मुलांच्या दांडगाईने वागण्याबाबत इतर मुले, इतर पालक आणि शाळा ह्यांनी काय करावे?

Submitted by वेल on 25 August, 2014 - 04:33

आजच शाळेतल्या एका पालकाकडून कळले की तिच्या मुलीला (पहिलीतल्या) तिच्याच वर्गातल्या मुलाने ढकलले. ती मुलगी स्वतःच्या जागेवर बसली होती आणि हा मुलगा त्या बेंचच्या बाजूने चालला होता. त्या मुलीचे नाक फुटून रक्त आले. ती मुलगी खूप घाबरली आहे.

त्या पालकाने शाळेत तक्रार केलेली आहे. शाळा नियमानुसार काय करायचे ते ठरवेल.

पण आपल्या मुलांनी अशा मस्तीखोर मुलांसोबत कसे वागावे? त्या मुलांपासून लांब राहावे हा उपाय नाही कारण ह्या परिस्थितीत ती मुलगी त्या मुलाच्या अध्यात मध्यातही नव्हती,

आपण आपल्या मुलांना अशी परिस्थिती हाताळायला शिकवताना काय शिकवावे? शिक्षकांकडे तक्रार करणे हा एकच ऑप्शन आहे का?

मला काही उपाय सुचले ते असे -

आपल्या मुलांना stand united शिकवावे. कोणी इतर कोणाला त्रास देत असेल तर ज्याला त्रास होतोय त्याची बाजू घेऊन आपण त्या त्रस देणार्‍या मुलाला हे लगेच थांबव असे शांत पण ठाम शब्दात सांगावे ( सहा वर्षाच्या मुलाकडून खूप जास्त अपेक्षा होत असेल कदाचित पण मी हे माझ्या मुलाला प्रॅक्टिकली कसं करायचं ह्याचा डेमो दिला आहे. तो ते तसं करू शकेल की नाही माहित नाही.)

त्रास देणारा हामुलगा नेहमीच इतर मुलांना त्रास देतो त्यामुळे त्या मुलाच्या वागण्याविरुद्ध शाळेत लेखी तक्रार करावी. आणि ह्यामध्ये मुलाला काउंसेलिंग देण्याची मागणी करावी. शिवाय पुन्हा असेच होत राहिल्यास पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करण्याची धमकी द्यावी.

कृपया तुमची मते मांडा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे म्हणायला क्लेष जाणवत आहेत व ह्यात अजिबात म्हणजे अजिबातच वैयक्तीक रोख नाही, पण मितान ह्यांच्या प्रतिसादांना एकांगीपणे उत्तम म्हणणारे लोक प्रतिवाद करणार्‍यांच्या पोस्ट्स वाचत तरी आहेत की नाही असाच प्रश्न पडत आहे. मितान तज्ञ आहेत व त्यांच्या तज्ञ असण्याबद्दल मनात खरोखरच आदर आहे, पण हा असा आंधळा सपोर्ट म्हणा किंवा इतर काहीच न मांडता नुसती स्तुतीपर कवने गाणे म्हणा, हे निव्वळ कंपूबाजीचे लक्षण दिसत आहे.

Sad

मितान, पुन्हा एकदा उत्तम प्रतिसाद. त्यावर थोडं सविस्तर विचारायचं आहे, वेळ मिळाला की विचारेन.

परत एक मुद्दा वारन्वार येणार कारण मुलान्ची सुरक्षीतता महत्वाची. तेव्हा एकच दान्डगट मुलाचे कशाला मी तर म्हणेन की सगळ्याच पालकान्चे काऊन्सिलीन्ग करा, कारण शेवटी शाळा आणी पालक यान्च्यात सम्वाद आणी सम्पर्क होणे मह्त्वाचे. दोघाना एकमेकान्विषयी आदर वाटला पाहीजे, जो वाटत नाही. आणी याला कारण काही आढ्यतेखोर पालक तर काही आढ्यतेखोर शाळा. ( प्रियदर्शिनी शाळा, भोसरी वाचले असेलच ) काही शिक्षक- शिक्षीका पण विक्षीप्त असतात, अगदी लहान मुलाना डस्टर फेकुन मारणे, हातावर पट्ट्ञा मारणे ( आपण पेपर मध्ये वाचतोच की) वगैरे कडक उद्योग करतात. तर काही शिक्षक वर्ग मुलाना साम्भाळुन घेतात.

नोकरी करणारा पालक वर्ग प्रत्येक वेळेस मिटीन्गला हजर राहु शकत नाही. तेव्हा या दरम्यान काही घडले तर शाळा आणी व्यवस्थापन जबाबदार राहील असे ठामपणे सान्गावे, आणी आपल्याकडुनही जेव्हा जमेल तेव्हा पाल्याची प्रगती-अधोगती बघावी. आधी दुसर्‍याचे बोलणे शान्तपणे ऐकुन घ्यावे, कारण जेव्हा आपल्या पाल्याची तक्रार येते तेव्हा ते दुसरे पालक किन्वा आपण सुद्धा उत्तेजीत झालेलो असतो, ऐकुन घेण्याच्या मनस्थितीत नसतो. आधी वर्ग शिक्षकाना प्राधान्य द्या हे मी वारन्वार सान्गेन. नन्तर मुख्याध्यापक आणी व्यवस्थापन यान्च्याशी बोला. तुमच्या मुलाना आधी वर्गशिक्षक शिकवतात ना, मग आपल्या बाळाला कुणी त्रास देत असेल तर आधी त्याना याची सूचना द्या. मी याचा अनूभव योग्य पद्धतीने घेतलाय, म्हणून हा सल्ला देतेय.

माझ्या मुलीला मी ठामपणे सान्गीतलेय की तुला कुणी त्रास दिला तर आधी टिचरला सान्ग, तू स्वतः अ‍ॅक्शन घेऊ नकोस. तू स्वतः कुणाला मारु नकोस, पण तुला कुणी मारत असेल तर त्याचा/ तिचा हात रोखायची ताकद तुझ्यात हवी.

माझी मुलगी कॉलनीतल्या एका झियान कडुन कधी कधी मार खाते, पण स्वतः कधी कधी फटका हाणते. पाप्याचे पितर असल्याने तिचे फटके जोरदार नसतात, तर झियान- बोचान ( शिनचॅनचा मित्र, तिने ठेवलेली नावे) जास्त मारतात.

बाकी नन्तर लिहीन.

@ संगीता कोल्हटकर
@ बेफिकीर
@ टोच्या

आपल्या भिन्न मतांचा आदर करून त्यावर कोणतेही मतप्रदर्शन न करण्याचा अधिकार वापरत आहे. माझी मते मी वर मांडत आले. ते सर्वांनी स्वीकारण्याचा अजिबातच आग्रह नाही. अर्थात मी ही माझी मते बदलण्याचा प्रश्नच येत नाही.

या फोरमवर मी यापेक्षा जास्त वेळ नि शक्ती घालवू इच्छित नाही.

यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग कामे पडली आहेत. समोर बसलेल्या मुलांबद्दल खोटी काळजी करायची आहे, गुडी गुडी बोलायचंय, सल्लागाराचा आव आणण्याची प्रॅक्टिस आहे आणि शिवाय पुस्तकी पोपटपंची वगेरे...... हे करून मिळालेल्या फुकटच्या पैशांची सोयही लावायची आहे. त्या पैशांनी इथे असलेल्या माझ्या कंपूला पार्टी देईन म्हणते !!
Wink

धन्यवाद !

मितान असे करायची गरज नाही... तुमचे मुद्दे तुम्ही मांडाच.. ते ज्यांना पटत आहेत त्यांना नक्कीच उपयोगी पडतील...

कुठे कश्याप्रकारचे रिअ‍ॅक्ट करावे हे फार महत्त्वाचे आहे... तुमच्या सोसयटीत तुमच्या मुलाला काही केल तर तिथे तुम्ही रिअ‍ॅक्ट करणे योग्यच आहे.. पण शाळेत जर काही घडले तर शाळेतील संबंधित व्यक्तीने अ‍ॅक्शन घेणेच सगळ्यात पहिली स्टेप आहे..

उद्या, तुम्ही आमच्या शाळेत येऊन शाळेतल्या विद्यार्थ्यांवर दादागिरी करता अशी तक्रार शाळेनी केलीच तर मग काय करायचे ते तुम्हीच ठरवा..

मितान, उत्तम प्रतिसाद. Please मनावर घेउ नका. तुमचि understanding आणि आमचि understanding as a parent थोडि वेगळिच असणारच.
पण फक्त issue हे आहे कि दांडगाई करणार्या मुलांचे पालक आपल्या मुलाने चुक केलि आहे हे मानत नाहि. म्ह्णुनच त्या मुलाला आपल्याला रागवाव लागत. पण कोणालाहि रागवण्या आधि खरच त्या मुलाने त्रास दिला होता, हे comfirm करुन घेने, हे त्या त्या पालकाचि विवेक बुध्द्दि वर आहे.
दांडगाई करणार्या मुलांचे पालक, आजकालच्य काळात असच असाव लागत, चुकुन धक्का जरि लागला तरि धक्का ला बुक्कि बरोबरच आहे म्ह्नुन protect करतात म्हणुन जास्त वाईट वाटत.
Please अश्या वेळि काय करायला हव. I am really interested to know. मला माझ्या मुलिला धक्का ला बुक्कि हे शिकावयचि इच्धा नाहि पण काहि parents मुले कराव लागत. नविन उपाय भेट्ला तर बर होईल.

Last year my daughters class teacher was very strict, त्या खरच खुप मारायच्या असल्या मुलाना. मला खुप वाईट वाटयच पण last year all those non sense stopped. Not single complain from class room.
This year class teacher was very soft, she dont punish usually so all kids started all these maramari again.

मितान उत्तम लिहितीयेस.. लिहीत रहा.

एक हिंदी चित्रपट आठवला. राहुल मेहेंदळे अतिशय उत्तम , शिकलेल्या, सुसंस्कॄत कुटुंबातला मुलगा असतो.
त्याच्या आईचा (रत्ना पाठक) तिच्या संस्कारांवर प्रचंड विश्वास असतो. आणि तो पुढे टोळीयुध्दात अडकतो. की गॅंगवॉर मधे (नक्की आठवत नाही... की हे दोन्ही एकच? ).
आणि आईला हे मान्यच होत नाही की आपला मुलगा ज्याच्यावरमी संस्कार केलेत तो असं काही करतोय. ती हेच सांगत असते की तो सिलीकॉन व्हॅली मधे नोकरी करतोय. आईच्या ऍक्सेप्ट न करण्याचा परिणाम म्हणुन ते पोर त्यातुन कधीच मागे फिरु शकत नाही आणि या लोकांचं पुढे जे व्हायचं ते त्याचं होतं ..

काही वरच्या पोस्ट वाचल्या आणि शेवटी लिहावसं वाटलं. दांडगाई करणार्‍या मुलाची/मुलीची मानसिकता, त्या मागचे कारण, त्याची मजबूरी, त्याची घरची स्थिती काय असेल म्हणून ते असे वागते हे समजून घ्यावे वगैरे वाचले.
मान्य आहे, हा अ‍ॅप्रोच बरोबर आहे.
पण,
१) आतावर मानसिक त्रास झालेल्या मुलाचे काय? त्याच्या शरीराला जखम झालेली ती फक्त दिसते लोकांना पण त्याच्या मनाच्या जखमेचे काय? ती किती खोल असु शकते?

२)जरी जखमी झालेल्या मुलाच्या पालकांनी कितीही दादागिरी केली तरी, त्या जखमी(शारीरीक आणि मानसिक रित्या) झालेल्या लहानग्याला रिकवर व्ह्ययला वेळ लागू शकतो त्याचे काय? ह्यावर काहीच ठळक पोस्टी आल्या नाहित.

३)अश्या दुसर्‍यांकडून त्रासलेल्या मुलांमध्ये भिती, मानसिक दडपण, एक प्रकारचा राग आजूबाजूच्या वातावरणात रहावे लागते ज्याचा लढा आपण करु शकत नाही ह्याची भिती वाढू शकते. शाळीबद्दल नाखुस्षी होवु शकते कायम. हा विचार कोणीच प्रकट केलेला दिसलेला नाही. दुसर्‍याचा मुलगा आपल्या मुलीची वही घेवून चित्र काढतो पण त्या लहान मुलीला कसे कळणार तो चित्रकार होइल म्हणून माझी आई त्याला प्रोत्साहित करण्यासाठी माझी वही देतेय? त्याला फक्त माझ्या त्रासात आईने मला साथ दिली नाही व बाहेरच्या मुलाला वही दिली हेच कळते. आणि दुसर्‍याच्या मुलाला नकळत वाईट वळणच लावतोय की दुसर्‍याची वही काबीज करून आपण काहीही करु शकतो, त्याचे काय?

उद्या हाच चित्रकार एक विचार घेवून फिरेल की घरात नाहि मिळाले तरी दुसर्‍याचा माल घेवून आपली आवड पुरी करावी.

काहीं पोस्टी म्हणजे, उगाचच लिहायला छान वाटते म्हणून लिहिलेले उपाय वाटतात. Happy

हे अगदी अनुभवाने लिहितेय,
वयाच्या आठव्या वर्षे मी शाळा बदलली बाबांच्या कामानिमित्त, ज्या नव्या शाळेत अ‍ॅडमिशन मिळाले तिथे जाण्यास तिसरीतली मी नाखुष होते. आधीच हा मानसिक ताण असेलच( तेव्हा हे कळले नाही पण नंतर आईने सांगितली हि गोष्ट कारण त्याचे भोग मी भयानल भोगले). त्यात शाळेतली मुलगी मला त्रास द्यायची. का? कारण काहीच नाही. नवीन मुलीला उगाच त्रास द्यायचा. कसा? माझी पुस्तकं लपवणे, मग हळूच परत ठेवणे टिचरला मी सांगेन असे वाटले की, मला बेंचवर नीट जागा न देणे, माझ्या वहीवर चित्र काढणे. इतरांना सांगणे की हिला खेळायला घेवू नका, बोलु नका वगैरे वगैरे.आधी मी टिचरला सांगितले पण टिचरला नक्की प्रूफ न्हवते की काय(असे तेव्हा वाटलेले पण खरे कारण वेगळेच होते) तिने फक्त हो, हो केले. नवीन शहरात आमचे बस्तान बसलेले.... तेव्हा आई- वडीलांना आधीच टेन्शन कमी न्हवती. तरी जेव्हा मी सांगितले तेव्हा आईने टिचरला सांगितले. पण परत तिने काहिच अ‍ॅक्शन घेतली नाही. कहर झाला जेव्हा मला पहिल्या टेस्ट मध्ये मला सर्व विषयात तोंडी परीक्षेत नापास केले व मला खूपच आश्चर्य वाटले व रडले. कारण असे होते की, ती मुख्याधापकाची मुलगी होती. वारंवार टिचरला सांगितल्याने, गोष्ट मुख्यधापकाच्या कानावर गेलेली. टिचर आपली नोकरी वाचवण्यासाठी, हो, हो आम्ही कारवाई करतोय हो. तशी कुठे ती मुलगी हिला शारीरीक जखमी करतेय.. वगैरे वगैरे. एकंदरीत मी शाळेत जाण्यास नकार दिला. नुकतीच शाळा बदलून आलेले, तेव्हा पुन्हा शाळा शोध... मला येणारा वारंवार ताप. शेवटी शाळेतून नाव काढले वडिलांनी व दुसर्‍या शाळेत घातले नाव.
-----
ह्यावरून,
१) तुमच्या मुलाला असा त्रास असेल तर टिचरला व मुख्यधापकला कळवणे. नात्यातले असतील टिचर वगैरे तर अंमल बजावणी कमी होइल पाहून आपल्या पाल्याला कसे वाचवता येइल पहावे.
२) दुसर्‍याच्या दांडगट मुलाला मारणे, धमक्या देणे चुकीचे असले तरी, त्याच्या आई, वडीलांना आपणच कळवाबे, टिचरची वगैरे वाट पाहू नये. एकंदरीत दांडगट मुलांचे आई वडीलहि बहुतेकदा असेच टवाळ, मवाली असतात. त्यांचा रोख कसाय पाहून अ‍ॅकशन घ्यावी. शारीरीक जखमा केले असेल आपल्या मुलास आणि बोलून समजून एकण्यासारखे समोरची पार्टी नसेल तर पोलीसांना नाईलाजाने सांगावे लागेल असे सांगावे.
३) शाळेतल्या इतर पालकांना ह्याची कल्पना द्यावी. त्यांचाहि सपोर्ट घेवून तपासावे की दांडगट मुलाने इतरांना काही त्रास दिलाय का आजवर? असेल तर त्या दांडगट मुलाला कौंन्सेलींगची गरज आहे असे दाखवून ते घडवून आणावे.
शक्यतो आपण हातात कायदा घेवू नये व दुसर्‍याच्या मुलाला मारू नये पण त्याच्याआई वडीलांचे कान शाब्दिक रित्या नक्कीच खडसावे.
४) आणि महत्वाचे, आपल्या मुलाचा आत्वविश्वास कमी होवु देवु नये. त्याला पालकांनध्ये काय चाललय ह्याची कल्पना न देता फक्त तु सुरक्षित आहेस, तुझा मित्र हि नीट वागेल असे सांगावे.

ह्यातले काहीच होत नसेल व शक्य नसेल व आपले मूल अजूनही ह्या कंपूशाहीचा शिकार असेल तर शाळा बदलावी. कारण आपण मवाली होवून प्रश्ण सोडवू शकत नाही अश्या मताची मी आहे. पण दुसर्‍याची राजेशाही सुद्धा आपल्या मुलाच्या जीवावर होत नाही हे शेवटपर्यंत नक्कीच पहावे.
------------------------------------------------------------
अलीकडेच एका मित्रांकडून अशीच केस एकली त्याच्या मुलाची, त्याचा मुलगा अमेरीकेहून भारतात गेला. शाळेत कंपूशाही करून काही मुलं त्याला सतत त्याच्या अमेरीकन उच्चारावरून चिडवत. आधीच ते मूल भारतीय वातावरणाशी, (हिंदी भाषा येत नसल्याने)भाषेशी टक्कर देत होतं. त्यात हे ही अ‍ॅड झालं. मुलगा शाळेत जायचा बंद झाला. वर रोज रडारड की अमेरीकेत जायुया , तिथे असे मित्र न्हवते मला. आता त्या सहा वर्षाच्या मुलाला काय समजवणार? शाळा बदलली शेवटी त्या मुलाचे बरेच कौंसिलींग करून. दांडगट मुलांचे काहीच वाकडे झाले नाही कारण टिचरच्या मतं , अमेरीकन मुलाला भारतीय मुलांची सवय नसल्याने असा वागतोय?
तेव्हा त्या मित्राचे वाक्य आठवले,

जब अपने पे बनती है ना, तो सब भुलते है .. तब तक लोग फोकट मे भाषणबाजी देते है. तभीभी मेरे बच्चे को हि कोस रहे थे. इनका बच्चा जब डर के मारे घर मे रहेगा तो समझेगा इनको.

कंपासने जखमी बरीच उदाहरणं दिसतात. माझ्या काकांच्या बुडात एका मित्रानं रागाने मागून कंपास घुसवलेले हे एकलेय.
जेव्हा कोणाची मुलं अश्या गोष्टींचा वापर करतात तेव्हा हे धोक्याचे लक्षण समजावे. चुकुनही मुलाची बाजू घेणं म्हणजे स्वतःचे नुकसान आहे.

मितान, उत्तम लिहिले आहेस.
पण आपल्याकडे एकूणच "डॉक्टरला काय कळतय आजारामधलं आणि औषधामधलं?" अशा प्रकारच्या अ‍ॅटिट्युडचा भरणा असतो हे पुन्हा एकदा सिद्ध होतय

मितानचे सगळे प्रतिसाद आवडले.

बेफ़िकीर, तुमचा थोडा खोचक असा शेवटचा प्रतिसाद वाचून मजा वाटली. मुद्द्यांचा विपर्यास कसा करायचा याचे एकदम उत्तम उदाहरण. Happy तुम्ही मुद्दाम तसे (विपर्यस्त) लिहिले आहे की गंभीरपणे?

त्रास देणार्‍या मुलांना त्रास द्यावासा का वाटतो हे शोधून त्या कारणाचे निराकरण केले की समस्या सुटेल की त्या मुलांना एखादी भीती दाखवून? भीती दाखवल्याने, धमकी दिल्याने मुले त्रास देण्याचे दुसरे मार्ग शोधतील, ज्यात ते सापडणार नाहीत. पालक जर मुलांना मारणारे असतील तर मोठ्या, ताकदवान लोकांनी त्यांचे न ऐकणार्‍यांना मारायचे असाच धडा देणार ना! मुले आपल्या आजूबाजूला काय घडते आहे ते बघून शिकतात, शंका आली तर प्रयोग करून बघतात.

आपण स्वतःहून त्रास द्यायचा नाही पण कोणी आपल्याला त्रास देत असेल तर प्रतिकार करायचा हे साधे लॉजिक आहे.

डॉक्टरला आजारातलं, मानसोपचार तज्ज्ञाला/समुपदेशकाला मनाच्या व्यापारातलं, शिक्षकाला शिकवण्यातलं, सिनेमाशी संबंधित व्यक्तीला सिनेमातलं, क्रिकेटरला क्रिकेटातलं काही कळत नाही हे त्रिकालाबाधित वैश्विक सत्य आहे.
शेवटी आपला एकदोन केसेस पाहून अनुभवून आलेला अनुभव महत्त्वाचा आणि योग्य.
मितानला हे बहुतेक याअगोदर माहित नव्हतं.
आता चांगलंच समजलेलं दिसतंय.
Happy

अशा प्रकारच्या घटनेत दोन अ‍ॅप्रोच आहेत.

१. शॉर्ट टर्म : ज्या मुलाला बुलिंग होतंय त्याची पूर्ण बाजू समजून घेतल्यावर त्याला सावरणे. त्याला न्याय मिळवून देणे. त्याच बरोबर त्याला 'आम्ही तुझ्या बाजूनं आहोत' हे लक्षात आणून देणे. इथे त्या अन्याय होणार्‍या मुलांचे पालक इन्व्हॉल्व असतात.

२. लॉन्ग टर्म : बुलिंग करणार्‍या मुलाला त्याचे वर्तन चुकीचे आहे हे लक्षात आणून देणे. त्याच्या पालकांनाही त्यांचा मुलगा/मुलगी चुकीचे वर्तन करत आहेत आणि ते तुम्ही सुधारण्याची गरज आहे हे (आधीच लक्षात आले नसेल तर) लक्षात आणून देणे. या ठिकाणी त्या मुलाच्या पालकांनी / शाळेनी घ्यावा.

यातील पहिल्या अ‍ॅप्रोचमध्ये ' त्याला न्याय मिळवून देणे. त्याच बरोबर त्याला 'आम्ही तुझ्या बाजूनं आहोत' हे लक्षात आणून देणे.' हे पालकांना कसं करता येईल? याबद्दलच वरचे वाद आहेत असं वाटतं.

"डॉक्टरला काय कळतय आजारामधलं आणि औषधामधलं?" अशा >>>> इथे कोण डॉक्टर आहे?

====>>>

टोचा बाकी कुणी असले तरी आपण पडलो सामान्य पालक, आपल्याला कशातले काय कळते? आपल्या मुलांना कुणी भोसको किंवा बुटांनी मारो. आपण विधायक विचार करावा. हो की नाही?

सातीबाय, कशी हुशारीनं बोलायलीस!!!! Proud

त्रास देणार्‍या मुलांना त्रास द्यावासा का वाटतो हे शोधून त्या कारणाचे निराकरण केले की समस्या सुटेल की त्या मुलांना एखादी भीती दाखवून? भीती दाखवल्याने, धमकी दिल्याने मुले त्रास देण्याचे दुसरे मार्ग शोधतील, ज्यात ते सापडणार नाहीत. पालक जर मुलांना मारणारे असतील तर मोठ्या, ताकदवान लोकांनी त्यांचे न ऐकणार्‍यांना मारायचे असाच धडा देणार ना! मुले आपल्या आजूबाजूला काय घडते आहे ते बघून शिकतात, शंका आली तर प्रयोग करून बघतात.

आपण स्वतःहून त्रास द्यायचा नाही पण कोणी आपल्याला त्रास देत असेल तर प्रतिकार करायचा हे साधे लॉजिक आहे.>>>> Happy मृदुला!!!

हाईट पालथा घडा पोष्टी आल्या आहेत. Lol

>>>आपल्याकडे एकूणच "डॉक्टरला काय कळतय आजारामधलं आणि औषधामधलं?" अशा प्रकारच्या अ‍ॅटिट्युडचा भरणा असतो हे पुन्हा एकदा सिद्ध होतय<<<

काही बाधा वगैरे झालेली नाही ना? Biggrin डोळ्यात किंवा पार्श्वभागात करकटक खुपसल्यावर दोन्ही मुलांची बिलिफ सिस्टिम तपासायला समिती नेमायच्चीक्कॅय?

>>>बेफ़िकीर, तुमचा थोडा खोचक असा शेवटचा प्रतिसाद वाचून मजा वाटली. मुद्द्यांचा विपर्यास कसा करायचा याचे एकदम उत्तम उदाहरण. स्मित तुम्ही मुद्दाम तसे (विपर्यस्त) लिहिले आहे की गंभीरपणे?<<<

दोन दिवस सुसंगतपणे प्रश्न विचारत आहे. कोणीही सुसंगत उत्तरे द्यायची तयारी दाखवली नाही. मितान ह्यांनी जी उत्तरे दिली ती वेगळ्याच प्रश्नांची होती. उदाहरणार्थ मला उद्देशून मितान ह्यांनी लिहिलेला हा पॅरा:

>>>एक चांगला समुपदेशक 'साध्या' प्रश्नाचा विपर्यास कधीच होऊ देणार नाही. आणि पालक / मुलांना आपल्यावर भावनिक रितीने अवलंबूनही ठेवणार नाही.
प्रत्येक व्यवसायात जशी मालप्रॅक्टिस चालते तशी आमच्याही व्यवसायात आहेच. त्यामुळे साध्या गोष्टींचे भांडवल करून पैसे उकळणारे कौन्सेलर्सही आहेत. <<<

हे मी विचारलेलेच नव्हते. हे कशाला लिहिले? आणि हे जे विसंगत लिहिले त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली गेली. बरं प्रत्यक्ष चर्चेत कोणीच पडत नाही आहे. नुसतेच 'मितान - उत्तम पोस्ट' म्हणायचे नाही तर प्रतिवाद करणार्‍यांना 'अ‍ॅटिट्यूडचा भरणा' वगैरे लेबले लावायची.

तर दोन दिवस मी प्रामाणिकपणे व चर्चेचा मूड सांभाळून लिहीत असलेल्या प्रश्नांवर कोणीही काहीही म्हणत नाही आहे आणि मितान ह्यांना अडचणीचे प्रश्न वाटल्यावर त्यांनी उपरोधिक विधाने करून वेळ नाही म्हंटले की त्यांना प्रतिसादांचे साकडे घालायचे. अरे तुमचे म्हणणे काय आहे ते सांगा ना? तुमच्या मुलाच्या गालात करकटक खुपसणार्‍या मुलाची बिलिफ सिस्टिम समजून घ्याल का?

ह्या प्रतिसाददात्यांपेक्षा मितान ह्यांनी मला पाठवलेली विपू बरीच उत्तम आणि त्यांच्या एक्स्पर्टाईझला शोभणारी आहे.

येथील काही प्रतिसाददाते तर असे आहेत की मायबोलीवर त्यांना उद्देशून कोणी काही लिहिले तर इतकाल्ली वये असूनही दुसर्‍याची बिलिफ सिस्टिम समजावून घेण्याची मानसिक कुवत त्यांच्यात नसते आणि सहा वर्षाच्या मुलाची म्हणे बिलिफ सिस्टिम समजून घेणार हे!

>>तुमच्या मुलाच्या गालात करकटक खुपसणार्‍या मुलाची बिलिफ सिस्टिम समजून घ्याल का?

थोडक्यात उत्तर - हो.

विस्ताराने - मला समजून घ्यायला जमले तर. पण कोणीतरी रूट कॉज समजाऊन घ्यावे यासाठी नक्कीच प्रयत्न करेन. त्या मुलाला समजून घेणे हे मुख्यत्वे त्याच्या पालकांचे काम. आणि त्याला सुधारणे हेही. त्यांनी ते करावे यासाठी फॉलोअप करेन. शाळेच्या माध्यमातून सहसा.

कर्कटक खुपसायची वेळ यायच्या आधीच या मुलाचे काही वेगळे / हिंसक / त्रासदायक वागणे असेल तर ते हेरून मुलाला बोलते करून प्रश्न सोडवायला हवा असे मला वाटते.

वेल,
अवघड आहे, तुला काहि वापरण्या सारखे उपाय भेटले का, ७ पानानन्तर. भेटले असेल तर, वर update कर. मला तर फक्त दोन्ही बाजु आपलच खर करत आहेत अस दिसत आहे.

Please refer below Test Cases Wink

१. चिड्वाचिड्वि प्रकार असेल, तर आपण आपल्याच मुलाला deal करायला शिकावायला हव. मुलाला त्यान्च्या कडे लक्श देउ नये, हे शिकवाव.
अति झाल , मुल रडत असेल शाळेत जायला तर take action. बाईना सान्गने. मुलाला त्यान्च्या कडे लक्श देउ नये हे परत शिकवावे. Realise him that he is very imp for us.

2. थोडिशी मारामारि प्रकार असेल, तर confirm करुन घेणे, बाईना सान्गने, If no action त्या मुलाच्या आईला सान्गने, If no action, then what ? Its real question.

Direct principle कडे गेला तर बाईशी सम्न्ब्ध खराब होउ शकतात. आणि थोडिशी मारामारि प्रकार होतच असतात, माझि मुलगि आता आता परत मारायला लागलि आहे, पण फुसकि आहे कोणि जोरात मारले तर पडेल, म्ह्णुन मी तिला बाईना सान्गयला सान्गते. पण एकाने मारले कि दुसरेहि येउन मारतात म्हनुण दुर्लक्श नाहि करता येत. हेच प्रकार जास्त घडतात.

३. मार लागणे किन्वा रक्त आल वगैरे प्रकार असेल तर बाई action घेतातच जास्त करुन, If no action तर direct principle कडे जाउ शकतो. त्या मुलाच्या पालकाशी हुज्जत करायचि काहि गरज नाहि.
Principle action घेतिलच आणि नाहि घेतलि तर मग तुम्हि काहिहि करा, त्यात तुमचि चुक नसेल.

मला फक्त २ point च ans हव. Please कोणाला सुचत असेल तर सान्गने.

व्हेरी गुड! कीप इट अप!

तातडीचा उपाय म्हणून आधी त्या करकटक खुपसणार्‍या मुलाची बिलिफ सिस्टिम समजावून घ्यायला हवी नाही का!

आपल्या मुलाचे जन्माचे नुकसान का झालेले असेनात!

हाईट म्हणजे माझे म्हणणे येथे अक्षरशः कोणालाही पटत नाही आहे. ह्याचा अर्थ मी जन्मजात मूर्ख आहे हे सिद्ध झाले. Biggrin

बेफीकिर मी सहमत आहे.
करकटक खुपसणार्‍या मुलाची बिलिफ सिस्टिम समजावून घेण्यापेक्षा त्या मुलाला ईतर मुलांपेक्षा वेगळे बसवावे सेपरेट बेंचवर आणि घरि पण ह्याची कल्पना द्यावी.आणि त्याच्या बॅगमध्ये ह्या वस्तु आणायला मनाई करावी.
त्या मुलाला आणि त्याच्या पालकांना गांभीर्य कळेल मग कारण सगळ्या पालकांचे आपला तो बाब्या आणि दुसर्याचे कार्टेच असते अपवादात्मक लोक दुसर्यांच्या मुलांवर प्रेम करु शकतात.

दुसर्‍याच्या मुलाची ( जो माझ्या मुलीच्या गालात करकटक खुपसतो कींवा नाही खुपसत ) बिलीफ सिस्टीम मी का समजुन घेउ? तरी पण इथले सगळे म्हणतायत समजुन घ्या समजुन घ्या तर...

माझे काही सिरियस प्रश्न आहेत.... कृपया सिरियसली उत्तरे द्या.

१. समजा घेतली मुलाची बिलिफ्स समजुन आणि मला कळले की त्याचा बाप मवाली, दारुडा आहे आणि आईला मारतो, मग त्याच्या बापाची पण बिलीफ सिस्टीम पण समजुन घ्यायची का? त्याचे दारु चे व्यसन सोडण्यासाठी AA मधे घेउन जायचे का?

२. समजा मुलाला त्याच्या घरी चित्रकलेची वही मिळत नाही म्हणुन तो माझ्या मुलीच्या गालात करकटक खुपसतो असे कळल्यावर त्याला चित्रकलेची वही आणुन देउ का?

३. समजा तशी वही आणुन दिली आणि नंतर त्याने १००० रुपये मागीतले ( कारण त्याला घरी १००० रुपये देत नाहीत )तर मग काय करु.

४. त्याच्या बापाला कळले की मी वही दिली आणि तो चिडला आणि मारामारी करायला आला तर काय करु?

५. हे लहान मुलांबद्दल झाले. थोडे फास्ट फॉरवर्ड करू. हा करकटक खुपसणारा मुलगा मितान ताईंच्या उपदेशामुळे आता थोडा गप्प झाला होता. आता माझी मुलगी १२ वर्षाची आहे, तो पण १२-१३ वर्षाचा आहे. आता तो मुलगा माझ्या मुलीच्या दुसर्‍या प्रकारे मागे लागतो. फँड्री वगैरे बघुन शाळेत जाउन हेच करायचे असते असा त्याचा बिलिफ झाला आहे. हा बिलिफ पण मी समजुन घेउ का?

६. मधल्या काळात माझ्या मुलीचे भीती मुळे अभ्यासावरचे लक्ष उडाले, ती शाळेत जायचा कंटाळा करु लागली तर मग तिचे बिलिफ त्या करकटक खुपसणार्‍या मुलाचा बाप समजुन घेणार का? शाळा तिला २०% मार्क ग्रेस म्हणुन देणार का?

बेफिकीरजी आपण सगळे मूर्खच आहोत असे खरेच वाटू लागले आहे आता इथले असले जीवघेणे विनोद वाचून.

टोचा अगदी बरोबर. माझ्या केस मध्ये त्या मुलाने मागल्या वर्षी त्याच्यामुळे उशीर होत असूनही शाळेत सांगितले होते की माझ्या मुलीमुळे रिक्षाला उशीर होतो. ह्या वर्षी मारण्याचा प्रकार घडला. त्यामुळे पुढे भलते प्रकार होऊ नयेत म्हणून आत्ताच हग्या दम वगैरे स्टेप घ्यावी लागली. हे मी तुम्हाला आणि तत्सम लोकांना सांगत आहे, इतरांनी दुर्लक्ष दिले तरी चालेल.

त्या करकटक खुपसणे वगैरे प्रकार तिसर्या category मधे येतात, जाउन त्या मुलाला दोन थोबडित द्यावि आणि principle कडे न्यावे असे स्पश्ट मत. सहन करणे शक्यच नाहि. पण बाई पण त्या मुलाला आधिच मारतिल व अक्शन घेतिल अस विश्वास वाटतो.

पण बाई पण त्या मुलाला आधिच मारतिल व अक्शन घेतिल अस विश्वास वाटतो>>>>>>

कनक२७ आता पुर्वीचे दिवस राहिले नाहीत, मुलांना शारीरीक शिक्षा करण्यावरून पालकांची मते भिन्न असु शकतात. आजकाल शिक्षक मुलांना मारायचे टाळतात कारण काही पालक त्यावरून वाद उत्पन्न करतात आणि शाळेला व त्या शिक्षकाला त्याचा त्रास होतो.

टोचा आणि बेफ़िकीर तुमचे प्रश्न खरच विचार करायला लावणारे आहेत.

Pages