निसर्गाच्या गप्पा (भाग २१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2014 - 13:39

निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्‍यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.

नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!

वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निसर्गाचं काही बिघडत नाही. बिघडणार आपलं, आपण त्यात जिवंत राहू का हा खरा प्रश्न! निसर्गाचं नुकसान करू नका, निसर्गावर घाला घालू नका, अशी हाकाटी आपण गाजवतो. निसर्गाचं काहीही नुकसान होत नसतं. नुकसान कुणाचं? तर आपलं!!

ह्म्म.. मलाही हेच वाटते..

खरेतर मानवाने प्राण्यासारखे जगणे सोडुन एका जागी राहुन शेती करणे सुरू केले आणि नंतर जे काही झाले त्याला प्रगती म्हणावी की अधोगती असा प्रश्न मला कधीकधी पडतो.

त्या पहिल्या स्टेजचे जगणे आणि आजचे जगणे यात जमिन आस्मानाचा फरक आहे. पण तरीही असे म्हणावेसे वाटते की गेल्या ५० वर्षांपर्यंतची प्रगती ही निसर्गाशी सुसंगत राहुन केलेली अशी होती. आपल्या आवाक्याचा विचार करुन आणि निसर्गाचा विचार करुन जे काही जमतेय ते करण्यात मानवाने धन्यता बाळगलेली.

पण आजचा मानव उन्मत झालाय. निसर्ग मेरी मुठ्ठीमे, माझ्या मनात येईल तसे मी त्याला वाकवेन ही भावना आज बोकाळलीय. आणि इथेच त्याच्या विनाशाची सुरवात झालीय. आजवरचा इतिहास पाहता जितक्या मानवांनी उन्मतपणा बाळगलाय आणि जगावर हुकुमत गाजवायचा प्रयन्त केलाय ते तेवढ्याच वेगात भुईसपाट झाले. आता प्रत्यक्ष निसर्गावर हुकुमत गाजवायच्या प्रयत्नात मानवाचे काय होणार हे सुस्पष्ट आहे.

शशांक, तुम्हाला योग्य वेळी योग्य ते अगदी चटकन आठवते आणि लगेच शेअर पण करता. Happy

शशांक.. छान उतारा आहे.
पेट्रोलियमचा शोध लागण्या ऐवजी.. सोलर एनर्जीचा साठा करून ठेवण्याचा शोध लागला असता तर कदाचित काही वेगळे घडले असते असे वाटतेय... पुढच्या ५० वर्षात ते घडेलही. म्हणजे पेट्रोल ला पर्याय सापडेलही.
तोपर्यंत शहाणपणा आवरायला हवा !

प्रचि छान! शशांक खूप छान उतारा. मंगलवारी सखी सह्याद्ीवर शभदा पटवर्धन ही खूप छान सांगतात परवा चंगलवाद अन निसर्ग विषयावर बोलत होत्या. त्याला थोडा आवर घालायला हवा पण ..... थोडं हे फार व्यक्तिसापेक्श आहे.... आपण निगकर्स समविचारी आहोत त्यामुलेसजास्त काही लिहीत नाही ... साधना म्हणतेय ते अगदी खरंयं

पण आजचा मानव उन्मत झालाय. निसर्ग मेरी मुठ्ठीमे, माझ्या मनात येईल तसे मी त्याला वाकवेन ही भावना आज बोकाळलीय. आणि इथेच त्याच्या विनाशाची सुरवात झालीय. आजवरचा इतिहास पाहता जितक्या मानवांनी उन्मतपणा बाळगलाय आणि जगावर हुकुमत गाजवायचा प्रयन्त केलाय ते तेवढ्याच वेगात भुईसपाट झाले. आता प्रत्यक्ष निसर्गावर हुकुमत गाजवायच्या प्रयत्नात मानवाचे काय होणार हे सुस्पष्ट आहे.>>>> +1

साधना, खरंच इंटरेस्टिंग विचार. मी मागे 'पृथ्वीवर माणूस उपराच' नावाचं पुस्तक वाचलं होतं. अगदी याच विषयावर आहे आणि बरेच दाखले दिले आहेत. ते वाच. डिटेल्स माहित नाहीत.

वॉव्,जो, खरबुज मस्त दिस्तंय.. घरचं..सो लकी!!!
लहानपणी आतून हिरवं असलेलं खरबूज ही मिळायचं ते आता मी देशोदेशी फिरले आता नाही दिसत अजिबात.. भारतात मिळतात का अजून ती??

चला... निसर्गयात्री,आता खालच्या फोटोतलं ,तो माणूस(खायला) विकतोय ते नेमकं काय आहे? Happy
ओळ-खा! Wink

https://lh3.googleusercontent.com/Qv5qhxBPpesd1j5VxlfnhBUlsgbv9F1h5BHw6wrIDqc=w256-h581-no

ती घायपात आती, आमच्या गावाला पाहीली आहे मी, भारे बांधन्या साठी उपयोग करतात,
खरबुज वॉव् तोंडाला पाणी आले.

मी मागे 'पृथ्वीवर माणूस उपराच' नावाचं पुस्तक वाचलं होतं. अगदी याच विषयावर आहे आणि बरेच दाखले दिले आहेत. ते वाच. डिटेल्स माहित नाहीत.

मी ऐकलेय या पुस्तकाबद्दल, पण वाचायचा योग अजुन आला नाही.. पण 'पृथ्वीवर माणूस उपराच' असावा याबद्दल माझी खात्री आहे.

जो_एस, किती बरे वाटते ना आपल्या कुंडीतले फळ खायला... मी अननस, हे वरचे फळ, कलिंङड इ. खाल्लेय. कलींगड अगदी मोसंबीएवढेच होते, पण माझ्या कुंडीतले होते ना... Happy

अआ, ते कसले तरी कंदमुळ आहे ना? राम म्हणे हे खाउन राहिलेला जंगलात व्.व. खुप माहिती वाचलीय. पण राम इतके मोठे कंदमुळ का काढत बसला देव जाणे, त्यापेक्षा बाग केली असती तर इतर फळे पण मिळाली असती.

हे नक्की काय आहे ते सांगा कोणीतरी (शशांक धावा....)

आता खालच्या फोटोतलं ,तो माणूस(खायला) विकतोय ते नेमकं काय आहे? >>>
हे पाहिलय, नाव माहीत नाही

कंदमुळ आहे मी शाळेत असताना खुप वेळा खाल्ले आहे, तेव्हा विकणारा असेच सायकल वर घेउन यायचा

राम म्हणे हे खाउन राहिलेला जंगलात>>> ह्याना विचारुन सांगते मागच्या आवतारात कंदमुळ खाल्ल होत का?? ( राम हे माझ्या नवर्‍याच नाव आहे Proud )

मस्त खरबूज जो.. ती करवंदेच आहेत.
ते रामाचे कंदमूळ.. गोडसर लागते मधल्या भागात बाकी कच्च्या बटाट्यासारखे लागते.

वर्षू.. हिरवे मेलन मिळते आपल्याकडे. मस्क मेलन म्हणतात.. ( पण तू नेमकी सिझनला भारतात हवीस ना ! )

पृथ्वीवर माणूस उपरा ची चर्चा आहे मायबोलीवर.. त्यात केवळ ऐकीव माहिती आहे. त्यातल्या काही प्रकरणांवर ( उदा. इस्टर आयलंड मधले पुतळे ) बीबीसी ने पर्दाफाश केलेला आहे.

त्यातल्या काही प्रकरणांवर ( उदा. इस्टर आयलंड मधले पुतळे ) बीबीसी ने पर्दाफाश केलेला आहे.

मराठीत लिहिलेल्या पुस्तकाचा पर्दाफास बीबीसी ने करावा? इतके झाले होते का हे पुस्तक प्रसिद्ध??
(तेव्हा मायबोली असती तर बीबीसीला कष्ट घ्यावे लागले नसते, इथल्या जागरुक मेंबरांनी काही प्रकरणांचाच काय, पुर्ण पुस्तक आणि लेखक दोघांचाही पर्दाफाश केला असता Wink Wink )

फोटोत दिसणार्या कन्दावर शिवाजी विद्यापीठात संशोधन झालेले आहे. डीएनए बारकोडिंग करून त्या कंदाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानुसार ते एकप्रकारच्या घायपाताचे (Agave sisalana) मूळ असल्याचे स्पष्ट झाले. त्याला फुले येण्याच्या सुमारास हा कंद काढून घेतला जातो.लहान चकत्या काढून विकत असल्याने त्याने दुष्परिणाम कळत नाहेत, पण ती जास्त प्रमाणात खाल्ल्यास विषारी आहे.
अधिक माहितीसाठी करंट सायन्स मधला हा शोधनिबंधः http://www.currentscience.ac.in/Volumes/100/09/1277.pdf

जो. एस., तुमच्या फोटोत दिसणारे फूल केवढे होते? काळ्या शिरिषाचे वाटते आहे. दुसर्या फोटोतील फुले 'फणशी'ची वाटताहेत. दोन्हीची झाडे वेताळ टेकडीवर भरपूर आहेत.

निगवरच्या चर्चा वाचायला आणि फोटो पहायला मजा येते आहे. Happy

खरबूज मस्तच!

घायपात असावी का? >>> हिला आमच्याकडे केकतड म्हणत. आम्ही ते मेथीच्या, कोथिंबीरीच्या जुड्या बांधायला वापरत असू. पानांना काटेरी किनार असते तर टोकाला अगदी टोकदार मोठा काटा असतो. त्याला मधे जे तुरे आलेत ना बहुदा त्यांना केशरी रंगाची फुले येतात. त्यांची भाजी करतात असे ऐकीवात आहे.

जो_एस, किती बरे वाटते ना आपल्या कुंडीतले फळ खायला>>>
हो , आणि ते पुर्णपणे झाडावर पिकलेल असल तर जास्तच मधुर लागत

खरं तर बीबीसी चे चित्रीकरण जुने आहे, लेखकाने त्याची दखल घेतलेली नाही.
त्या एकाकी बेटावर ( सध्या तिथे काही उगवत नाही ) प्रचंड मोठे पुतळे रांगेत उभे केलेले आहेत. प्रथमदर्शनी ते काम "अमानवीय" वाटते. पण त्या काळात तिथे मानवी वस्ती कशी होती आणि ते पुतळे करणे मानवाला कसे शक्य होते याचे चित्रीकरण बीबीसी ने केलेय.

घायपाताची लागवड करून वाळवंटाचा प्रसार रोखता येतो. त्याची मूळे खुप खोल जातात. त्यापासून नलिनी म्हणतेय तसे धागे तर काढता येतातच ( Sisal) पण त्यातल्या एका जातीपासून एक प्रकारचे गोड सिरपही करतात. ( साखरेला पर्याय पण त्यातही एक प्रकारची साखर असतेच, त्यामूळे मधुमेहींना चालेल असे अजिबात नाही. ) बीबीसी फूड वरच्या एका रेसिपीत वाचले मी हे.

वॉव्,जो, खरबुज मस्त दिस्तंय.. घरचं..सो लकी!!!>> +१
त्या फळाचा / कंदाचा फोटो मागे बहुदा जिप्सीने टाकलेला.
साधना बरी झालेली दिसतेय Happy
असे मोठे मोठे घायपात गणपतीपुळ्याला एमटीडीसीच्या पायर्‍यांवरुन समुद्रात जायला उतरताना पाहिले.

त्या एकाकी बेटावर ( सध्या तिथे काही उगवत नाही ) प्रचंड मोठे पुतळे रांगेत उभे केलेले आहेत. प्रथमदर्शनी ते काम "अमानवीय" वाटते. पण त्या काळात तिथे मानवी वस्ती कशी होती आणि ते पुतळे करणे मानवाला कसे शक्य होते याचे चित्रीकरण बीबीसी ने केलेय

ह्म्म.. हल्लीच पिरॅमिडचे दगड इतके उंच घेऊन जाणे कसे शक्य आहे यावरही काहीतरी वाचलेले आठवतेय. पिरॅमिडचा उंच आकार पाहिला की माणसाला असे काही बांधणे शक्य नाही असेच वाटायला लागते. पण थोडे गणीत, थोडी कल्पकता आणि थोडे डोके लावले की असल्या गोष्टी कशा केल्या असतील याचे कोडे उलगडायला लागते. आज जगात जे अमानवीय दिसतेय त्यामागचे रहस्य उलगडले की मग ते अमानवीय राहात नाही हेच खरे.

गौराम्मा, आशुतोष, जो_एस, अत्रूप्त आत्मा मस्त फोटो.

शशांकजी मस्त माहिती शेअर केलीत. अनिल अवचट यांची मी fan आहे.

जो_एस तुमच्या कुंडीत काय काय मस्त लावता तुम्ही, मोठ्या आहेत का कुंड्या?

हल्ली मानुषीताई नाही दिसल्या बरेच दिवसांत.

इस्टर आयलंडबद्दल विकिवर वाचत होते..

Polynesian people settled on Easter Island in the first millennium AD, and created a thriving culture, as evidenced by the moai and other artifacts. However, human activity, the introduction of the Polynesian rat and overpopulation led to gradual deforestation and extinction of natural resources, which caused the demise of the Rapa Nui civilization.

असा धडधडीत इतिहास समोर असुनही आपण डोळे बंद करुन बसतो.. Happy

Pages