बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुपरमॉम, इकडे मायक्रोवेव्ह मधली सुरळीची वडी एकदा ट्राय करून पहा. फारच सोपी आणि कमी वेळखाऊ आहे. फक्त तुम्हाला लागतील तशा बॅचेस कराव्या लागतील. मी तिचं ओरिजिनल प्रमाण, वेळ वगैरेमध्ये फेरफार करत नाही. अजून एक विकेंड आहे तेव्हा ट्राय मारा. Happy

माझी मैत्रीण दर वर्षी हा मेन्यू ठेवते.
मुगाची उसळ , वरुन फरसाण , बटाटा , टोमॅटो , कोथिंबीर इ. जोडीला तिखटमिठाच्या पुर्‍या ऑर्डर करते.
चटणी आणि पल्पचे फ्रुट सॅलड. गेली चार वर्ष हाच मेन्यू सेट आहे. लोकांना आवडतो पण.
दुसर्‍या मैत्रिणीकडे इतकेच लोक येतात. तिच्याकडे साबुदाणा खिचडी, कचोरी आणि बुंदीचा लाडू किंवा
उपमा, कचोरी आणि गुलाबजाम.

मी मागच्या वर्षी व्हेज बिर्याणी आणि गाजर हलवा केला होता, सोबत बुंदी रायता. पब्लिकला आवडलेला मेन्यु. व्हेज बिर्याणीमधे अर्थातच कांदा लसूण होता. हलवा प्रसाद मानला Happy

फक्त ३५ लोकांचा अंदाज चुकेल याची जरा भीती वाटतेय.>>>>>>>>>>> तु सुपरमॉम आहेस गं...तुला नक्की जमेल...बेस्ट ऑफ लक

सुमॉ, मी यावर्षी लाडू, चिवडा आणि इडली सांबर असा बेत ठेवलाय. लाडू फक्त घरी करणार बाकी सगळे बाहेरुन ऑर्डर केले आहे.
उसळ केली तर त्याबरोबर ब्रेड वगैरे नाही का ठेवायला लागणार? अशीच शंका आली.

सुपरमॉम,

१. पुलाव, टोमॅटो सार, काजूकतली
२. मसालेभात, गुजराती कढी/ काकडीची चक्क्यातली कोशिंबीर, उकडीचा मोदक
३. उपमा, ढोकळा/ कचोरी, मोतीचुराचा लाडू
४. गोड शिरा, बटाटेवडे.

यात काजूकतली, मोतीचुराचा लाडू, मोदक, बटाटेवडे आऊटसोर्स करता येतील असं गृहित धरलं आहे.

१. साबुदाणा वडे - चटणी, खोबर्‍याच्या वड्या / बर्फी / शिरा, मठ्ठा / लस्सी
२. भाज्या घालून मूद पाडून उपमा - वर शेव, कोरडे खोबरे-कोथिंबीर-लिंबाची फोड, चटणी/ काकडी रायते, जिलेबी, ढोकळा
३. पुरी-भाजी (भाजी नेहमीची बटाट्याची उकडून किंवा इतर मिक्स भाजीचे प्रकार), बासुंदी, पुलाव, रायते.
४. दही-वडे, उपमा, गुलाबजाम

धन्यवाद मैत्रिणींनो!

शेवटी हा मेनू फायनल केलाय.

पहिला दिवस- इडली चटणी, कचोरी, उकडीचे मोदक नि काजूकतली
दुसरा दिवस- बटाटेवडे, कचोरी,मोदक नि शिरा (डी जे स्टाईल)

उकडीचा मोदक नावापुरता एकच देणार असल्याने दुसरे गोड ठेवले आहे.

तुम्हा सगळ्यांच्या टिप्स चा खूप उपयोग झाला.

सुमॉ, बटाटेवडे आणि कचोरी असं दोन्ही तळकट ठेवण्याऐवजी रगडापॅटीस किंवा भाताचा प्रकार चालणार असेल तर बिसिबेळेभात - दहीबुंदी असलं काही नाही का चालणार?

मृ, अग त्या स्वाद च्या अगदी चिमुकल्या कचोर्‍या येतात ना, त्या आहेत. आपली खस्ता कचोरी नाय. (इतक्या खस्ता नाही ग काढता येत मला Happy

अन त्या दिवशी सोबत मुगाची उसळ किंवा मसालेभात करायचा छुपा प्लॅन आहेच. पण पूजेची तयारी, इतर कामं यात जमलं नाही तर नवर्‍याच्या अपेक्षा कशाला वाढवून ठेवायच्या- म्हणून आधीपासूनच 'डिक्लेअर' करणार नाहीय Happy

>> इतर कामं यात जमलं नाही तर नवर्‍याच्या अपेक्षा कशाला वाढवून ठेवायच्या- म्हणून आधीपासूनच 'डिक्लेअर' करणार नाहीय <<<

हे अगदी बरोबर Happy

गणपती साठी ५ भाज्या करायाच्या आहेत.. पारंपारिक

मटार बटाटा
कोबी
पीठ पेरुन पडवळ
भोपळी मिर्ची ( साधी फोडणी करुन)

अजुन एक रस भाजी सुचवा

अळूची पातळ भाजी, पालकाची थोडा आंबटचुका घालून पातळभाजी
रसभाज्यांमध्ये लाल भोपळ्याची बाकर भाजी, फ्लॉवर + स्वीट कॉर्न ची रस्सा भाजीही छान लागते (पण माहीती नाही की सणासुदीला करतात का)

मटकीची उसळ, डाळींब्यांची उसळ, फ्लॉवर बटाटा रस्सा, तोंडलीची रस्साभाजी, वांग्याची पंचामृती भाजी, दोडक्याचा रस्सा

यावर्षी गणपती दर्शन आरती आणी सत्यनारायण पुजा असा दुपारी कार्यक्रम ठेवलाय ..प.न्गत करायची असा विचार आहे..
२६ मोठे आनी १८ मुल आहेत.
खालचा मेनु कसा आहे? प्लिज एल्बी मधे प्रमाण सुचवा
चटणी
कोशिबिर
साध-वरण भात
बटाटा-मटार कोरडि भाजी
पालकाची भाजी
पापड
मुग भजि( बाहेरुन)
कढि(बाहेरुन)
पोळ्या(बाहेरुन)
गुलाबजाम्(विकत),मोदक(रिकोटाचे)
सत्यनारायण शिरा(हातावर द्रोणातदेणार)
मसाला पान

चटणी - २ पौंड ( साधारण १ किलो)
कोशिबिर - ४ पौंड (साधारण १.७५ - २ किलो)
साध-वरण भात - २.५ किलो तांदूळ. (बहुतेक!! तज्ञ लोकांना विचारा)
बटाटा-मटार कोरडि भाजी- माणशी एक बटाटा घेऊन करते. मटार हिशेबात घेत नाही.
पालकाची भाजी - ५-६ पौंड
पापड - ७०-८० नग पापड
मुग भजि( बाहेरुन) - ४ पौंड
कढि(बाहेरुन) - ५ लिटर ताकाची
पोळ्या(बाहेरुन) - १५० नग
गुलाबजाम्(विकत),मोदक(रिकोटाचे) - १ पौंड मध्ये १२ गुलाबजाम धरले तर १०-११ पौंड लागेल.
सत्यनारायण शिरा(हातावर द्रोणातदेणार) - ४ पौंड
मसाला पान - ५० नग

२६ मोठे आनी १८ मुल आहेत.>>>पोळ्या(बाहेरुन) - १५० नग>>> जरा जास्त वाटतायत. १००-११० पुरावेत.

माझ्याकडे गेल्या रविवारी ४० जण होते मोठे लहान सगळे धरून (लहान पण आता हायस्कूल/मिडल स्कूल इतपत मोठे आहेत तेव्हा त्यांना गदीच लिंबूटिंबू धरून चालत नाही). मी ६० रोटी ऑर्डर केल्या होत्या आणी त्या पुरून उरल्या.

मेन्यू मध्ये मसाला भात इ काही नाही. साधे वरण भात फार कमी खाल्ला जातो. (तो अंदाज २.५ किलो जास्त वाटतो मला म्हणून इतरांना विचार). पोळी (६ इंची पातळ पोळी) मोठ्या लोकांच्या माणशी ४ आणि लहान लोकांच्या माणशी २ प्रमाणे हिशेब करावा लागेल. पोळी जर वेगळी असेल तर अर्थात कमी मागवल्या तरी चालतील.

मोठ्या लोकांच्या माणशी ४ आणि लहान लोकांच्या माणशी २ प्रमाणे हिशेब करावा लागेल. >>> तू मच. २ भाज्या, भात, गोड, sides एवढ सगळ असताना पोळ्या जास्त लागत नाहीत. १०० ऑर्डर केल्या तरी उरतील.

मी कन्फ्युज आहे!
माझी पोळेवाली फुलका साईज पोळ्या देते..पातळ असतात.
कढी एवजी मसाला ताक( मठ्ठा ) योग्य होइल का?

अरेरे माझ्या पोस्टीने कन्फ्युज नको होवू. आईकडे एक रुचिरा पुस्तक होते. त्यात मागे सगळे अंदाज दिलेले होते. अगदीच अडले तर ते बघ. ते अचूक असत. आईने अख्खा संसार त्यावर निभावला.
१०० पोळ्या मागव. (अगदी लोक आधाशी असावे असे जेवले तर पिटाळ कार ट्रेडर जो मध्ये Wink )

मुलं बटाट्याची भाजी / पोळ्या खातील का? माझ्या माहितीतली बरीच देशी मुलं ( २ ते १२ वर्षे एस्पेशली) खाण्याच्या बाबतीत फार पिकी असतात. नेहेमीच्या सवयीचे सोडून इतर पदार्थ पटकन / पुरेसे खात नाहीत.
त्यात काहींचे पालक सुद्धा पास्ता नाहीये का ? दही भात का नाही ? टाइप नेमके त्यावेळेस नसलेल्या पदार्थांसाठी हटून बसतात.

तुमच्याकडचे पाहुणे कसे आहेत त्यावरुन सर्व मुलं खातील असे एखाद-दोन पदार्थ असू द्यात मेनूमधे.

Pages