चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी हा आठवडा पार पाडला तर मला कोअर ग्रूपात घ्या.
नायतर हाकलून लावा. डोळा मारा >> अग कोअर ग्रुप म्हणजे वजन कमी करण्याबद्दल सिरियस असलेल्या लोकांचा ग्रुप . जर सगळेच्या सगळे ५४ त्यात आले तर आनंदच आहे की Happy

my score today- 6/7
no sprouts in the night!! and shallow fry fish - 2 small pieces

@ robinhood

हम्म्म्म

मीपण वाचले आहे ते!

मी office मध्ये हेवी ब्रेकफास्ट करते , दुपारी थोडे जेवते , ४ वाजता वगैरे फळे खाते आणि रात्री कमी जेवते. So that I feel that my Stomach is not too full as the article says Happy

मस्त धागा . मी पण आली तुमच्यात !
मला वजन कमी पेक्षा stamina वाढवायचा आहे .३ दिवस झाले चालायला सुरुवात केली .खाण्यात भाजी करताना तेल कमी वापरायला प्रयत्न करावे लागत आहेत .सवयी प्रमाणे जास्त पडते.२ मैल चालून येते पण मग योगासने होत नाहीत

झम्पी, खरे आहे झोप पुरेशी व्हायला हवीच .
मला ऋजुता दिवेकर चे पटते ,योग्य आहार आणि योग्य विहार !.

.

काल ०६/०८ गुण ७/७. आज ०७/०८ गुण ६/७ कारण शिरा केला आणी खाल्ला पण जिम मध्ये ४५० कॅ. बर्न पण केल्या.

Two what's app msg. Very apt for this group.
Against fast food - Few moments on your lips and forever on your hips!!
Obesity - Obesity does not run in the family, it is there because no one runs in the family.
इंग्लिश बद्दल माफी Happy

अदिति प्रमाणे वजन कमी झाले आहे का ते चेक केले (उग्गीच पिअर प्रेशर!). ६ दिवसात एक पौंड कमी झाले आहे. अदिती सेम पिंच! अर्थात हे नगण्य! एक दिवस आहार सोडला तर ते लगेच वाढेल.

काल व्यायाम केला. योगासनामुळे वजन कमी होत नाही असा सूर इथे जाणवला. दुसरा कुठला खेळ (टेनिस इ ) सध्या जमेल असे वाटत नाही. सबब- कॉलेजात परीक्षेला काहीही विचारले तरी आपल्याला हे येत तेच लिहाव अस करीत करीत पास झाले. आताही तसच होईल अस वाटत Wink

प्रोटीन खाल्ले, फळे नाही आणि त्याच ग्रुप मधले सॅलड पण नाही. ६/७

ब्रेकफास्ट थालिपीठ
११ वजता : दोन पोळ्या आणी छोले
३ वाजता: १ कप कॉफी (शेजारीण कृपा)
६ वाजता: खाकरा
डिनरः छोले आणी भात.

नो सॅलड. काल रात्रीच्या पावसामुळे आमच्या गावात दूधभाजीफळं आलीच नाहीत. Proud उद्या आली तर भाजीखरेदी होइल!!

व्यायामः तासभर योगा आणि एरोबिक्स.

माझा अपडेट -
८: ०० ब्रेफा - १ थालिपीठ + चहा
१०:०० - अर्धा कप कॉफी
दु १२:३० - २ फुलके + डाळ + दही काकडी
३:३० - अर्धा कप कॉफी
५:०० - १ सफरचंद + १ वाटी चुरमुरे .. जरा भुक भुक झाली काल Sad
सं ६:०० - १ तास जिम
८:०० - १.५ चपाती + डाळ + थोडासा भात

या आठवड्यात बर्यापैकी रोज ६/७ गुण होतायत ..

ब्रेकफास्ट - सकाळी १/२ कप विनासाखरेचा चहा एक छोटा टोस्ट,१ बाऊल साबुदाणा खिचडी ,पाउण ग्लास दूध.
१२ वाजता २ चिकीचे तुकडे.
लंच - दोन फुलके, कुळीथाची उसळ अर्थात खोबरं घालून
६ वाजता थोडे चणे.,२ खजूर.,डाळिंबाचे अर्धी वाटी दाणे.
डिनर - १ फुलका,घेवड्याची भाजी,वाटीभर भात,आमटी,सोलकढी , बीट.( अजून जेवण व्हायचे आहे)

२०-२५ योगासने/प्राणायाम आणि तेवढाच वेळ घरी चालणे.......७/७

मला पण घ्या ह्या ग्रुप मधे

रोज वाचतीये... पण सध्या पावसाचे कारण देऊन व्यायामाची वाट लागली होती. तो आधी सुरु केला.

मी डाएट व्यायाम एकदम काटेकोर करु शकते.

पण सध्या मोटिवेशन हवं होतं ते या ग्रुप मुळे मिळतय..

सध्याचे वजन ५६ किलो...टार्गेट ५० किलो.

उद्यापासुन अप्डेट्स लिहिन..
एकदम उपयुक्त धागा आहे हा... मनापासुन धन्यवाद...

काल व्यायाम, अन आहार अगदी व्यवस्थित त्यामुळे ७/७.
आज मात्र व्यायाम केला नाही. कारण काहीच नाही. तसेच क्रमांक ४ पाळले नाही. फार गिल्टी वाटतय. २/७.
६/८ आणी ७/८ टोट्ल: ९/१४

माझे अपडेट्स:

१. ब्रेकफास्ट : १ कप चहा.
२. लंच : मटकीची उसळ, ३. पोळ्या
३. दुपारी: कटिंग चहा Happy
४. संध्याकाळी: थोडया पापड्या (साधारण अर्धी वाटी)
५. डिनर: पुन्हा मटकी उसळ ३ पोळ्या.

व्यायाम:

सर्किट ट्रेनिंग: ४५ मिनिटे.

गुण: ६/७

माझे आजचे ६/७ गुण. दीड तास व्यायाम केला आज. खाण्याच्या बाबतीत अजून भरपूर प्रश्न आहेत. ते सवडीने विचारेल. माझा मुख्य उद्देश पोटावरची चरबी कमी करणे हा आहे. त्याकरिता काही व्यायाम सुचवता येईल का ? BMI प्रमाणे कुठले वजन योग्य मानायचे? अगदी starting point चे कि त्या range मधले कुठलेही? BMI नुसार माझे वजन योग्य आहे.

अरे वा ,
छान अपडेटस सगळ्यांचे . कीप इट अप Happy

माझे आज १ तास चालणे , १ तास टीटी .
फळे फळभाज्या : डाळिंब अन सॅलेड
प्रोटीन्स : २ वाट्या वरण , १ अंड्याचा पांढरा बलक
तळलेले, गोड काही नाही
गुण ७/७

खारूताई,
स्त्रियांच्या शरीरात नॉर्मली फॅट जास्त असते. जास्त टेन्शन घेऊ नका Wink
चरबी फर्स्ट कम लास्ट गो बेसिसवर जाते.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी पोटाचे स्पेशल व्यायाम, उदा. सिट-अप्स ही मिथ आहे. सिक्स प्याक येतील, पण फ्याट जाईलच असे नाही.
पोटाच्या घेरापाठी, व्हिसेरल फॅट, सबक्युटॅनिअस फॅट अन अ‍ॅब्डॉमिनल मसल टोन या तीन बाबी येतात.
(व्हेसेरल फॅट म्हणजे, आतड्यांभोवतीच्या आवरणातलं, सबक्युटॅनिअस म्हणजे त्वचेखालचं. कमरेच्या बाजूला पडलेल्या वळकट्यांना 'लव्ह हँड्ल' म्हणतात Wink भारतीय जनुकांमुळे, व प्रेग्नंन्सीनंतर, वयाने ३५+ स्त्रीला तिथलं संपूर्ण फॅट गायब करणं महाकर्मकठीण. पण, पोटाच्या स्नायूंचा टोन, कडकपणा व्यायामाने परत आणता आला, तर भरपूर फरक पडतो.)
बीएमआयनुसार योग्य वजन हा एकमेव क्रायटेरिया नाही. तुमची एनर्जी लेव्हल, स्टॅमिना, एक्सरसाईज टॉलरन्स या सगळ्या बाबी तुमची फिटनेस लेव्हल ठरवतात.

सारांशः
आत्ता तुमचं वजन चांगलं असेल, तर स्टॅमिना वाढवण्याचे व्यायाम करा. प्लस जेवण हेल्दी करायची सवय करा. म्हणजे भविष्यातला जाडेपणा आटोक्यात राहील.
वयाबरोबर शरीराचा बेसल मेटॅबोलिक रेट कमी होतो = तितक्याच जेवणात जास्त फॅटची उत्पत्ती.
अ‍ॅफ्ल्युअन्स लेव्हल वाढली की जेवणात रिचनेस वाढतो + फिजिकल वर्क कमी होत जाते = अधिक फॅटची उत्पत्ती.

इथल्या भावी 'म्हातार्‍यां'साठी उपदेशः
"म्हातारपणी माणसाने खारकेसारखं असावं. खजूरापेक्षा खारीक जास्त टिकते."

इब्लिस, पोस्ट खूप आवडली. Happy
माझ्यासारख्यांना व्यायाम न टाळण्यासाठी उपयुक्त. बादवे काल ३० मिनीट्स ब्रिस्कवॉक आणि १५ मिनीट्स दोरीवरच्या उड्या. आज ४० मिनीट वॉक आणि १५ मिनीट दोरीवरच्या उड्या. आणि रोजचे २० मिनीतांचे स्ट्रेचींगचे डॉक्टरनी सांगितलेले व्यायाम.
१०-१५ मिनीटं उड्या झाल्या की दम लागतो. Sad

आज ब्रेकफास्ट पिअर, अ‍ॅपल (२-२ फोडी), २ ब्राउन ब्रेडचे टोस्ट (बटर शिवाय), १ कप कॉफी, एक बॉइल्ड एग.
लंचला पनीर-शिमला मिर्ची, २ वाट्या मुग-मसूर डाळ, काकडी आणि एक फुलका.
संध्याकाळी - एक कप कॉफी, २ रस /टोस्ट, मोड आलेली मटकी.
रात्री - २ फुलके, पिठलं, ग्लासभर ताक.

इब्लुश्या खरं तर तू आणि सातीनं यावर दणदणीत मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. साती तर सोत्ताच पेशंट बनून स्वतःचा मेन्यु सांगतिया . आता तर तुझ्यावरच भिस्त रे बाबा.....

अल्पना, धन्यवाद!
*
अजून एक विचारमौक्तिक सांडून इथले आजचे ज्ञानामृत वाटप आवरते घेतो.

What should be the aim of your exercise and diet schedule?

You should feel proud of your own body when you look into the mirror, AND you should not be ashamed to display it in public, for example, when you go to a water-park.

अर्थात-.
मी व्यायाम अन आहारनियंत्रण का करावे?

तर आरशात पाहिल्यावर आपल्याच शरीराकडे पहावेसे वाटावे असे शरीर असावे, अन चारचौघात आपल्या शरीराचे प्रदर्शन करायची वेळ आल्यास- उदा. वॉटरपार्कात- स्वतःचीच लाज वाटू नये म्हणून Wink

बाय द वे कमरेवरच्या वळकट्यांना लव्ह ह्यांडल नाव देनार्‍याचा मी लकडी पुलावर मुका घायला तयार आहे. बाई असेल तर ओटी भरायला ::फिदी:

Love handles" is an informal term for deposits of excess fat at the side of one's waistline. विकीबाबा

images_3.jpg

>>> वयाने ३५+ स्त्रीला तिथलं संपूर्ण फॅट गायब करणं महाकर्मकठीण. )<<<<

हा हि एक समज आहे.

भारतीय मुद्दाम काढलेले आहे हे ल्क्षात येइलच.

आपलजीवनपद्धती हेच एक कारण आहे, त्यात काही समज जे पक्के भारतीय आहेत.

आय सिंप्ली रिफ्यूज टू बी किस्ड बाय रॉहू ऑन द लक्डी पूल Lol

हे बघा:

लव्ह हँडल्स कुणालाही येऊ शकतात राजे.

*
आपलजीवनपद्धती हेच एक कारण आहे, त्यात काही समज जे पक्के भारतीय आहेत.
<<
अ‍ॅब्सोल्यूटली मान्य.
पण या धाग्यावर आपण जीवनपद्धतीत बदल घडवण्याबद्दलच चर्चा करीत आहोत. - पॉझिटिव्ह लाईफस्टाईल मॉडिफिकेशन.

इब्लिस छान माहिती .
stamina टिकवणे जास्त महत्वाचे .इतक्या प्रयत्नांनी वाढवलेले वजन कमी व्हायला वेळ पण लागणारच.

Pages