बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

लंचच्या ऐवजी संध्याकाळी येणार आहेत पोराची मित्रमंडळी + आया. एकूण ८ लहान मुलं आणि पाच मोठे आहोत.

मश्रूम+क्रीम व्हाइट सॉस पास्ता, रेड सॉस पास्ता, मेयॉनीज बेस्ड सलाड, गार्लिक ब्रेड (हा विकतचा आणेन), मॄण्मयीच्या रेसेपीने पालक+पनीरचे ङोळे /कचोर्‍या आणि केक, आईसक्रीम, सरबत, चिप्स असा मेन्यू आहे.
अंदाज येत नाहीये पदार्थांच्या प्रमाणाचा.

दुसरा प्रश्ण - दुपारी २-३ वाजता सॉस करून ठेवले आणि संध्याकाळी सगळे यायच्या वेळी पास्ता शिजायला ठेवला तर चालेल ना? आधीपासून सॉसमध्ये टाकून ठेवला पास्ता तर चांगला नाही ना लागणार? आणि आधीपासुन शिजवून वेगळा ठेवायचा असेल तर किती आधी शिजवून ठेवू.

(नेमकी आज एक महत्वाची ऑफिशियल मिटींग आहे. मिटींग घरीच आहे. पण अर्धा दिवस त्यात जाईल. मदतीला कामवाली बाई आहे. ..तरी उगीचच जमेल ना वेळेत सगळं असं वाटायला लागलंय. Happy )
अजून ग्रोसरी राहिलिये.... पास्ता, चीझ हे सगळं बाजारातच आहे. भाज्या आल्या फक्त घरी. आणि डिस्पोजेबल ग्लास आणि प्लेटस राहिल्यात आणायच्या.

अल्पना, पास्ता, केक, आईस्क्रीम सगळंच यमीक्रीमी नाही का होणार? आयांसाठी. मुलांना फार आवडेलच. पाऊस असेल तिकडे तर सरबताऐवजी गरमगरम कॉर्न सूप?

मस्त मेन्यू.. दिल्लीतल्या उकाड्याचा जाम कंटाळा आला आहे...हे 3 महीने महाराष्ट्रात जाऊन राहावे असे वाटते मला दरवर्षी.

अल्पना दी, पास्ता सॉस तुम्ही आधी पासून करून ठेऊ शकता. वेळेवर पास्ता सॉस गरम करून त्यात नुकताच उकडलेला पास्ता टाका चाळणीतून कढईत. दोन पास्ता ऐवजी पिझ्झा पण करू शकता. सगळं सामान कामवाली कडून कापून घ्या आणि आयत्यावेळी फक्त बेक करा पिझ्झा बेसवर पसरवून. साधारण 3-4 मोठ्या पिझ्झा पुरतील असे वाटते.

पास्ता सॉस घरी केलेला जास्त आवडतो. Wink

मला अंदाज सांगा ना किती पास्ता लागेल? मिनी फ्युसिली आणि मिनी पेने पास्ता आणलाय. ३५० ग्रॅ. ची पाकिटं (प्रत्येकी २ पाकिटं आणून ठेवलियेत) आहेत. मला किती घ्यावा लागेल याचा अजिबात अंदाज येत नाहीये.

अल्पना लहान मुलांना प्रत्येकी साधारण ५० ग्रॅमचा पास्ता पुरावा.. सन फिस्टची पास्ताची पाकिटे येतात त्यात एका पाकिटात दोघे जण पोटभर खातात.. पण तू पास्ता बरोबर अजून पण पदार्थ करणार आहेस त्यामुळे तेव्हढे प्रमाण प्रत्येकी पुरेसे ठरेल.

अल्पना, जितकी माणसं आहेत तेवढे मूठ पास्ता शिजव. म्हणजे लहान मुलं कमी आणि मोठी माणसं जास्त खातील असा हिशोब बरोबर होईल. प्रत्येकी एक सर्विंग गृहीत धरलंय.

सन फिस्टची पास्ताची पाकिटे येतात त्यात एका पाकिटात दोघे जण पोटभर खातात>>>>>>>>... नाही मला तरी ते एकटीला एक लागत..... Happy

काल ३५० ग्रॅ मिनी फ्युसिली पास्ता व्हाइट सॉस मध्ये - पालक + मश्रुम घालून, ३५० ग्रॅ पेने वेज पास्ता रेड सॉसमध्ये, अर्धा डब्बा व्हेज मेयो वापरून वेजिटेबल सलाड, ३०० ग्रॅ पनीर + एक बटाटा आणि पालक घालून टिक्क्या, एक लोफ चीज गार्लिक ब्रेड, अर्धा किलो केक आणि आइसक्रिम इतकं सगळं आम्च्या कालच्या पार्टीला पुरून उरलं.
आम्ही मोठी ७ जण आणि ९ लहान मुलं होतो.

आउटडोअर गटग साठी मेन्यु सुचवा.७ जणी एक एक पदार्थ बनवून घेउन येणार आहेत. तर सात पदार्थ सुचवा. सध्या इथे थंडी चालु आहे. गटग दुपारी आहे तरीही गारवाच असेल. पदार्थ गरम करण्याची सोय नाही.

दुपारच्या थंडीतल्या गटगला....

सँडविच (गरम करावे लागणार नाहीत... पुदिना चटणी-काकडी-टोमॅटो-चीज वगैरे नेहमीचे यशस्वी प्रकार)
इडली-चटणी
आलू टिक्की / बटाटेवडे -सॉस / कटलेट्स
स्वीट (पेस्ट्रीपासून मँगो शिरा पर्यंत आवडीचे काहीही) - २ प्रकार. शक्यतो उचलून खाता येण्यासारखे... उदा. गुलाबजाम, बर्फी, पेढा, गोडाचे आप्पे इ. किंवा चॉकलेट्स् / चॉकलेट डेझर्ट
पास्ता सॅलड
फळांचे काप

For the outdoor gtg
You can also make variations on sandwiches - Roasted vegetables + humus, mozzarella cheese + tomatoes, cold cuts, omelettes , boiled egg slices + Parmesan cheese etc.

Use good ciabatta bread or panini rolls rather than plain white bread.

Bruschetta is another option - just make sure you bring the topping separately -

Pasta salad, quinoa salad all taste great at room temperature and are easy to transport .
Cold soba noodles tossed in a ginger-sesame sauce are delicious. Check out these links for ideas
http://www.thekitchn.com/soba-for-lunch-5-filling-noodle-salads-189860
http://www.chopchopmag.org/content/peanutty-sesame-noodles

Muffins, cupcakes, sconces are a great choice for dessert - they can be made ahead of time( or store bought) , will survive several hours without refrigeration, easy to transport and easy to serve. No utensils needed.

If someone can bring coffee / tea/ hot chocolate in thermos flasks, it will be a welcome addition at the end of a meal .

Have two ladies bring sandwiches, two ladies can bring two different salads, one can bring appetizers, one friend can take care of dessert and one family bring all beverages - hot and cold.

Have fun, take plenty of pictures and enjoy the outdoors ...

मेधा, अकु धन्यवाद प्रतिसादासाठी. गटग खरे तर ९ तारखेला करायचे होते पण घाईघाईत कालच उरकले. होस्ट आधी म्हणाली कि मेन्यु सुचव म्हणुन इथे येउन विचारले तर तीनेच मनाने मेन्यु ठरवला. पावभाजी, पुलाव, खीर, रायता. स्टार्टरसाठी व्हेज बॉल्स आणि व्हेज पफ्स ठरले होते तर व्हेज पफ्सवाली आलीच नाही Proud
बार्बेक्युवर पाव भाजले.

१४ मोठे आणि ४ लहान मुले उद्या येणार आहेत.
बेत
१) मिसळ
२) मटार करंजी
३) नारळी भात
ह्यातला फक्त नारळी भात मला करायचा आहे. किती वाट्या तांदूळ घेऊ?

~साक्षी.

आणि स्वीट काहीच नाहीये!
>> हेहे तसं नाही. स्वीट करणार आहे पण त्यात काय करावं असा प्रश्न नाही पडणार.
कोशिंबीर पण करायची आहे कशाची ते इथे लोकं सुचवतीलच असं अझ्यूम केलं मी Happy

केळं, सफरचंद, डाळिंबाच्या दाण्यांची दह्यातली कोशिंबीर किंवा अननसाचे रायते केले तर गोड + कोशिंबीर दोन्ही साध्य. मेन्यू मस्त आहे! सफरचंदाचे लोणचेही छान वाटेल.

कुरकुरीत भेंडी / परतलेल्या तोंडल्याच्या काचर्‍या / स्वीट-कॉर्न भुर्जी / काकडी-सिमला मिरची परतून / सिमला मिरचीची पीठ पेरून / गाजर-मटार परतून / श्रावण घेवड्याची दाण्याचे कूट ओले खोबरे कोथिंबीर घालून भाजी - अशा कोणत्याही भाज्या मस्त वाटतील.

अशा मेनूबरोबर गोड म्हणजे गुलाबजामच डोळ्यांसमोर येतात. Happy

उंधीयो बरोबर बिर्याणी (दोन्हीपण खूप सार्‍या भाज्या असलेले पदार्थ ) हेव्ही होईल अस वाटतं.
त्या ऐवजी तुप, जीरं आणि हिंग फोडणीची डाळ तांदळाची पातळ गुजराती खिचडी जास्त छान लागेल.
उंधीयो असेल तर बाकीच्या भाज्या जरा कमीच खाल्ल्या जातात. रायत्यामधे पालक रायता,बुंदी रायता, पुदीना रायता किंवा फ्रुट रायता. नाहीतर नेहमीचं कचुंबर रायता. Happy
गोडात बासुंदी नाहीतर श्रीखंड. Happy

उंधियो, जिरा राईस, टोमॅटो सार, पोळ्या, सुरळीची वडी/अळू वडी, सुतरफेणी/आम्रखंड. ?? हे कसे वाटेल?

श्रीखंडच करायचा माझा प्लॅन आहे. आता अकु ला हवे आहेत तर थोडे गुलाबजाम पण करीन म्हणते. Happy
बिर्याणी कुठे म्हटले मी सीमा? साधा सौम्य चवीचा पुलावच आहे.

सुतरफेणी नक्की कशी खातात? इंग्रोत चांगली मिळते का? मी खूप लहानपणी खाल्लेली आठवते. पण चव नाही आठवत. कुठल्या स्पेसिफिक ब्रँडची चांगली मिलत असेल तर आणीन ती पण.

सर्वांना धन्यवाद!

Pages