चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अदिति, माझं असंच असतं. एखाद दिवस अगदी "आदर्श" पणाचा कळस आणि कधीकधी नुसत्या जंकफूडवर दिवस ढकलायचं.

रच्याकने, व्यायामाला आठवड्यातुन एक दिवस सुट्टी घेतली तर अधिक फायदा होतो का? >> आभा , हे तुम्ही कोणत्या प्रकारचा व्यायाम करता त्यावर अवल्बून आहे . मी त्यापे़क्षा व्यायामात बदल प्रेफर करेन . म्हणजे जर रोज जिमला जात असाल तर एखादा दिवस बॅडमिंटन्/टीटी खेळा , सायकलिंग वा चालायला जा .

स्वतःहून सहसा चुकवू नका , मात्र अति दमला असाल तर करूही नका .

हा धागा मस्त आहे. सध्या summer vacation मुळे पाहुण्यांची रेलचेल सुरु आहे. त्यामुळे diet कितपत करू शकेन माहिती नाही. पण आठवड्यातून ५ दिवस तरी व्यायाम करते आहे. सकाळी ५ वाजता उठून सुद्धा!! पण सप्टेबर पासून नक्की मी join होयिन. रोज tips साठी येथे येतेच. सगळ्यांचा उत्साहाला माझ्या कडून ५ stars!!!

दोन दिवस pilate झाले अर्धा तास. काल एक- सव्वा तासचालले.. पण मग पाव वाटी आईसक्रिम खाल्ले.. ते वगळता आहार चांगला. जरा पंधरवड्याने नीट सगळं लिहित जाईन मी.

मला इथे यायलाच भिती वाटतेय.(एकदा की खादाडी संपली की येइन).

इथे इतक्या भन्नाट रेसीप्या(रेसीपी अनेकवचन) येतेय.. पोहे काय, चना मदरा , मेवा पराठा काय...कसलं काय...

(कोणाचा उत्साह कमी करायचा हेतु नाय... तुमचं चालू ठेवा.)

खाण्याला तीनच गुण आहेत. व्यायामाला चार! रेसिपी वाचा, रोज छान छान खा पण व्यायाम करा. तेव्हा इकडे न घाबरता या, जरूर या!! Happy

दोन दिवस pilate झाले अर्धा तास. काल एक- सव्वा तासचालले.. पण मग पाव वाटी आईसक्रिम खाल्ले.. ते वगळता आहार चांगला. जरा पंधरवड्याने नीट सगळं लिहित जाईन मी. >> चांगल आहे . कीप इट अप .

6/7 ice-cream 4 tea spoons अरेरे >> वर्षू नील , इतर सगळ्या गोष्टी नीट फॉलो करत असाल तर आठवड्यातून एखादा दिवस ४ टी स्पूनला (For that matter , any sweet in small quantity) हरकत नाही . फक्त ४ टी स्पूनवर थांबणे अवघड असते आणी बोल्ड केलेले शब्द महत्वाचे Happy

चालणे तसे अलाऊड आहे. पण अवेळी येणारा पाऊस. आज घरीच १० सूर्य नमस्कार घातले. मागच्या वर्षी पर्यंत मी एका दमात ६० सूर्य नम्स्कार घालायचे ते. आठवले. Sad असो. आता थोड खाण्याकडे लक्ष द्यायला हव आहे. संध्याकाळी सगळा घोळ होतो.

५/८/२०१४
सकाळी एक प्लेट फोडणीचा भात, एक कप चहा.. (काल सकाळ पर्यंत हा धागा पाहिला नव्हता Sad )
दुपारी - दोन फुलके, अर्धी वाटी मिक्स भाजी, लेकाच्यातला उरलेला चार चमचे वरण भात
संध्याकाळी - खोकल्यामुळे फक्त कमी साखरेचा हळद, सुंठीचा थोड्या दुधातला काढा
रात्री - दोन फुलके, अर्धी वाटी फोडणीचे वरण, वाटीभर उकडलेले मूग व मटकी (त्यावर रहावले नाही म्हणून चवीपुरती दोन चमचे शेव घातली). Sad संध्याकाळी हा धागा वाचल्याने रात्री दोन चमचे उरलेला भात अजून तसाच वगळला आहे. )
सॅलड/फळे नाहीत.
नेहेमीप्रमाणे सव्वा तास योगा.. पण चालणे किंवा व्यायाम नाही. ३ च गुण..
एकूण - ३ + २ = ५/७

जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल इन्फॉर्मेटिक्स असोशिएशनच्या एका अभ्यासानुसार 'crowdsourcing has the potential to improve adherence to dietary self monitoring over a long period of time'
म्हणजे केवळ स्वतः ठरवून किंवा डाएटिशियनने दिलेल्य प्लॅननुसार खाऊन वजन कमी करणे यापेक्षा एखादा ग्रूप बनवून एकमेकांचे डाएटिंग वॉच केल्यास लोकांचा डाएट करण्याचा उत्साह जास्त दिवस टिकतो.
३३३ जणांचा एक इंटरनेट ग्रूप बनवून काही वर्षे सतत असे मॉनिटरिंग केल्यावर या ग्रूपमधल्या लोकांचे डाएट एकमेकांच्या प्रतिसादामुळे बरोबर मॉनिटर झाले, पिअर प्रेशरमुळे अरबट चरबट खाल्ले गेले नाही असे निदर्शनास आले.

ही आपल्या या ग्रूपसाठी अगदी उत्साहवर्धक बातमी आहे.

माझे कालचे ३/७ गुण. काल व्यायाम केला नाही. कामवाल्या बाईने दांडी मारली. Not a good excuse but I was tired after doing all the house work.

केदार, मी काल उसळी ऐवजी २ वाट्या कुळीथ पिठ्ले सूप सारखे प्यायले व त्याचा १ गुण धरला. बरोबर केले ना?

सॉरी, दोन तीन दिवस आलेच नाही इथे Sad
एवढे प्रतिसाद बघुनच धडकी भरत होती.

माझे अपडेट्स:
आहाराचा चार्ट केला कच्चा. त्यामुळे आपल्याला काय काय ऑप्शन्स आहेत ते कळाले आणि सुरुवात केमी फॉलो करायला. आता आहारत सॅलड, ताक, प्रोटीन्स सगळयाचा समावेश झालाय.
आज सकाळी अर्धा कप दूध, एक खाकरा. नंतर तासाभराने नटबार आणि १ संत्री. ११ वाजता सॅलड. १२ वाजता जेवणात ओट्सचा उपमा आणि ताक. रात्री उसळ आणि ब्रेड खाणार.
व्यायामाला सुरुवात करायची आहे पण खांदे दुखीमुळे शक्य नाहिये. पण रविवारी मैदानावर चालणं, पळणं, खेळणं सगळ झाल.

रोज नटबार खाल्लेला चांगला आहे का?
आणि ब्रेड (व्होल मील) अजिबातच खायचा नाहि का?

व्यायामाला सुरुवात करायची आहे पण खांदे दुखीमुळे शक्य नाहिये. पण रविवारी मैदानावर चालणं, पळणं, खेळणं सगळ झाल.

>> माझ्या मते इथे बर्याच जणांची व्यायाम म्हणजे काय यात गल्ल्त होतेय .
आपल्यला कॅलरी जाळायच्या आहेत . Happy
त्यासाठी जिमला जायची , वजन उचलायची किंवा ट्रेडमिलवर पळायची गरज नाही .
चालणे (किमान ४० मि) , जॉगिंग , सायकलिंग , टेबल टेनीस / बॅडमिंटन (सलग) खेळणे हेही व्यायामच आहेत .

४०० च्या वर प्रतिसाद झाले, १४ पाने भरली. तरी मी काही ढिम्म पोस्ट टाकायला तयार नाही. यावरुनच माझा आळस किती असेल ते लक्षात येइल.
केदार, तुला प्रत्यक्ष भेटुन खुप्च इंप्रेस्ड वाटले.
मी एक डॉ. फॉलो करत होते वर्ष भरापूर्वी. त्याचे चांगले रिझल्ट्स आले होते. पण ऑफिसच्या वेळा, तिच्या वेळा, आणि घरगुती अडचणी यामुळे खंड पडला. परत आळसाने मात केली.
मी परत डाएट फॉलो करायला सुरुवात केली आहे.
सकाळी- नाचणी सत्व १.५ चमचा आणि पाउण कप मोठा कप दुध
१०.-१०.३० वा.- चहा आणि गव्हाचे टोस्ट-२
१२.३० - काकडी
दु. १ वा.- २ पोळ्या, भाजी, असेल तर ताक
दु. ४ वा.- चहा, आणि खाकरे होल व्हिट-२
८.३० ला- पोळ्या २, वरण, कोशिंबीर, भाजी
रात्रीचे खुप वेगवेगळे मेन्यु दिले आहेत डॉ. ने. ते एक एक करायला सुरुवात करेन.
मला पण अ‍ॅड करा ग्रुपात. द्क्षे माझा नं. आहे का तुझ्याकडे.
वविच्या कोण्त्याही धाग्यावर सापडेल माझा नं.

काल संध्याकाळी अर्धी वाटी फरसाण आणि रात्री एक वाटी भात + दोन वाट्या टोमॅटो घालून फोडणी वरण + एक टेस्पू दही + चवळी मसून मिक्स उसळ. सो आहाराचा एक गूण कट. व्यायाम चुकला काल. जाताना पाच मजले चढत गेले पण या व्यतिरिक्त व्यायाम नाही.

आज सकाळी ४५ मि. व्यायाम थोडी योगासने. सून ५ Sad पाचात धाप लागते चक्क. कठीणे!! वाढायला हवी संख्या. नुसते तास तास भर सून पुरेसे होतील.... वेगळ्या व्यायामाची गरजच नाहीये.

ब्रेफा लाभो + १ टिस्पू बीट किसून घातलेला मिक्स पीठांचा १ पराठा + फूलपात्र दूध. दुपारी २ चपात्या व उसळ.

संध्याकाळसाठी पराठा आणलाय. तो आणि चहा होईल. रात्री एखादी फळभाजी व चपाती, डाळ भात.
सॅलड आणि फळे जात नाहीयेत सध्या. सो एक गूण वजा. आजचे गूण ६/७
टोटल २७/३६

सध्या डाळीच जास्त पोटात जाताहेत. आणि आठवड्यातून २-३ फळभाज्या. डाळी जास्त झाल्याने अपाय आहे का?

रात्रीचे खुप वेगवेगळे मेन्यु दिले आहेत डॉ. ने. ते एक एक करायला सुरुवात करेन.>> मुग्धा शेअर कर ना प्लीज.
माझ्या मते इथे बर्याच जणांची व्यायाम म्हणजे काय यात गल्ल्त होतेय .>> फक्त सून आणि योगासनं बास आहेत का?

टोफू ची भुर्जी छान लागते . फक्त टोफू फार soft नसावा . प्रोटीन्स भरपूर मिळतात . अमेरिकेत असताना केली जायची पण भारतात आल्यास टोफू आणलाच नाहीये . इथे पुण्यात कुठे मिळेल चांगला ?

केदार मला पण अ‍ॅड करा प्लीज. मला अजून डॉकने खूप व्यायाम नाही सांगितला आहे पण खाणे मात्र मी इथे सुचविल्याप्रमाणे सुरू केले आहे. मी शाकाहारी.
आजचे माझे खाणे : सकाळी चहा त्यासोबत घरी केलेली दोन बिस्किटे ( कणकेची, अर्थात तूप आणि साखर आहेच पण मला चहासोबत खायची सवय आहे म्हणून फक्त दोनच), त्यानंतर एक केळे, दहा वाजता जेवण (हो दहाच वाजता) दोन फुलके, वालाच्या शेंगांची भाजी, तूर दाळ बिना फोडणीची, भात अर्धी वाटी, दही अर्धी वाटी, एक काकडी.

रोज सधारण याप्रमाणेच सकळ्चे जेवण असते. त्यानंतर दुपारी २ला चहा-आणि नाश्ता, आणि संध्याकाळी ५.३० ते ६ च्या दरम्यान जेवण. रात्री ८.३०-९ ला दूध. हो रोज याप्रमाणेच माझ्या घरी खाणे असते. (जैन )

आज मी गुण नाही घेतले कारण व्यायामच नाही.

थॅन्क्स केदार पण ते खेळणं, चालणं, पळणं रविवारी झाले. त्यानंतर काहिच नाही Sad खरतरं घराजवळ इतके छान गार्डन्स आहेत, ४-४ किमीचे ट्रॅक आहेत पण घरी जाइपर्यंत पूर्ण अंधार आणि सकाळी ऑफिसची घाई. (ही सगळी कारणं Sad )

माझे वजन ९१ किलो आणि कमी करायचे आहे ३० किलो.
मला thyoroid and weight induced diabetes आहे, त्यामुळे वजन अगदी काटेकोर पणे क्मी करायचा सन्कल्प केला आहे.
कालचे गुण ५/७

ऑफीसमधे ४ च्या सुमारास खायला कुरमुरे - फरसाण विकत मिळतं मिक्स ते चांगलं आहे का ? फरसाण नॉमिनल असतं तसं.

अन्विता, कोणत्याही सुपरमार्केटच्या फ्रोझन सेक्शनमध्ये टोफू मिळतो. डीमार्टमध्ये अगदी नक्की मिळतो. Chetran म्हणून ब्रॅन्डचा मी खाल्ला आहे बरेचदा.

व्यायाम, आहार ओके. पण सगळे गुण घेत नाही मी. देअर इज ऑलवेज स्कोप फॉर इम्प्रूव्हमेन्ट. म्हणून ५/७.

माझे कालचे मार्क्स ६/७. व्यायाम केला. तेलकट पण नाही खाल्लं पण फळ आणि मोड नाही खाल्ले.

६/७, सकाळी एक पोळी १० वाजता, १-३० ला जेवण (२ पोळ्या १ वाटी भाजी, मिक्स स्प्राऊट सॅलड), ३ किमी चालणे, २ व वेळा जिने चढलो (१३ मजले)

Pages