

हो, जानूचा हिरवा आणि अम्सुली ड्रेस बघून कंटाळा आला. खर्या आयुष्यातलै कपडै निकालात निघाले पण हे मात्र मळेन पण फाटणार नाही, झिजेन पण विटणार नाही टाईप दिसतात.
रजनी व सुबोध दोघांसाठीच डोकावते मी या सिरेलीत.

पण काल अगदीच तारतम्य नसल्यासारखं दाखवलं त्या रजनीला. ती नंदिनी इतकी घाबरून घट्ट झालेली आणि त्यात ती रजनी कॉफी प्यायला जाऊ असं लोचटासारखं म्हणत होती.

घाबरून घट्ट>> दक्षिणे!! Lol

अदिती वेळ मिळाला की प्रवचन देत असते! केवढे लांबलचक संवाद देतात तिला!

या मालिकेत सर्वच मुलं परदेशात दूर गेल्यावर आई-बाबांना विसरलीत काय? सदाकाकांचीही तीच स्टोरी. काहीतरी नवं कारण तरी द्यायचं! बर, विसरली ना मुलं? मग पैशाची तजवीज आपल्यालाच करायची आहे ही जाणिव नसेल का? कायम यांचे खिसे रिकामेच कसे?

मला त्यांना नक्की पगार किती आहे हे जाणून घ्यायचे आहे. इतक्या लोकांना पैसे वाटून समाधान विकत घेतलं आहे. म्हणून आपली एक उत्सुकता!

सुबोध भावेचा स्क्रीन प्रेझेन्स कसल्ला सॉलिड आहे. तो आला की बाकीचे कसे फिके पडतात त्याच्यापुढे!

मला त्यांना नक्की पगार किती आहे हे जाणून घ्यायचे आहे.>>> मला पण. आणि पहिलाच पगार वर दिवाळीचा घसघशीत बोनस सुद्धा Uhoh अण्णांना पैसे, घरभाडे, मोठ्या भावाचे कसले तरी कर्ज सगळं एक फटक्यात भागवले.

सुबोध भावेचा स्क्रीन प्रेझेन्स कसल्ला सॉलिड आहे. तो आला की बाकीचे कसे फिके पडतात त्याच्यापुढे!>>> +१

सुबोध भावेचा स्क्रीन प्रेझेन्स कसल्ला सॉलिड आहे. तो आला की बाकीचे कसे फिके पडतात त्याच्यापुढे!>>> +१०००००००००००००००००००० Happy

सुबोध भावेचा स्क्रीन प्रेझेन्स कसल्ला सॉलिड आहे. तो आला की बाकीचे कसे फिके पडतात त्याच्यापुढे!>>>>
+१०००००००००००००००००००००००००००००००००००००० Happy .

गेलाच शेवटी डिनरला ....(अरे हो नायतर यांची सिरीयल कशी चालेल) .त्या जयला बदडलं पाहीजे.नाही म्हणायचं ना स्पष्ट डिनर ला जायला.आता त्या रजनी ला माहीत नसेल पण याला तर माहीत आहे ना की स्वतःच लग्न झालय, तरी प्रोब्लेम मधे पडायची हौस .आतातर सासरेबुवांनी पाहिलय तिच्याबरोबर म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास .गोड गोड बायकोला गजरा देउन तेवढं पटवलय .जेव्हा सुभोध भावे घेउन जाईल ना आदितीला डेट्वर तेव्हा कळेल त्या जयला.

सुबोध भावेचा स्क्रीन प्रेझेन्स कसल्ला सॉलिड आहे. तो आला की बाकीचे कसे फिके पडतात त्याच्यापुढे!> >>> +१००० प्रत्यक्ष सुद्धा तो असाच आहे. मी मराठी पाउल पडते पुढे च्या एका एपिसोडला प्रेक्षक म्हणून गेले होते तिथे तो बाल गंधर्व सिनेमाचं प्रमोशन करायला आला होता. जितका छान दिसतो तितकाच तो हुशारही आहे. अतिशय विचारी, स्पष्ट आणि पारदर्शक. त्याच्यासमोर ती खूप छान खूप छान मुग्धा गोडसे अगदी फिकि म्हणजे नाहिशीच झाली होती.

जेव्हा सुभोध भावे घेउन जाईल ना आदितीला डेट्वर तेव्हा कळेल >> ते तर होणारच आहे मी.

जय खरंच कसला पेद्रा दाखवलाय, त्या रजनीने त्याचं पार माकड करून टाकलंय. उठ की उठ बस की बस.

रविवारातलं खंडोबाचं देऊळ सुभा चं वडिलोपार्जित आहे. आता खंडोबाचं नवरात्र बसलं २३ तारखेला की तो तिथे जातीने हजर असतो सगळं बघायला. लोकांशी छान बोलतो. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. Wink

जय खरंच कसला पेद्रा दाखवलाय, त्या रजनीने त्याचं पार माकड करून टाकलंय. उठ की उठ बस की बस पेद्रा जय नाही , काही स्त्रीया अश्या डायनामीक असतात. मला वाटत नेहा जोशी उर्फ रजनी अशी आहे. तिचा पोस्टर्बॉइज मधला रोल सुध्दा असाच खणखणीत आहे.

त्या रजनी चा रोल ज्याप्रकारे लिहिलाय तो मलाही आवडलाय .जास्त आगाउ अश्याप्रकारचा पण डायनामीक, स्मार्ट. तीने 'हवाहवाई' मधेही पार्थो गुप्ते च्या आईचा रोल खुप छान केलाय.

हा जय त्या दुसर्‍या मुलाला चांगला फडाफड बोलला बरं ते बरं प्रोफेशनल मॅटर होतं. ही रजनी हापिसात पर्सनल गोष्टींबदल बोलत असते तर तिथे मूग गिळून गप्प.

मी काय म्हणते जय आदितीने आपले एकमेकांवर प्रेम आहे असे अर्धसत्य सांगावे की...
म्हणजे बरेच एपिसोड कमी करता येतील...तेवढाच प्रेक्षकांचा त्रास कमी.. एक नोकरी नि एक लग्न यावर नाहीतरी किती सिरियल ताणणार?

Pages