क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< त्यामुळे इशांत सामी आणि बिन्नी यांनी बळी घेण्याची जवाबदारी घ्यावी.. >> जडेजा कुणाला आवडो वा नावडो, त्यालाही [ व कुणी सांगावं, मुरली विजयलाही ] ही जबाबदारी घ्यावी लागेलच. आजच जडेजाचे चेंडू वळताहेत व उसळताहेत !

वीराट चा क्लास बद्दल शंका नाहि..तो केव्हाही उभारु शकतो.. पन बाकी बसुन आहेत ना.. रोहित पन त्यातलाच.. धवनच पण काही खर नाही...
बघु मॅच रंगतदार तर होतेय.. १ विकेट पन गेली अजुन ९ बाकी आणि जवलपास २७५ रंस.. आणि अख्खा एक दिवस..

३ गेल्या, ७ राहिल्या !!
इशाण्त जबरी स्पेल टाकतोय. शमी ने बॅलन्सला काढल्यानन्तर बॉडी लॅन्गवेज एकदम बदलली आहे, आज अजुन १/२ तरी विकेट्स पाहीजेत.

सिद्धार्थ, अगदी अगदी! १०० च्या आत ६ बाद हवेत! मी हेच लिहायला आलो होतो. आजून ७८ चेंडू आहेत. तुमच्या तोंडात साखर (व/वा अन्य आवडीचा पदार्थ) पडो. Happy
आ.न.,
-गा.पै.

भारताच्या ड्रेसींग रूममधे नक्कीच हा धागा वाचत असणार ! नाहीं तर, << ज्या विकेटवर बॉल बर्‍यापैकी स्विंग आणि सिम होत होता सकाळी, तिथे हा प्राणी शॉर्टपीच का टाकत होता ? >> हें इशांत शर्माच्या टाळक्यात कसं शिरलं ? Wink

मोईन अली किती वेळा वाचणार आहे ??

दोन वेळा एल बी डब्ल्यू दिला नाही. धोणीने कॅच टाकला.!
उद्या सहा विकेट्स हव्यात... ९९.९९% भारत जिंकणार !

शिखर धवनने टाकलेली शेवटची ओव्हर पाहिली ? कोण म्हणतं भारत एकच स्पीनर घेवून खेळतोय ! उद्याचा दिवस फिरकीचाच आहे, असं मला कां वाटतंय ? फिरकीने टीळा लावल्याशिवाय विजयश्री भारताकडे पाहून हंसतच नसावी !
झंडा ऊंचा रहे हमारा ..... !

कोण म्हणतं भारत एकच स्पीनर घेवून खेळतोय ! उद्याचा दिवस फिरकीचाच आहे, असं मला कां वाटतंय >>>> उद्यासाठी आपल्याकडे आता जाडेजा, विजय, धवन असे ३ स्पिनर्स आहेत. मला तर वाटतं, रहाणे आणि कोहलीलाही ट्राय करण्यास हरकत नाही wink.gif.

छ्या आजचा सामना दुपारनंतर बघण्याचे नशीबात नव्हते. शेवटचे पाहिले तेव्हा जडेजा १७-१८ धावा धोकादायक पद्धतीने काढून खेळत होता आणि त्यामुळे मुरली विजय सुद्धा अचानक संतुलन गवसल्यासारखा खेळू लागला होता, बिचारा त्यातच गेला असावा. पण त्यानंतर जडेजाही पटकन जाईल असे मला वाटलेले त्याने काय कसे एवढे रन जमवले बघता आले नाही. मात्र भुवीने खात्रीपूर्वक पुन्हा आश्वासकच खेळ केला असणार. त्यानंतर ४ विकेट ! क्या बात है !! सामना सेट आहे !!! फक्त फकत फक्त ... गेल्या चार दिवसांचा इतिहास भूगोल पाहता गाफिल राहू नका, कधीही कुठल्याही विकेटला शतकी भागीदारी होऊ शकते, गणित केव्हाही बदलू शकते ..सो किप फाईटींग एन्ड किप ईट अप टीम ईंडिया Happy

<< गेल्या चार दिवसांचा इतिहास भूगोल पाहता गाफिल राहू नका, >> मला इतिहासापेक्षां भूगोलाची भिती वाटतेय; इंग्लंडचा पाऊस !
मुरली विजय ! २४७ चेंडू खेळला, त्यातले ८०%हून अधिक ऑफ स्टंपबाहेरचेच व ते सगळे व्यवस्थित सोडून देत; नेमका ९५वर असताना कुठे गेला बिचारा बाहेरच्या चेंडूला बॅट लावायला !! Sad
नेहमी शांतपणे आपलं काम करणार्‍या धोनीचीं काल स्टंप्सच्या मागे खूप नाटकं चाललीं होती- कधीं स्टंप्सच्या जवळ, कधीं खूप मागे किंवा स्टंप्सच्या बाहेर वगैरे, वगैरे. उतरती कळा लागल्याचीं जाणीव हें तर कारण नाही ना !

>>नेहमी शांतपणे आपलं काम करणार्‍या धोनीचीं काल स्टंप्सच्या मागे खूप नाटकं चाललीं होती- कधीं स्टंप्सच्या जवळ, कधीं खूप मागे किंवा स्टंप्सच्या बाहेर वगैरे, वगैरे. उतरती कळा लागल्याचीं जाणीव हें तर कारण नाही ना !

अनईवन बॉउन्स मुळे तो तसा करत होता ना?

पाऊस नाही पडला तर ही मॅच आपली. ईशान्त आणि शमीचा काय स्पेल होता. आज सकाळच्या सत्रातच मॅच सम्पायला पाहीजे. Happy

सायबाचं पिल्लू जाम चिवट.. सहजासहजी हार मानणार नाहीत. परंतु सामना वाचवतील / जिंकतील अशी शक्यता मात्रं वाटत नाही.

भाऊसाहेब,

>> मला इतिहासापेक्षां भूगोलाची भिती वाटतेय; इंग्लंडचा पाऊस !

बीबीसी म्हणतंय की येते ४ दिवस लंडनमध्ये पाऊस अजिबात नाहीये! Happy

आ.न.,
-गा.पै.

<< अनइवन बॉउन्समुळे तो तसं करत होता ना >> पण चेंडू काय ह्याच्या कानात सांगून अन इव्हन बाऊन्स करत होता ? हा पुढे असताना चेंडूने उसळी घ्यायची व मागे गेला कीं टप्पा पडून यायचं असं होतच राहिलं ना ! Wink
<< सायबाचं पिल्लू जाम चिवट >> आपलीं पोरं बी आज काल जाम बेरकीं झालीयेत; कळलंच म्हना आज सायबांच्या पिल्लाना !! Wink
गा.पै.जी , हवामानासाठी बीबीसीचा हवाला दिल्याबद्दल धन्यवाद.

आपलीं पोरं बी आज काल जाम बेरकीं झालीयेत; कळलंच म्हना आज सायबांच्या पिल्लाना !! >>> भाऊकाका, इसपर एक तो कार्टून बनता है... होऊन जाऊ दे. !!!

>>पण चेंडू काय ह्याच्या कानात सांगून अन इव्हन बाऊन्स करत होता ? हा पुढे असताना चेंडूने उसळी घ्यायची व मागे गेला कीं टप्पा पडून यायचं असं होतच राहिलं ना
Happy Happy

माइन्ड गेम्स :)..

मस्त चित्र !!!

पहिला तास वाया घालवलेला आहे.. किती तो जडेजावर टाकलेला विश्वास.. दुसरा कोणीतरी बॉलर गरजेचा आहे.. बिन्नीनी अजून एकही ओव्हर टाकली नाहीये.. त्याला काय नुसते क्रीजवर येउन रन न करता बाद होण्यासाठी घेतले आहे का???

गेला मोईन अली गेला.

75.6 Ishant to Moeen Ali, out Caught by Pujara!! Ishant has done it. The short ball ploy has worked. Moeen Ali was looking to duck, took his eyes off the ball and then just thrust his glove in the way - lobbed off the glove to Che. Ishant strikes with the last ball before lunch. The England think-tank is gutted on the balcony and so are the batsmen in the middle.

Moeen Ali c Pujara b Ishant 39(147) [4s-5]

जेवणाच्या सुट्टी अगोदरच्या शेवटच्या चेंडूवर मोईन अली परतला.

लंच

Pages