मुलांच्या दांडगाईने वागण्याबाबत इतर मुले, इतर पालक आणि शाळा ह्यांनी काय करावे?

Submitted by वेल on 25 August, 2014 - 04:33

आजच शाळेतल्या एका पालकाकडून कळले की तिच्या मुलीला (पहिलीतल्या) तिच्याच वर्गातल्या मुलाने ढकलले. ती मुलगी स्वतःच्या जागेवर बसली होती आणि हा मुलगा त्या बेंचच्या बाजूने चालला होता. त्या मुलीचे नाक फुटून रक्त आले. ती मुलगी खूप घाबरली आहे.

त्या पालकाने शाळेत तक्रार केलेली आहे. शाळा नियमानुसार काय करायचे ते ठरवेल.

पण आपल्या मुलांनी अशा मस्तीखोर मुलांसोबत कसे वागावे? त्या मुलांपासून लांब राहावे हा उपाय नाही कारण ह्या परिस्थितीत ती मुलगी त्या मुलाच्या अध्यात मध्यातही नव्हती,

आपण आपल्या मुलांना अशी परिस्थिती हाताळायला शिकवताना काय शिकवावे? शिक्षकांकडे तक्रार करणे हा एकच ऑप्शन आहे का?

मला काही उपाय सुचले ते असे -

आपल्या मुलांना stand united शिकवावे. कोणी इतर कोणाला त्रास देत असेल तर ज्याला त्रास होतोय त्याची बाजू घेऊन आपण त्या त्रस देणार्‍या मुलाला हे लगेच थांबव असे शांत पण ठाम शब्दात सांगावे ( सहा वर्षाच्या मुलाकडून खूप जास्त अपेक्षा होत असेल कदाचित पण मी हे माझ्या मुलाला प्रॅक्टिकली कसं करायचं ह्याचा डेमो दिला आहे. तो ते तसं करू शकेल की नाही माहित नाही.)

त्रास देणारा हामुलगा नेहमीच इतर मुलांना त्रास देतो त्यामुळे त्या मुलाच्या वागण्याविरुद्ध शाळेत लेखी तक्रार करावी. आणि ह्यामध्ये मुलाला काउंसेलिंग देण्याची मागणी करावी. शिवाय पुन्हा असेच होत राहिल्यास पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करण्याची धमकी द्यावी.

कृपया तुमची मते मांडा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मुलीला एका मुलाने मारले तेंव्हा शाळेत जाऊन शिक्षकांसमोर तमाशा केला. (हे करण्यामागे हेतू असा होता की शिक्षकाना कळू द्या की या मुलीचे पालक असले प्रकार खपवून घेत नाही). त्यानंतर एक पत्र लिहून शिक्षकेच्या हातात दिले व सांगितले की त्या मारक्या पोराच्या बापाला द्या. पत्रातील मचकूर असा होता.

"तुझ्या पोरानी माझ्या पोरीला मारलं याचा मला प्रचंड राग आला आहे. पोराला नीट अक्कल सांग, यापुढे जर त्यानी मारलं तर तुला व तुझ्या पोराला तुझ्याच घरात घुसुन मारेन, शाळेत नाही मारणार. मग बाकीचं काय ते पोलिस चौकीत बघून घेईन" पुढच्या माणसात दांडगाई दिसली की बरेच प्रश्न सुटतात हा अनुभव ईथेही कामी आला.

शाळेतले शिक्षकही टाईट व मुजोर पोराचा बेफिकीर बापही सरळ.

अमू़क एका विद्यार्थीनीचे पालक सभ्यतेच्या नावाखाली स्वतःच्या पोरांची पिटाई खपवून घेत नाही हा मेसेज संपुर्ण शाळेला व मारक्या पोरांच्या पालकाना व्यवस्थीत पोहचेल याची मी खबरदारी घेत असतो.

असल्या मुलांचे पालक पण मोस्ट्ली त्याच टाईप चे असतात. तेच तुमच्या अंगावर धावुन येतील.>>>>>>>> म्हणुन आपण काय गप्प बसायचे का?

लहान मुलांचे विश्व खुपच वेगळे असते, त्यांंना ह्या वयात बरे-वाईट ह्यात जास्त फरक करता येत नाही. ही जी त्रासदायक मुले असतात त्यांना ईतरांना त्रास देण्यात एक आनंद मिळत असतो यात आपण काही वाईट करत आहोत अशी जाणीव त्यांना बहुतेक वेळा होत नसते. त्याला खरेतर त्यांचे पालकच सर्वस्वी जबाबदार आहेत. कारण आपल्या प्रतापी मुलांबद्दल त्यांना संपुर्ण माहिती असते आणि त्याला योग्य ते वळण न लावता ते त्याकडे दुर्लक्ष करतात.

त्रासदायक मुलांंकडुन आपल्या मुलांना त्रास झाला तर आपण वर्गशिक्षक/मुख्याध्यापक यांच्याकडे तक्रार करावीच कारण जर आपण असल्या प्रकारांकडे दुर्लक्ष केले तर हे प्रकार आणखीन वाढण्याची शक्यता असते. आपण आपल्या मुलांना सुध्दा अश्या प्रसंगी कसे वागावे हे शिकवणे फार गरजेचे आहे. एखादा आपल्याला प्रतिकार करतो हे त्यांना माहित पडलं की ते सहसा त्याची खोड काढत नाहीत.

म्हणजे समोरच्या सहासात वर्षाच्या मुलानं गुंडागिरी केली म्हणून आपण त्याच्या उलट गुंडागिरी करायची. आपण त्यच्याहून जास्त घाण भाषा वापरायची (हाग्या दम वगैरे शब्द मागच्या पानावर वाचला!) पोलिस स्टेशनामध्ये बलगुन्हेगार म्हणून तक्रार करायची...

पण मग जर उद्या तुमच्या मुलासंदर्भामध्ये जर अशाप्रकारे बुलिंगची तक्रार आली तर एक पालक म्हणून तुम्ही काय करणार आहात? या माझ्या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही.

हा माझ्या बघण्यातला किस्सा.

स्कूलबसमधे खिडकीजवळची सीट पकडण्यासाठी मारामारी. आधी धावत जाऊन ती पकडायची. एकाला ती मिळाली नाही म्हणून दुसर्‍या मुलाने त्याचे डोके खिडकीवर आपटले. त्याने खिडकीची जागा सोडली. त्या मूलाने रडत रडत आईला सांगितले. आई म्हणाली, डोके आपटले कि खिडकी मिळते, हे तूला कळले ना ?

मग दुसर्‍या दिवशी त्याने पण त्या मूलाचे डोके आपटले.... पण ही आपटाआपटी दोन दिवसात संपली. मग दोघांनी वार वाटून घेतले. आज २२ वर्षांनी देखील ते मित्र आहेत. पण हे सगळे त्या दोघांनीच हँडल केले.

खरंच असा प्रकार ऐकला की पालक म्हणून पहिली प्रतिक्रिया 'अमुक ऐवजी अमुक घडते तर?' असे विचार मनात येऊन प्रचंड टेन्शन येतं. परवा माझ्या मुलीच्या वर्गात घडलेला प्रसंग. एका मुलाने पेन्सिलीला अगदी धारदार टोक केली आणि बाजूच्या मुलाच्या मांडीत खुपसली. तेंव्हा आमचेही असेच झाले.

तेंव्हा संबंधीत क्षेत्रातील कोणी तज्ज्ञ/अनुभवी मायबोलीकर/पालक इथे असतील तर त्यांनी कृपया त्रास देणारे / संभाव्य त्रास झेलणारे मूल आपले असेल तेंव्हा नेमके कशाप्रकारे हे हाताळावे यावर मार्गदर्शन करा. जेणेकरून अशा प्रसंगांना घाबररून जाण्याऐवजी आत्मविश्वासाने सामोरे जाता येईल.

माबोकर मितान चाईल्ड सायकॉलॉजी आणि स्कूल काउन्सेलिंगमधली तज्ज्ञ आहे, स्वतः प्रॅक्टिस करते. तिला इथे लिहायची विनंती Happy
कुणीतरी तिच्या विपू त निरोप ठेवा

पण मग जर उद्या तुमच्या मुलासंदर्भामध्ये जर अशाप्रकारे बुलिंगची तक्रार आली तर एक पालक म्हणून तुम्ही काय करणार आहात? या माझ्या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही.>> हो नंदनी माझ्या पोरीनी मारल्याची तक्रार आली तेंव्हा मी माझ्या पोरीला घेऊन थेट मार खाल्लेल्या पोराकडॅ गेलो व त्याला म्हटलं हिला तू मार... त्या पोराची आई म्हणत होती "जाऊद्या हो लहान आहे" वगैरे. मी त्या मातेला समजावून सांगितले की यातूनच पोरं मारके बनतात. त्यामुळे त्याना कळू दे की आपण मारले तर नंतर आपल्याला मार बसतो. या प्रकरणा नंतर तिनी परत कोणाला मारलं नाही.

लहान मुलाना खूप ईगो असतो ही एक वास्तविकता आहे. आपण ज्याला मारतो त्याच्या हातून आपल्याला मार खावा लागला यामुळे माझ्या पाच वर्षाच्या पोरीचा ईगो प्रचंड दुखवताना मी पाहिले.

अन हे झाल्यावर वीस मिनटं तीला जवळही घेतलं नाही. शिस्त लावताना ती कठोरपणे लावावे असा माझा नियम आहे.

सायंकाळी मात्र रोजच्यापेक्षा चारपट जास्त लाड केले व खाऊ दिला.

शिस्त आणि लाड या दोघात बाबा सरमिसळ करत नाही हा संदेश पोरीला नीट कळेल असं मी वागत असतो.

माबोकर मितान चाईल्ड सायकॉलॉजी आणि स्कूल काउन्सेलिंगमधली तज्ज्ञ आहे, स्वतः प्रॅक्टिस करते. तिला इथे लिहायची विनंती स्मित>>> मलाही मितानच आठवली Happy

पण मग जर उद्या तुमच्या मुलासंदर्भामध्ये जर अशाप्रकारे बुलिंगची तक्रार आली तर एक पालक म्हणून तुम्ही काय करणार आहात? या माझ्या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही.

==>

आत्याबाईला मिशा असत्या तर तिला काका म्हणाले असते अशा प्रकारचे वाक्य आहे हे. तरी पण उत्तर देते. आमच्या मुलांना आम्ही योग्य वळण लावलेले असल्याने अशा तक्रारी येणार नाहीत. आणि आल्याच तर आमच्या मुलांना आम्ही वस्तुस्थिती समजाऊन घेतल्यावर दम देणे, पुन्हा असे घडणार वगैरे योग्य ती शिक्षा करु.

त्रास देणारे मूल आपले असू शकते हे आधी मान्य केले पाहिजे पालकांनी. डिनायल उपयोगाचा नाही. डिनायल मोडमध्ये गेलात तर त्या मुलाला सुधारण्याची संधीच आपण देत नाही.
मूल खोडकर आहे, व्रात्य आहे की धसमुसळं, दंगेखोर, त्रासदायक आहे हे पालकांना ठाऊक असतंच. अनेकदा त्याकडे - होईल हळूहळू नीट, हे वयच असतं वगैरे नावांखाली दुर्लक्ष केलं जातं.
आपल्या मुलामध्ये काहीतरी बिहेवोरियल प्रॉब्लेम आहे हे पालकांच्या पचनी पडणं तसं अवघडच आहे. नॅचरल आहे. पण त्यांनी ते अ‍ॅक्सेप्ट करणे, मुलावर योग्य ते उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठीच काऊन्सेलर लागतात. आणि खूप सारा संयम.

शिस्त आणि लाड या दोघात बाबा सरमिसळ करत नाही हा संदेश पोरीला नीट कळेल असं मी वागत असतो.////

बरोबर बोललात हतोडावाला आम्ही पण तेच करत असतो

माझ्या अनुभवाप्रमाणे मारकी पोरं प्रोब्लेम नसून त्यांचे पालक हे खरे प्रोब्लेम असतात. या पालकाना जेंव्हा सव्वाशेर मिळतो तेंव्हा मग बरोबर पोराना शिस्त लावली जाते.

एखाद्या मारक्या मुलाचा आपल्या पोराना त्रास होत असेल तर आपण सव्वाशेर पालक नाही याचे भोग आपली पोरं भोगत असतात. ज्या दिवशी तुम्ही सव्वाशेर पालक बनता त्या दिवशी प्रश्न सुटतो.

माझ्या लहानपणी माझ्या आणि माझ्या आजुबाजुच्या सर्वच मुलांचे आई-वडील वेगळे होते. कोणाकडे त्यांच्या मुलांची तक्रार घेउन गेले तर मुलाची बाजू पण न ऐकता मुलाला दम भरत ( बर्‍याच वेळेला फटके सुद्धा ). त्यामुळे स्वताच्या आई-वडलांची मुलांना भिती वाटायची.

आता मुलांना पालकांची भीती दाखवण्यात काही अर्थ नाही. स्वताच्या मुलाचे चुकले असेल असे त्यांना वाटत च नाही.

आता शिक्षकांनी जरी विद्यार्थ्याची तक्रार केली तर पालक शिक्षकांना तुमचीच चुक असेल असे जाउन झापतात (इतकी हजारो रुपये फी भरतो तर तुम्ही करता काय म्हणुन )

तुमच्या मुलासंदर्भामध्ये जर अशाप्रकारे बुलिंगची तक्रार आली तर एक पालक म्हणून तुम्ही काय करणार आहात? या माझ्या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही.>> >>>> मी स्वता माझ्या मुलीला चांगलेच झापीन आणि वेळ पडली तर त्या वि़क्टीम मुलाला जाउन सॉरी म्हणीन.

आता मुलांना पालकांची भीती दाखवण्यात काही अर्थ नाही. स्वताच्या मुलाचे चुकले असेल असे त्यांना वाटत च नाही. <<< पुन्हा +१

हा प्रॉब्लेम शाळेपुरताच नव्हे तर सोसायट्यांमध्येही भेडसावत असतो.

मी माझ्या पोरीला घेऊन थेट मार खाल्लेल्या पोराकडॅ गेलो व त्याला म्हटलं हिला तू मार... त्या नंतर तिनी परत कोणाला मारलं नाही. लहान मुलाना खूप ईगो >> मारल नाहि फक्त रागवल तरि काम होत.

एकाने मारल म्हणुन दुसर्याने मारावे हे पटत नाहि, मी खुपदा teacher ला सान्ग हेच सान्गते. पण it not works now days. Teacher किती मुलानच्या complain एकनार. मारामारि हे काहि मुलांचा खेळ असतो. ते विचार करत नाहित कि कोणाल लागु शकतो. पालकानि समजावयाला ह्वे. Atleast agree तर करायला हवे कि माझ मुल दुसर्याना त्रास देतो. Problem हाच असतो कि सगळ्या पालकाना आपले मुल innocent वाटत. त्याच्या समोरच म्हणतात कि त्याने काहि केल नाहि मग ते मुल जास्तच शेफारत.

माझी लेक सिनियर केजीत असताना मला एकदा शाळेत बोलावले होते माझ्या लेकीने एका मुलाला पोटात गुद्दा मारला म्हणुन.
मी आणि त्या मुलाचे पालक सगळे प्रिन्सिलॉलच्या केबिनमधे.
दोघांनाही समोरासमोर घेऊन प्रिंसिपलने विचारले की काय झाले?
दोघेही गप्प, खूप खोदुन विचारल्यावर कळले की माझी लेक शेजारी बसते म्हणुन हा मुलगा तिच्या पायाला चिमटे काढायचा. एक दोनदा तिने सहन केले पण नंतर राग येवुन तिने त्याला ढकलले बाजुला. बाकीच्या मुली यावर हसल्या त्यामुळे त्या मुलाचा इगो आडवा आल्याने त्या मुलाने रडारड केली आणि त्याची परिणीती शाळेत तक्रार करण्यात झाली.
पण पोटात गुद्दा वगैरे मारण्याचा प्रकार धादांत खोटा होता. कधी कधी पालक असेही वागू शकतात. इथे चुक मुलाची नक्कीच नव्हती जर त्याच्या पालकांनी त्याला असे करणे कसे चूक आहे हे सांगितले असते तर प्रसंग इतका वाढला नसता. स्वतःचा मुलगा रडतोय म्हणल्यावर त्यांनी पण काही समजुन न घेता तक्रार केली. अर्थात मी लेकीला सांगितलेच की अस कुणी काही केले तर समोर असलेल्या टीचरला सांगायचे. पण आमचं पात्र अन्याय सहन न करणार्‍यातल आहे.

सांगायच इतकच की दोन्ही बाजू तपासा कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी. कारण तक्रार करणारा/री किंवा खोडी काढणारा/री आपल्याच मुलाच्या वयाचे आहेत त्यामुळे त्यांची समजही आपल्याच मुलाइतकी असते. Happy

हा प्रॉब्लेम शाळेपुरताच नव्हे तर सोसायट्यांमध्येही भेडसावत असतो.>> अगदी,
आमच्या सोसा. एक मुलगा माझ्या पोरीला सारखा त्रास देत असे. त्याच्या बापाला सांगितलं तर "नाही हो, तुम्ही काहीतरीच बोलता" म्हणत माझ्यावरच डाफरला. मग एक दिवस बरीच मुलं खेळताना पोरीला ढकललं त्या पोरानी. मी दुस-या मजल्या वरुन पाहतच होतो. धावत जाउण पोराचे हातपाय धरुन हवेत उचललं व म्हटल् "फेकून देऊ का तुला" पोरगं रडायला लागलं. वाचमेनला पाठवून त्याच्या बापाला बोलवलं.

"या पुढे जर तुझ्या पोरानी हात लावला तर त्याला दुस-या मजल्यावरुन फेकून देईन" अशी धमकी दिली.

पोराचा बाप घाबरला की पोरगं सरळ व्हायला वेळ लागत नाही. त्या नंतर पोरगं सुता सारखं नाही तरी खूप बदलला.

मारक्या पोरांच्या बाबतीत पालकांच्या सायकॉलॉजीवर अटॅक करणे आवश्यक असते.

पालक घाबरला की पोराच्या वागणूकीत शिस्त दिसू लागते.

असल्या मुलांचे पालक पण मोस्ट्ली त्याच टाईप चे असतात. तेच तुमच्या अंगावर धावुन येतील.>>> प्रचंड अनुमोदन.

हे मी स्वतः अनुभवलं आहे, माझ्या मुलाच्या बाबतीत. तो इयत्ता दुसरीत असताना त्याच्या वह्यांत पाठीमागच्या पानांवर चित्रे वगैरे काढलेली असायची. माझ्या मुलाची चित्रकला तर बिलकुल चांगली नाही त्यामुळे हे सुबक काम दुसर्‍याचेच असणार हे नक्की माहित होते. माझा मुलगाही बराच बुजरा होता व जो मुलगा हे करतो त्याला तो घाबरून विरोध करत नसे. शाळेत जाऊन शिक्षकांना सांगितले. शिक्षकांनी जवळ बसणार्‍या मुलाला जाब विचारण्याआधीच त्याचे पालक (जे राजकीय वर्तुळातील आहेत) अरेरावीच्या भाषेत म्हणाले की आमच्या मुलावर आरोप करताय, सिद्ध करुन दाखवा की आमच्या मुलाने हे केलेय मी स्वत: मुलाचे नाव शाळेतुन काढुन टाकीन वगैरे.
आश्चर्य म्हणजे जेव्हा त्या मुलाला शिक्षकांनी विचारले तर त्याने स्वतःच कबुलीजवाब दिला की मीच हे केलेय म्हणून आणि मला घरी मम्मी चित्रे काढून देत नाही हे त्यामागचे कारणही सांगितले.
मान खाली घालून त्याचे पालक निमूटपणे निघून गेले होते तेव्हा.

दिनेश.,
तुम्ही वर दिलेल्या उदाहरणात कुणाला गंभीर दुखापत झाली नाही म्हणून ठीक पण तसे झाले असते तर..
मुलांनी आपापसात मिटवावे वगैरे काही वेळा ठीक वाटते पण नेहमीच नाही. त्यातून सगळीच मुले सारखी नसतात, भावनिकदृष्ट्याही आणि शारीरिकदृष्ट्याही.
शाळेत मुलाला सुरक्षित वाटणे खूप महत्वाचे. प्रत्येक शाळेत अँन्टी बुलिंग पॉलिसी हवी. तसे नसेल तर पालकांनी एकत्र येऊन शाळेला तसे करायला भाग पाडावे. यात शाळा सुरु होताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सर्वांनाच सुस्पष्ट मार्गदर्शन हवे. वर्तनाच्या काय अपेक्षा आहेत, गैर वर्तन झाल्यास काय उपाय योजना असेल हे सर्वांनाच स्पष्ट केले तर बराच गोंधळ कमी होतो. पालकांनी कशा स्वरुपात तक्रार करावी, त्यांच्या तक्रारींची नोंद कशा प्रकारे घेतली जाईल, समाधान न झाल्यास कशा प्रकारे मार्ग काढायचा, पुढे कुणाकडे दाद मागायची याबाबत योग्य पॉलिसी असेल तर ते सर्वांनाच सोईचे जाते. पालकांनी परस्पर मुलांना दम देणे, पालकांची भांडणे, पालकांचे शिक्षकांशी गैरवर्तन, शिक्षकांनी वर्तनसमस्येकडे दुर्लक्ष करणे यासारख्या चुकीच्या गोष्टींनाही यामुळे आळा बसतो.
गैर वर्तन करणार्‍या मुलांना समज देणे, योग्य शिक्षा हे जसे आवश्यक तसेच चांगले वर्तन करणार्‍या मुलांचे कौतुकही महत्वाचे. नुसत्या टेस्ट मधल्या मार्कांवर लक्ष केंद्रीत करण्या ऐवजी दर आठवड्याला चांगल्या वर्तनासाठी म्हणून मुलांचे कौतुक झाले तर खूप फायदा होतो. यात दंगेखोर मुलांचेही वर्तनात सुधारणा होइल तसे कौतुक करावे. आठवड्याचे स्टार स्टुडंट्स म्हणून वर्गात नाव जाहीर केले आणि वहीत लावायला स्टारचा स्टिकर दिला तरी मुलं चांगले वागायला धडपडतात.
बहुसंख्य केसेसेमधे काउंसेलिंगची गरज पडत नाही. पण मुलाबाबतच्या तक्रारींची नोंद ठेवली गेली तर पॅटर्न लक्षात येतो आणि काउंसेलरना वर्तन समस्या सोडवायला मदत होते.

मला घरी मम्मी चित्रे काढून देत नाही हे त्यामागचे कारणही सांगितले. <<
बापरे म्हणजे त्या बिचार्‍याला घरी चित्रं काढण्यावरून छळलं असणार नंतर.

मुलां सोबत पालकांचही काऊन्सलिंग झाल पाहिजे... फक्त शाळे पुरताच नव्हे तर एकंदर समाजिक जाणिवाच बोथट झाल्या आहेत. आपल्या आडमुठ्या किंवा इगो जपणार्‍या कृती मुळे इतरांना त्रास होऊ शकतो, हेच मुळात जनता विसरत चालली आहे.

सर्वत्र attack for service धोरणं अवलंबल जात आहे. मग पाल्यही कळत नकळत त्याचच अनुकरण करतं.

आशिका, पालकांची अरेरावी एका बाजूला, पण वहीच्या मागच्या पानांवर चित्रंच काढली होती ना? त्या चित्रांमध्ये आक्षेपार्ह काही होतं का शिक्षकांकडे तक्रार करण्यासारखं?

इंद्रा, तुझी पोस्ट मात्र पटली.

पण तरीही एकूणच या बाफवरच्या पोस्टी वाचता बरेच जण अतिसजग पालकत्वाचा अतिअवलंब करत आहेत असं वाटतंय.

पण मग जर उद्या तुमच्या मुलासंदर्भामध्ये जर अशाप्रकारे बुलिंगची तक्रार आली तर एक पालक म्हणून तुम्ही काय करणार आहात? या माझ्या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही.>>>>>>>

माझ्या मुलाचे संगोपन करताना त्याला जास्तीत जास्त सभ्यता शिकवता यावी यावर माझा कटाक्ष असतो. यात त्याला त्याच्या शाळेतील वर्तनाबद्दलसुध्दा अनेकवेळा सांगितले आहे. शाळेतुन कोणत्याही प्रकारची तक्रार येऊ द्यायची नाही हे सुध्दा त्याला समजावलेले आहे. मुलाचे लाड आणि शिस्त यात कधीच गल्लत होऊ देत नाही त्यामुळेच काही महत्वाच्या बाबी त्याला समजल्या आहेत.

पण तरी सुध्दा तुम्ही म्हणता तशी तक्रार आली तर मी स्वतः त्याच्या शाळेत जाऊन त्याच्या वर्गशिक्षक्/मुख्याध्यापक यांची त्यासोबत त्या मुलाची आणि शक्य असल्यास त्याच्या पालकांची भेट घेईन आणि झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करून माझ्या मुलाला त्यांची क्षमा मागायला सांगेन. आणि झाला प्रकार परत कधीही घडणार नाही ह्या बद्दल माझ्या मुलाला योग्य समज देण्यात येईल.

.

आमच्या सोसा. एक मुलगा माझ्या पोरीला सारखा त्रास देत असे. त्याच्या बापाला सांगितलं तर "नाही हो, तुम्ही काहीतरीच बोलता" म्हणत माझ्यावरच डाफरला. मग एक दिवस बरीच मुलं खेळताना पोरीला ढकललं त्या पोरानी. मी दुस-या मजल्या वरुन पाहतच होतो. धावत जाउण पोराचे हातपाय धरुन हवेत उचललं व म्हटल् "फेकून देऊ का तुला" पोरगं रडायला लागलं. वाचमेनला पाठवून त्याच्या बापाला बोलवलं.

"या पुढे जर तुझ्या पोरानी हात लावला तर त्याला दुस-या मजल्यावरुन फेकून देईन" अशी धमकी दिली.

पोराचा बाप घाबरला की पोरगं सरळ व्हायला वेळ लागत नाही. त्या नंतर पोरगं सुता सारखं नाही तरी खूप बदलला.

मारक्या पोरांच्या बाबतीत पालकांच्या सायकॉलॉजीवर अटॅक करणे आवश्यक असते.

पालक घाबरला की पोराच्या वागणूकीत शिस्त दिसू लागते.
>> अमेझिंग!!

त्रासदायक मुलांसोबत इतर मुलांनी कसे वागावे? इतर मुलांनी पेक्षा ईतर लोकांनी लिहील तर बरे होईल कारण ही मुले सगळ्यानांच त्रास देत असतात्.आमच्या घरात पण दिराची दोन आहेत मुलगा(वय वर्षे ८),मुलगी (वय वर्षे ७) खुप त्रास देतात्.आपण जागेवर नसेल तर घरातल्या रुमचा कचरापेटी...कोणतीही वस्तु तोड्ण्यात त्यांना आनंद मिळतो,सोफा फाडने,पाणि सोडुन देने,हॅन्डवॉश घेउन मोबाईल किंवा रिमोट वॉश करने,एकमेकांचे केस कापने,ड्रेसिंग टेबलवरचे सामान फोडने.....आजकाल छ्त्र्या मोडतायेत...
ह्यावर पण थोड अनुभवी पालकांनी मार्गदर्शन करावं..

Pages