आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की
आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .
आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .
आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .
कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .
गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .
हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ?
त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?
लोकहो ,
आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया
खाली आणखी काही पॉईंट अॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया
आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.
कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू
रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .
१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही
२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे
जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण
त्यामुळे आता रोजचे गुण १०.
म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अॅड करत जाईन .
काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल
आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा .
31 August, 2014 - 12:59
१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०
१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल
४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस
केदार... एकदम मान्य. पण इथे
केदार... एकदम मान्य. पण इथे एकत्र लोकांचा जो डेटाबेस बनतोय ना तो खुपच महत्वाचा आहे. याचे बरेच पॅरामिटर्स असणार. एकदम मान्य. पण तुमच्या मार्कांची विभागणी खुपच चांगली झालीय. आणि लोक रोजचे मार्क मोजताहेत. म्हणुन कम्युलेटीव्हली हे सगळ अॅव्हरेज होतच जाणार आहे. फक्त जास्त दिवस झाले कि एरर कमी होत जाइल. आणि टोटल मध्ये २०-२५ % डेव्हीएशन आल तरी एखादा पॅटर्न मिळुन जाइल असे वाटते.
केदार माझा ६८ हा प्लॅटू आहेच
केदार माझा ६८ हा प्लॅटू आहेच आहे. इथेच गाडी अडकते नेहमी.
फॅट लॉस होतोय चांगला, वेट लॉस होत नाही. जोडीला व्यायाम सुरू असल्याने मसल मास वाढत असेल तर वेट लॉस दिसणारच नाही. चेक करायला हवं.
ओके निपा
ओके निपा
मला माझ्या ट्रेनरने
मला माझ्या ट्रेनरने सांगितलेले, वजनाकडे बघु नका.
इंचेस कडे पहा. आणि एनर्जी लेवल बघा. ते महत्वाचे.
इंचेस पाहा, एनर्जी लेवल
इंचेस पाहा, एनर्जी लेवल पाहा... यस्स्स!! डिट्टो!!!
माझे अपडेट्स फॉर १४/०८/२७
९/१०
वर्षु इंच लॉस चांगला
वर्षु इंच लॉस चांगला आहे.
माझ्याकडे एक फॉर्मल पँट आहे पण ती बसत नव्हती. आता बसतेय.
अजून थोड्या दिवसांनी कंफर्टेबली बसेल. तोवर पावसाळा पण कमी होईल
दक्षिणा, तू बी एम आय कडे बघून
दक्षिणा, तू बी एम आय कडे बघून वजन ठरवतेयस का?
बी एम आय फ्रेम(चण) लक्षात घेत नाही.
फ्रेमनुसार बी एम आय चा चार्ट उपलब्ध असल्यास त्यात वजन पडताळून पहा.
म्हणजे काय तर एखादी पाच फुटाची आणि ५० किलोची मुलगी जर स्मॉल फ्रेमची असेल तर दोन ़कि ओवरवेट, मेडियम फ्रेमची असेल तर अगदी बरोबर आणि लार्ज फ्रेमची असेल तर दोन कि. ओवरवेट असेल.
फ्रेम कोणती हे ठरवण्याचे अनेक क्राय्टेरिया आहेत.
आपल्याला आपली फ्रेम माहित असतेच.
एक सोपी पण रफ पद्धत म्हणजे मनगटाच्या लहानात लहान भागाभोवती दुसर्या हाताची बोटे गुंडाळायची.
अंगठ्यावर मधले बोट क्रॉस होऊन पुढे गेले तर स्मॉल फ्रेम, नुसतच टच केलं तर मेडिअम फ्रेम आणि खूप अंतर राहिलं तर लार्ज फ्रेम.
साती तु सांगितलेलं करून
साती तु सांगितलेलं करून पाहिलं. माझं बोट अंगठ्यावरून क्रॉस होतंय. पण माझी फ्रेम बर्यापैकी अॅथलिट आहे.
आता माझं वजन ६८ किलो असून कुणाला गेस करायला सांगितलं तर ६०-६२ असेल असं म्हणतात. (आडवं हाड असणं म्हणजे काय? :अओ:) तसं काहीतरी आहे माझं. उंची अॅव्हरेजच आहे, पण चण हेल्दी आहे.
आणि साती मला बी एम आय, बी एम
आणि साती मला बी एम आय, बी एम आर चेक करायला हवाय. त्यावर मी अजून किती वजन कमी करायचं ते ठरवणार
पण फॅट लॉस ३% करणार तो करणारच. त्यात अपेक्षेपेक्षा कमी किंवा जास्त वेट लॉस झाला तरिही मला चालणार आहे. 
माझा अपडेट - ८/२८ एकुण - ८/१०
माझा अपडेट - ८/२८
एकुण - ८/१० - समोसा चाट खाल्ला!
फॅट लॉस ३% करणार तो करणारच
फॅट लॉस ३% करणार तो करणारच <<< वजनामधे नेमक फॅट किती हे कस कळणार? आणि फॅट लॉस हे टारगेट ठेवण्यासाठी काय करावे लागत? म्हणजे स्पेसीफीक व्यायाम वैगरे काय चेन्जेस करावे लागतील?
वजनामधे नेमक फॅट किती हे कस
वजनामधे नेमक फॅट किती हे कस कळणार>>> बहुतेक कंडक्टीव्हीटीवर ठरवतात.
२८/०८/२०१४ ८/१० १)व्यायाम :
२८/०८/२०१४
८/१०
१)व्यायाम : ४
२)फळे/भाज्या/सॅलडः ०
३)प्रोटिन : १
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे : १
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे : ०
२८/०८/२०१४ १)व्यायाम : ४ (
२८/०८/२०१४
१)व्यायाम : ४ ( कमीच होतोय)
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन : १
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे : १
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : ०
७)साखर ३ चमचे : ० ..... ८ /१०
९७.५/११०
२८-०८-१४ व्यायाम २ फळे ० बाकी
२८-०८-१४
व्यायाम २
फळे ०
बाकी सगळे गुण मिळाले.
एकूण ७/१०.
फळं खायची खरंच इच्छा होत नाहीये.
साती , फळं खायची इच्छा होत
साती ,
फळं खायची इच्छा होत नसेल तर काही दिवस बंद करा.काकडी,टॉमेटो,बीट हे आहारात ठेवा.कारण कंटाळून खाल्लं की त्याचा काही उपयोग नसतो .काही दिवसांनी फळे परत चालू करा.
Aditi, sorry for writing in
Aditi,
sorry for writing in english. our body is made of lot of elements like Water, Muscle, Fat etc. every element has its limit which is ideal to maintain. there are few machines which can calculate ech level of this element in body.
weight loss cannot be the only aim. because weight may reduce on the the machine but we never know if we are loosing muscles. which is not good. so with proper diet and workout we need to focus on losing fat% .
work out builds muscle mass which is good for body. and when muscle mass goes up weight also goes up but dont bother.
weigh is only a no. rest reducing fat% and building muscle mass is important.
to lose fat% lot of fiber intake helps. fiber in the sense lot of salad. cucumber, carrt, tomato, cabbage with lemon or any tasty sprinkle. fruit like orange also has fiber.
काकडी टोमॅटो चालू आहे पण फळे
काकडी टोमॅटो चालू आहे पण फळे नाहीत.
२४ /०८ व्यायामाला सुट्टी -४
२४ /०८ व्यायामाला सुट्टी -४ ५/१०
२५/०८ ६० min व्यायाम १० /१०
२६/०८ ६० min व्यायाम ८/१०
२७/०८ ७५ min व्यायाम ९/१०
२८/०८ ६० min व्यायाम ९ /१०
माझे सगळे मार्क "२ फळे / फळभाज्या आणि २ वाट्या मोड , डाळी , उसळी" यामुळे जातात. आजवर जेवताना मी पोट तुडूंब भरेस्तोवर जेवायचे पण आता २ चपात्या च्या वर जेवत नाही. आणि तेवढं जेवण पुरतंय. थन्क्स टू चला वजन कमी करूया. केदार मी बाकी गोष्टी पण पाळायचा प्रयत्न करेन.
आज २ तास मॉल मधे काढल्यावर
आज २ तास मॉल मधे काढल्यावर व्यायाम करायचा कंटाळा आलाय. आज ४/१०
१)व्यायाम : ०
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन : १
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे : ०
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : ०
७)साखर ३ चमचे : १
28/8 5/10
28/8
5/10
२९/०८/२०१४ ७/१० १)व्यायाम :
२९/०८/२०१४
७/१०
१)व्यायाम : ४
२)फळे/भाज्या/सॅलडः ०
३)प्रोटिन : १
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे : १
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : ०
७)साखर ३ चमचे : ०
नेहमीपेक्षा दहा मिनीटे कमी
नेहमीपेक्षा दहा मिनीटे कमी चालले.
फळे नाहीत.
२९-०८-१४ : ७/१०
८/२९ : उपवासामुळे साबुदाणा
८/२९ :
उपवासामुळे साबुदाणा खिचडी , फळे फक्त.. पण व्यायाम केला १ तास
एकुण - ८/१०
२९/०८/२०१४ १)व्यायाम : ४ (
२९/०८/२०१४
१)व्यायाम : ४ ( कमीच होतोय-२५मिनिटे वॉक)
२)फळे/भाज्या/सॅलडः ०
३)प्रोटिन :०
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे : १
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : ०
७)साखर ३ चमचे : ० ..... ६ /१०
१०३.५ / १२०
गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर
गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर इथे सामिल व्हावं असा विचार आहे.
माझं टार्गेट- इंचेस कमी करणं, फ्लेसिबिलिटी वाढवणं, जास्त फिटनेस मिळवणं
Problem areas- ब्रेकफास्ट स्किप होतो, गोडाची आवड असल्यामुळे गोड खूप खाल्लं जातं, फळ खाण्याची आवड अजिबात नसल्यामुळे फळं खाल्ली जात नाहीत, संध्याकाळी जंक फूड खाल्लं जातं, रात्रीचं जेवण उशीरा होतं व त्यानंतर मिडनाईट snacking मध्ये केक, आईस्क्रीम वगैरे गोड खाल्लं जातं. आणि व्यायामाचा कंटाळा
वेदिका तु ह्या धाग्यासाठी
वेदिका तु ह्या धाग्यासाठी पेरफेक्ट कॅन्डीडेट आहेस
वेदिका , लौकरात लौकर जॉइन हो
वेदिका , लौकरात लौकर जॉइन हो इथे...
माझे अपडेट्स फॉर १४/ ०८/ २८
५/१०
बॉडी टू टायर्ड .. म्हणून ब्रेक घेतला व्यायामातून..
आज सर्व कसर भरून काढणार..
२९/०८/२०१४ १)व्यायाम : १ (
२९/०८/२०१४
१)व्यायाम : १ ( फक्त १० मिनिटे केला आज )
२)फळे/भाज्या/सॅलडः ०
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे : १
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे : १ ..... ६ /१०
आजचा स्कोर मायनस मधे घ्यावा
आजचा स्कोर मायनस मधे घ्यावा का ??:((
Pages