मुलांच्या दांडगाईने वागण्याबाबत इतर मुले, इतर पालक आणि शाळा ह्यांनी काय करावे?

Submitted by वेल on 25 August, 2014 - 04:33

आजच शाळेतल्या एका पालकाकडून कळले की तिच्या मुलीला (पहिलीतल्या) तिच्याच वर्गातल्या मुलाने ढकलले. ती मुलगी स्वतःच्या जागेवर बसली होती आणि हा मुलगा त्या बेंचच्या बाजूने चालला होता. त्या मुलीचे नाक फुटून रक्त आले. ती मुलगी खूप घाबरली आहे.

त्या पालकाने शाळेत तक्रार केलेली आहे. शाळा नियमानुसार काय करायचे ते ठरवेल.

पण आपल्या मुलांनी अशा मस्तीखोर मुलांसोबत कसे वागावे? त्या मुलांपासून लांब राहावे हा उपाय नाही कारण ह्या परिस्थितीत ती मुलगी त्या मुलाच्या अध्यात मध्यातही नव्हती,

आपण आपल्या मुलांना अशी परिस्थिती हाताळायला शिकवताना काय शिकवावे? शिक्षकांकडे तक्रार करणे हा एकच ऑप्शन आहे का?

मला काही उपाय सुचले ते असे -

आपल्या मुलांना stand united शिकवावे. कोणी इतर कोणाला त्रास देत असेल तर ज्याला त्रास होतोय त्याची बाजू घेऊन आपण त्या त्रस देणार्‍या मुलाला हे लगेच थांबव असे शांत पण ठाम शब्दात सांगावे ( सहा वर्षाच्या मुलाकडून खूप जास्त अपेक्षा होत असेल कदाचित पण मी हे माझ्या मुलाला प्रॅक्टिकली कसं करायचं ह्याचा डेमो दिला आहे. तो ते तसं करू शकेल की नाही माहित नाही.)

त्रास देणारा हामुलगा नेहमीच इतर मुलांना त्रास देतो त्यामुळे त्या मुलाच्या वागण्याविरुद्ध शाळेत लेखी तक्रार करावी. आणि ह्यामध्ये मुलाला काउंसेलिंग देण्याची मागणी करावी. शिवाय पुन्हा असेच होत राहिल्यास पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करण्याची धमकी द्यावी.

कृपया तुमची मते मांडा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या वेळेला काय करायला हवं यावर शाळेत मिटींग सुरू आहे.>> सर्टनली अ पोलिस केस.

राजकारणी ओळखीचे असतील तर मदत होतेय का बघावे. (हे शाळेच्या लेव्हल वर. वैयक्तिक काहीच नसावे)

बा द वे, मुळ लेखासाठी,
क्लासटिचरना बरीच प्रकरण हॅण्डल करता येतात अगदी नीट.
आपण आक्रस्ताळेपणा करण्याऐवजी प्रथम त्यांची भेट आणि रितसर तक्रार करणे गरजेचे आहे.
मुलाच्या शाळेत एक प्रकरण क्लास टीचरनी त्यांच्या लेव्हलला पालकांना सोबत घेत प्रसंगी पालकांना हे असेच सुरु राहिले तर सस्पेन्शन आणि इतर कारवाईची माहिती देवुन हॅण्डल केलय.
घरी मुलांना देखील तुम्ही समजाउन सांगा ज्याच्याशी होतात त्याच्यापासुन (हा सल्ला दोन्ही पार्टीना शाळेत दिलेला आहे).

अर्थात शाळा प्रशासन कडक आहे.
राजकारण्यांना त्या शाळेत एखादी अ‍ॅडमिशन तुमच्या शब्दाखातर म्हणुन त्यानी दिलेली असते.
त्या रिलेशनचाही सपोर्ट होत असेल. पण फारशी बाहेरच्या अशा गोष्टीनी भिक न घालणारी शाळा म्हणुनच प्रसिद्ध आहे.

>>> इब्लिस | 25 August, 2014 - 20:27 नवीन

भूषणदादा,
तुमच्या मुलाने असं वागलं शाळेत तर तुम्ही काय कराल ते लिहा आधी.
हे कसले १-२-३-४ मुद्दे लिहिताहात?
शी!
<<<

माझा मुलगा असा वागणार नाही ह्याची दक्षता सर्वप्रथम, वागला तर पुन्हा वागणार नाही असा सज्जड दम आणि वागला असल्यास ज्याच्याशी वागला त्या पाल्याला व त्याच्या पालकांना भेटून मनापासून माफी मागणे व काही नुकसान भरपाई देणे उचित असल्यास ती त्वरीत देऊ करणे हे मी करेन!

बेफिकीर तुमचे मुद्दे खरच चान्गले आहेत. पण आजकाल ते आपल्या सारखे राहीलेले नाही. सगळ्याना आजकाल एकच मूल ( क्वचीत २ ) आणी ते ही अती लाडावलेले त्यामुळे असे प्रॉब्लेम तयार होतायत. सन्वाद हरवलाय आणी शाळा व पालक यात खरच दरी निर्माण झालीय.

आजच मुलीची शिक्षीका म्हणाली की तुम्हाला निरोप दिला तर तुम्ही येता तरी, बाकीचे पालक २-३ महिने सुद्धा विचारणा करत नाहीत मुलान्बद्दल. आम्ही २ -३ वेळा नोटीस देतो, नाहीच आले तर मग पुढे विचारत पण नाही, कारण आमच्यावर पण लोड असतो.

>>>सन्वाद हरवलाय आणी शाळा व पालक यात खरच दरी निर्माण झालीय.<<<

एक खूप चांगले विधान!

>>>पण आजकाल ते आपल्या सारखे राहीलेले नाही. सगळ्याना आजकाल एकच मूल ( क्वचीत २ ) आणी ते ही अती लाडावलेले त्यामुळे असे प्रॉब्लेम तयार होतायत<<<

मी स्वतः एकुलता एक आहे आणि प्रचंड धाकात वाढवला गेलेलो आहे. प्रॉब्लेम एकुलता एक असण्याचा कदाचित नसावा, प्रॉब्लेम संपन्नतेतून आलेल्या अनाठायी आक्रमकतेचा असावा असे मला तूर्त वाटते.

>>>इब्लिस यानी ही वरची पोस्ट वैयक्तीक रित्या तुम्हाला उद्देशुन लिहीली आहे असे मला वाटत नाही, तर ती उपरोधाने लिहीली आहे असे वाटतेय<<<

माझ्या खर्‍या नावाने त्यांनी ती पोस्ट लिहिल्यामुळे मला ती वैयक्तीकरीत्या ट्रीट करणे आवश्यक होतेच, त्यांनी 'बेफी' म्हणून लिहिले असते तरीही तशीच ट्रीट केली असती. Happy

बरोबर आहे.:अरेरे: पण का कोण जाणे ती पोस्ट तुम्हाला मुद्दाम उद्देशुन असावी असे नाही वाटले, त्यात उपरोध जाणवला. म्हणजे इब्लिस याना काय म्हणायचे आहे ते मला कळलेय, पण मलाच ते शब्दात मान्डता येत नाही. लिखाण आणी गणित यान्चाशी माझा जरा ३६ चा आकडा आहे.

आय एन्टायरली अ‍ॅग्री विथ यू रश्मी!

बहुधा इब्लिस ह्यांना असे म्हणायचे आहे की येथील किती पालकांनी प्रश्नाची शहानिशाही करण्याआधी आपल्या पाल्याबाबत तक्रार आली किंवा आपल्या पाल्याने तक्रार केली ह्या संदर्भात स्वतःच्या पाल्यावर काही संस्कार केले?

ते अनेकदा योग्य मुद्दे अयोग्य शैलीने मांडतात हे सर्व माबोमित्रांप्रमाणेच मलाही माहीत आहे Happy

बेफि, भलतेच पेशंट आहात बुवा तुम्ही Wink

असो, माझी मुलगी पहिली दुसरी मधे असतानाचे किस्से साधारण असेच आहेत.
आम्ही चिडूनच गेलो मुख्याध्यापिकांकडे, त्यांनी वर्गशिक्षिकांना आणि त्या त्रासदायक ३/४ मुलांना बोलावून घेतले.
आणि आमच्यासमोरच त्या मुलांना "पोलिसांना बोलावेन" असा दम दिला होता.
नंतर आम्ही शाळाच बदलली.

तिकडचे इश्यूज आपल्याला (म्हणजे तुम्हाआम्हाला) समजतीलच असे नाही इब्लिस, तिकडे 'गन लहान मुलाच्या हातात असू शकते' असेही प्रॉब्लेम्स असतात.

त्रासदायक मुलांशी 'सर्वांनी' कसे वागावे हा बहुधा मेजर प्रॉब्लेम असावा.

चु भु द्या घ्या

त्रासदायक मुलांशी 'सर्वांनी' कसे वागावे हा बहुधा मेजर प्रॉब्लेम असावा.>>> अहो नुसतीच मुले नाही तर त्यान्चे पालकही.

असे फिजिकल नेचरचे प्रॉब्लेम एलिमेन्तरी लेव्हल ला तरी नसतात, इथे प्रिस्कुल चे २-३ वर्श( भारतातले प्ले-ग्रुप ते सिनियर केजि वैगरे)फक्त शेअरिन्ग, सर्कल टाइम, रुटिन मधे गोश्टि करणे यावर खर्च होतात, एवेन केजि च बरच वर्श ही त्यातच खर्च होते. याने शिस्तबद्धता येते, दुसर्‍याची वस्तु विचारुन घेणे, स्वतःच्या वस्तु निट हाताळणे, प्लिज्,थॅन्क्यु मॅनर्स चे ईम्प्लिमेन्टेशन इत्यादी
त्यामुळे वर नमुद केलेल्या समस्या इथे अगदी प्रायमरी लेव्हल ला फार प्रकर्षाने जाणवत नाही तरिही काही मुल प्रच.न्ड बुली असतात त्या.न्ना पण शिक्षक आणि पालक इतराच्या लेव्हलला आणण्याचे प्रयत्न करत असतात्च. यावर शाळा मधे सतत अ‍ॅन्टि-बुलिन्ग वर चर्चासत्र असतात्,मुला.न्ना सुद्ध त्यात सामिल करुन घेतले जाते.
/ अर्थात सगळ अगदी आलबेल नसतच (काय नाहिच आहे!!) माध्यमिक आनी उच्च माध्यमिक ला हे प्रकार वेगळ स्वरुप घेवु शक्तात.

पण, ऑथरीटि त्यात नियमाला धरुन कारवाई करतात्,करु शकतात.
(वरच सगळ माझ्या वै.अनुभवा वरुन लिहलय, जो अजुनही अ‍ॅज अ पालक एलिमेन्टरी स्कुल पर्यत मर्यादित आहे)

बापरे! डेन्जर आहे हे सगळं!
ते दुसऱ्याच्या वहीत चित्र काढणं- म्हणजे दोन वर्षाच्या बाळाला नाही कळत आपलं-दुसऱ्याचं असा फरक. पण दुसरीतल्या मुलाला कळतो तो फरक. तरी दुसऱ्याची वही घ्यायची हे चूकच. आशिकाने आई म्हणून योग्यच केलं!
आमच्या लहानपणी हे प्रकार शाब्दिक चिडवाचिडवी किंवा डबा पळवणं, पेन्सिल पळवणं इतपत मर्यादित असायचे. फिजिकल धोका नसायचा. आता हे खरंच रिस्की होत चाललंय. चिडवाचिडवीमुळे मुलाच्या मनावर उठणारे ओरखडे नंतर पुसता येतात पण खरंच एखादयाला डोळा, चेहरा किंवा हातापायाला कायमची दुखापत झाली तर कठीण.

हतोडावालांचाच उपाय लागू पडल्याची उदाहरणं समोर आहेत. तुम्ही गप्प बसून ऐकून घेणार नाही, तुमच्या मुलाला त्रास झाला तर त्या गुंड मुलाला सोडणार नाही- हे प्रेशर लागू पडतं.

आमच्या लहानपणी हे प्रकार शाब्दिक चिडवाचिडवी किंवा डबा पळवणं, पेन्सिल पळवणं इतपत मर्यादित असायचे. फिजिकल धोका नसायचा. आता हे खरंच रिस्की होत चाललंय. चिडवाचिडवीमुळे मुलाच्या मनावर उठणारे ओरखडे नंतर पुसता येतात पण खरंच एखादयाला डोळा, चेहरा किंवा हातापायाला कायमची दुखापत झाली तर कठीण. >>>+1

माझे वैयक्तिक अनुभव - असाच त्रास एका मुलीच्या (पहिली) वर्गात एक मुलगा देत होता. तिच्या पालकानी बाकी कोणाही पालकाना सांगितले नाही. शाळेने काहीही कर्यवाही केली नाही. शेवटी मुलीच्या मैत्रिणिच्या पालकानी तिची शाळा बदलली. मी मुलीशी यावर खूप चर्चा केली आहे.

तुमचा एकतेचा मंत्र आवडला. टारगट मुलेदेखिल त्यातल्यात्यात मऊ मुले शोधतात. त्यामुळे काही जण जर गट करून असतील तर त्रास होण्याशी शक्यता कमी होते. त्यासाठी तिनचार जणींचा गट करून एकत्र रहाण्यास सांगा. तसेच त्यांच्या पालकांशी देखील बोला.

(एका पद्धतीच्या) कराटेमधील नियम - जेथे पळून जाता येते तेथे पळून जावा. मुलीलाही प्रथम सांगा तुला जर सुरक्षित वाटले नाही तर जेथे सुरक्षित वाटते तेथे जा. पण ते शक्य नसेल तर बचाव (स्वसंरक्षण) करण्यासही प्रव्रुत्त करा. आपले मूल खूप मउ असेल तर त्यास धीट होण्यासाठी प्रयत्न करा. पण काहीवेळेला हे शक्य नसते कारण उपजत प्रव्रुत्ति बदलता येणे अवघड असते. अशावेळी मुलीकडे शिट्टी द्या. वेळ पडल्यास जोरात वाजवायला सांगा.

ततुमचा प्रश्न ह्यापैकी कोणत्या स्तरावर आहे ते ठरवा. सुरक्षा - आत्मसन्मान - स्वातंत्र्य - comfort. सुरक्षेवर कधीही तडजोड नको. आत्मसन्मान - स्वातंत्र्य कधीतरी नसले तरी चालते. comfort नसले तरी चालते.

प्रत्येक प्रसंग शिक्षकाना आणि घरी सांगितलाच पाहीजे हे सांगा. स्वतः नियम/कायदा हातात शक्यतो घेउ नका.

ता. क. - मी स्वत: लहानपणी खूप दांडगट होतो व इतर मुलांबरोबर प्रसंगी मरामारी देखील केली आहे..

सुसुकु प्रतिसाद आवडला.
अनेकांनी खूप चांगले प्रतिसाद दिले आहेत.
सगळ्याच शाळांमधुन हा प्रश्न सध्या जाणवतो आहे. याची कारणे प्रत्येक केस नुसार वेगळी असतात.त्यामुळे सरसकटीकरण करण्यात येऊ नये.

अगदी लहान मुले 'दुष्टपणा करायचा म्हणून' बुलिंग करत नाहीत. दुसर्‍याची वही घेणे, दुसर्‍याचा डबा खाणे इ प्रकार बेशिस्त या प्रकारात मोडतात. बुलिंग मध्ये नाही. त्यांना समजलेच पाहिजे वगेरे म्हणणार्‍यांनी आपण किती वर्षाच्या मुलाकडून अचुक वर्तनाची अपेक्षा ( की मागणी) करत आहोत याचे भान ठेवावेच !

हग्या दम देणे, मारणे, हवेत लटकवून खाली फेकण्याची धमकी देणे, शारी. इजा करण्याची धमकी देणे असे करण्यात 'समाधान' मानणार्‍यांविरुद्ध बालसुरक्षा कायद्यानुसार तक्रार का करू नये ??

मुळात प्रत्येक वेळी मुलांच्या प्रत्येक वर्तनामागे निश्चितच काहीतरी बिलिफ सिस्टिम कार्यरत असते. ती समजून घेऊन त्यात बदल केला की मुलांचे वर्तन बदलते.

हे करण्यासाठी वेळ लागतो हे मान्य. पण हाच योग्य उपाय आहे. असे मुलांचे मानसशास्त्र सांगते. ( ते मानणे कोणालाही बंधनकारक नाही; त्या शास्त्राची टिंगल करणार्‍यांविषयी माझे काहीच म्हणणे नाही Wink )

तातडीने काय उपाय करावे ?
१. बुलिंग झालेल्या मुलाला 'तुला झालेला त्रास मला समजतोय हे सांगणे, यावर पालक/शिक्षक्/कोणतीही अथॉरिटी म्हणून नक्कीच दखल घेतली गेली आहे हे पोहोचवणे. हेस सेम बुलिंग करणार्‍या मुलापर्यंतही पोहोचवणे.
२. मुलांचा स्वतःचा सपोर्ट ग्रुप असावा. या वयाला तसेही गँग एज म्हणतात. मुलांनी गटात असणं, त्यांचे ग्रुप असणं हे खूप स्वाभाविक असते. त्या ग्रुपला मदतीसाठी बोलावणं.
३. बुलिंग करणार्‍यांनाही पीअर प्रेशर असतेच. तशाच प्रेशरचा उपयोग बुलिंग न करण्यासाठी एक चांगला शिक्षक करून घेऊ शकतो.
४. मोठ्या माणसांची मदत मागणं. यासाठी 'आपण जे बोलतोय ते यांना कळतं' असा विश्वास निर्माण केलेले लोक भोवताली असणं.
५. शारी. इजा कोणी करू लागला तर मोठ्याने ओरडणं, प्रतिकार करण्यासाठी शारी. बळाचा वापर करणं. ( अब्युजमधल्या कित्येक केसेस मध्ये ' असं ओरडायचं नाही, असं मारायचं नाही... इ कंडिशनिंग असलेली मुलं इच्छा असूनही हात उचलत नाहीत. चावत बोचकारत नाहीत, ओरडतही नाहीत Sad )
६. हो आपल्या मुलांना मारता ओरडता चावता बोचकारता आलं पाहिजे. ते कुठे करायचं हे मात्र पक्कं शिकवलं गेलं पाहिजे.

आता दीर्घकालीन उपाय
१. बुलिंग करणारी मुलं आतून भित्री, असुरक्षित असतात. एकाकी असतात. बरेचदा त्यांचा सेल्फ एस्टीम लो असतो. मग स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात असं काहीतरी केलं जातं. हे लक्षात घेऊन मुलांवर लेबल न करता कृतीवर लेबल लावावे.
२. लहान वयातल्या मुलांना चेष्टा आणि बुलिंग यातला फरक समजवून सांगायला हवा. त्यासाठी आम्ही वेगवेगळे रोलप्ले पालकांना करायला सांगतो.
चेष्टा मुलांना सहन करता यायला हवी. त्यातून स्वतःतल्या उणीवांचा स्वीकार करायला मुलं शिकतात.
३. बुलिंग करणारा मुलगा काउन्सेलिंग प्रोसेस मध्ये जाईल याचा आग्रह धरावा. या गोष्टीचा पाठपुरावा करावा. ज्या मुलांना त्रास झाला आहे त्या मुलांना यात सामिल करून घ्यावे.
४. मुलांच्या अँटिबुलिंग कमिटी तयार करून त्यांना अशा केसेस हातळण्याचे स्वातंत्र्य द्यावे. या कमिटीचा गाईड शिक्षक असावा.
मी एका वर्गाबरोबर काम करताना अशाच एका कमिटीने बुलिंग करणार्‍या दोन विद्यार्थ्यांना त्यांनी त्रास दिलेल्या मुलांच्या स्कूलबॅग्स एक आठवडा वाहण्याची शिक्षा दोन मुलांना केली. त्यांनी ती मुकाट भोगली. मात्र हे होताना या विषयावर शाब्दिक चर्चा होणार नाही ही अट मी घातली होती. ती दोन मुले काउन्सेलिंगला येत होतीच आणि शिक्षाही घेत होती. पण तिचा उल्लेख कोणीही केला नाही. मुलांच्या वर्तनात सुधारणा आहे.
५. असे विषय शक्यतो मुलांचे मुलांनी हाताळण्याला जास्त प्रोत्साहन द्यावे.
माझ्या मुलाच्या डोक्यावर त्याच्याच वयाच्या मुलाने पाणी ओतले हा पालकांच्या इगोचा विषय प्लीजच असू नये.

लेबलिंग, चिडवणे, टिंगल या सगळ्या गोष्टी आपण लावून घेतल्या तरच लागतात हे मुलांच्या मनावर अवश्य ठसवावे. तसेच आपले मूल्यमापन करण्याचा अधिकार जगात कोणाला आहे व कोणाला नाही हे ही वारंवार सांगितले जावे. ( यात पालक विवेकी असणे गृहित धरले आहे)

बरेच मुद्दे लिहिलेत. बरेच राहिलेत. पण वेळेअभावी सध्या एवढेच.

वा मितान फारच छान लिहिलं आहेस.

>>>>> लेबलिंग, चिडवणे, टिंगल या सगळ्या गोष्टी आपण लावून घेतल्या तरच लागतात हे मुलांच्या मनावर अवश्य ठसवावे. तसेच आपले मूल्यमापन करण्याचा अधिकार जगात कोणाला आहे व कोणाला नाही हे ही वारंवार सांगितले जावे. ( यात पालक विवेकी असणे गृहित धरले आहे) >>>> पते की बात!

मितान, सुंदर प्रतिसाद!

शारी. इजा कोणी करू लागला तर मोठ्याने ओरडणं, प्रतिकार करण्यासाठी शारी. बळाचा वापर करणं. ( अब्युजमधल्या कित्येक केसेस मध्ये ' असं ओरडायचं नाही, असं मारायचं नाही... इ कंडिशनिंग असलेली मुलं इच्छा असूनही हात उचलत नाहीत. चावत बोचकारत नाहीत, ओरडतही नाहीत अरेरे )
६. हो आपल्या मुलांना मारता ओरडता चावता बोचकारता आलं पाहिजे. ते कुठे करायचं हे मात्र पक्कं शिकवलं गेलं पाहिजे.<<< हे फार आवडलं. यापुढे हे नक्की लक्षात ठेवेन.

लेबलिंग, चिडवणे, टिंगल या सगळ्या गोष्टी आपण लावून घेतल्या तरच लागतात हे मुलांच्या मनावर अवश्य ठसवावे. तसेच आपले मूल्यमापन करण्याचा अधिकार जगात कोणाला आहे व कोणाला नाही हे ही वारंवार सांगितले जावे. ( यात पालक विवेकी असणे गृहित धरले आहे)<<<< +१

वेळ मिळाल्यास अजून विस्तारानं लिही ही विनंती.

मितान धन्यवाद. तू आणि मनीने लिहिण्याची वाट पाहत होते. खूप छान मांडलस. मला जे मुद्दे हवे होते ते खूप चांगले समजावून लिहिलेस.

माझे स्वतःचेही मत असे आहे की कोणतेही मूल मुळातच वाईट नसते. त्याचे वागणे त्रासदायक असते आणि मुलांच्या अशा वागण्यामागे काही कारण नक्कीच असते जे समजून घेऊन एलिमिनेट करायचा प्रयत्न वर्गशिक्षिकेने, शाळेतल्या काउन्सिलर्सने आणि पालकांनी करायला हवा. परंतु बरेचदा ह्या साखळीतली एक कडी काम करत नाही. तिथे साम, भेद, दंड ह्याप्रकारानेच जावे लागते.

मला वाटते मी शिर्षक बदलायला हवे.. अधिक स्पष्ट करायला हवे.

मी दिलेल्या वरच्या उदाहरणातल्या त्रासदायक मुलांच्या तक्रारी मुलांनीच वर्गशिक्षिकेकडे अनेकदा केल्या आहेत आणि वर्गशिक्षिकेने स्वतःहून आम्हाला हे सांगितले होते की कदाचित तुमच्या मुलाने तुमच्याकडे या मुलाबद्दल तक्रार केली असेल तर आम्हाला माहित आहे वर्गातली तीन मुले अशी वागतात आणि आम्ही त्यांच्याशी आणि त्यांच्या पालकांशी बोलायचा प्रयत्नदेखील करत आहोत. असे धरून चालूया की शाळेने काउन्सेलिंग आधीच सुरू केले होते. (तसे नाही आहे हे मला माहित आहे.) असे असतानाही मुलांना जर गंभीर दुखापती होत असतील किंवा होण्याची शक्यता असेल तर "एखाद्याच्या घरची परिस्थिती बरी नाही किंवा त्याचे पालक असे व्हायोलण्ट आहेत किंवा अति शिस्तीचे आहेत म्हणून मूल शाळेत बेशिस्त आहे आणि ह्या सर्वावर कडी म्हणजे मूल लहान वयाचे आहे" ह्या किंवा कोणत्याही कारणास्तव त्या मुलाला किंवा पालकांना सवलत देणे कधीच मान्य केले जाणे योग्य नाही.

मला मान्य आहे काउन्सिलिंग चालू असताना मुलाचे वागणे अचानक रिलॅप्स होऊ शकते. आणि ते वागणे दुसर्‍याला गंभीर दुखापत करू शकते. परंतु कोणत्याही कारणास्तव ह्या गंभीर दुखापती अ‍ॅक्सेप्टेबल नाहीत. आणि मी वर म्हटले तसे जून पासून ऑगस्ट संपेपर्यंत जर मुलांचे आणी पालकांचे काउन्सेलिंग झाले नसेल तर इतर पालकांनी शाळेकडे तशी मागणे ठेवणे आणि त्याला शाळेने किंवा पालकांनी ह्याकडे दुर्लक्ष केल्यास पोलिसांकडे जाण्याची धमकी देणे ह्यात नक्कीच काही चूक नाही. कारण हे दुर्लक्ष एखाद्याला गंभीर दुखापत करू शकते. अजून झाली नसली तरीही. वरच्या उदाहरणात मुलीच्या नाकातून रक्त येणे (आणि त्या मुलाला वर्गशिक्षिका रागवली त्यानंतरही त्याने अजून एका मुलाला जोरात ढकलले परंतु त्या मुलाला लागले नाही) ही गंभीर दुखापतच आहे कारण आज ती मुलगी शाळेत जायला घाबरत होती.

एकदा दोनदा समजावून सुद्धा जर त्रास देणे किंवा बुलिंग चालूच राहात असेल तर केवळ हायर ऑथोरिटेज कडे लेखी तक्रार मांडून गप्प नाही बसता येणार. त्या नुलांना योग्य मेडिसिनल किंवा काउन्सेलिंगची ट्रीटमेण्ट मिळावी ह्यासाठी प्रेशर आणणे खूप गरजेचे आहे. आणि जर समजावून लेखी तक्रारीने काम होत नसेल तर धाक दाखवून करून घेणे महत्त्वाचे, मग मूल सहा वर्षाचे असो, दहा असो की सोळा. (मायबोलीवरच कुठेतरी ज्युवेनाईल क्रिमिनल्सबद्दल बोलणे झाले आहे ना)

स्वाती ह्यांनी माडलेला अ‍ॅण्टीबुलिंग पॉलिसीचा मुद्दाही पटला. त्याचीही मागणी केली जाईल.

मितानचा मुद्दा << लेबलिंग, चिडवणे, टिंगल या सगळ्या गोष्टी आपण लावून घेतल्या तरच लागतात हे मुलांच्या मनावर अवश्य ठसवावे. तसेच आपले मूल्यमापन करण्याचा अधिकार जगात कोणाला आहे व कोणाला नाही हे ही वारंवार सांगितले जावे. ( यात पालक विवेकी असणे गृहित धरले आहे)>> हे इतर पालकांना शाळेतही कम्युनिकेट केले जाईल कारण अनेकदा नकळत पालक स्वतःच आणि शिक्षकही शाळेत मुलांना चिडवतात. किंवा कम्पेअर करतात.

इतर पालकांनी मुलांना स्वतःची लढाई स्वतः लढायला सक्षम बनवलेच पाहिजे आणि अन्यायाविरूद्ध व्यक्त होताना कोणकोणते मार्ग अवलंबवावेत ह्याबद्दल लिहिल्याबद्दल मितान आणी इतर सार्‍यांचे धन्यवाद. ह्यासोबत माझ्या मते जर एखादे मूल स्वतःला थोडे दुर्बळ समजत असेल अथवा अन्यायाविरुद्ध व्यक्त होऊ शकत नसेल तर त्यासाठी सोबतची मुले त्याला मदत करू शकतात आणि पीअर सपोर्ट ग्रूपचा फायदा होतो हेही समजले. हुश्श्य वाटले i was on right track about this.

मितानने आणी इतरांनी मांडलेले मुद्दे हेडरमध्ये अपडेट करण्यासाठी अनुमती द्यावी.

जिथे मुद्दे नावासकट मांदायला नको असेल किंवा नाव आवर्जून यायला हवे असेल त्यांनी मला विपु करावी.

मितान सुरेख प्रतीसाद. पण.....

त्यांना समजलेच पाहिजे वगेरे म्हणणार्‍यांनी आपण किती वर्षाच्या मुलाकडून अचुक वर्तनाची अपेक्षा ( की मागणी) करत आहोत याचे भान ठेवावेच !>>>> हे मी माझ्या लहान वयातच अनूभवलेय, आणी त्याचा परीणाम माझ्या मुलीवर होऊ नये याच विचारातुन माझी एक पोस्ट आहे तशी.

मी ६ ते ७ वर्षाची होते, शेजार्‍यान्कडे एक रन्गीबेरन्गी चित्रान्चे अतीशय सुन्दर असे छोट्से विणकामाचे आणी देशोदेशीच्या प्रवासाचे असे दुसरे पुस्तक होते. सहज म्हणून मी ते उचलुन पाहीले. त्या काकुनी ते नन्तर चार चौघात मोठ्याने बोलुन दाखवले. आणी वर ताशेरे की आमची मुले नाही बाई अशी कुणाकडे जाऊन हात वगैरे लावत.( वास्तवीक यान्च्या मुलानी त्यान्च्या मित्रान्ची खेळणी तोडली होती आपटुन ) मला तशी दुसरीकडे हात लावायची सवय नव्हतीच. आई कडक असल्याने ते शक्यही नव्हते. पण लहानपणापासुन तो प्रसन्ग माझ्या मनात घर करुन राहीला. त्या काकुन्चा स्वभाव काही बदलला नाही. आमचे काही नातेवाईकही या काकु गटातले आहेत

त्याच मुळे माझ्याही मुलीला मी ठामपणे बजावले आहे की कुणाच्याही वस्तुला हात लावायचा नाही. लहान मुलान्मध्ये उत्सुकता असते, कुतुहल असते ते योग्य रितीने शमवणे पालकान्च्या आणी शिक्षकान्च्या हाती असते.

बाकी तू लिहीले आहेस तेच परत लिहीण्यात अर्थ नाही. खूप सुसम्बद्ध रितीने लिहीले आहेस, धन्यवाद. आवडले.:स्मित:

कदाचित हे थोडे अवांतर असेल पण तरीही मला असे वाटते

पालकांचे हे असे वागणे असेल - की समोरचा त्रास देत असेल तरी नियमानुसार वागा, त्याला भीती दाखवू नका, वरिष्ठांकडे लेखी तक्रार करा आणी गप्प बसा - तर ह्या बोटचेप्या वागण्याचा सहन करणार्‍या मुलांवर वाईट परिणाम होतो. मग त्यातून आयुष्यभर सहन करायची सवय लागते आणि ह्यातूनच हुंडाबळी जातात, मुलींना छेडछाड सहन करायची सवय लागते आणि दांडगाई करणार्‍या मुलांनाही सवय लागते मी काही केले तर चालते असा त्यांचा भ्रम होऊ शकतो

ह्या दोन्ही गोष्टी समाजविघातक आहेत. थोड्या वेळाने ह्याच पोस्टमध्ये ह्याबद्दल सविस्तर लिहेनच

कदाचित हे थोडे अवांतर असेल पण तरीही मला असे वाटते

पालकांचे हे असे वागणे असेल - की समोरचा त्रास देत असेल तरी नियमानुसार वागा, त्याला भीती दाखवू नका, वरिष्ठांकडे लेखी तक्रार करा आणी गप्प बसा - तर ह्या बोटचेप्या वागण्याचा सहन करणार्‍या मुलांवर वाईट परिणाम होतो. मग त्यातून आयुष्यभर सहन करायची सवय लागते आणि ह्यातूनच हुंडाबळी जातात, मुलींना छेडछाड सहन करायची सवय लागते आणि दांडगाई करणार्‍या मुलांनाही सवय लागते मी काही केले तर चालते असा त्यांचा भ्रम होऊ शकतो>>>>> वेल तुझे खूप गालगुच्चे घ्यावेसे वाटतायत. येहीच मेरेको लिखना था, मगर मान्डनेको नही आ रहा था.:फिदी: माझ्या मनातले लिहीलेस.:स्मित:

मितान, धन्यवाद आणि आणखी जमेल तसे लिहाच.

माझ्या मुलाच्या डोवर त्याच्याच वयाच्या मुलाने पाणी ओतले हा पालकांच्या इगोचा विषय प्लीजच असू नये.<<< खरे आहे.

मितान
----------------------------------

मुळात प्रत्येक वेळी मुलांच्या प्रत्येक वर्तनामागे निश्चितच काहीतरी बिलिफ सिस्टिम कार्यरत असते. ती समजून घेऊन त्यात बदल केला की मुलांचे वर्तन बदलते.

हे करण्यासाठी वेळ लागतो हे मान्य. पण हाच योग्य उपाय आहे. असे मुलांचे मानसशास्त्र सांगते. ( ते मानणे कोणालाही बंधनकारक नाही; त्या शास्त्राची टिंगल करणार्‍यांविषयी माझे काहीच म्हणणे नाही )

==>

पालक म्हणून आमच्या मुलांच्या सुरक्षितता आमच्यासाठी प्रथम प्राधान्य असते. त्रास देणार्‍या मुलांच्या तथाकथित "बिलिफ सिस्टिम" सुधारणे हे त्याच्या आईवडिलांचे आणि शिक्षकांचे काम आहे. त्रासदायक मुलांच्या शिक्षक व पालकांनी तक्रारी आल्यावर अशा त्रासदायक मुलांना (बाल)मानसशास्त्रज्ञाकडे जरूर घेऊन जावे व त्यांच्या तथाकथित "बिलिफ सिस्टिम" सुधारत बसावे. आम्हाला आनंदच होईल.

पण अशा त्रासदायक मुलांच्या "बिलिफ सिस्टिम" सुधारत बसणे आमचे काम नाही आणि फुकट घालवायला आमच्याकडे तितका वेळही नाही. अशा त्रासदायक मुलांना हग्या दम देणे वगैरे अत्यंत योग्यच आहे. कारण त्या मुलांना जरब बसून त्यांनी आमच्या मुलांना त्रास देणे/इजा करणे थांबवून आमची आमची मुले सुरक्षित राहणे हे आमचे प्रथम प्राधान्य आहे. त्यांची "बिलिफ सिस्टिम" सुधारण्याची वाट बघत बसलो आणि आमच्या मुलांना जर गंभीर शारिरीक इजा झाली तर ते कुठलेही मानसशास्त्र भरून देऊ शकणार नाही.

यात कुठल्याही शास्त्राच्या टिंगलीचा प्रश्नच उद्भावत नाही. पण जी गोष्ट ज्याने, जिथे, आणि जेव्हा करायची त्यानेच, तिथेच, आणि तेव्हाच ती केली गेली पाहीजे. And, most importantly: You simply cannot take a knife to a gunfight.

=======================================================

मी बोलले त्याला रीयाने सांगितलेल्या किश्याने अधिकच पाठबळ मिळालेले आहे. हतोडावाला आणि तत्सम इतरांना अनुमोदन.

=======================================================

वेल | 26 August, 2014 - 00:54

वेल, अगदी बरोबर.

Pages