चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>मोदकांच ताट समोर दिसत असूनही फक्त १ तुकडा घेतला >>
केदार तुम्ही खरच ग्रेट आहात.....हे मला खरच नाही जमणार अरेरे

>> अस काहीही नाहिये. जिभेवर एकदा ताबा मिळवला की झाल आणि तो तुमचा तुम्हालाच मिळवायचा आहे . आपल शरीर खूप शहाण असत फक्त सवयीच गुलाम असत त्यामुळे चांगल्या सवयी लावण महत्त्वाच.
अतिशयोक्ती नाही , खरच सांगतो "जर केदार जाधव चहा सोडू शकतो तर कुणीही काहीही सवय लावू शकतो"

समोर मोदक वा खीर आली तर विचार करा की तुम्ही का खाताय ?
प्रसाद म्हणून खात असाल तर १ चमचा पुरेसा आहे . कधीतरी केला जातो म्हणून खात असाल तरी १ मोदक , १ वाटी खीर पुरेशी आहे .
खरतर आज काल सगळे पदार्थ १२ महिने मिळतात त्यामुळे दिवाळी आहे म्हणून करंज्या खाल्ल्या यालाही फारसा अर्थ नाही

त्यातूनही जर तुम्हाला खायची इच्छा अनावर झाली तर १ तास जास्त व्यायाम करा . सिंहगडला ट्रेक करून गेला आणि मग ४ प्लेट भजी खाली तर चालेल , पण गाडीन जाऊन एका जागी बसून हाणली तर मात्र संपल Happy

धन्यवाद सगळ्यांचे. केदारने म्हटल्याप्रमाणे ओव्हरनाईट बदल होऊ शकणार नाहीत पण बेबी स्टेप्स घेते आहे. जसं- midnight snacking न करणे, रोज ४५ मिनिटे व्यायाम, रोज एक फळ खाणे. हळूहळू बाकीच्या गोष्टीही जमतील Happy

३/९/१४
१)व्यायाम : ०
२)फळे/भाज्या/सॅलडः ०
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :०
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १/२
७)साखर ३ चमचे इ. : ०... .....२.५ /१०

१३३.५ / १७०

आज बर्‍यापैकी जमले तरी ९/१०

१)व्यायाम : ४
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे इ. : १

३/९/१४

८/१०

१)व्यायाम : ३
२)फळे/भाज्या/सॅलडः ०
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे : १
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे इ. : १

०३-०९ ७/१०

१)व्यायाम : २ (३० मिनिट वॉक केला पण सुर्यनमस्कार नाही)
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे इ. : ० (घरी बनवलेल्या सुपारी एवडया लाडवाचा ३/४ भाग खाल्ला...पण खुप गोड नव्हता Happy )

केदार नाही म्हनण जमायला लागलय .. मैत्रिनी कडे जेवायला जायच्या आधीच तेलकट/गोड काही नको म्हनुण कळवुन टाकल Happy तिनेही आग्रह नाही केला आणि तीही inspire झाली आहे Happy

३/९/१४
१)व्यायाम : ६० मिनिटे +१ मैल चालणे
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे इ. : १
एकूण १० /१०
किती मस्त वाटतंय १० /१० लिहायला Happy

माझे मार्क २/९/२०१३ = २/१०

व्यायाम - ०
फळ - १
प्रोटीन -१
रात्रीच जेवण ८ वाजता ०
बाहेरच खाण -०
साखर ०
बेकरी - ०

माझे मार्क ३/९/२०१३ = ४/१०

व्यायाम - ०
फळ - १
प्रोटीन -०
रात्रीच जेवण ८ वाजता १
बाहेरच खाण -१
साखर ०
बेकरी - १

ज्याची भीती होती तेच झालं....
गौरींच्या नावाखाली सगळं बिघडलय... Sad

४/९/१४
१)व्यायाम : ०
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :०
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १/२
७)साखर ३ चमचे इ. : ०... .....३.५ /१०

१३७ / १८०

सस्मिता .. मी आधी वजन केलं नव्हतं त्यामुळे एक्झॉक्ट सांगु शकत नाही ..
बारीक दिसतेय असं फेबु फोटोवरुन कॉम्प्लिमेंट्स मिळलेत.. Wink इन फॅक्ट मला ही असं वाटतयं

४/९/१४

९/१०

१)व्यायाम : ४
२)फळे/भाज्या/सॅलडः ०
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे इ. : १

४/९/१४ ७/१०
१)व्यायाम : २ (३० मिनीट वॉक केला)
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे इ. : ०

आता next target आहे व्यायामामधे ४ पेकी ४ Happy next week मधे ते achieve करनारच ....नाही झाल तर कान पकडाच सगळे जण Proud

४/९/१४
१)व्यायाम : ६० मिनिटे
२)फळे/भाज्या/सॅलडः १/२ (एकच फळ खाल्लं)
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे इ. : १
एकूण- ९ १\२ /१०

काल सगळ व्यवस्थित जमल!!!

४/९/१४ ७/१०
१)व्यायाम : ४ (४५ व्यायाम)
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे इ. : १

माझे पहिल्यान्दा १०/१० Happy

एकुण गुणः १२२/१६०

कालचे मार्क : ६/१०
५/९/२०१४

१)व्यायाम : २ ( चालले फक्त ३० मिन्टं )
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :०
५) बाहेरचे खाणे :०
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे इ. : १

५/९/२०१४
४/ १०

१)व्यायाम : ०
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : ०
७)साखर ३ चमचे इ. : ०

५/९/१४
१)व्यायाम : २ (१५ मिनिटेपण जलद)
२)फळे/भाज्या/सॅलडः ०
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १/२
७)साखर ३ चमचे इ. : ०
एकूण- ५.५ /१०..............१४२.५ / १९०

६/९/१४
१)व्यायाम : १
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :०
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १/२
७)साखर ३ चमचे इ. : ०
एकूण- ४.५ /१०..............१४७ / २००

९/४ : ९/१०
९/५ : ४/१० - भस्म्या झाला होता .. नुस्ता खाल्लं थोडं थोडं !

Pages