चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

८/२७ :

व्यायाम ४/४
प्रोटिन १/१ - फक्त दही... रोज दाल बनवतं नाही
फळे, भाज्या १/१
बाहेरचे खाणे नाही ०/१ - कलीगने घरी बनवलेली तिखट शेव खाल्ली
बेकरी प्रॉडक्ट्स नाही १/१
जेवण आणि झोप अंतर १/१
साखर २ टीस्पून ०/१
एकुण - ८/१०

२७/०८/२०१४
१)व्यायाम : ४ ( १५ मिनिटे चालणे,१५ मिनिटे योगासने + प्राणायाम)
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन : १
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे : १
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे (कॅडबरीचे २ तुकडे): १ ............................१०./१०

एकूण ८९.५०./ १००

माझा व्यायाम बराच कमी पडतो.वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.आज फळ खाण्याचा कंटाळा आला होता .या धाग्यामुळे टाळला.केदार,धन्यवाद!

my updates for 14/08/26

10/10

Dakhu,Leslie sansone rocks!!

Yes Varshu,

Leslie Sansone really rocks. my friend gave me 2 CDs of her.
5 days slim down and 5 miles walk at home. both are amazing.

२७/०८/२०१४

६/१०

१)व्यायाम : ०
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन : १
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे : १
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे : १

आज माझ्या डाएट +एक्सरसाईजला एक महिना पूर्ण झाला.
वजन दिड किलो कमी झालंय.
पण माझ्या वजनात सहज एक ते दिड किलो फरक पडतो. केवळ सकाळ ते संध्याकाळ इतक्या वेळात.
त्यामुळे अजून दोन कि कमी झालं तरच खरं.
मात्र फॅट रिडिस्ट्रीब्यूशन झालंय.
चेहरा बारिक दिसतोय.
सहा महिन्यापूर्विचा ड्रेस अंगात शिरत नव्हता तो आज नीट घालून फिरतेय.

वर्षू नील , अदिति , स्वाती२ , देवकी शाब्बास Happy > ८०%

अनिरूद्ध , साती , सीमांतिनी , पाखरू , खारूताई , सामान्य वाचक चांगल करताय , आणखी थोडे प्रयत्न वाढवा . (~७५%)

मनीशा अन स्मिता , कम ऑन , टाईटन अप .

चनस , पौर्णिमा , दक्षिणा , चांगली सुरूवात आहे .

१. केदार जाधव ८८/१००
२ सामान्य वाचक ६५/९०
३ अदिति ८६/१००
४ अनिरूध्द ६८/९०
५ साती ७३/१००
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ३७/५०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील ९२/१००
१० देवकी ८९.५/१००
११ smitaklshripad ४५/९०
१२ पाखरू ६४/९०
१३ खारूताई ४९/६०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस १६/२०

सातीजी ७३ % आणि वजन किती % कमी झाले ते लिहा ना प्लिज.... १.५ किलो किती किलोत कमी ( भोचक पणा नाहिय ना हा Uhoh ) म्हणजे एक डाटा पॉइंट मिळेल.....

इतर लोक , ज्यानी अजून लिहायला सुरू केल नाहीये त्यानी आत्ताही सुरू केल तरी चालेल . आपल्याला बरच लांब जायच आहे अजून . आणि हे % असल्याने काही फरक पडत नाही. फक्त एकदा सुरू केल की कन्सिस्टंट रहा .

परत सांगतो , गुण लिहायसाठी वेगळ काहीच करायची गरज नाहीये , तुम्ही रोज जे करताय त्यावरून ते लिहायचेत . दिवसात २ मिनिटही लागणार नाहीत . रोज लिहिण शक्य नसल्यास स्वतःकडे लिहून ठेवा आणि थोड्या थोड्या दिवसानी अपडेट द्या . Happy

अरे वा A grade मिळाली Lol

मला २ प्रॉब्लेम्स आहेत. एक म्हणजे मी घरुन काम करत असल्यामुळे आणि बॅक टु बॅक मिटींगज असल्यामुळे ३ एक वाजे पर्यंत जागेवरुन उठणही फारस होत नाही. मी इथे लिहायला लागल्यापासुन मी न चुकता ३५/४० मिनीट व्यायाम करते. त्यात माझ्या मशीन प्रमाणे ५००/६०० कॅलरीज कमी होतात. इतका व्यायाम आणि बाकी ऑलमोस्ट ० हालचाल, हे बरोबर आहे का?
दुसरा प्रॉब्लेम असा की पोर्शन कंट्रोल होत नाहीये. फळ आणि भाज्याही जरा जास्तच खाल्या जातात. ह्यावर उपाय करायला पाहीजे.
परत एकदा, ह्या धाग्याचा फायदाच होत आहे Happy थॅन्क्स केदार!

निपा , वजन ६३.५ झालं .
सुरूवातीला ६४ होतं, मध्येच ६५ झालं (१० तारखेला)आणि आता ६३.५.
पण माझं एवढं वजन फ्लक्च्युएट होतंच असतं.
माझं महिनाभर ६१-६२ रेंजमध्ये राहिलं तर कमी झालं म्हणायचं.

योग्य फळे आणि योग्य भाज्या थोड्या जास्त खाल्ल्यास काही बिघडत नाही.
भाज्या कमीतकमी तेलातल्या आहेत ना, मग झालं.

सातीजी धन्यवाद... केदार राव हम जारासा डाटा चुराये तो चलता है ना.... हम कोरिलेशन आपको भी देंगे.... Wink

सातीजी धन्यवाद... केदार राव हम जारासा डाटा चुराये तो चलता है ना.... हम कोरिलेशन आपको भी देंगे.... डोळा मारा >>
निपा जरूर . Happy
पण कोरिलेशन करण्यात बर्याच फॅक्टर आहेत आणि त्यातून चुकीच निष्कर्ष निघून नयेत इतकच .

मुळात वजन कमी करायचा वेग किती चांगला हाच एक मुद्दा आहे .
कारण फक्त तुमच्या वजनाच आणि कमी झालेल्या वजनाच % काढल तर ते चुकीच ठरेल .
समजा माझ वजन १०० किलो आहे अन माझ आयडियल वजन ७० आहे तर माझ वजन महिन्याला सहज ४-५ किलो कमी होईल (मी आयडियल पासून फार लांब आहे) इथे माझ ३ किलो कमी झाल तर I am underachieving .
तेच माझ वजन ७५ किलो आहे अन माझ आयडियल वजन ७० आहे तर महिन्याला मी २ किलो कमी केल तरी ते Best आहे .

दुसर म्हणजे तुम्ही वजन सगळ नीट करून कमी करत नसला (क्रॅश डाएट ने वगैरे किंवा उगाच कमी खऊन ) तर तुम्हाला फास्ट रिझल्ट मिळतील पण ते बॅकफायरही होईल

तिसर , म्हणजे कुणाही बरच वजन कमी केलेल्याला माहित असेल की वजन लिनिअरली कधीच कमी होत नाही . कधी कधी अचानक १-२ किलो कमी होत तर कधी कधी महिनाभर कमीच होत नाही . पण प्रोसेस नीट चालूच ठेवण गरजेच असत . अशावेळी जर रिझल्ट दिसले नाहीत तर नाऊमेद व्हायची शक्यता असते .

माझ्या मते अस कोरिलेशन करण्यासाठी किमान ३ महिन्याचा डेटा घेतला पाहिजे . क्रिकेट च्या भाषेत अ‍ॅव्हरेज वरून खेळाडू कसा आहे कळण्यासाठी ५० इनिंग्ज होऊ देत . Happy

केड्या एक्झॅक्टली मी या प्रॉब्लेम मधून जातेय. मला ६० चं टारगेट गाठायचं आहे, पण आयडियली मला ६५ चालणार आहे, ६८ वर गाडी अडली आहे. जालिम उपाय सांगा गाडीला धक्का मारायला.
हत्ती गेला आणि शेपूट राहिलय. पण निघेना. Sad

24/8 6/10
25/8 10/10
26/8 6/10
27/8 9/10
Maze ek kilo suddha kami zale nahiye. Tya mule uthsah kami zala aahe aarthat paryant chaluch aahet.

मी बीबी रोज वाचतेय. अजूनही ताबा मिळालेला नाही गोड खाण्यावर. इथे अ‍ॅड होण्याआधी थोडा थोडा प्रयत्न करतेय.

मग अ‍ॅड होइनच. पण आधी स्वतःहून कंट्रोल करेन.

(गणोबा येतोय, तेव्हा जपून).....

जालिम उपाय सांगा गाडीला धक्का मारायला. >>

दक्षिणा , आहे हे चालू ठेव हा प्लाटू जाईल . Happy
तरीही शक्य असल्यास व्यायाम वाढव . खाण मात्र फारस कमी करू नको .

Maze ek kilo suddha kami zale nahiye. Tya mule uthsah kami zala aahe aarthat paryant chaluch aahet. >> मनीशा काळजी करू नका . असही वर साती म्हणाल्याप्रमाण १-२ किलो मोजण्यात फारसा अर्थ नसतो .
सलग २ -३ महिने होऊ द्या . मग ठरवा Happy

पुण्यात येत्या १२ ऑक्टोबर २०१४ ला 'रन बियाँड मायसेल्फ' नावाची 'पुणे रनिंग' तर्फे आयोजित केलेली 'चॅरिटी रन' होणार आहे. या वेळेस 'बियाँड मायसेल्फ' मार्फत जमा झालेली रक्कम 'सोफोश' ह्या ससूनला निगडीत असलेल्या अनाथालयाला दिली जाणार आहे.

ह्या मधे ३, ५ १० आणि २१ किमी अशी अंतरे आहेत. तरी अधिकाधिक लोकांनी ह्यात सहभागी व्हावे ही विनंती.

त्यांचे फेसबुक पान -
https://www.facebook.com/#!/events/267084230148621/

आणि नोंदणी करण्याकरता
To register goto: http://www.meraevents.com/event/prbm2014

Pages