क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धोनी, जडेजा हे लोक वेस्ट आहेत उद्या .. कारण ५०-६० धावा कुटून नाही तर शेदोनशे बॉल खेळून सामना वाचवायचा आहे..

शमी, पंकजसिंग हे तर तळाचेच .. भुवी देखील सध्या सो कॉलड फॉर्मात असला तरी त्याला मर्यादा आहेतच..

झाले ५,
आधी गचकलेत ४ ..
टोटल ९ ..

म्हणजे आता सध्या खेळत असणारे शर्मा आणि रहानेपैकी एकाला घ्यायचाय, म्हणजे जोडी फोडायची आहे बस्स ..

अर्थात त्यातही शर्माचे टेकनिक जेमतेमच इथे .. त्यामुळे तो देखील लंच टाईमपर्यंत लढेल वगैरे फारच अपेक्षा वाटताहेत मला..

तर मग उरला कोण तर एकटा रहाणेच .. चला हा पठ्ठ्या दिवसभर एका बाजूने खेळलाच तरी उरलेल्यांना निम्मी षटके जमतील का ??

हा सामना नक्की काय कुठून वाचणार आहे मला कोणी सांगेल का?

मुळात इच्छाच दिसत नव्हती आज सामना वाचवण्यासाठी खेळायची.
एकेक जण एकेक धावेसाठी असे मरत होते की सामना गेला खड्ड्यात मी माझे ५० मारतो आणि पुढची टेस्टची जागा पक्की करतो..

जोपर्यंत संपुर्ण नीराशा होत नाहि तोपर्यंत आशा सोडु नये. अजुन ९० षटके.. आपले ६ फंलदाज खेळनार नक्कि..
य्ये हुई ना बात, अस्सा आत्मविश्वास पाहिजे!

तर मग उरला कोण तर एकटा रहाणेच .. चला हा पठ्ठ्या दिवसभर एका बाजूने खेळलाच तरी उरलेल्यांना निम्मी षटके जमतील का ??

>>>>>>

फार काही मोठे भाकीत नव्हते वर्तवले हे मी काल ... पण खरे ठरले Happy

ही टेस्ट वाचवायची / जिंकायची असा काही सगळ्या टीम चा मिळून एकत्र विचार आहे असं जाणवलच नाही. प्रत्येक जण (त्या रहाणे ला वगळू ह्यातून) स्वतःचा अजेंडा घेऊन आल्यासारखा खेळला.

नववा गडी बाद झाल्यानंतर रहाणे देखील ५० पुर्ण करण्याच्या मागे लागलेला - ते understandable आहे हो. आता त्या मॅच मधे काहीच राम राहीला नव्हता.

गुड कॅच असाम्या >> मी कॉमेंट्रीमधे ऐकले रे. बोलणारा कोण होता ते कळले नाहि - बहुधा आर्थरटन होता.

नववा गडी बाद झाल्यानंतर रहाणे देखील ५० पुर्ण करण्याच्या मागे लागलेला - ते understandable आहे हो. आता त्या मॅच मधे काहीच राम राहीला नव्हता. >> +१.

मोईनची बॉलिंग कशी हँडल करायची ह्याबद्दल गनरलच confusion दिसले फार. रोहित त्याला मारायला जाताना बाद झाला तर आज, सगळे त्याला डीफेंड करताना. एव्हढा rigid approach कशाला देव जाणे. मला तरी आपली बोलिंग जनेरल थकेलली वाटत होती नि अजून २ टेस्ट्स जायच्या आहेत.

त्या पंकजसिंगच्या बॉलिंगलाच सुरुवातीलाच कूकची कॅच सुटली होती ना..
त्याला पुढे सामन्यात एकही विकेट मिळाली नाही .. बिच्चारा Sad

त्या जॉर्डन आणि वोक्सला पण एकही विकेट मिळाली नाही, त्यातील एखादा तरी बदलून ते आपली टीम आणखी स्ट्राँग करतील पुढच्या कसोटीत .

आता पुढच्या सामन्यात, इशांत तंदुरुस्त झाला असेल तर पंकजसिंगच्या जागी तो येईल.

धवनच्या जागी आता तरी गंभीरला घेण्याचा शहाणपणा दाखवायलाच हवा.

रोहित शर्माला देतील अजून एक चान्स. नाहीतर घेतले घेतले आणि काढले काढले व्हायला नको. तसेही बेंचवरही ऑप्शन कमीच आहेत.

आश्विनला बेंचवर बसलेले मला बघवत नाहीये.

कोहलीला पाचव्या क्रमांकावर टाकून रहाणेला चौथ्यावर आणायचा धाडसी निर्णय दाखवतील का? सध्या तरी तोच सर्वात जास्त कम्फर्टेबल वाटतोय मिडल ऑर्डरमध्ये. खासकरून धोनी, जडेजा आणि शर्मासारखे बेभरवश्याचे फलंदाज पाठीमागे असताना त्याचा पाचवा नंबर फार दूर वाटतोय. त्यामुळे सद्यस्थितीत रहाणेचा लक्ष्मण करण्यापेक्षा सचिन करा.

ईशांत शर्मा पुढच्या मॅच मधून बाहेर आहे. नमन ओझा ला बोलावलय साहा जायबंदी झाल्यामुळे. त्याला नुसता फलंदाज म्हणून पण खेळवता येईल (असं होणं फार फार अवघड आहे). एकमेव बदल संभवतो म्हणजे अश्विन संघात येण्याचा. पण बहूदा धोनी संघ फारसा बदलत नाही.

पण बहूदा धोनी संघ फारसा बदलत नाही. >>>>> हरल्यावरसुद्धा ? ते ही असे दणकून ??

शिखर धवनला बसवून आता गंभीरची जागा तर बनतेच बनते. शिखर धवन हा काही पन्नास कसोटी खेळलेला, स्वताला सिद्ध केलेला फलंदाज नाहीये जे फॉर्म इझ टेंपररी अन क्लास इझ परमनंट म्हणत त्याला संधी देत राहायचे. त्यापेक्षा त्याला बसवून नेटमध्ये तंत्रावर मेहनत घ्यायला लावणे उत्तम.

बाकी धोनी कोणत्याही विकेटकीपर फलंदाजाला निव्वळ फलंदाज म्हणून टेस्ट मॅच खेळवायची घोडचूक करून स्वताच्या पायावर / पोटावर / कारकिर्दीवर धोंडा मारून नाही घेणार. भले मग कप्तानी मुळे त्याची कसोटी संघातील जागा तुर्तास पक्की असली तरी लोकांना तुलना करायला, चर्चेला विषय नाही देणार Wink

एकमेव बदल संभवतो म्हणजे अश्विन संघात येण्याचा. पण बहूदा धोनी संघ फारसा बदलत नाही. >> +१. धोनीने त्याच्या मुलाखतीमधे ४ बॉलर चे स्पष्टीकरण दिले आहे नि रोहित नि धवनबद्दल समाधान व्यक्त केले आहे. तेंव्हा चौथ्या टेस्टपर्यंत शमी किंवा भुवी झोपले तर पांडे आत येईल. पण ह्यापलिकडे बदल कठीण वाटतो. इशांत चौथ्यापर्यंत फीट होणार नाही (Does anyone else also find this ironic that people who were clamoring for Ishant's ouster before commencing of the series are now asking questions about his availability ?)

बाकी धोनी कोणत्याही विकेटकीपर फलंदाजाला निव्वळ फलंदाज म्हणून टेस्ट मॅच खेळवायची घोडचूक करून स्वताच्या पायावर / पोटावर / कारकिर्दीवर धोंडा मारून नाही घेणार >> साहाला खेळवले होते ना निव्वळ बॅट्समन म्हणून रोहित शर्मा इंजर्ड झाला तेंव्हा धोनीबरोबरच ?
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/441825.html

ओझा कीपर म्हणून तरी नक्कीच धोनीच्या आसपासही येत नाही तेंव्हा तसा धोका नाहीच.शिवाय to be honest he is is unlikely to take spot as pure batsman when Gambhir is available (or for that matter replacing Rohit) on pure merit of his bastmanship skills. He is there as Saha's substitute and that's all.

मुळात धोनी हा कसोटी फलंदाज म्हणून फार कुठे येत नाही. खास करून परदेशात जाऊन तंत्र तोकडे पडतेच. बरेचदा बघवत नाही इतका चाचपडत खेळतो.
त्याची किपिंग स्पिनर्सविरुद्ध चांगली असली तरी (स्टंपिंग वगैरे छानच करतो) पण वेगवान गोलंदाजांसमोर सूर घेत झेल घेणे वगैरे प्रकार त्याला फारसे नाही जमत. कित्येकदा त्याने ट्रायच नाही केले असेही बघायला मिळते. याही मालिकेत बघायला मिळाले.
तो कप्तान नसून कोणी और असता तर कसोटीत त्याला पर्याय म्हणून कोणीतरी सतत त्याच्या डोक्यावर टांगती तलवार ठेऊन असता.

तो कप्तान नसून कोणी और असता तर कसोटीत त्याला पर्याय म्हणून कोणीतरी सतत त्याच्या डोक्यावर टांगती तलवार ठेऊन असता. >> तुमचा मूळ मुद्दा दुसरा किपर बॅट्समन घेऊन insecurity निर्माण होण्याचा होता. सध्याच्या कुठल्याही भारतीय किपरची (ज्याची किपिंग धोनीएव्हढी किंवा धोनीपेक्षा चांगली आहे अशांची - Lets not forget main function of keeper-batsman is still keeping, so can not compromise on that) बॅटींग धोनीहून चांगली नाहिये. (कार्थिक हा एकमेव आहे ज्याचे technique चांगले आहे पण किपिंग दुर्दैवाने consistent नाहिये Sad . KL Rahul ज्याचे किपिंग सुंदर असले तरी बॅटींग ठिकठाक आहे. Same goes for Saha. ) मग अशी insecurity का येईल ? आपल्याकडे कोणी डीव्हिलियर्स किंवा संगा असता वाट बघत तर गोष्ट वेगळीच होती.

ऋन्मेऽऽष, हरल्यावरसुद्धा ? ते ही असे दणकून ?? - ८-० नंतर सुद्धा काही फरक पडला नव्हता. तेव्हाची एक कथा अशी वाचली होती मध्यंतरी की निवड-समिती ने पुढचा संघ निवडताना, कप्तान म्हणून धोनी च्या नावावर काट मारली होती, पण श्रीनिवासन ने तो निर्णय स्वतःच्या अधिकारात बदलला होता (tell them that their job is to select the team, don't worry about selecting the captain). असो.

असामी, कार्थिक, राहूल, ओझा विषयी तुमचं मत मलाही पटतं. पण मी संजू सॅमसन विषयी आशावादी आहे. त्याला पेशन्स, टेंपरामेंट वगैरे गोष्टी शिकायच्या आहेत. पण टेक्निक च्या बाबतीत तो धोनीपेक्षा सरस आहे.

साहाला त्या नागपूर च्या कसोटीत खेळवलं होतं कारण राखीव खेळाडूंमधे पर्यायच उरले नव्हते. मुळात लक्ष्मण ला (दुखापतीमुळे) कव्हर म्हणून नो-हिट शर्मा ला बोलावलं होतं, आणी टॉस च्या आधी फुटबॉल खेळताना तो ही जखमी झाल्यामुळे, साहा चा डेब्यू झाला होता.

पण मी संजू सॅमसन विषयी आशावादी आहे. त्याला पेशन्स, टेंपरामेंट वगैरे गोष्टी शिकायच्या आहेत. पण टेक्निक च्या बाबतीत तो धोनीपेक्षा सरस आहे. >> बॅटसमन म्हणून नक्कीच पण किपर म्हणून त्याला अजून बरेच शिकायचे आहे (असे मी नाही किरमाणी म्हणत होता - विशेषतः स्पिनर्ससमोर). पण अर्थात त्याच्याकडे बराच वेळ आहे त्यामूळे नक्कीच improvements येउ शकतात.

वर म्हटल्याप्रमाणे धोनी हा मला वेगवान उसळणार्‍या खेळपट्ट्यांवर कीपींगबाबत तोकडाच वाटतो. तसेच अश्या खेळपट्ट्यांवर त्याचे फलंदाजीतील तंत्र पारच गंडते, त्यामुळे परदेशी कसोटींचा विचार करता साहा आणि कर्तिक हे दोघेही त्याला आव्हान उभे करू शकतातच, जर त्यांना मोक्याच्या वेळी संधी मिळाली आणि त्यावेळी त्यांचा फॉर्म चांगला निघाला की धोनी सहज बसला असता. यात मग किपिंगशी कॉम्प्रोमाईज नाही केले तरी विकेटकीपरची बॅटींग फ्लॉप जाऊ लागते तेव्हाच त्याला बदलायची बोंबाबोंब सुरू होते हे ही लक्षात घ्या. अर्थात कायमचा नक्कीच बसला नसता पण संगीतखुर्ची खेळायची तरी वेळ येऊ शकली असती. जी सचिनसारखा सन्माननीय अपवाद वगळता भल्याभल्यांना नाही चुकलीय. मग विकेटकीपरच्या एका जागेसाठी नक्कीच त्याला स्वताला गृहीत धरता आले नसते.

अर्थात हे धोनी कर्णधार नसता तर ची गोष्ट आहे.
बाकी डीव्हिलियर्स किंवा संगा हि फार मोठी नावे झाली. (मर्यादीत षटकांच्या सामन्यात धोनीही तेवढेच मोठे नाव आहे हे देखील नमूद करतो)

त्यामुळे परदेशी कसोटींचा विचार करता साहा आणि कर्तिक हे दोघेही त्याला आव्हान उभे करू शकतातच, >> साहा धोनी नम्तर बर्‍याच वर्षांनी आला नि कार्य्थिकला replace करूनच धोनी आला होता. मला कार्थिकबद्दल प्रचंड soft corner आहे पण त्याने त्याला मिळालेल्या संधींचा पुरेपूर वापर केला नाही हि अतिव दु:खाची गोष्ट आहे (तो एक उत्क्रुष्ट टीम प्लेयर आहे नि कप्तान material आहे). ह्याच उलट धोनीने त्याला मिळालेल्या संधींचा पुरेपूर उपयोग केला हि तेव्हढीच सत्य बाब आहे. धोनी कप्तान नसता तर त्याला संगीत खुर्ची खेळावी लागली असती वगैरे सगळ्या आत्या बाईला मिशा असत्या तर सारख्या गोष्टी झाल्या. Happy ह्याच न्यायाने पार्थिव पटेल च्या किपीम्ग चे standard २००४ नंतर सपशेल घसरले नसते तर धोनीच काय, कार्थिक सुद्धा बाहेरच असता आज. तू काय म्हणतोयस ते माझ्या लक्षात आले फक्त तेव्हढा isolation मधे विचार करता येणार नाही असे मला वाटते.

१. धोणीच्या टाळक्यात अक्कल शिल्लक आहे का ?
२. अश्विन अंडी घालतो का ? ती उबवण्यासाठी त्याला बसवला आहे का ?
३. जाडेजा हा बेदी तर सोडाच गेला बाजार राहुल संघवीपेक्षाही रद्दड बॉलर आहे हे धोणीच्या मेंदूत शिरत नाही का ?
४. गौतम गंभीरने पुढच्या आयपीएलला चेन्नई कडून खेळल्याशिवाय त्याला टीममध्ये घेणार नाही का ? त्याला लंडन ब्रिज झाडण्यासाठी नेलं आहे का ?
५. विराट कोहलीचा हनिमून अजून संपला नाही का ? संपला नसल्यास त्याच्याऐवजी गंभीरला खेळवण्यास घोडं कुठे अडलं आहे ?
६. मोईन अली हा कोणत्याही तुलनेत वॉर्न, मुरलीधरन सोडाच ग्रॅहम स्वानच्या तरी जवळपास येऊ शकतो का ? आपल्या बॅट्समनना जुलाब झाल्यामुळे ते त्याला विकेट देऊन परतण्याच्या घाईत होते का ?

मला पडलेल्या या प्रश्नांची उत्तरं एन. (निर्लज्जम सदासुखी) श्रीनिवासन देईल काय?

स्पार्टाकस, सही मुद्दे काढलेत. मला बुवा दुसऱ्या कसोटीत निकालनिश्चितीचा वास येतोय. मला क्रिकेटातलं फारसं कळंत नाही, म्हणूनही असेल.
आ.न.,
-गा.पै.

ओ गा पै, जिंकलेल्या कसोटीवर कशाला उगाच शंका उपस्थित करून हिरमोड करत आहात Sad

बाकी संघनिवड चुकीची होतेय हे माझेही मत आहे पण ती अनाकलनीय नाही, तर धोनी स्पेशल आहे. यामागचे चांगलेवाईट हेतू आणि डावपेच त्यालाच ठाऊक. मग ते डावपेच क्रिकेटच्या मैदानातले असो वा संघनिवड राजकारणातले.

ऋन्मेऽऽष, अर्रर्र...! बरोबर आहे तुमचं. निकालनिश्चितीचं हरलेल्या कसोटीबद्दल म्हणत होतो मी!
आ.न.,
-गा.पै.

Pages