आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की
आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .
आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .
आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .
कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .
गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .
हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ?
त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?
लोकहो ,
आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया
खाली आणखी काही पॉईंट अॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया
आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.
कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू
रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .
१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही
२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे
जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण
त्यामुळे आता रोजचे गुण १०.
म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अॅड करत जाईन .
काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल
आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा .
31 August, 2014 - 12:59
१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०
१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल
४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस
मी जरी या गृपचा मेंबर नसलो
मी जरी या गृपचा मेंबर नसलो तरी एक पै...
आता जवळपास एक महिना होत आलाय आणि बर्याच जणांनी मार्क्स कम्युलेटीव्ह पध्दतीने मोजलेत. तर आता एका महिण्यात झालेला वजनात झालेला बदल आणि मिळालेले गुण असे टेबल तयार केले तर एक क्वाँटीटेटीव्ह रिझल्ट मिळेल. आणि दर महिण्याच्या शेवटच्या दिवशी हे अपडेट केले तर फॉलो करत आलेल्या प्रोसेसची उपयुक्तता प्रत्येकाच्या लक्षात येइल.
कदाचित सुरवातीला काही कोरिलेशन नाही मिळणार, पण सहा महिने- वर्षभरात , तुला इतके किलो कमी करायचे आहेत तर इतक्या दिवसात इतके गुण मिळव(दिलेल्या फॉरमॅट मध्ये) असे समीकरण मिळुन जाइल.....
निपा , आता जवळपास एक महिना
निपा ,
आता जवळपास एक महिना होत आलाय आणि बर्याच जणांनी मार्क्स कम्युलेटीव्ह पध्दतीने मोजलेत. तर आता एका महिण्यात झालेला वजनात झालेला बदल आणि मिळालेले गुण असे टेबल तयार केले तर एक क्वाँटीटेटीव्ह रिझल्ट मिळेल. आणि दर महिण्याच्या शेवटच्या दिवशी हे अपडेट केले तर फॉलो करत आलेल्या प्रोसेसची उपयुक्तता प्रत्येकाच्या लक्षात येइल. स्मित
कदाचित सुरवातीला काही कोरिलेशन नाही मिळणार, पण सहा महिने- वर्षभरात , तुला इतके किलो कमी करायचे आहेत तर इतक्या दिवसात इतके गुण मिळव(दिलेल्या फॉरमॅट मध्ये) असे समीकरण मिळुन जाइल..... स्मित
>> कल्पना छान आहे . पण रिगरसली करायला आठवडा झाला सुरूवात केली आहे . अजून २-३ आठवडे सेटल होऊ देत

तोवर "कर्म किये जा ... "
माझे २३ तारखेचे
माझे २३ तारखेचे मार्क
व्यायाम- २६ कि मी cycling (रोज व्यायाम केल्यामुळे हात पाय अजिबात दुखले नाही )
जेवण व इतर - ७
१०/ १०
२४/०८/२०१४ आजचे गुण १)व्यायाम
२४/०८/२०१४ आजचे गुण
१)व्यायाम : ४ ., मुद्दाम वॉक नाही घेतला गेला,पण मधे न थांबता २५ मिनिटे चाल झाली.
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन : १
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे : १
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १/२
७)साखर१/२ चमचा १ .............................९.५./१०
एकूण ६०.५./७०
सकाळी ७ ला लिंबुपाणी, १ कप
सकाळी ७ ला लिंबुपाणी, १ कप दुध
१ तास हाईकिंग
९ ला १ एग ऑम्लेट
११:३० ला कलिंगड
२ ला जॅपनीज राईस बोल, ह्यात फिश राईस(व्हाईट), काही भाज्या
४:३० ला स्ट्रॉबेरीज
७:४५ ला उस़ळ, १ पोळी, काकडी, टोमॅटो कांदा
१ बुंदीचा लाडु (प्रसादाचा म्हणुन खावाच लागला
)
८/१० घेते
इकडे जे नियमितपणे येतात,
इकडे जे नियमितपणे येतात, लिहितात, त्यांचं उद्दीष्ट काय आहे? वजन मर्यादेत ठेवणे, बीएमआय मर्यादेत ठेवणे, आहार उत्तम आणि त्यायोगे उत्तम तब्येत राखणे?
इथले कितीजण नियमितपणे वजनाच्या काट्यावर उभे राहतात?
साती, इब्लिस, वजन बघण्याची योग्य वेळ कोणती? याविषयी काही लिहू शकाल का?
25.08.14 9/10 had very small
25.08.14
9/10
had very small quantity of sweets at one function and had seasoning of little oil on salad..was abke to take dinner at 7.30pm.
had lot of gap in between dinner and sleep.
manjudi.its advisable to
manjudi.its advisable to check early in morning after emtying bowel and bladder.
Use only one weighing scale throught.
preferably avoid digital scales..use lever mechanism instead.
my objectives of reducing weight is
1avoiding diabetes 2that is prevalent in my family,
2.revert signx of metabolic syndrome that have already appeared
3 avoid cardiac risk and build up stamina for long distance walk
but the most important driving force for me is to fit into the old lovely dresses that i have.

इकडे जे नियमितपणे येतात,
इकडे जे नियमितपणे येतात, लिहितात, त्यांचं उद्दीष्ट काय आहे? वजन मर्यादेत ठेवणे, बीएमआय मर्यादेत ठेवणे, आहार उत्तम आणि त्यायोगे उत्तम तब्येत राखणे?
चालु आहे)... सगळयात महत्वाची गोश्ट म्हणजे छान वाटत आहे 
>>>
मंजूडी ...माझा main goal आहे की वजन कमी करणे .......पण इथल्या बाबी सुरु केल्या पासून आहार उत्तम घेतला जातोय ...त्यामुळे उत्तम तब्येत (आधी काही आजार नव्हता पण थकवा जाणवायचा मधे मधे), वजनात ही फरक जाणवतो आहे (खूप नाही पण केदारनी लिहील्या प्रमाणे कर्म किये जा
इथले कितीजण नियमितपणे वजनाच्या काट्यावर उभे राहतात? >>> माझ्याकडे weighing machine नाही सो नियमितपणे होत नाही पण slow and steady व्यायाम चालु ठेवणार आहे
its advisable to check early
its advisable to check early in morning after emtying bowel and bladder.>>> ओक्के, धन्यवाद!
पण माझ्याकडे डिजिटल काटाच आहे
पण ठीक आहे. तेवढे उणे/ अधिक चालवावं लागेल.
o fit into the old lovely dresses that i have.
डोळा मारा>>> आह!! आमेन साती.
हे मी सध्या अनुभवते आहे, त्यामुळे मी फारच रिलेट झाले या भावनेशी
माझं उद्दीष्ट आहे प्रदीर्घ कालासाठी उत्तम तब्येत राखणे. त्यासाठी योग्य आहार आणि वजन मर्यादेत ठेवणे.
२२/०८/२०१४
२२/०८/२०१४ ९/१०
१)व्यायाम : ४ .
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन : १
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :०
५) बाहेरचे खाणे : १
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ लहान चमचे : १
२३/०८/२०१४ ५/१०
१)व्यायाम : ० .
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन : ०
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स : १
५) बाहेरचे खाणे : १
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ लहान चमचे : १
२४/०८ ७/१०
१)व्यायाम : ४ .
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन : १
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :०
५) बाहेरचे खाणे : ०
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ लहान चमचे : ०
केदार, कर्म किये जा बरोबर आहे
केदार, कर्म किये जा बरोबर आहे पण फल नहिं मिल्या तो जरा कानाडोळा शुरु होता है. इसलिये
:जाता जाता डेटा गोळा करण्यास उत्सुक निवांतः
इकडे जे नियमितपणे येतात,
इकडे जे नियमितपणे येतात, लिहितात, त्यांचं उद्दीष्ट काय आहे? >>
माझ उद्दिष्ट आहे वजन किंचित कमी करणे अन त्याहीपेक्षा फिट होणे/राहाणे
२४/०८/२०१४ १)व्यायाम : २
२४/०८/२०१४
१)व्यायाम : २ .
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन : १
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स : १
५) बाहेरचे खाणे : ०
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ लहान चमचे : १
गुणः ७/१०
एकुणः ५४/७०
माझे उद्दिष्ट आहे आहारावर
माझे उद्दिष्ट आहे आहारावर नियंत्रण मिळवणे- विशेषतः गोड खाण्यावर आणि नियमित व्यायाम करणे.
इथे लिहायला लागल्यापासून गोडाकडे हात जायला लागला की आपोआप ब्रेक लागतो. पोर्शन कंट्रोल होतो. दर वेळेलाच जमते असेही नाही. पण किमान मनात जाणिव तरी राहते.
माझे अप्डेट्स... २२/८/२०१४ :
माझे अप्डेट्स...
२२/८/२०१४ : ऑफिस चा आउटींग होतं...खुप अॅडवेंचरस अॅक्टीवीटीज होत्या...राफ्टींग वगैरे सारख्या,.,,,व्यायाम केला नाही घरी पण तिथे ड्बल व्यायाम झाला....मग मी ४ गुण धरु का ?
बाकी आहार सगळा चुकला - ४/१० म्हणु शकते..
२३/८/२०१४ आणि २४/८/२०१४ = ०/२०
शनिवारी माझी डाएटिशियन कडे
शनिवारी माझी डाएटिशियन कडे अपॉईंटमेंट होती.
आता ३% फॅट लॉस केला की वजन मेंटेन करू शकेन असं तिने मला सांगितलं आहे.
वजन कमी करायला सुरू केलं तेव्हा फॅट ४१% होतं. आता ३७% आहे. आपल्याला ३४% हवं असं तिने मला सांगितलं. वॉटर लेव्हल सुद्धा सुरू केलं तेव्हा ४१% होती आता ४७% झाली आहे.
फॅट लॉस करताना वजन थोडे फार कमी होईलच नक्की असं तिचं म्हणणं आहे.
गुरुवार पासून व्यायाम व्यवस्थित सुरू आहे. ५० मिनिटं करते रोज, पण आता थोडा वाढवण्याचा विचार आहे.
>>शनिवारी माझी डाएटिशियन कडे
>>शनिवारी माझी डाएटिशियन कडे अपॉईंटमेंट होती.>>
दक्षिणा, नाव पत्ता दे ना....आणि तुझा अनुभव पण लिही की ईथे
म्हणजे कधी पासुन सुरु केलं डाएट ? किती दिवसात कसा फरक पडला ई. ई.
स्मिता माझी डाएटिशियन म्हणजे
स्मिता माझी डाएटिशियन म्हणजे ज्ञानदा चितळे-पुसाळकर.
त्यांचं क्लिनिक जंगली महाराज रोडला पिझ्झा हटच्या गल्लीत, अभ्युदय बँक आहे, त्याच्यावरती आहे.
माझ उद्दिष्ट आहे, फिजिकली फिट
माझ उद्दिष्ट आहे, फिजिकली फिट असणे..
)साईझ ११-१२ वरून ५-६ वर स्वतःला येताना पाहणे म्हंजे परमोच्चानंद..( have achieved this..took 5 months.)
रेग्युलर व्यायामाने हात्,पाय्,जॉइंट्स दुखायचे थांबतात..
आणी ( ऑफकोर्स!!
मी दोन आठवड्यातून एकदा वजन करते, Wii fit वर. साती ने सांगितल्याप्रमाणे सकाळी.. ठराविक वेळेला..
आता वजन इतकं भराभरा कमी होत नाही पण मसल्स टोन्ड होताहेत .. हळूहळू...
या धाग्यामुळे स्वतःचं स्वता:कडे लक्ष देता येऊ लागलंय.. थँक्स टू केदार!!
कालचे अपडेट.. १४/०८/२४
व्यायामाला वेळ मिळाला नाही म्हणून .. ६ / १०
माझ आजच अपडेट : सगळ अगदी
माझ आजच अपडेट :
सगळ अगदी व्यवस्थित जमल १०/१०
नॉर्मली फॅट % २० च्या आत हवं
नॉर्मली फॅट % २० च्या आत हवं असं म्हणतात ना? की प्रत्येकाच्या बॉडी टाईपनुसार असावा?
त्या दिवशी मला अज्जिबातच वेळ मिळाला नाही नीट प्रश्न विचारायला. त्यामूळे हा प्रश्न खूप छळतोय.
मी धरून चालले होते की अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे.
आत्ताच एका वेबसाईटवर वाचलं की
आत्ताच एका वेबसाईटवर वाचलं की ३९ वयापर्यंत स्त्रियांचं फॅट % ३२ असू शकतं. अर्थात हे मॅक्सिमम आहे.
माझा पण आजचा स्कोअर १०/१०
माझा पण आजचा स्कोअर १०/१० आत्तापर्यंत.
२५/०८/२०१४ आजचे गुण १)व्यायाम
२५/०८/२०१४ आजचे गुण
१)व्यायाम : ४ .,
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन : १
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे : १
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १/२
७)साखर३ चमचे(कॅडबरीचा तुकडा) १ .............................९.५./१०
एकूण ७०./८०
इथे लिहायला लागल्यापासून गोडाकडे हात जायला लागला की आपोआप ब्रेक लागतो. पोर्शन कंट्रोल होतो. दर वेळेलाच जमते असेही नाही. पण किमान मनात जाणिव तरी राहते.>>>>> +1. नाहीतर कॅडबरीचा १ स्लॅब खाणारी मी,छोट्या तुकड्यावर समाधानी राहिले.प्रामाणिकपणे सांगायचे तर, नको खाऊया हा विचार प्रथम आला.त्यानंतर धाग्यात लिहिणार्या गुणांचा विचार आला.
व्यायामाच्या बाबतीत मात्र खरोखरच कंटाळा येतो.मग केदारसरांनी 'कमी केलात तरी चालेल,पण नियमित व्यायाम करा' या सवलतीचा फायदा घेते.
इकडे जे नियमितपणे येतात,
इकडे जे नियमितपणे येतात, लिहितात, त्यांचं उद्दीष्ट काय आहे? वजन मर्यादेत ठेवणे, बीएमआय मर्यादेत ठेवणे, आहार उत्तम आणि त्यायोगे उत्तम तब्येत राखणे?>>>>> वजन कमी करणे.
इथले कितीजण नियमितपणे वजनाच्या काट्यावर उभे राहतात? >>>> मी बरेचदा रहाते.कमी झालं का म्हणून आशेने पहाते.
आठवडाभर अपडेट्स लिहिलेच
आठवडाभर अपडेट्स लिहिलेच नाहीत. मद्रास वीकच्या ईव्हेंटच्या नावाखाली अख्ख्या मद्रासमधील खादाडी ठिकाणं भटकत होते
आजपासून अपडेट्स परत चालू:
ब्रेकफास्ट " पालक पराठा (नो तेल तूप)
लंचः ब्राऊन राईस सॅलड आणि कोळाच्या शेंगा
दुपारी: दोन बिस्कीट आणि चहा
डिनरः तीन फुलके वांगं आणि सॅलड.
आता झोपण्याआधी एक कप दूध पिईन.
व्यायामः एक तासभर एरोबिक्स आणि धावाधाव.
२३ ऑगस्ट १०/१० व्यायाम
२३ ऑगस्ट १०/१०
व्यायाम ४/४
प्रोटिन १/१
भाज्या, फळे १/१
साखर २ टीस्पून १/१
बाहेरचे खाणे नाही १/१
बेकरी प्रॉडक्ट्स नाही १/१
जेवण आणि झोप अंतर १/१
२४ ऑगस्ट ९/१०
व्यायाम ४/४
प्रोटिन १/१
भाज्या, फळे १/१
बाहेरचे खाणे नाही १/१
बेकरी प्रॉडक्ट्स नाही १/१
जेवण आणि झोप अंतर १/१
साखर - गोड खाणे झाले ०/१
आज पासून केलेला बदल - वॉक अॅट होम मधे १ मैल वाढवला. बाकी अपडेट उद्या.
२५-०८-१४ No exercise
२५-०८-१४
No exercise -0
Proteins-1
fruits-0
home cooked food-1
sugar one tsp-1
NO bakery/fried items - 1
early dinner and sleep- 0
TOTAL -4/10
२५/०८/२०१४ १)व्यायाम : २
२५/०८/२०१४
१)व्यायाम : २ .
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन : ०
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स : १
५) बाहेरचे खाणे :०१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ लहान चमचे : १
गुणः ७/१०
एकुणः ६१/८०
Pages