मुलांच्या दांडगाईने वागण्याबाबत इतर मुले, इतर पालक आणि शाळा ह्यांनी काय करावे?

Submitted by वेल on 25 August, 2014 - 04:33

आजच शाळेतल्या एका पालकाकडून कळले की तिच्या मुलीला (पहिलीतल्या) तिच्याच वर्गातल्या मुलाने ढकलले. ती मुलगी स्वतःच्या जागेवर बसली होती आणि हा मुलगा त्या बेंचच्या बाजूने चालला होता. त्या मुलीचे नाक फुटून रक्त आले. ती मुलगी खूप घाबरली आहे.

त्या पालकाने शाळेत तक्रार केलेली आहे. शाळा नियमानुसार काय करायचे ते ठरवेल.

पण आपल्या मुलांनी अशा मस्तीखोर मुलांसोबत कसे वागावे? त्या मुलांपासून लांब राहावे हा उपाय नाही कारण ह्या परिस्थितीत ती मुलगी त्या मुलाच्या अध्यात मध्यातही नव्हती,

आपण आपल्या मुलांना अशी परिस्थिती हाताळायला शिकवताना काय शिकवावे? शिक्षकांकडे तक्रार करणे हा एकच ऑप्शन आहे का?

मला काही उपाय सुचले ते असे -

आपल्या मुलांना stand united शिकवावे. कोणी इतर कोणाला त्रास देत असेल तर ज्याला त्रास होतोय त्याची बाजू घेऊन आपण त्या त्रस देणार्‍या मुलाला हे लगेच थांबव असे शांत पण ठाम शब्दात सांगावे ( सहा वर्षाच्या मुलाकडून खूप जास्त अपेक्षा होत असेल कदाचित पण मी हे माझ्या मुलाला प्रॅक्टिकली कसं करायचं ह्याचा डेमो दिला आहे. तो ते तसं करू शकेल की नाही माहित नाही.)

त्रास देणारा हामुलगा नेहमीच इतर मुलांना त्रास देतो त्यामुळे त्या मुलाच्या वागण्याविरुद्ध शाळेत लेखी तक्रार करावी. आणि ह्यामध्ये मुलाला काउंसेलिंग देण्याची मागणी करावी. शिवाय पुन्हा असेच होत राहिल्यास पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करण्याची धमकी द्यावी.

कृपया तुमची मते मांडा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मितान, उत्तम पोस्ट्स !

तातडीचा उपाय म्हणून आधी त्या करकटक खुपसणार्‍या मुलाची बिलिफ सिस्टिम समजावून घ्यायला हवी नाही का! >>>

नाही, ती बिलिफ सिस्टिम तुम्ही समजावून घ्यायची गरज नाही. बुली होणारा व्हिक्टिम असतोच ह्यात शंकाच नाही. त्याला समजून घेणे, सावरणे आणि प्रतिकार करायला शिकवणे ही उपाययोजना पालक, शिक्षक आणि समुपदेशक ह्यांनी तातडीने करायलाच हवी. त्यात तडजोड नाही.

त्याचबरोबर बुली करणारा हाही परिस्थितीचा व्हिक्टिम असतो. तो असे का वागत असेल हे समजून घेऊन त्यानुसार उपाययोजना करणे हे बुली होणार्‍या मुलाला सावरण्याइतकेच महत्त्वाचे आहे. कारण दम देणे, मार देणे हे उपाय म्हणजे जखम साफ न करता वरुन नुसते एक बँडेज लावून टाकण्यासारखे आहे. ह्याने ती जखम चिघळेल.

मुलांच्या वागण्यामागची कारणमीमांसा शोधण्याचे काम फक्त आणि फक्त समुपदेशक, ( त्यांच्या मदतीने ) शिक्षकांचे आणि त्या मुलाच्या पालकांचे आहे. ही प्रक्रिया दीर्घकालीन चालणारी आहे. हा तातडीचा उपाय नव्हे.

करकटक खुपसणार्‍या मुलाची बिलिफ सिस्टिम समजावून घेण्यापेक्षा त्या मुलाला ईतर मुलांपेक्षा वेगळे बसवावे सेपरेट बेंचवर आणि घरि पण ह्याची कल्पना द्यावी.आणि त्याच्या बॅगमध्ये ह्या वस्तु आणायला मनाई करावी. >>> दुसर्‍या मुलाला शारीरिक इजा करण्याइतके बुलिंग गंभीर आहे असे शिक्षकांना आणि समुपदेशकांना वाटल्यास ते हे तातडीचे उपाय करणार नाहीत असं तुम्हाला का वाटतंय ?
त्याच वेळी वर्गात अनेक मुलं असल्याने त्यांच्या नजरेतून ह्या गोष्टी सुटतील आणि पालकांच्या आधी लक्षात येतील हे शक्य आहे. अशावेळी मुलाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन तुम्ही हे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून द्यायला हवं.

एकतर हे करायचंय किंवा ते अशी ही either-or situation नाही. बुली होणार्‍या मुलाची सुरक्षितता आणि मुळात बुलिंग होऊच नये ह्यासाठी प्रयत्न करणे ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

कर्कटक, कात्री, सुरी लाकडी पट्टी वगैरे लागू शकणारी हत्यारे शिक्षणाच्या प्रोसेस मध्ये न वापरता काम होउ शकेल ह्या पद्धतीने शिक्षणाचा अभ्यास क्रम आखता आला पाहिजे. पूर्वी ब्लेड ने पेन्सिलीस टोक करत, त्या ऐवजी शार्पनर आले. आता कॉलेजातून प्राण्यांचे डिसेक्षन काढण्याची प्रक्रिया चालू आहे.
शिक्षणाच्या पद्धतीतूनच असे घातक/ पोटेन्शिअली घातक प्रकार काढता आले तर मुलांच्यातील प्रवृत्ती आटोक्यात राहायला मदत होइल.

सर्कल काढायला कोन मोजायला स्वस्तातील टॅब किंवा इतर साधने विकसित करता येतील.

जिथे कार्यानुभव/ सायन्स प्रॅक्टिकल इत्यादी ठिकाणी घातक वस्तू, पदार्थांचा वापर होतो तिथे तो तसा करणार नाही म्हणून मुलांकडून लिहवून त्यावर पालकांची सही घ्यावी. उल्लंघन केल्यास काय शिक्षा होते ते स्पष्ट करावे.

.

आणि हे शास्त्र विकसित होण्याआधीच्या पिढीत मुलांच्या मनात जी 'धाक' नावाची एक भावना असे ती कुठेतरी लोप पावत चालली आहे आणि त्याला आत्ताचे समस्त पालक जबाबदार आहेत हेही स्वीकारायची लाज वाटत आहे का?>>>>> प्लस देणार नाही, कारण लाज वाटते ना. आई वडिलान्चा आणी पूर्वी घरातल्या काका मन्डळीन्चा जो धाक असायचा आणी नजरेची जरब असायची, ती आता उरली नाही.

असे नाही मी म्हणणार की मूल ऐकत नसेल तर द्या चार फटके. त्या फटक्यानी मूल कोडगे बनेल. जे वास्तवात घडलेय. माझ्या मुलीला कॉलनीतला एक मुलगा सतत मारतो, त्रास देतो. मी ४ वेळा समजावुन, ओरडुन काहीच उपयोग झालेला नाही. त्याच्या आई वडिलाना सान्गीतले की ते त्याला पट्ट्याने मारतात. ( आईने पूर्ण मोकळाच सोडलाय, शाळेला पण जात नाही बर्‍याच वेळा. )

शेवटी माझ्या नवर्‍याने त्याला निक्षुन सान्गीतले की परत तू हेच केले तर तुझ्या आई बाबान्समोर मी तुला मारेन, तेव्हा कुठे तो आता शान्त बसलाय. नाही तर घाणेरड्या शिव्या पण द्यायचा. त्याच्या वडिलान्ची बदली झालीय, आणी आईचा काहीच धाक नाहीये. पण माझ्या मुलीने पर्याय शोधलाय, वाचन आणी ड्रॉईन्ग.

बाहेर मोकळ्या हवेत खेळायला तिला आवडायचे, पण या असल्या मुलान्मुळे तिची जाम कोन्डी झालीय. आम्ही कॉलनी बदलु शकत नाही, निदान आता तरी तसा विचार नाहीये. पण पर्याय शोधावे लागत आहेत.

खरे तर समुपदेशनानी माणसाचे वागणे मेजरेबल बदलते ह्याला च काही पक्का आधार आहे का?

हा प्रश्न इथे अवांतर आहे पण मी स्वता ४-५ महीने डिप्रेशन वर समुपदेशन करुन घेतले आहे. माझ्या नशिबाने डॉक्टर फक्त समुपदेशक नव्हते तर मेडिकल डॉक्टर होते, त्यामुळे ते अँटी डिप्रेसंट पण देत होते. मीच ५ महिन्यांनी कंटाळलो ( आणि १००० रुपये एका तासाचे देउन ) आणि आपोआप बरा झालो आणि समुपदेशन बंद केले. पण औषधांचा मात्र चांगला उपयोग होतो हे नक्की.

पुन्हा समुपदेशनाकडे.

१. जसे आधुनिक वैद्यकात औषधाची क्लिनिकल ट्रायल घेतली जाते ज्यात एका समुहाला औषध, एकाला काहीच नाही, आणि एकाला खोटे औषध ( प्लॅसिबो साठी ) दिले जाते आणि मग निकाल लागतो. समुपदेशनात ज्या व्यक्तीला समुपदेशन केले जाते आहे ते केले कींवा नाही केले तर काय होईल हा फरक कळणे च शक्य नसतो. त्यामुळे जर काही पॉझिटीव्ह बदल झाला तर तो समुपदेशनानेच कशामुळे?.
२. काळ हे बर्‍याच गोष्टींवरचे औषध असते, समुपदेशन हा प्रकार बराच काळ चालू असल्यामुळे नक्की फरक कशामुळे पडला हे कसे कळणार? मधल्या काळात त्या करकटक खुपसणार्‍या मुलाला बापानी चांगला ठोकुन काढुन दम दिला म्हणुन पण तो गप्प झाला असु शकतो.
३. हल्लीची सायकॅट्री ( औषध वाली ) समुपदेशन वगैरे काही मानतच नाहीत. सर्व केमीकल प्रॉब्लेम आहेत आणि ते औषधानेच नियंत्रीत करता येतात असे त्यांचे म्हणणे आहे.

टोचा मी असहमत आहे.
घोड्याला पाण्याजवळ नेणं पॉसिबल आहे, पाणि प्यायचं की नाही ते घोडाच ठरवतो.
घोड्यानं पाणी प्यायलं नाही तर त्याला तिथवर नेणार्‍याचा काय दोष?

बाकी चालू द्या.

रश्मी, या केसमधे सोसायटीतल्या बाकिच्या लोकांनी पण एकत्र यायला हवे. हा त्रास सर्वांनाच होत असणार.

खरं, तर मितान ने ज्या उपरोधाने लिहिलेय ते मला पटले नाही. इथे धागाकर्तीने ज्या बाजूने प्रश्न विचारला आहे, तसेच उपाय किंवा त्यावरची चर्चा व्हायला हवी होती. दुसरी बाजू असतेच.

मला, टोचा यांनी लिहिलेले पटतेय.

बुली होणार्‍या मुलाची सुरक्षितता आणि मुळात बुलिंग होऊच नये ह्यासाठी प्रयत्न करणे ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. >> यू सेड इट अगो.

मी पण ही चर्चा वाचतेय. मितान च्या पोस्ट्स छान आहेत.
पण बेफी किंवा इतर लोकांनी विचारलेले प्रश्न ही सामान्य माणसाच्या मनातून आलेले असल्याने मितान ने त्यावरही उत्तर द्यायला हवं असं वाटतंय.

काही लोकांनी मितानच्या पोस्ट्सना चांगलं म्हणणार्‍यांना कंपूबाज म्हणणं अगदीच खटकलं. हेल्दी चर्चा होत असताना मनात आलेले काही वेगळे विचार बोलून दाखवलेच पाहिजेत आणि त्यांना हिंसक वळण दिलच पाहिजे असं नाही.

.

दिनेशजी कॉलनीतल्या फ्लॅट धारकान्ची तोन्डे वेगवेगळ्या दिशेला आहेत. ते कधीही कुठल्याही विषयावर एकत्र येऊ शकणार नाहीत, याचे विचीत्र अनूभव आम्ही घेतलेत. त्यामुळे पूर्वी शेजारधर्म म्हणून जी चीज अस्तित्वात होती, तिच्यावरचा आमचा विश्वास उडालाय. आम्ही तो शेजार धर्म अजूनही पाळतो, पण बाकी मेम्बर्स एकमेकात जाम भान्डतात, त्यामुळे आम्ही आता दूरच राहतो.

खूप प्रयत्न केले मिटिन्ग मध्ये पण बाकी मेम्बर्स उदासीन आहेत. याच मुलाने बाकीच्यान्च्या गाड्याना ब्लेडने स्क्रॅच केलेय. पण स्वतःच्या गाडीला तो हात लावु देत नाही कुणाला. १० वर्षाच्या मुलाची अक्कल बघा केवढी आहे.

तळे राखील तो पाणी चाखील असे दिवस आलेत आता.

.

इतके अवघड का जात आहे अनेकांना, हे मान्य करणे, की खूप अभ्यासपूर्ण रीतीने विकसित झालेले एखादे शास्त्र हे प्रत्येक आणि प्रत्येकवेळी उपायकारक असतेच असे नाही? आणि हे शास्त्र विकसित होण्याआधीच्या पिढीत मुलांच्या मनात जी 'धाक' नावाची एक भावना असे ती कुठेतरी लोप पावत चालली आहे आणि त्याला आत्ताचे समस्त पालक जबाबदार आहेत हेही स्वीकारायची लाज वाटत आहे का?>>>>>>>>>> बेफि़जी, आपल्या विधानाशी १००% सहमत.

.

खूप काही लिहायचे आहे पण वेळेअभावी लिहित नाही.

मितान तुझा प्रत्येक शब्द खूप महत्वाचा आहे. आणि सेन्सिबल सुद्धा

दांडगाईला दांडागाईने उत्तर किंवा त्या मुलाची आणि त्याच्या पालकांची दांडगाई कमी होण्याची वाट पाहाणे हे दोन वेगवेगळे चॉईसेस आहेत आणि वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांसाठी आहेत. there is no standard answer प्रत्येकाच्या प्रॉब्लेम नुसार, situation नुसार solution बदलणार. ह्यात कोणी चूक नाही आणि कोणी बरोबर नाही.

मितानने वर लिहिले आहे त्याप्रमाणे लेबलिंग करणे योग्य नाही हे मोठ्यांना आणि मायबोलीकरांनाही लागू होतेच.
एखादा क्रूर किंवा एखादा मवाळ कशासाठी? why are you people getting personal? एखाद्याला एखादी कृती क्रूरपणाची वाटली त्याने ते बोलून दाखवले, एखाद्याला दुसर्‍याचे वाट पाहाणे मवाळपणाचे वाटले त्याने ते बोलून दाखवले. प्रत्येकानी आपली बाजू कशी योग्य हे सांगितले. एवढं पुरत नाही का?

इथे कोणी कोणाची परिक्षा नाही घेत आहे. की ज्याची मते पटत नाहीत त्याच्या घरात जाऊन आपल्याला राहायचे नाही आहे. समोरच्याने आपल्या म्हणण्याला योग्य म्हटलेच पाहिजे ह्यासाठी केवढा तो अट्टहास.

दांडगट मुलांची दांडगाई कमी होईल पण मायबोलीकरांची एकमेकांना मूर्ख ठरवण्याची सवय काही कमी व्हायची नाही.

मितानने वर लिहिले आहे त्याप्रमाणे लेबलिंग करणे योग्य नाही हे मोठ्यांना आणि मायबोलीकरांनाही लागू होतेच.
एखादा क्रूर किंवा एखादा मवाळ कशासाठी? why are you people getting personal? एखाद्याला एखादी कृती क्रूरपणाची वाटली त्याने ते बोलून दाखवले, एखाद्याला दुसर्‍याचे वाट पाहाणे मवाळपणाचे वाटले त्याने ते बोलून दाखवले. प्रत्येकानी आपली बाजू कशी योग्य हे सांगितले. एवढं पुरत नाही का?

इथे कोणी कोणाची परिक्षा नाही घेत आहे. की ज्याची मते पटत नाहीत त्याच्या घरात जाऊन आपल्याला राहायचे नाही आहे. समोरच्याने आपल्या म्हणण्याला योग्य म्हटलेच पाहिजे ह्यासाठी केवढा तो अट्टहास.

दांडगट मुलांची दांडगाई कमी होईल पण मायबोलीकरांची एकमेकांना मूर्ख ठरवण्याची सवय काही कमी व्हायची नाही.>>>>>>++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++१११११११११११
१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
११११११११११११११११११

अहो बेफि, असं काय करताय?
नव्या वळणासाठी काही स्पेसिफिक नव्या भिडूंचा समावेश झालाय की चर्चेत !
तुमच्या परममित्राकडे पासवर्डही मिळेल त्यापैकी काहींचा Wink

.

हम्म!
कनक २७, तुम्हाला सॅपल कॉपी हवी होती ना? http://www.cde.ca.gov/ls/ss/se/samplepolicy.asp

बुलिंग बाबतची प्रक्रिया अनेक प्रकारे हाताळावी लागते. बुलिंग होऊ नये म्हणून सातत्याने प्रयत्न. यात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक, अ‍ॅडमिन वगैरे मंडळींना मार्गदर्शन आणि जोडीला त्रास देण्याची संधी मिळू नये म्हणून प्रत्यक्ष उपाय योजना - यात सुरक्षिततेसाठी करकटक, टोक असलेली कातर, जेवणाचा काटा वगैरे शाळेत आणायला बंदी, जिने, बाथरुम्स, हॉलवे, शाळेचे ग्राउंड अशा दांडगट मुलांसाठी मोक्याच्या जागांबाबत विशेष दक्षता वगैरे उपाय येतात. या कामात शिक्षकांना मदत म्हणून पालक सभेतर्फे वॉलेंटियर्स. - निम्म्या पालकांनी वर्षातून एकदा अर्धा दिवस वॉलेंटियर म्हणून काम केले तरी खूप मदत होते.
बुलिंग झाल्यास पिडीत मुलाच्या सुरक्षिततेसाठी विशेष प्रयत्न. यात त्या मुलाला खास बडी देण्यापासून ते दांडगट मुलांना या मुलापासून कटाक्षाने दूर ठेवणे.
बुलिंग करणार्‍या मुलासाठी तात्पुरता उपाय म्हणून शिक्षा(यात काही काळ शाळेतच जादा अभ्यास ते काही काळ शाळेत यायला बंदी, जोडीला मधल्या सुट्टीत खेळायला बंदी वगैरे) आणि दीर्घकालिन उपाय म्हणून गरजे प्रमाणे काउंसेलिंग. जाणून बुजून केलेली गंभीर स्वरुपाची दुखापत वगैरे असेल तर शाळेतून नाव काढून टाकणे, पोलिसात तक्रार वगैरे उपाय करावे लागतात.

शाळेची याबाबत सुस्पष्ट पॉलिसी हवी. अ‍ॅडमिशन देतानाच विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून काय अपेक्षा आहेत, शिस्त भंग झाल्यास काय प्रकारची कारवाई होइल, तक्रार करायची प्रोसिजर, कशा प्रकारे दखल घेतली जाईल, अपिल प्रोसेस काय आहे हे लिखित स्वरुपात हवे. लहान मुलांच्या बाबतीत वर्षाच्या सुरुवातीला पोलिसकाका प्रत्येक वर्गात येऊन मुलांशी बोलून गेले तरी खूप फरक पडतो.

मध्यंतरी आमच्या गावच्या शाळेत बुलिंग आणि एकूणच वर्गातील वाईट वर्तनाबाबत शाळेने उपाय योजला - पालकांनी आपल्या पाल्याला ताबडतोब येऊन घरी घेऊन जाणे. यात पालकांना कामावरून सवलत घेऊन शाळेत येणे, मुलाला घरी नेणे, मुल लहान असेल तर त्याच्या सोबत घरी थांबणे किंवा पर्यायी व्यवस्था करणे, बुडालेला अभ्यास भरुन काढणे वगैरे त्रास होत असल्याने आपोआप पाल्याला घरुनच वर्तनाबद्दल तंबी मिळू लागली/ शिक्षा होऊ लागली. आपोआप शाळेतील त्रासदायक वर्तनाच्या घटना कमी झाल्या.

मायबोलीवरच्या सगळ्यांनाच (अर्थात जेन्यूईन अपवाद आहेतच) आपल्याला जे ज्ञान आहे तेच सर्वथा परिपूर्ण आहे अशी खात्रीच आहे, नव्हे त्यापलिकडे सर्व मिथ्या आहे असा त्यांचा ठाम विश्वास आहे. अश्या चर्चा म्हणजे चालून आलेली सुवर्णसंधी, ज्यामध्ये ईतरांचे नाक दाबून आपले परिपूर्ण ज्ञान त्यांच्या गळी ऊतरवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. तुम्ही डॉक्टर, वैज्ञानिक, स्पेशालिस्ट असाल तरी , फुकट सल्ला दिला रे दिला की त्याचबरोबर थोडं सोलपटायचीही तयारी ठेवा. हेच काम तुम्ही पैसे घेऊन करत असल्यास समोरचा निमूटपणे फाटे न फोडता, आक्रस्ताळेपणा न करता ऐकतो हा अनुभव तुम्हाला व्यवहारातही आलाच असेल.
त्यात बेफिकिरांसारखे प्रत्येक धाग्याची आणि चर्चेची व्यवस्थित वाट लावणारेही तज्ञ आहेत. ही थेट शेरेबाजी वाटल्यास वाटू द्याच, धाग्यांची वाट लावण्यासारखे सत्कर्म करणार्‍याला त्याचे क्रेडीट द्यायलाच हवे.(सध्या ते रिकामटेकडे असल्याने भविष्यातल्या सगळ्याच चर्चांचे भवितव्य अंधारात आहे हे तर ओपन सीक्रेट आहे)
कन्स्ट्रक्टिव चर्चा कशी असावी आणि मायबोलीवर ती अपवादानेच का घडते ह्यात अ‍ॅडमिन टीमने लक्ष्य घालणे जरूरी आहे. हे सगळे असेच घडत राहिल्यास आणि त्याबद्दल आजिबातच काही अ‍ॅक्शन न घेतल्यास पहिल्या पोष्टीपासून गुद्दागुद्दी चालूच राहणार आणि खरोखर हातभार लाऊ शकणारे लोक डिस्करेज होत राहणार.

थॅन्क्स स्वाती२. चांगली पोस्ट.

मितान, तीन पोस्ट मध्ये फोल्ड होण्याची गरज नाही. स्ट्रक्चरड एन्व्हायरमेंट मध्येही बुलिंग हाताळणे अवघड असते. तुझ्या पोस्ट्स उपयोगी होत्या. कौन्सेलिंग चांगले असले तरी त्याचा सक्सेस रेट बद्दल काही अभ्यास झाला आहे का? हा योग्य प्रश्न आहे. हे तपासणे अवघड असेल. पण ज्या शाळेत कौन्सेलर नियुक्त आहे आणि जिथे नाही (किंवा कौन्सेलर असताना शाळा आणि नसताना तीच शाळा) असा काही अभ्यास झाला आहे का?

बेफिकीर टोचा ह्यांचे काहि पाॅईंट व्हॅलिड आहेत कोणी लाॅजिकल ऊत्तरे त्यांना दिली तर त्यांचे पण काऊन्सिलिंग होईल Happy आणि मितान प्लिज तुमच्याकडुन वाचायला नक्किच आवडेल

थॅन्क्स स्वाती२, for सॅपल कॉपी. मस्तच पोस्ट. किति चान्गलि शाळा आहे तुमचि.

शाळेची याबाबत सुस्पष्ट पॉलिसी हवी. अ‍ॅडमिशन देतानाच विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून काय अपेक्षा आहेत, शिस्त भंग झाल्यास काय प्रकारची कारवाई होइल, तक्रार करायची प्रोसिजर, कशा प्रकारे दखल घेतली जाईल, अपिल प्रोसेस काय आहे हे लिखित स्वरुपात हवे. लहान मुलांच्या बाबतीत वर्षाच्या सुरुवातीला पोलिसकाका प्रत्येक वर्गात येऊन मुलांशी बोलून गेले तरी खूप फरक पडतो. >>> हा उपाय बेस्ट. पण हा उपाय योजने शाळेवर आहे. इथे कोणि खुप सिरियस्लि घेत नाहि.

ध्यंतरी आमच्या गावच्या शाळेत बुलिंग आणि एकूणच वर्गातील वाईट वर्तनाबाबत शाळेने उपाय योजला - पालकांनी आपल्या पाल्याला ताबडतोब येऊन घरी घेऊन जाणे. यात पालकांना कामावरून सवलत घेऊन शाळेत येणे, मुलाला घरी नेणे, मुल लहान असेल तर त्याच्या सोबत घरी थांबणे किंवा पर्यायी व्यवस्था करणे, बुडालेला अभ्यास भरुन काढणे वगैरे त्रास होत असल्याने आपोआप पाल्याला घरुनच वर्तनाबद्दल तंबी मिळू लागली/ शिक्षा होऊ लागली. आपोआप शाळेतील त्रासदायक वर्तनाच्या घटना कमी झाल्या. >> हा उपाय पण बेस्ट. हे पण शाळेवर आहे.

मी हि सॅपल कॉपी बाईना दाखवेलच. आपण पालक म्ह्णुन काय करायला हव हे ठरवण अवघडच आहे. आम्हाला लहानपणि कधि असा problem आला नाहि. मला खुपच चिडचिड होते अस काहि झाल कि. एका मुलाला मोठ करण किति अवघड झाल आहे.

वेल >> ++१

जे कुणी ३५ + आहेत त्यांच्या आधीच्या पिढीत मुलांना स्वातंत्र्य देण्याची वृत्ती असेल, मुलांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून ट्रीट करण्याची दृष्टी असेल,व्यवहारज्ञान चांगलं असेल अशांची मतं हल्लीच्या पिढीला आवडतील. आताच्या पिढीत मुलांशी कसं वागावं याबद्दल खूप वेगळी मतं आहेत. तो फरक राहणार हे लक्षात घ्यायला पाहीजे. हवं तेव्हढं घावं बाकीचं पटत नसल्यास सोडून द्यावं. आपल्याला काही पद्मभूषण मिळवायचं नाही.

दोने जुने मराठी पिच्चर आताच पाहीले. एकत निळू फुलेच्या मुलाची कंप्लेन केलेली असते, दुस-यात दिलीप प्रभावळकरांना गावातला पातील मुलाला का मारलं म्हणून दम देतो. मुलाला जशास तसं शिकवायची इच्चा असणा-यांनी या शक्यता विसरू नयेत.

म्हणजे वय वर्षे ६ ते १२ या वयोगटातले मुले स्वसमोहनाने बरी होतीलच.

दुस-यात दिलीप प्रभावळकरांना गावातला पातील मुलाला का मारलं म्हणून दम देतो. >>>>अशोक॑ सराफचा मास्तुरे वाला भूताचा शिणुमा का? झकास होता तो.

नाही नाही, नुस्त संमोहन. स्व म्हणजे स्वताच करायचं अस काहीतरई झेम्गट असल.

दिलीप प्रभावळकरांना मारतात बहुतेक. (पूर्ण नाही बघितला). मुलांना उत्तर द्यायला शिकवलं तर अंगाशी येऊ स्शकतं.

.

Pages