बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्याकडचे पाहुणे कसे आहेत त्यावरुन सर्व मुलं खातील असे एखाद-दोन पदार्थ असू द्यात मेनूमधे.>>
मोस्टली सगळे मराठी आनी एक्दोन हि.न्दी भाषीक आहेत पण, हि समस्त मन्डळी अगदी घरची टाइप आहेत (नेहमी भेटणे, पॉटलक वैगरे) मुल सगळी शहाणी आहेत म्हणजे देसी जेवण चविने खाणारी..हिन्दी वाले मराठी जेवणाचे फॅन त्यामुळे कधी बोलवल की अरे पनिर वैगरे मत बना ना! तुमच गोडा मसाल्याच जेवण हव.. मधली आहेत.

जेवणाची वेळ दुपारी साडेबारा आहे... प.न्गत करणार आहोत.. अगदिच् महाराष्टार्यिन..(इथे मात्र माझे आणी नवर्‍याचे मत कन्फ्लिक्ट आहे म्हणजे हिन्दी वाल्या.न्ना ही कन्सेप्ट किति पचनी पडणार ते कुणास ठाउक. नवर्‍याकडे १००-१५० पान म्हणजे अगदी नित्याचिच गोश्ट आहे)

२-३ पन्गत होतिल ( काही ट्रिक सुचवा ,तसच रा.न्गोळिचा पसारा होइल त्यामुळे ते काढणार नाही पण तरी ताट सजवता येइल अस काही सुचवा)

रांगोळीसाठी फुले किंवा कार्डपेपरवर प्रिंटआउट किंवा वेळ असेल तर क्राफ्टवर्कची रांगोळी. हिंदीवाले काय गुरुद्वारात बुफे खात वाढले काय??? Wink Happy आवडेल की पंगत त्यांनापण. फक्त तुला अरेंज करायला जरा त्रास पडणार.

रांगोळी ऐवजी, बंगाली अल्पना (तांदुळच्या पिठाची पेस्ट वापरुन) काढता येइल... रांगोळी डिझाईन्स... कचरा...कचकच होणार नाही...

रांगोळी ऐवजी फुलं, आकर्षक आकाराची / रंगाची पानं यांची मांडलेल्या पानांभोवती सजावट करता येते. किंवा मोत्याची / प्लास्टिक मण्याची महिरप किंवा खोटी फुलेही लावतात ताटाभोवती. प्लास्टिक फुले - खरी पाने असेही कॉम्बो करतात. रांगोळीचे छाप मिळतात ते छाप ठराविक अंतरावर उमटवून सुध्दा आटोपशीर रांगोळी होऊ शकते. फुलांच्या पाकळ्यांचा पर्याय लहान मुलं असल्यामुळे सुचवत नाही. कार्डबोर्डची किंवा लोकरीची, विणलेली महिरपही वापरतात.

धन्यवाद लाजो,अकु,सीम.न्तीनी!
रा.न्गोळी/महिरप खोट्या फुला.न्ची करु अस म्हणतोय... म्हणजे एक प.न्गत झाली कि दुसरी बसवायला सोपे पडेल.
आता जेवणाचा अ.न्दाज बरोबर आला की झाल..सगळ नीट पार पडल की लिहते इथे.

प्राजक्ता मोठा बेत आहे. तिथे असते तर तुम्हाला मदतीला आले असते. शुभेच्छा. एव्ढी ,मोठी पंगत घरी बसवणार आहे का हॉल घेतला आहे? तिथे एखादी रं गीत तालीम घेता आली तर फायनल इवेंटला तुम्हाला जास्त त्रास होणार नाही.

धन्यवाद ! अहो जाहो नका करु अमा! नाही हॉल नाही घेतलाय! गणपती साठी घरीच बोलावलय. लिव्हिन्ग रुम मोठि आहे तशी एकावेळेस १५ -१६ जण बसु शकतिल.तसे २० एक लोक दरवेळि असतात पण डिश थेवते किन्वा जेवण असल तरी बफे स्टाइल असत.प.न्गत पहिल्या.न्दाच करणार आहोत आणि सेपरेट न बोलावता २ ग्रुप एकदम बोलावलेय.२ मैत्रिणि सकाळपासुन मदतिला येतायत.

सगळ्या.न्च्या सजेशन मुळे आणी गणराय क्रुपेने अगदी मस्त झाला कार्यक्र्म! सनई, प.न्गत , सामुहिक आरती, सगळ्या.न्चे पार.न्परिक पोषाख याने र.न्गत आणली.
फायनल बेत आणि प्रंमाण खालील वापरले.
बटाटा भा़जी:-- ३० बटाटे+ ३ कप मटार
पालक भाजी-- २ बीजेज च्या पालक बॅग्ज्स
मुग-भजी-- ५ कप मुगाची डाळ
मठ्ठा--- ५ एलबी दही
जिलेबी-- ८ पाउ.न्ड
कोशिबिर--१० काकड्या किसुन + दाण्याचा कुट+ दही
चटणी-- २ वाट्या दाणे+ १ वाटी खोबर
रिकोटा मोदक-- १६ ओउन्स रिकोटा +१ पिशवी मिल्क मावा पावडर
पोळ्या-- १०५ मागवल्या पण जेमतेम ८० लागल्या.
एकुण म.न्डळी २६ मोठे+ १५ मुल होती
( यातल उरल्यावर सगळ्या.न्ना टु गो ही देता आल )

प्राजक्ता, सहीच! इकडे प्रमाण देऊन चांगलं केलसं. हो, बीएसचा अंदाज बरोबर होता पोळ्यांचा. मायबोली खरच रॉक्स!

प्राजक्ता, सहीच! इकडे प्रमाण देऊन चांगलं केलसं.>> + १

प्राजक्ता, भाताचा काय पदार्थ होता? किती तांदूळ घेतलेस?

प्राजक्ता, भाताचा काय पदार्थ होता? किती तांदूळ घेतलेस?>>
अरे! भात वरण आणी पापड राहिलेच का!
पापड-- ई.न्ग्रो मधल एक खिचिया पॅक लागला ( एकात किती असतात याचा काही अ.न्दाज नाही पण ५० पापड असावे..न.न्तर १-२ मैत्रीणी.न्नी किचन ताब्यात घेवुन मला फक्त वाढायला ठेवले होते पापड्,भजी त्या.न्नीच केले होते.)
भात--- एकुण ६ कप भात दोन टप्प्यात लावला
वरण-- ह्याचा अ.न्दाज जरा जास्तच झाला २एल्बी वरण लावल होत जे बरच जास्त झाल पण स.न्डे आणी आस्वपु करणार्‍या १-२ जणी ना ते बर झाल(.तसही आमच्याकडे न.नतर टुगो च्या पिशव्या बा.न्धल्या जातातच!)
मसाला पान-३०
सत्यनारायण प्रसाद-- एक मोठा पाणी प्यायचा पेल्याच्या मापाने केला( हे आईच प्रमाण आहे)
यातल मठ्ठा,चटणी,कोशि.बिर्,भात बरोबर झाले, बाकी पदार्थ अजुन ६-७ मोठे आणी ३-४ लहाने धरुन पुरले असते.( हे मुद्दाम फ्युचर मधे कुणाला रेफ्र.न्स हवा असेल तर लिहुन ठेवलय कि.न्वा मलाही न.न्तर लागल तर डोकावता येइल)

माझाही एवढ्या प्रमाणात कु.न्किगचा पहिलाच अनुभव होता, भरपुर दमायला झाल पण, प्रच.न्ड मजा आली.
चिन्नु म्हणते ते बरोबर आहे, मायबोली खरच रॉक्स!
बीस चा पोळ्या.न्चा अ.न्दाजही बरोबर होता.
अकु,सीन्तिणीनी,लाजो! खोट्या फुला.न्ची माळ रा.न्गोळी म्हणून वापरली आनी मधे मधे खरी रा.न्गोळी पण काढली.
धन्यवाद सगळ्या.न्ना

सत्यनारायण प्रसाद-- एक मोठा पाणी प्यायचा पेल्याच्या मापाने केला( हे आईच प्रमाण आहे)>>>> एवढ्या माणसांसाठी किती पेले रवा घेतला?

देवकी सव्वा पेला फ्क्त! त्याचा चमचा चमचा हातात द्यायला भरपुर प्र्साद झाला, तो व्यवस्थित पुरला कारण बाकिचे गोड पदार्थ पण होते.( इथे पाणि प्यायचा ग्लास म्हणायच्य, फुलपात्र नाही, गैरसमज व्हायचा)
जर शिरा हाच गोड पदार्थ असेल तर मात्र एवढ्या माणशी नाही पुरणार!

ओह!

शालेच्या मैत्रिणी 25 वर्षानी भेटतो आहोत.
सूप, फिश फ्राई, पालक वड्या साग, फूलके, फिश करी , साधा भात , सोलकढी, सलाड असा बेत आहे.
या बरोबर गोड काय करावे? शाही टुकड़ा किंवा आईस क्रिम किंवा दुसरे काय करावे?

केक! शाळेतील एखादा ग्रुप फोटो/शाळेची बिल्डींग असलेला केक (बेकरीत फोटो दिला की केक करून देतात.) किंवा शाळेचा लोगो आयसिंग असलेला केक. सगळ्यांनी एकत्र येऊन केक जवळ फोटो वगैरे काढा, मजा येईल.

सीमंतिनी... मानल तुला... अगदी पेरफ़ेक्ट डीश सुचवली आहेस... हेच शोधत होते मी... थैंक्स ... खुप खुप थैंक्स..

फीश आहे तर दुधाचे पदार्थ टाळा! केक सही होईल.

नाहीतर नी चं ते किरिस्ताव शाकाहारी काहीतरी आहे बघ.. (दोदोल??). ते पण छान लागेल!

प्राजक्ता, खरचं कमाल आहे. खूप कौतुक वाटलं. पंगतीचे आणि पानाचे फोटो बघायची उत्सुकता वाटत आहे जमलं तर टाक ना इथे.

दोन फिश चे पदार्थ का? एक काहीतरी चिकन चे पण ठेवता येइल. आवड असेल तर. केक ची आयडिया मस्त.

Pages