मुलांच्या दांडगाईने वागण्याबाबत इतर मुले, इतर पालक आणि शाळा ह्यांनी काय करावे?

Submitted by वेल on 25 August, 2014 - 04:33

आजच शाळेतल्या एका पालकाकडून कळले की तिच्या मुलीला (पहिलीतल्या) तिच्याच वर्गातल्या मुलाने ढकलले. ती मुलगी स्वतःच्या जागेवर बसली होती आणि हा मुलगा त्या बेंचच्या बाजूने चालला होता. त्या मुलीचे नाक फुटून रक्त आले. ती मुलगी खूप घाबरली आहे.

त्या पालकाने शाळेत तक्रार केलेली आहे. शाळा नियमानुसार काय करायचे ते ठरवेल.

पण आपल्या मुलांनी अशा मस्तीखोर मुलांसोबत कसे वागावे? त्या मुलांपासून लांब राहावे हा उपाय नाही कारण ह्या परिस्थितीत ती मुलगी त्या मुलाच्या अध्यात मध्यातही नव्हती,

आपण आपल्या मुलांना अशी परिस्थिती हाताळायला शिकवताना काय शिकवावे? शिक्षकांकडे तक्रार करणे हा एकच ऑप्शन आहे का?

मला काही उपाय सुचले ते असे -

आपल्या मुलांना stand united शिकवावे. कोणी इतर कोणाला त्रास देत असेल तर ज्याला त्रास होतोय त्याची बाजू घेऊन आपण त्या त्रस देणार्‍या मुलाला हे लगेच थांबव असे शांत पण ठाम शब्दात सांगावे ( सहा वर्षाच्या मुलाकडून खूप जास्त अपेक्षा होत असेल कदाचित पण मी हे माझ्या मुलाला प्रॅक्टिकली कसं करायचं ह्याचा डेमो दिला आहे. तो ते तसं करू शकेल की नाही माहित नाही.)

त्रास देणारा हामुलगा नेहमीच इतर मुलांना त्रास देतो त्यामुळे त्या मुलाच्या वागण्याविरुद्ध शाळेत लेखी तक्रार करावी. आणि ह्यामध्ये मुलाला काउंसेलिंग देण्याची मागणी करावी. शिवाय पुन्हा असेच होत राहिल्यास पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करण्याची धमकी द्यावी.

कृपया तुमची मते मांडा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शीर्षक कसले लांबलचक आणि गोंधळात पाडणारे आहे.
इतर मुलांना त्रास देणार्‍या>>> या ४ शब्दांसाठी 'त्रासदायक' असा एकच शब्द वापरता येईल.

हा प्रतिसाद वाचून राग येईल, पण शीर्षक योग्य नसेल तर चांगले प्रतिसाद मिळणं अवघड होतं.

अरेरे पोलिस स्टेशनच का लगेच. त्या मुलाचे ही काही बिहेवरल इश्यूज असतील. उभय पक्षी काउन्सेलिन्ग घेतले दिले जावे. पालकांना सांगावे. पेरेंटल काउन्सेलिन्ग पण गरज आहे.

मंजूडी - धन्स. शीर्षक बदलले.

अमा,
मुलांचे आणि पालकांचे काउन्सेलिंग हा ऑप्शन आहेच पण तो आपण कसा अमलात आणायचा? शाळेला आपण फक्त पत्र देऊन सांगू शकतो की कृपया ह्या मुलाला आणि पालकांना त्वरीत काउन्सेलिंग करवा. ते करूनही मुलाचे वागणे बदलत नसेल तर (ज्याला पालक जास्त प्रमाणात जबाबदार असतात कारण हे मुले आहेत - लाडावलेले वंशाचे दिवे, ह्या एकाच वर्गात अशी तीन मुले आहेत) किंवा पालक अशा काऊन्सेलिंगला सिरियसली घेत नसले तर पोलिसांची धमकी देणे हा माझ्या मते एक मार्ग आहे. कारण हा प्रकार पहिल्यांदा झालेला नाही.

अमाशी सहमत... तसेच मुलांना फिजीकली फिट ठेवून वेळ पडल्यास ( वेळ पडल्यासच ) प्रतिकार करायला पण शिकवले पाहिजे. नेमकी वेळ कधी येते, ते पण नीट समजावून सांगितले पाहिजे.
प्रतिकार होत नसेल तर त्रास देणे जास्तच वाढते.
शाळेत लेखी तक्रार कराच. त्यासाठी इतर पालकांचे सहकार्य मिळाले नाही तरी थांबू नका.

पोलिस स्टेशन? सहा वर्षाच्या मुलासाठी?? सीरीयसली?

आपलाच मुलगा शाळेत अशाप्रकारे मस्ती करतो अशी तक्रार केली तर एक पालक म्हणून काय स्टेप घ्याल?

तसेच मुलांना फिजीकली फिट ठेवून वेळ पडल्यास ( वेळ पडल्यासच ) प्रतिकार करायला पण शिकवले पाहिजे. नेमकी वेळ कधी येते, ते पण नीट समजावून सांगितले पाहिजे.>> हेच नक्की कसे करायचे ह्याबद्दल थोडे मार्गदर्शन मिळेल का?

प्रतिकार होत नसेल तर त्रास देणे जास्तच वाढते.>> हेच मला म्हणायचे आहे. आई वडिल देखील अशा तक्रारींना खूप सिरियसली घेत नाहीत.

आज त्या मुलीच्या नाकातून रक्त आले. मुलं लिहित असतात, पेन्सिल्स समोर उघड्या असतात, अशाच धक्यामध्ये उद्या एखाद्या मुलाला / मुलीला डोळ्याला इजा झाली म्हणजे? ती भरून येणार आहे का?

त्रास देणारा हा मुलगा नेहमीच इतर मुलांना त्रास देतो त्यामुळे त्या मुलाच्या वागण्याविरुद्ध शाळेत लेखी तक्रार करावी. आणि ह्यामध्ये मुलाला काउंसेलिंग देण्याची मागणी करावी. शिवाय पुन्हा असेच होत राहिल्यास पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करण्याची धमकी द्यावी.

==>

अगदी योग्य आहे. धमकी द्यावी असे लिहीले आहे, प्रत्यक्ष तक्रार करावी असे नाही. धमकी आवश्यक आहे कारण अशा टोणग्यांना लहानपणीच दाबले नाही तर मोठे होऊन बालगुन्हेगार किंवा आणखी मोठे झाल्यावर अत्याचारी होण्याची शक्यता आहे.

माझ्या मुलीला रिक्षात एका मुलाने मारले होते. मी आधी त्या मुलांना त्यांच्याच वर्गात जाऊन वर्गशिक्षिकांसमोर हग्या दम दिला आणि मग मुख्याध्यापकांकडे तक्रार केली आणि सांगितले की तुम्ही पालकांना बोलावून तंबी द्यायची हमी दिली आहे म्हणून नाही तर मी लेखी तक्रार करेन असे म्हणून हातातली लेखी तक्रार नाचवली त्यांच्यासमोर. कारण त्या मुलाने आधीही माझ्या मुलीला त्रास दिलेला होता. माझा अवतार पाहून सगळे टरकले होते. मात्रा बरोबर लागू पडली.

त्याच बरोबर मुलीला सांगितले त्याने परत मारले तर तो थांबे पर्यंत तू मारत रहा. जीव खाऊन हाणत रहा.

क्लास टिचरशी आधी बोलुन ( ते ही व्यवस्थीत आणी टिचरचा योग्य तो आब राखुन ) स्पष्ट शब्दात आपले म्हणणे मान्डावे. कारण क्लास टिचरच आधी क्लासमधील मुलान्च्या सम्पर्कात असतात.

माझ्या मुलीला तिच्याच क्लास मधली मुलगी अशीच त्रास द्यायची. तिच्या पेन्सिली, रबर लाम्बवायची. शेवटी ती मुलगी माझ्या बरोबरच येत असताना तिच्या आई समोरच मी सान्गीतले की माझ्या मुलीच्या पेन्सिली आणी रबर वर्गातल्या मुली पळवतात. त्या मुलीला काय वाटले माहीत नाही, पण दुसर्‍या दिवसापासुन तो प्रकार बन्द झाला.

ती मुलगी आधी माझ्या मुली शेजारी बसत होती, पण मीच टिचरला तिची ( माझ्या मुलीची ) जागा बदलायला सान्गीतल्यावर त्यानी खरच मदत केली. आणी तिलाही झापले.

टिचर शी सन्वाद साधा हेच आधी योग्य पाऊल आहे, पोलीसान्कडे जाऊ नका. उगाच लहान मुलान्चे भाव विश्व अशाने कोलमडेल.

किंवा पालक अशा काऊन्सेलिंगला सिरियसली घेत नसले तर पोलिसांची धमकी देणे हा माझ्या मते एक मार्ग आहे. कारण हा प्रकार पहिल्यांदा झालेला नाही.>> चुकीचा मार्ग आहे. जरा दुसर्‍या पद्धतीने विचार करून बघा. किंवा तुम्ही स्वतः एखाद्या एज्युकेशनल एक्ष्पर्ट, काउन्सेलरला भेटा. जी चूक सुधारता येणे शक्य आहे त्याला पोलीस मध्ये आणून पार गॉन केस करून टाकणार का? त्या मुलांना शाळेतून काढ्णे, स्पेशल मुलांच्या शाळेत काढ्णे एडी एच डी असल्यास औषध उपचार करणे हे मार्ग आधी अवलंबले पाहिजेत. पेशन्स मला तुमच्यामध्ये पण कमी वाट्तो आहे हा प्रकार सोडविण्यात.

टोणगे, त्यांना लहान पणी दाबले पाहिजे ही वाक्य रचना सुजाण पालकत्वाचे लक्षण नाही. तेव्हा पास.

या तुमच्या वाक्याचा निषेध. आमच्या मुलांना मारहाण होणार असेल तर ती करणार्‍यांसाठी हेच शब्द योग्य आहेत.

जी मुलं शाळेत असं वागतात ती घरीही दंगेखोर असणारच. वर्गशिक्शकासोबत त्या पालकाशी मिटींग घ्यावी. मुलांनाही समोर उभे करून. इट वर्क्स.

बर्‍याच वेळेला मुलांना परिणामांची जाणीव नसते त्यामुळे त्यांच्या हातून हे असे प्रकार घडतात.

अश्या मुलांना जमेल तेवढा प्रतिकार आणि टीचरकडे तक्रार कर हे आपण आपल्या मुलांना सांगून ठेवणे योग्य. शिवाय अश्यावेळी घाबरून न जाता घडलेला प्रकार जसाच्या तसा घरी आईबाबांना सांगायचा हे पढवून ठेवणे.
विशिष्ट मुलांबद्दलच्या तक्रारी वाढल्या तरच आपण टीचरकडे धावणे योग्य.

वय वर्ष सहासाठी पोलिस आणि बालगुन्हेगार वगैरे जे काय काय लिहिले आहे ते वाचून धक्का बसला.

आणि नंदिनीचा प्रश्नही योग्य आहे - आपल्या मुलाबद्दल अश्या तक्रारी आल्या तर आपण काय करू?
यावरही चर्चा होणं अपेक्षित आहे.

हे माझ्या मुलासोबत झालेले नाही, पण होणार नाही असेही म्हणता येत नाही.

असे काही कोणी माझ्या मुलासोबत केले तर एक तर मुलाला सांगितले आहे घाबरून जायचे नाही. तुला किंवा इतर कोणालाही कोणी मुलगा मारत असेल तर मारणार्‍या मुलाचे दोन्ही हात पकडायचे आणि गरज पडल्यास त्याला जोरात रागवायचे. आपल्यासोबत होत नसेल तरी मित्रांना मैत्रिणींना मदत करायची.

असा धक्का देणे वगैरे प्रकार झाले तर मी शाळेत धरणेच धरेन जोवर त्या पालकांची माझी भेट होत नाही आणि त्यांना मी काऊन्सिलरकडे नेत नाही तोवर मी इथून उठणार नाही.

आणि त्रासदायक वागणे हे एकदोन वेळा एक दोन मुलांसोबत होणे वेगळे आहे आणि जून मध्ये शाळा सुरू झाल्यापासून दर दोन आठवड्याला कोणा मुलासोबत होणे हे वेगळे आहे.

टिचर शी सन्वाद साधा >> हे तर चालू आहेच कोणा ना कोणाचे अगदी जूनपासून...

त्रासदायक मुलांना पालकांसमोर थंड स्पष्ट आणि ठाम शब्दात सांगणे हा एक ऑप्शन आहेच.
पोलिसांची धमकी पालकांना द्यायची आहे मुलांना नाही. कारण मुलांचे वागणे न बदलायला ते कारणीभूत आहेत.

पोलिसांकडे तक्रार करणे क्रूर आहे असे म्हणताना हाही विचार करायला हवा अशा मुलाने एखाद्या मुलाला जिन्याच्या वरच्या पायरीवर असताना ढकलले आणि ते मूल जर अख्खा जिना - कमीतकमी १५ पायर्‍या गडगडत खाली पडले तर काय होईल? सिच्युएशन इमॅजिन करून बघायची. मग कोण क्रूर ठरेल, त्रासदायक मूल की त्या त्रासदायक मुलाचा त्रास कमी व्हावा ह्यासाठी पावले न उचलणारे आपण?

या वयातील सर्वच मुल/मुली थोड्याफार प्रमाणात डांबरट पणा करतातच. तेंव्हा असे विषय सुरवातीला समोपचारांने मिटतात का हे आधी पहावे.

वेल, मुलं शाळेत जायला लागली की हे प्रकार सगळे सुरू होतातच. वर्गशिक्षकांनाही कोण कोण मुलं त्रासदायक आहेत ते माहित असतं. आपल्या पाल्यानं तक्रार केली की सर्वप्रथम तिच्या/त्याच्यावर विश्वास दाखवला पाहिजे. म्हणजे तूच बरोबर असं म्हणायचं नाही. पण हो, असा प्रसंग घडला आहे आणि त्याबद्दल अधिक माहिती घेण्यास मी उत्सुक आहे हे त्यांना कळू दे. बरेचदा पालक, जाऊ दे गं, जाऊ दे रे असं म्हणून झटकून टाकतात आणि मुलांना मग त्यांना त्रास होणार्‍या गोष्टी कोणापाशी बोलाव्यात हे समजत नाही.

हळू हळू बोलून आणि प्रश्न विचारून नक्की प्रसंग काय घडलाय ते समजून घ्यावं. बरेचदा आपलं मूल स्वतःचीच बाजू सांगतं आणि दुसरी बाजू काय ते नक्की कळत नाही. आणि आपलं मूल आपल्यासमोर वागतं त्यापेक्षा बाहेर वेगळं वागू शकतं हे ही लक्षात ठेवावं.

एकदा का प्रसंग लक्षात आला, की मग ठरवता येतं की अ‍ॅक्शन काय घ्यायला हवी.

नेहमी बुली केल्या जाणार्‍या बुजर्‍या मुलांना आत्मविश्वास देणं गरजेचं असतं. त्यांना सुरवातीला थोडंफार प्रोटेक्शन लागतं. याकरता डायरेक्ट दुसर्‍या मुलांच्या पालकांशी बोलण्यापेक्षा वर्गशिक्षकांशी बोलावं. काय घडलंय आणि त्यामुळे मुलाला कसा त्रास होतोय ते सांगावं. आणि काय उपाय करता येईल हे त्यांनाच विचारावं. ते अशा प्रकारच्या परिस्थिती हाताळण्यास समर्थ असतात. मुलांच्या पालकांशी बोलल्यास ते ऐकतीलच असं नसतं. वर्गशिक्षकांकडून प्रकरण नीट हाताळलं गेलं नाही तर मुख्याध्यापिकेकडे लेखी तक्रार द्यावी.

नेहमी बुली केल्या जाणार्‍या बुजर्‍या मुलांना आत्मविश्वास देणं गरजेचं असतं. >> मामी फक्त बुजरी नाहीत ग सगळीच मुलं त्या तीन मुलांना घाबरत आहेत. आठ मुलांकडून एकच वर्जन ऑफ स्टोरी ऐकतेय मी. बेसिकली सगळ्या मुलांना असहा सिच्युएशन हॅण्डल करायला आत्मविश्वास कसा द्यायचा. पीअर सपोर्ट ह्याबद्दलसुद्धा गाईडन्स हवाय.

<< आपल्या पाल्यानं तक्रार केली की सर्वप्रथम तिच्या/त्याच्यावर विश्वास दाखवला पाहिजे. म्हणजे तूच बरोबर असं म्हणायचं नाही. पण हो, असा प्रसंग घडला आहे आणि त्याबद्दल अधिक माहिती घेण्यास मी उत्सुक आहे हे त्यांना कळू दे. बरेचदा पालक, जाऊ दे गं, जाऊ दे रे असं म्हणून झटकून टाकतात आणि मुलांना मग त्यांना त्रास होणार्‍या गोष्टी कोणापाशी बोलाव्यात हे समजत नाही.>> हे मी त्या पालकांना नक्की सांगेन. मला शब्द सापडत नव्हते. मी स्वतः हेच करते. ह्याशिवाय इतर काही मुलांशी बोलूनही त्यांच्याकडून त्याचे अनुभव ऐकले आहेत.

<< वर्गशिक्षकांकडून प्रकरण नीट हाताळलं गेलं नाही तर मुख्याध्यापिकेकडे लेखी तक्रार द्यावी.>> हे केले नाहीये अजून पण नक्की करण्यात येईल. ह्याकरता ज्या ज्या मुलांला त्रास झालाय त्या पालकांनी एकेकाने लेखी तक्रार द्या असही सांगेन.

बेसिकली सगळ्या मुलांना असहा सिच्युएशन हॅण्डल करायला आत्मविश्वास कसा द्यायचा. पीअर सपोर्ट ह्याबद्दलसुद्धा गाईडन्स हवाय. >>> हे खूप लवकर होतंय असं वाटत नाहीये का? म्हणजे त्यांच्या आत्मविश्वास नाही असा निष्कर्ष खूप लवकर काढला जातोय असं वाटत नाहीये का?
प्रतिकार करायला हवाय ही भावना त्या मुलांच्या मनात आपली आपण उद्भवू द्या ना..

मग त्या सगळ्या आठ मुलांच्या पालकांनी एकत्र येऊन लेखी निवेदन मुख्याधिपिकेस द्यायला हवे. नक्कीच अ‍ॅक्शन घेतली जाते.

माझ्या मुलीच्या स्कूलबसमध्ये अशी उपद्व्यापी मुलं होती. ती मुलं बसस्नॅक आणायचे आणि खाण्याऐवजी त्याचे तुकडे इतरांवर फेकायचे. एकदा लेक आणि तिची मैत्रिण बसमध्ये एका सीटवर बसून गप्पा मारत असताना ते पेन्सिलीची टोकं त्यांच्या डोळ्याजवळ नेत होते. कळल्यावर मी आणि तिच्या आईनं इमेली केल्या. लगेच शाळेनं त्यांच्या पालकांना बोलावून त्यांना आणि मुलांना समज दिली. तो प्रकार लगेच थांबला.

प्रतिकार करायला हवाय ही भावना त्या मुलांच्या मनात आपली आपण उद्भवू द्या ना..

>>> प्रत्येक मूल वेगळं. प्रतिकार करायला हवा हे काही मुलांना सांगावं लागतं. नाहीतर त्यांचा आधिच कमी असलेला आत्मविश्वास अजूनच डळमळीत होतो. याकरता मुलांचा आणि पालकांचा संवाद अत्यंत गरजेचा. बुजर्‍या मुलांना प्रतिसादाची इच्छा असली तरी त्यांच्याकडून तो होईलच असं नाही. त्यामुळे जर घरच्यांनी सांगितलं की कोणी 'अरे' म्हटलं तर तो जरूर 'कारे' कर तर त्यांना भावनिकदृष्ट्या खूप आधार मिळतो.

खुपच अवघड होत असल्यावेळी. १ लि पासुन असे प्रकार खुप वाढतात. मी दिली होति धमकि १ मुलाला फक्त भिति दाखवण्यासाथि, खुपच issue केला त्याच्या आईने, त्याने मारलच नाहि , त्याचि काहिच चुक नाहि अस म्ह्णुन पालक, दुर्लक्श करतात, पण ज्या मुलाला लागत त्याच काय. कितिदा दुर्लक्श करायच.खुपच मानसिक त्रास होत त्यामुळे. आणि एकाला बघुन दुसरे हि मुले मारायला लागतात. Teacher पण रोजचि complain बघुन जो पर्यन्त कोणाला मार नाहि लागत, सिरियसली घेत नाहित. मला शाळेत overprotective mother समजतात.
जे मुल वीक (or sincere) आहेत, त्याना खुप त्रास होतो शाळेत आजकल.
I have faced lot of this type of issues in these 3 years. As per teacher my daughter is most sincere and calm student in class but that creates issue when she deal with naughty kids. Now days she is becoming smart, She dont play (Dont take Panga) much with naughty kids. त्या मुलाना हो ला हो म्ह्णते.

प्रतिकार करायला हवाय.. हे मुले शाळेच्या बाहेर, घरात शिकतील. त्यासाठी योग्य ते वातावरण घरात हवे.
घरातच एखादी व्यक्ती आपली मते इतरांवर लादत असेल, तर जग असेच असते असे त्यांच्या मनवार ठसू शकते.

मला गाडगीळांच्या, किडलेली माणसे, मधली "ती" आठवली.. तिची सासू तिला जेवायला कमीच वाढत असे म्हणून ती स्वतः वाढून घेतानाही कमीच घेत असे... असे काहीसे वाक्य आहे ते.

शिवाय असे प्रसंग फक्त वर्गातच घडतील असे नाही. स्कूलबसमधे, मधल्या सुट्टीत देखील घडतात. त्यामूळे
आपल्या मूलाकडून खरे वदवून घेऊन ( वाटल्यास त्याची शहानिशा करून ) याप्रसंगी तू कसे वागायला हवे होतेस, हे देखील सांगायला पाहिजे.

शिक्षकांकडे, मुख्याध्यापकांकडे देखील तक्रार करणे मुलाला स्वतःला जमले पाहिजे.

असल्या मुलांचे पालक पण मोस्ट्ली त्याच टाईप चे असतात. तेच तुमच्या अंगावर धावुन येतील.

माझ्या एका नात्यातल्या मुलीच्या शाळेत पण हाच प्रोब्लेम आहे, शिक्षक आणि शाळा नुस्ती बघ्याची भुमिका घेते.

असल्या मुलांचे पालक पण मोस्ट्ली त्याच टाईप चे असतात. <<
हेच लिहायला आले होते. बुलिइंग करणार्‍या मुलांपैकी अनेकांचे पालक
१. आमचा मुलगा असं करूच शकत नाही
२. त्यात काय झालं एवढिशी खोडी काढली तर
३. माझ्या मुलाची तक्रार ती अमुक तमुक करते म्हणजे तिलाच आकस असणार माझ्या मुलाबद्दल
या मानसिकतेचे असू शकतात. किंवा त्या अ‍ॅग्रेसिव्ह मानसिकतेला विनिंग मेण्टॅलिटी समजणारेही पालक असतात. अश्या वेळेला व्हिक्टिमाइज होणार्‍या मुलांच्या पालकांनी काय करायचं?

याचबरोबर उद्या समजा आपल्या मुलाबद्दल/ मुलीबद्दल अशी तक्रार आली तर आपण काय करू? किंवा हा प्रश्न कश्याप्रकारे सोडवू? याची पण चर्चा व्हावी

हम्म्म माझ्या लेकीच्या बाबतीत पण असाच प्रकार घडयचा ती रोज तक्रार करायची की तो/ती त्रास देतो. तेव्हा मी तिला सांगुन ठेवले आहे की जो तुला मारेल त्याला जोरात ओरडुन दम द्यायचा आणि तरीही नाही ऐकला तर जोरात 'टिचर हा/ही मला मारतो/ते' असे ओरड. तेव्हा जर टिचरने लक्ष नाही दिले तर मला सांग मी तुझ्या टिचरशी बोलेन.
ती शाळेत खुप बुजरी आहे तरीही तिची खुप तयारी करुन घेतली तेव्हा तिने त्या मुलाला दम दिला. दोन तिन वेळा असे झाल्यावर तिच्या आवाजातील 'दम' वाढला आणि हल्ली तिची त्या मुलाबद्दलची तक्रार येण बंद झाली.
हल्ली नविन तक्रार येते नविन मुलीबद्दल आता पुन्हा लेकीला तयार करावी लागेल....

टोचा | 25 August, 2014 - 15:34

असल्या मुलांचे पालक पण मोस्ट्ली त्याच टाईप चे असतात. तेच तुमच्या अंगावर धावुन येतील.<<<

तुमचा हा प्रतिसाद पाहिल्या पाहिल्या तुम्हाला विपू केली.

नीधपंनी तो चांगला विस्तारला मुद्दा!

एकुण मस्त चर्चा!

नी मुद्दा चांगला आहे. ह्यावरही पिल्लूसोबत बोलून झालं आहे. लिहिते थोड्याच वेळात

निल्सन - धन्स. आणि पुन्हा एकदा साठी ऑल द बेस्ट.

Pages