चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२५/०८/२०१

१)व्यायाम : २ .
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन : १
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे : १
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : ०
७)साखर ३ लहान चमचे : १

७/१०

माझे मार्क्स जास्त खाण्यानेच कमी होतात Sad पोळी १ च खाल्ली तरी फळ आणि भाज्या जास्त खाल्ल्या जातात.

१)व्यायाम : ४
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन : १
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे : १
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ लहान चमचे : १

साती, मग फ्रूटचाट करून खा.
चाट मसाला मिळत असेल तर वापर मस्तपैकी.
नाहीतर सफरचंद+काकडी+डाळींब अशी दह्यातली कोशींबीर कर मस्तपैकी हिरव्या मिरचीचे तुकडे घालून.

२५/०८/२०१४ : स्कोर ७/१०

१)व्यायाम : २ .
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन : १
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे : १
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ लहान चमचे : ०

गणपती बाप्पा येता आहेत व दोन points ची भिती वाटते आहे मेदयाचे पदार्थ + साखर ३ लहान चमचे Sad

नो व्यायाम. स्पाईन एमाराय केला
Disc degeneration and disc bulges are seen at C5/6 & C6/7 levels indenting the thecal sac without any cord compression. Screening of the dorsal and lumbar spine is normal.
असे आलय इंप्रेशन मधे. Sad

मी रोज अपडेट लिहीत नसले तरी सिरीयसली प्रयत्न करते आहे. तीन महिने रोज दोन किमी 3 किलो ओझे घेऊन चालते आहे. त्याने आता जरासा हालचालीत चपळपणा आलाय असे वाटतेय. 1 तारखेपासून जीम लावणार. सकाळी उठल्यावर आवळा रस कोमट पाण्यतुन. मग अर्ध्या तासाने चहा. मग 10 ला मोड आलेले कच्चे मूग, / लेस ऑईल प्लेन डोसा कटिंग चहा
1 ला बिनातेलाच्या 2 पोळ्या भाजी
4 ला कपभर चहा
7 ला कधी डाळीब, सफरचंद, कॉर्न
10 ला 2 पोळया भाजी कोशिंबीर आमटी मूठभर भात.
पैकी चहा व भात पूर्ण बंद करू शकत नाही. गोड खूप खायचे ते कमी केले. वडे, बिस्कीटे, चॉकलेट, आईस्क्रीम पूर्ण बंद. अजून काय करू? 3 महिन्यात 10 कि कमी हा अनअचिवेबल गोल आहे का?

आशू, रात्री दहा वाजता भात खाण्याऐवजी सात वाजता खाऊ शकशील का?
म्हणजे त्यावेळी तू ऑफिसमधे असशील तर शिजवलेला भात डब्यातून घेऊन शक्य आहे का?
तसे केलेस तर जास्त फायदा होईल.

नाय गो.. आमच्या चिऊला गमगम भात भरवल्याशिवाय मी कसा खाऊ? रात्री उशीर आहे जेवायला, पण दिवसभरात मी तेव्हाच तिला खाऊ घालते. ती झोपली की मग मी जेवते. मला झोपायला 12. तिच्यासाठी चालतं मला. Happy

Sad काहीतरी करा की ऎडजस्ट.. Proud पोर्शन कंट्रोल करतेय. दुपारी भात शक्य नाही. सकाळ संध्याकाळ पोळीचे तुकडे मोडायला जीवावर येतं.

बरं, भात खा मग रात्री. Happy
अपेक्षित ते साध्य झालं की नाही ते तीन महिन्यानंतर इथे लिहा.

२६/८/२०१४ चे अपडेट्स : ५/१०

१)व्यायाम : ०
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन : ०
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स : १
५)नो बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ लहान चमचे : १

आजपासुन व्यायाम परत सुरु केलाय....बघु आज १०/१० मिळतात का ते Happy

घरी वजन करण्याच्या त्या यंत्राला 'बाथरूम स्केल' असं नांव आहे.
वेळ अक्कांनी सांगितली ती साधली, तरी त्यात अजून एक अ‍ॅड करतो.
सर्व कपडे काढून, अन हे शक्य नसेल तर नेहेमी एकाच ड्रेसमधे वजन करा. नुस्ती जीन्सची पँट १-१ किलोची असू शकते. Wink

धन्यवाद इब्लिस.
कपडेविरहीत शरीराचं वजन ही अत्यंत सुखद भावना आहे.
पण मेडिकल चेकपच्या वेळी किंवा डॉक्टर व्हिजिटच्यावेळी कपडे घालूनच वजन करावं लागतं ना Wink
त्यामुळे उद्दीष्ट ठेवतानाही कपडे अंगावर ठेवलेले बरे.

मला पण जॉइन करायचा आहे हा गृप ... आता मध्येच आले तर चालेल का. बरेच दिवस झालेत ...मला मध्ये जमले नाही.... माझे वजन आय्डियल पेक्षा ३-४ किलो जास्त आहे ....
पण मला मेनली स्टॅमिना वाढवायचा आहे , व्यायाम केला कि छान वाटते हा अनुभव असुनही टाळला जातो Sad

रोज इथे लिहाय्च्या स्साठी तरी रेग्युलर होइन अशी आशा आहे ...

बाकि माझे नॉर्मल डाएट असे आहे

७ - २ मोठे ग्लास पाणी कोमट

८१५ - नाश्ता ( उप्पीट, / पोहे - १ बोल // इडली ३ )

१३० - जेवण - १ पोळी, १ वाटी भात आमटी, सॅलड, भाजी १ वाटी
५३० - चहा आणी ३-४ बिस्कीटे

८३० - जेवण सकाळ सारखेच

दिवस्सातून दोन दा ग्रीन टी...

काही बदल पाहिजे आहे का...?

चालणे २० मिन रोज होतेच ... पण तेवढेच ... ते वाढवाय्चे आहे

आशूडी ,
तुमच रात्रीच जेवण हेवी होतय . भात बंद करण शक्य नसेल तर पोळ्या कमी करा. ५-७ च्या दरम्यान हलक खा म्हणजे रात्री भूक भूक होणार नाही

हो. पोळी 1 कमी केलीय. 2 सवयीने लिहीलं.
मंजूडे, नक्की.
रोज मोड आलेले मूगच खायचे का? का? Sad बाकी कडधान्य नाही का चालत?
त्यात तिखट मीठ लिंबाशिवाय व्हरायटी आहे का?

आशू, तू ते मूग कच्चे कसे खाऊ शकतेस? मला गॅसेस होतात. वाफवून/ शिजवूनच खाऊ शकते मी.

मोड आलेल्या मुगाचे पेसरट्टू करता येतील.
मिक्स स्प्राऊटमधे कांदा-टोमॅटो, कोथिंबीर, मिरची पेस्ट घालून भेळ/मिसळ करता येईल.
मसूर वाफवून त्यात चाट मसाला पेरून खायला मला आवडतं.
बारीक चवळी वाफवून दह्यात कालवून मीठ, कोथिंबीर किंचीत साखर घालून सह्ही लागते.
सध्यातरी इतकंच आठवतंय.

मोड आलेल्या मेथीचे पदार्थ

गणपती आणि गौरीच्या दिवसात गोडावर कंट्रोल रहावा यासाठी ट्राईड न टेस्टेड टिप्स द्या Happy मोदक, पुरणपोळी, तूप हे आत्ताच दिसायला लागले आहेत डोळ्यापुढे! Happy

रोज मोड आलेले मूगच खायचे का? का? अरेरे बाकी कडधान्य नाही का चालत? >
मोड आलेले मूग पचायला हलके असतात अन न शिजवता खाता येतात . मटकी वगैरे कच्ची चालत असेल तर माहित नाही . इतर कुठलेही मोड तुम्ही शिजवून खाऊ शकता .
त्यातही तुम्हाला नॉन व्हेज चालत असेल तर अंड्याच पांढर किंवा शिजवलेले / रोस्टेड चिकन , फिश हा ऑप्शन आहे

पौर्णिमा ,
सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे आपण डाएट / वजन कमी करतोय हे ओपनली सांगणे . जे हितचिंतक आहेत ते तुम्हाला आग्रह करणारच नाहीत अन इतराना स्पष्टपणे सांगण्याची तयारी ठेवा .
आता स्वतःच्या तयारीबद्द्ल , प्रसाद अगदी एक शित/ एक तुकडा खाल्ला तरी चाल्तो . २ पोळ्या किंवा ४ मोदक खायची गरज नाही अन एकदा तेवढासा खाल्ला की मग उरलेला भाग हा जस्ट अनदर स्वीट आहे Happy
अरे , अभी तो दिवाली बाकी है Happy

अन एकदा तेवढासा खाल्ला की मग उरलेला भाग हा जस्ट अनदर स्वीट आहे स्मित>> वा! मस्त आहे हे वाक्य! थँक्स! Happy

अभी तो दिवाली बाकी है >> देवा! Biggrin

मोड आलेल्या मुगाचे पेसरट्टू करता येतील.
मिक्स स्प्राऊटमधे कांदा-टोमॅटो, कोथिंबीर, मिरची पेस्ट घालून भेळ/मिसळ करता येईल.
मसूर वाफवून त्यात चाट मसाला पेरून खायला मला आवडतं.
बारीक चवळी वाफवून दह्यात कालवून मीठ, कोथिंबीर किंचीत साखर घालून सह्ही लागते.

>> हे सगळ अस वाचायला टेस्टी वाटत. पण मी केल की अजिबात टेस्टी लागत नाही Sad
कायतरी चुकतय. त्यामुळे कडध्यान्य फक्त उसळ करुनच खाल्ली जातात.

मंजूडी, करून बघते. सकाळी घाईत पेसरट्टु शक्य नाही व कच्चा कांदा ऑफिसमध्ये डबा उघडायलाच नको वाटेल. वाफवून बघते.
केदार, एग व्हाईट सुरू करेन. थँक्स

Pages