मुलांच्या दांडगाईने वागण्याबाबत इतर मुले, इतर पालक आणि शाळा ह्यांनी काय करावे?

Submitted by वेल on 25 August, 2014 - 04:33

आजच शाळेतल्या एका पालकाकडून कळले की तिच्या मुलीला (पहिलीतल्या) तिच्याच वर्गातल्या मुलाने ढकलले. ती मुलगी स्वतःच्या जागेवर बसली होती आणि हा मुलगा त्या बेंचच्या बाजूने चालला होता. त्या मुलीचे नाक फुटून रक्त आले. ती मुलगी खूप घाबरली आहे.

त्या पालकाने शाळेत तक्रार केलेली आहे. शाळा नियमानुसार काय करायचे ते ठरवेल.

पण आपल्या मुलांनी अशा मस्तीखोर मुलांसोबत कसे वागावे? त्या मुलांपासून लांब राहावे हा उपाय नाही कारण ह्या परिस्थितीत ती मुलगी त्या मुलाच्या अध्यात मध्यातही नव्हती,

आपण आपल्या मुलांना अशी परिस्थिती हाताळायला शिकवताना काय शिकवावे? शिक्षकांकडे तक्रार करणे हा एकच ऑप्शन आहे का?

मला काही उपाय सुचले ते असे -

आपल्या मुलांना stand united शिकवावे. कोणी इतर कोणाला त्रास देत असेल तर ज्याला त्रास होतोय त्याची बाजू घेऊन आपण त्या त्रस देणार्‍या मुलाला हे लगेच थांबव असे शांत पण ठाम शब्दात सांगावे ( सहा वर्षाच्या मुलाकडून खूप जास्त अपेक्षा होत असेल कदाचित पण मी हे माझ्या मुलाला प्रॅक्टिकली कसं करायचं ह्याचा डेमो दिला आहे. तो ते तसं करू शकेल की नाही माहित नाही.)

त्रास देणारा हामुलगा नेहमीच इतर मुलांना त्रास देतो त्यामुळे त्या मुलाच्या वागण्याविरुद्ध शाळेत लेखी तक्रार करावी. आणि ह्यामध्ये मुलाला काउंसेलिंग देण्याची मागणी करावी. शिवाय पुन्हा असेच होत राहिल्यास पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करण्याची धमकी द्यावी.

कृपया तुमची मते मांडा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येक शाळेत अँन्टी बुलिंग पॉलिसी हवी >> स्वाती२ मस्तच, example copy आहे का प्लिज. मी PARENTS COMMITEE मधे नाहि अहे पण overall शाळेत वातावरण healthy असाव अस खुप वाटत. टिचरला example copy देउन बघते. मारामारि ने सगळे मुलेच बिघडतील नाहितर.

मंजुडी, आक्षेपार्ह असं नव्हतं गं, पण मागची पाने चित्रांनी भरत वही मागून भरत चालली होती , म्हणजे मागून ५-६ पानांवर हाच उद्योग आणि हे फक्त रफ वहीत नाही तर इतर विषयांच्या वहीतही आढळले.
पाने मागची होती म्हणून लगेच लक्षात नाही आलं. पण एकदा मुलाने वहीत जागा नाही म्हणून रफ वहीत अभ्यास लिहून आणला व घरी येऊन कॉपी केले नवीन वहीत, म्हणून हे सर्व शिक्षकांच्या कानावर घातले.

.

मंजुडी,
आक्षेपार्ह नसल तरि, दुसर्या मुलाच्या फेयर वहित चित्र काठण चुकिच नाहि का? आणि काहि मुल विरोध हि नाहि करु शकत म्ह्णुन पालकाना जाव लागत. नाहितर खरच मुलानच्या शाळेत जाउन complain करन, नको वाटत असत, पण काहि मुल स्वहता deal नाहि करु शकत.

नाही हो नाही. इयत्ता दुसरीत असताना ते बाळ दुसर्‍याच्या वहीत सुबक सुंदर चित्रं काढत असेल तर चूक आणि बरोबर काय शोधायचं?
मी आशिकाच्या जागी असते तर माझ्या मुलीला वेगळी वही दिली असती आणि तिला समजावून सांगितले असते की त्या मुलाला या वहीत चित्र काढायला सांग, फेअर वहीत नको. शिक्षकांकडे तक्रार नसती केली, शिक्षकांना आणि पालकांना त्या बाळाच्या कलेविषयीची जाणीव करून दिली असती.

मंजुडी, ज्या मुलाचे वडील /काका नगरसेवक आहेत ते त्यांच्या मुलाला वेगळी वही घेवून देऊ शकत नाहीत का? फक्त घरच्या शिस्तिपायी तो मुलगा स्वतःची वही साफ आणि दुसर्‍याची खराब करत असेल तर ते योग्य आहे का? आणि ते त्याच्या पालकांनाही कळायला नको का?

आधी तक्रारीची नीट शहानिशा करून अश्या टारगट मुला/मुलींच्या पालकांना जरब बसेल असेच वागले पाहिजे. उगाच उदारमतवादी दृष्टीकोन कामाचा नाही. अश्या खोडकर मुलांच्या कारनाम्यामुळे इतर मुलांना त्रास होतो त्याचे काय? कित्येकदा इतर मुलांना दुखापती होतात. तेव्हा वर कुणीतरी 'अश्या टारगट मुलांना वेळीच दाबल पाहिजे वगैरे' लिहिलंय ते अगदीच चूक म्हणता येणार नाही.

मुळात दुसर्‍याच्या वस्तुला परवानगी शिवाय हात लावायची सवय लहानपणापासुन लागली, की मोठेपणी त्याचे काहीच वाटत नाही. हे सन्स्कार घरातुन झालेले बरे.

आशिका, त्या मुलाची चित्र काढण्याची भूक आणि त्याचे कसब त्या नगरसेवकवाल्या घरात मारले जातेय. अश्या पद्धतीने त्याने वाट करून दिली त्याला. आईवडिलांना वही परवडत असली तरी मुलाने चित्र काढणे हे मानसिक वा बौद्धिकदृष्ट्या परवडत नसेल त्यांना.
चित्रे सुबक आहेत एवढ्या लहानपणी म्हणजे बाळ कलाकार आहे. एखाद्या कलाकाराला असा थोडा पुश आपल्याकडून दिला गेला तर बिघडलं कुठे? भले तो कलाकार आपला मुलगा नाहीये पण तरी हरकत काय आहे?

मंजूडी, विशेषतः ज्याच्या वहीत ही चित्रं काढली जात आहेत त्या मुलाला ते आवडत नसेल तर? त्याला रोजच्या रोज हे टॉर्चरच ना?

त्याच्या चित्र काढण्याला माझी ना नाहीच आहे, पण अशा प्रकारे दुसर्‍यांच्या फेयर वहीत काढू नयेत आणि तेही इतक्या प्रमाणात की ज्याची वही आहे त्याला स्वतःचा अभ्यास लिहायलाही जागा न देता, हे मात्र खटकलेच मला. चूक माझ्या मुलाचीही तेव्हढीच आहे की त्याने हे सर्व करु दिले.

तो कलाकार आहे व त्याची कला जोपासली जावी हा मुद्दा नंतर येतो, पहिला विचार कुणाच्याही मनात स्वतःच्या मुलाबद्दलच येणार ना, तसाच मी केला, कदाचित कुणाला चुकीचा वाटला असेलही.

त्या मुलाच्या चित्रकारी बाबत त्याच्या पालकान्शी बोलायला हरकत नाही. माझ्या भाचीची चित्रकला उत्तम आहे, तिच्या वह्या पाहुन बहिणीच्या मैत्रिणीनी त्यान्च्या मुला-मुलीना चित्रकले च्या क्लासला घातलेय. जेणे करुन कलेने मन रमेल, अक्षर सुबक होईल आणी एका जागी बसतील. उगाच कार्टुन्स पाहुन नोबिता बनण्यापेक्षा ते बरे.

मितान, धन्यवाद इकडे रुमाल टाकल्याबद्दल.

माझ्या मुलीच्या बाबतीत असे होते की वर्गात असे काही घडले की ताबडतोब ते शिक्षिकेच्या लक्षात आणून देण्यात माझी मुलगी पुढे असते. त्यामुळे अशी मुलं तेवढेच लक्षात ठेवून तिला कधी इजा तर करणार नाहीत ना, अशीही काळजी वाटत राहते.

त्याच्या चित्र काढण्याला माझी ना नाहीच आहे, पण अशा प्रकारे दुसर्‍यांच्या फेयर वहीत काढू नयेत आणि तेही इतक्या प्रमाणात की ज्याची वही आहे त्याला स्वतःचा अभ्यास लिहायलाही जागा न देता, हे मात्र खटकलेच मला. चूक माझ्या मुलाचीही तेव्हढीच आहे की त्याने हे सर्व करु दिले. >> +१
दुसर्‍यांची वस्तु वापरु नये हे मुलाना कळ्याला हव

मी आशिकाच्या जागी असते तर माझ्या मुलीला वेगळी वही दिली असती आणि तिला समजावून सांगितले असते की त्या मुलाला या वहीत चित्र काढायला सांग, फेअर वहीत नको. >> हे हि मस्त उपाय आहे. पण एकदा त्या मुलाला रागवुन कि अस दुसर्‍यांची वस्तु वापरु नये, मग वहि देउ शकतो. खर, म्ह्नजे तेव्हा आपण खुप रागात असतो चान्ग्ल काहि डोक्यात येत नाहि.

आशिका, असच occasion बघुन gift देउन बघ. मुलान्चे relation पण सुधारतिल.

It is matter of 10 years, their childhood, which will be most memorable part of their life.So it is better to built good realation with everybody.

स्वाती.. ते उदाहरण मला फार नंतर कळले.. ! स्कूलबसमधे देखील इतकी गर्दी असते कि एखादा सेवक प्रत्येक मुलावर नाही लक्ष ठेवू शकत. आणि त्यालाही नाही जुमानत मुले. त्या बसची जबाबदारी शाळा तरी कशी घेईल ?
दुखापत झाली नाही हे चांगलेच... पण एखाद्या मुलाने मुकाटपणे सगळे सहन करत रहायचे, हे पण योग्य नाही ना ?
अश्यानेच मग टग्या मूलांचे फावते.

कनक२७, मुलांची रिलेशन्स छानच आहेत हे सारं होउनही आणि त्यामुळे पालकांचीही. ३ वर्षे होऊन गेली आता.
काहीच ताण नाहीये

चित्र काढण्यावर बंधन घातले जात असल्यामुळे दुसर्‍या मुलाच्या वहीत दामटून चित्रे काढणे ह्या प्रकारात ज्याची वही आहे त्याच्या बाजूने माझी तरी सहानुभुती आहे बुवा! तो चित्रे काढणारा मुलगा कलाकार आहे ह्याचे कौतुक करणे वेगळे, पण नॉट अ‍ॅट द कॉस्ट ऑफ अनहॅपिनेस ऑफ माय चाईल्ड!

(अवांतर - रुमालाचे धन्यवाद प्रथम पाहायला मिळाले ह्याबद्दल धन्यवाद) Light 1

आणि तो मुलगा कलाकार वगैरे आहे हे आपण मोठी माणसं समजू शकतो. त्याच्याच वयाच्या मुलाच्या दृष्टिनं तो त्याची वही बळजबरीनं खराब करणारा वाईट मुलगा आहे. आणि त्याला नको म्हणून सांगता येत नाही म्हणून मनातल्या मनात त्रास होत असणार. त्यामुळे आशिका तू योग्य तोच मार्ग अवलंबलास.

एका क्ष शाळेत एक विद्यार्थी आहे. तो रोज मधल्या सुट्टी मधे उगाचच वर्गामधे पळत पळत येतो आणि जेवणार्‍या मुलांचे डबे बेंचवरुन खाली फेकुन देतो.
इयत्ता पाचवी!
दुसरी मुलं रडवेली होऊन आपला आपला डबा उचलतात आणि शासनाची खिचडी खायला जातात.(डब्बा खाऊन झाला की आपण सांडलेलं खरकटं आपल्या हाताने डब्यात भरायचं ही शाळेने लावलेली शिस्त आहे. सुट्टी संपताना शिपाई येऊन वर्ग झाडुन जातात)
शिक्षिका आधी स्टाफरूम मधे इतर शिक्षकांसोबत जेवायला बसायच्या त्यामुळे त्यांना हे सगळं माहीत नव्हतं.कोणत्याही विद्यार्थ्याने कधीही सांगितलं नाही.

एक दिवशी एक पालक शाळेत आहे आणि बाईंशी या मुलाच्या वर्तनाबद्दल भांडायला लागले.
बाईंना तोपर्यंत हे प्रकार अजिबात माहीत नव्हते. बाईंनी त्या विद्यार्थ्याला बोलावलं आणि खरं काय ते विचारलं, तो मुलगा काही मान्य करायला तयार नाही. आधी बर्‍याच वेळ समजावून झाल्यावर बाईंनी त्याला सांगितलं की मी आता खाली जाऊन पाणी पिऊन येते. तोपर्यंत जर तू खर काय ते सांगितलं नाहीस तर मी तुला आंगठे धरुन उभं करेन.

मुलगा घाबरला आणि बाई वर्गात परत आल्यावर म्हणाला की हो मी असं केलं. का विचारलं तर रडायला लागला.
बाईंनी त्याला सौम्य अशी शिक्षा केली (एवढा तास संपेपर्यंत वर्गाबाहेर उभा रहा). त्या मुलाने घरी जाऊन सांगितलं की बाईंनी मला दिवसभर उभं राहिला लावलं आणि त्याचे पालक भांडायला आले Uhoh
त्याचे पालक म्हणजे अक्षर्शः गुंडच! ५-६ लोकं घेऊन आलेले. "तुला बघुन घेईन' अशी धमकी बाईंना देऊन गेले. पुढे ते प्रकरण निस्तरता निस्तरता नाकी नऊ आले.. तोपर्यंत बाई वर्गात मुलांसोबत जेवायला मागल्या म्हणुन या मुलाला काहीच करता येईना. त्याच्या पालकांनी शाळेतल्या एका सरांच्या थोबाडीत ठेवुन दिली आणि मग शाळेने त्या मुलाला दाखला दिला. त्यानंतर ही बरेच दिवस बाईंना आणि त्यांच्या कुटुंबाला बरेच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्रास झाले.

आता हा मुलगा रोज शाळा सुटण्याच्या वेळेत शाळेच्या ग्राऊंडवर येतो आणि दिसेल त्या वर्गमित्राला धपाधप मारतो.
त्याचे पालक बाजुला उभे राहुन हे प्रकार बघत असतात. कोणी त्या मुलाच्या जवळ आलं की अंगावर धावून येतात.
या वेळेला काय करायला हवं यावर शाळेत मिटींग सुरू आहे.
(काही कारणाने मजकुरात थोडेसे बदल केलेत)

हे फारच झाले रीया! ही मात्र खरोखरंच पोलिस केस आहे. तसेच, ह्यात पोलिसांनी काही दडपण आल्याने काहीच केले नाही तर ही केस माध्यमांच्या मार्फत बोंबाबोंब करण्याची केस आहे.

एक शिक्षक / शिक्षिका हे निभावून नेऊ शकत नाहीत हे समजू शकते पण एक अख्खी शाळा ह्या प्रकाराशी डील करू शकत नाही हे चमत्कारीक व संतापजनक आहे.

(नथिंग पर्सनल अ‍ॅट ऑल)

एक सर मधे पडले तर मार खाल्ला ना.
ही एक लहानशी मराठी शाळा आहे त्यामुळे सगळंच साधंसं आहे.

पोलीस कंप्लेंट करायचा विचार केला तर शाळा त्याला तयार नाही (शाळेचं नाव खराब होईल) आणि ही गाववाली लोकं आहेत (माझ्या एरियाची महती जाणुन असालच) त्यामुळे बाईंनाखरच या फंदात पडायचं नाहीये.
_____________
काही कारणाने पोस्ट थोडीशी बदलत आहे.

दादागिरी होते ह्यामुळे शाळा पुढील वर्षापासून रिकामी होण्यापेक्षा शाळा चांगल्या कारणासाठी बदनाम झालेली बरी, हा विचार त्यांना पटवून द्यायला हवा आहे.

Sad

(मीही हे कैच्याकै म्हणूनच लिहिलेले आहे, समजू शकतो की हे त्या शाळेला झेपतच नसेल)

ही पण एकप्रकारे बदनामीच झाली ना शाळेची पण काय करणार आता!
त्यामुळे या वयातल्या मुलांचे एमानसिकता वगैरे मला झेपतच नाही.
पालकांनी फुस लावल्याशिवाय मुलं अशी वागूच शकत नाहीत.
त्यामुळे एकतर गोड शब्दात दुसर्‍यांच्या मुलांना एकदा समज द्या नाही ऐकलं तर रत्न दाखवाच हे माझं स्पष्ट मत!
या पालकांना कोणी तरी जशाच तसा मिळो आणि त्यांच्या मुलाला बदडुन काढो ही माझी मनापासुन इच्छा आहे.
मी बरीच सेन्सेटिव्ह आहे. अनेक बाबतीत हळवी आहे. क्रुर नाही पण अशी क्रुर मुलं पाहिली की माझं डोक सटकतंच!

तुमच्या मुलांना सेल्फ डिफेन्स शिकवाच! कधी कधी शाळा, शिक्षक इत्यादी पुरेसे पडत नाहीत Sad

माझ्या काही प्रामाणिक शंका आहेत.

१. आपल्या पाल्याने दुसर्‍या पाल्याच्या वर्तनाबाबत केलेली एखादी गंभीर तक्रार (माझ्या वहीत तो लिहितो येथपासून ते मारतो वगैरेपर्यंतची) आपला पाल्य शिक्षकांकडे आधी का करत नाही हा प्रश्न पालकांना पडू नये का? मला आठवते त्यानुसार आमच्यावेळी तरी असे बाळकडू असायचे की वर्गात शिक्षक सर्वेसर्वा असतात आणि झालेला कोणताही त्रास त्यांना सांगितल्यास त्यांना योग्य वाटेल ती अ‍ॅक्शन ते घेतात. आता मुलांना ते माहीत नसते की खरे वाटू शकत नाही की आता शिक्षक हे आपल्या पालकांइतकेच महत्वाचे आहेत ही संस्कार रुजवून घेण्याची पातळीच खालावलेली आहे? थोडक्यात, आताची मुले हे प्रकार 'फक्त' पालकांनाच सांगण्याच्या पात्रतेचे समजतात की काय?

२. पूर्वी सहाध्यायीचे पालक शाळेत आले आणि थेट आपल्याशी बोलले व त्यांच्या पाल्याला त्रास न देण्यास त्यांनी सांगितले तर त्रासदायक विद्यार्थी / विद्यार्थिनी घाबरत असे व सुधारण्यास सज्ज होत असे. असे आताचे विद्यार्थी नसतात'च' का? नसल्यास त्याचे मूळ पालकांनी त्यांच्यावर कळत / नकळत केलेल्या 'तू वाग रे बिनधास्त कसाही, काही झाले तर मी आहे' अश्या स्वरुपाच्या संस्कारांमध्ये किंवा श्रीमंतीत आहे का?

३. पाल्याची शाळेतून तक्रार येणे ही बाब अतिशय गंभीर समजली जायची, म्हणजे तक्रारीच्या सत्यासत्यतेची शहानिशा करण्यापूर्वीही! असे आता होत नाही का? (आणि नसल्यास का)

४. चूक कोणाचीही असली तरीही आधी आपल्या पाल्याला समज देणे असे एक पूर्वी व्हायचे. आज कदाचित हे न्याय्य वाटणार नाही, पण ह्यातही एक नकळत केलेला संस्कार असे तो म्हणजे दुसर्‍याची तक्रार करण्यापूर्वी तू हे टाळू कसे शकला असतास ते शिकून घे! आता असे होत'च' नाही का? (पुन्हा नसल्यास का?)

५. साध्या साध्या गोष्टींमध्ये समूपदेशन, पालकांचेही समूपदेशन, काही प्रमाणात मेडिकेशन असा विचार केला जाणे हा नेहमीच विकास म्हणता येईल की प्रश्नाचा विपर्यास?

भूषणदादा,
तुमच्या मुलाने असं वागलं शाळेत तर तुम्ही काय कराल ते लिहा आधी.
हे कसले १-२-३-४ मुद्दे लिहिताहात?
शी!

Pages