मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाघांची संख्या कमी झाली म्हणून गाढवांची संख्या वाढली
आता गाढवच ती चिखलातच लोळणार Wink

उदय +१

The funds held by Indians with banks in Switzerland rose by over 40 per cent during 2013, from about 1.42 billion Swiss francs at the end of previous year, as per the latest data released today by the country’s central banking authority Swiss National Bank.

आजची बातमी.

मनमोहन सिंग यांच्यावर टिका करणारे मोदी तोंड बंद ठेऊन आहेत, खुर्चीचा परीणाम असावा.सहा कोटींचे प्रगत राज्य चालवणे आणि 125 कोटींचा मागास देश चालवणे यातला फरक मोदींना लवकरच लक्षात येईल.

घिरज , उदयन, मिर्ची दुसरा काय option आहे.

मनमोहन तर निव्रुत्त होणार होते. समाजवादी पक्ष महिला विरोधी, बसपा ला पुतळे उभारण्याचा सोडुन काय येत नाही.

युवराज उठ्सुठ परदेशात जाउन बसतात आणी राजकारणातल ओ की ठो कळत नाही. . ( As per Times of India, he is in abroad since he can not take Delhi summer heat). कोग्रेस् युवराज शिवाय दुसरे काही बोलायला तयात नाही.

ममता, समता, जयललिता , राष्टवादी , TRS , जगमोहन , बिजु वगैरे ह्या एकाच राज्यातल्या पार्ट्या आहेत.
कम्युनिस्ट चा नामोनिशाण राहिला नाही.

आप कडे १० च्या वर चागले उमेदवार नाहीत. (५ वर्षात कदाचीत राष्ट्रीय पक्ष म्हणुन येउ शकतो पण सध्या तरी दिल्ली आणी पंजाब पर्यन्त मर्यादित आहे. )

अश्यावेळी मोदी शिवाय पर्याय नाही.

ह्या १५ दिवसात तसे काही वाईट काम केले नाही. He is concentrating to make government organization lean so that top ranking officers can take own decision without ministerial interference. Also remember that he does not have good support from senior member. (Ideally this should not be an excuse but in this situation their is no choice).

लोकाच्या पण अपेक्षा भरपुर आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टी मध्ये पण पंतप्रधानाची प्रतिक्रिया ची अपेक्षा करणे गैर आहे. He is trying to communicate whenever he get's time & opportunity. Although he talks less after 16th May but he is not salient. He is using that time to improve system.

<( As per Times of India, he is in abroad since he can not take Delhi summer heat)>

Please provide link to this news item.

"In" abroad?

प्लीज इथे विनोदी चित्र अपलोड करू नका, बातम्यांच्या लिंक वगैरे द्या किंवा चर्चा करा. बाफ लोड व्हायला वेळ लागतो.

धन्यवाद.

प्रोसेसर कोणता घ्यावा ?
Saffron PC-XT v/s INC Celeron 3.2Ghz

काँग्रेसविरोधी चित्र लोड होतात ------------ काँग्रेसविरोधी चित्रं लोड होतात
आपविरोधी चित्रे लोड होतात --------------- आपविरोधी चित्रं लोड होतात
मोदींविरुद्धची चित्रं लोड होत नाहीत.............मोदींविरुद्ध चित्रं लोड होतात

Light 1 घ्या. धन्यवाद.

मोदीविरोधक सगळे इथे मायबोलीवर गोळा झाले ते बरे झाले. बाहेर देशात उरलेल्या जनतेने निवांतपणे मोदींना निवडुन दिले. बरे दिले ते दिले, निर्विवाद बहुमताने दिले. आता बसा इथे पोस्टी आणि कार्टुन टाकत.

"you get what you deserve!!" ,
मला VP govt.चा किस्सा आठवतो.मधु दंडवते (जनता पार्ती)नामक एक अर्थतज्ञ होते.
त्यांचे मुख्य काम काय तर कोन्ग्रेसने तयार केलेल्या सर्व अर्थसंकल्पांवर सडकुन टीका करणे.
८९ साली ते अर्थमंत्री होते.त्या वर्षी त्यांनी जो अर्थसंकल्प तयार केला तो, काही फुटकळ बदल सोडल्यास, कोन्ग्रेसचा copy pasted अर्थसंकल्प होता.

मोदी समर्थकांचं गाडं बहुमत , काँग्रेसच्या ४४ जागा यावरच अडकलंय. जागता पहारा ४५ पानांचा झाला. तरी चांगलं म्हणावं असं एखादंही कार्य केलेलं दिसत नाही. मंत्रालयांत झाडू मारा, भंगार सामान काढून टाका, इ. पासून सुरुवात केली असेल तर अजून भ र पू र वाट पहावी लागेल. तोवर कार्टून पाहण्याशिवाय पर्याय नाही.

राज्यपालांच्या उचलबांगडीने खेळाने कठपुतळीची प्रॅक्टिस (गुजरात, भाजपमध्ये होतीच, आता देशाच्या पटावर) सुरू केली आहे.

काही दिवसापासुन देशाला पनोती लागली आहे Wink कुणाचे पाय लागले बरे Biggrin

चार दिन की चांदनी है फिर काली रात है
ढल जायेगी ये जवानी सोचने की बात है Wink

>>अगदी अगदी, मोदीविरोधी कार्टून असतील तर सर्व्हर क्रॅशदेखील होतो.>>

किमान "डिपार्ट्मेंटचे लक्ष आहे" अशी इथे थेट दमदाटी तरी होत नाही Wink

मंत्रालयांत झाडू मारा, भंगार सामान काढून टाका, इ. पासून सुरुवात केली असेल तर अजून भ र पू र वाट पहावी लागेल.>>
होस्टेलचे दिवस आठवले, नविन वर्ष सुरु झाल्यावर नविन रुम मध्ये गेलं की पहिला दिवस साफसफाइतच जायचा, काय हे ना की आधिच्या लोकांनी प्रचंड घाण करुन ठेवलेली असायची, आता आम्हाला घाणीत राहायची सवय नव्हती/ अजुनही नाहिये, मग पहिला दिवस साफसफाईसाठी द्यावाच लागायचा! बाकी असोच..

Mukhtar Abbas Naqvi ✔ @naqvimukhtar
Follow
हिन्दी एवं अन्य क्षेत्री भाषाएँ हिन्दुस्तान की आत्मा है- हिन्दी को प्राथमिकता देशवासियों में आत्मसम्मान एवं आत्मविश्वास का एहसास कराती है

-------------------

सरळ सांगा नविन पंतप्रधानांना नीट इंग्लिश येत नाही....हिंदी सगळ्यांनी वापरली असतीच की Biggrin

--------------------

चिखलात लोळणार्यांना सगळी कडे घाणच दिसते हो Wink

तळवे चाटणार्‍यांना आणि भ्रष्टाचारात लोळणार्‍यांना काय दिसते म्हणायचं?

२००४ ला पण इच्छाच होती.. पण १० वर्ष मग पोस्टी टाकणे आणि कार्टुन टाकणेच काम करण्याच्या लायकीचे उरले Biggrin

आणि म्हणुन २०१४ ला युवराजांचा आणि त्यांच्या बगलबच्च्यांचा कार्टुन सारखा चेहरा झालेला बघायला मिळाला Biggrin

Pages