तोंडली

तोंडल्याचा रस्सा

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तोंडली २ कप

वाटणासाठी
- खोबरं १ वाटी
- कडीपत्ता १०-१२ पानं
- चिंच ( आवडीप्रमाणे)
- गुळ
- कोथिंबीर
- गोडा मसाला
- मीठ

क्रमवार पाककृती: 

१. प्रथम एका तोंडल्यांचे २ काप अशी तोंडली चिरून घ्या
२. प्रेशर कुकरमधे चिरलेली तोंडली आणी १/४ कप पाणी घालून शिजवून घ्या.
३. वाटणासाठी दिलेले सगळे साहित्य मिक्सरमधून वाटून घ्या.
४. पातेल्यात फोडणी करून त्यात जीरं, हळद लाल तिखट घालून त्यात वाटलेला मसाला घाला.
५. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्या.
६. नंतर त्यात तोंडली घाला आणी जरूरी पुरते पाणी घालून उकळा.
७. भाजी एकजीव झाली की त्यात चिरलेली कोथिंबीर घाला.

वाढणी/प्रमाण: 
२ माणसे
अधिक टिपा: 

१. तोंडल्यात शिजवताना जास्त पाणी घालू नये.
२. चिंच नसेल तर आमचूर पावडर घाला.
३. तिखट हवं असेल तर वाटताना हिरवी मिरची घालू शकता.
४. कांदा तेलावर परतून त्यात मसाला व तोंडली घालून पण भाजी छान होते.

गरम गरम भाकरी/पोळीशी खायला छान लागते.
पार्टीसाठी ग्रेव्हीवाली भाजी सगळ्यांना आवडते

Tondali.jpg

माहितीचा स्रोत: 
माझी नणंद

तोंडलीची रस्सा भाजी

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तोंडली, फोडणीचे साहित्य, तिखट, गोडा मसाला, शेंगदाण्याच कुट, गुळ, मिठ

क्रमवार पाककृती: 

तोंडलीचे ४ तुकडे होतील अश्या पद्धतीने कापावी. म्हणजे मधुन एक काप आणि मग त्या २ कापांचे पुन्हा २ काप.
कुकरमधे उकडुन घ्यावी. अगदी फार जास्त शिजवु नये.
कढईत फोडणी करुन तोंडली टाकावी, जरा परतुन घ्यावी. मग त्यात तिखट, गोडा मसाला घालावा. थोड पाणी घालाव. एक वाफ काढल्यावर कुट, चवीनुसार मिठ व गुळ घालावा. अजुन १ वाफ काढावी.
भाजी तयार. गरम गरम पोळ्यांबरोबर खावी.

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे
अधिक टिपा: 

वेळ असेल तर बाहेर वाफेवरही शिजवु शकतो.

माहितीचा स्रोत: 
आई