जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती सिरीयल मेघना साठी नाही बघत मी तर बुआ. आपल्याल तो आदे लय आवडतो.
त्या श्री पेक्षा तर जामच.
आदे ला काय बोलायचा नै!!! आधीच सान्गते. Wink

अरे आबा पाटलांना सांगुन ह्या ह बा वर सदोष मनुष्यवधाच कलम लावा रे.
हसवुन हसवुन मारतोय. Lol

मेघना आणि जानुच वर्णन लैच आवडल.

फक्त हे दोनच ऑप्शन असतील तर मी हिमालयात जाइन बॉ. Proud

गाण थोड बदलल आहे ना प्रेमाची कबुली दिल्यापासुन...
मिळावे तुझे तुला ,,, मी तुझ्यासाठी... मग एक सुर आळवला जातो...कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी....
अ‍ॅम आय करेक्ट ????

खेळ हा कालचा आज कोण जिंकले
हरवले कवडसे मिळुन ते शोधले
एकमेकांना काय हवे
जे हवे सगळेच आणले तुजसाठी

कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी
कोणी कुठे बांधल्या रेशिमगाठी
जुळुन येती रेशिमगाठी
आपुल्या रेशिमगाठी

मला निहिरा जोशी आणि स्वप्निल दोघांचेही आवाज भयंकर आवडतात म्हणुन हे गाणे (शिर्षकगीत) मी मनःपुर्वक ऐकलय.

या सिरियलीत शिर्षक गीत, दोन्ही गायक, सुमो आणि गिओ या व्यतिरिक्त सर्व काही भिकार आहे.

जानु आणि मेघी पैकी मेघीच बरी आहे... जानुसारखा 'एनसायक्लोपिडीया' आणि फिलौसोफर बनायचा तरी प्रयत्न करत नाही. >>>>> नाही कसं? मेघी 'एनसायक्लोपिडीया' नाही "विकीपिडीया" आहे.. तिला भुगोलातल सगळ माहीत आहे (आठवा तो पृथ्वी, चंद्र, सूर्य गोल गोल फिरण्याच एक्सप्लनेशन) गाण्यातल माहीत आहे, नृत्यातल माहीत आहे, चित्रकलेतल पण माहीत आहे...

सीरीयल संपायला आली असल्यास त्यात "पाणी घालुन वाढवण्यासाठी" कल्पना:
जेजुरीहुन येताना गाडीला अपघात होतो आणि आदित्य(१) गाडीबाहेर फेकला जाउन नाहीसा होतो. आणि मग सगळा देसाई परिवार तिचे लग्न आदित्य(२) बरोबर लावुन देण्याच्या तयारीला लागतो. आणि ऐन लग्नाच्या वेळी साडेसहा फेरे झाल्यावर आदित्य(१) दाढी वाढवुन उगवतो आणि ते पाहुन आदित्य(२) ला अटॅक येउन तो मरतो आणि परत सगळा आनंदीआनंद... (सीरीयल ६ महिने तरी "वाढवता" येइल Happy )

मनस्मि Lol अस नाही होणारे पण कारण आज सकाळी झी मराठी बघत असताना स्क्रोलमध्ये वाचल की "आदित्यच्या पाठीत भरली उसण आता त्याच्या काळजीची गोड जबाबदारी अर्थातच मेघनावर आली आहे"

आदित्यच्या पाठीत भरली उसण आता त्याच्या काळजीची गोड जबाबदारी अर्थातच मेघनावर आली आहे

>>>> Lol हे मराठी लिहिणार्‍याला माझे साक्षात दंडवत.

हबा जॉईन झाले का?? आवरा रे प्रतिसाद Rofl

मेघनाच्या हसण्याबद्दल लिहीताय लोक्स तुम्ही अर्चूला (शर्मिष्ठा राऊत) हसताना ऐकलंय का? अर्थात तिला हसायला लावलं नाही तेच बरं एकामागे एक अखंड उचकी लागावी किंवा वाजणार्‍या खेळण्यावर पाय देत लहान पोराने नाचल्यावर आवाज येईल तशी हसते ती...
जानू खरंच विकीपेडीया आहे पण मला मेघना पेक्षा तीच बरी वाटते... ह्म्म़़, क्कॉय गं/ए/रे, रीईईईली सॉरी... आणि झिणझिणल्यासारखी गिटार वाजवणे, फुलं घ्या फुलं डान्स स्टेप्स वगैरे वगैरे पेक्षा फार बरं ते!

पण पर्याय मिळाला तर दोघीही बाद!!

मेघनाच्या हसण्याबद्दल लिहीताय लोक्स तुम्ही अर्चूला (शर्मिष्ठा राऊत) हसताना ऐकलंय का? अर्थात तिला हसायला लावलं नाही तेच बरं एकामागे एक अखंड उचकी लागावी किंवा वाजणार्‍या खेळण्यावर पाय देत लहान पोराने नाचल्यावर आवाज येईल तशी हसते ती...>>>>>>>>>>>>:हहगलो: स्वप्न सुन्दरी तू पण आवर आता.:हाहा:

आदित्यच्या पाठीत भरली उसण आता त्याच्या काळजीची गोड जबाबदारी अर्थातच मेघनावर आली आहे

>>>> Lol हे मराठी लिहिणार्‍याला माझे साक्षात दंडवत. >>>> अग माझही असच झाल होत... नवर्‍याच्या तब्ब्येतीच्या काळजीची कसली गोड जबाबदारी.... काहीही...

जानू खरंच विकीपेडीया आहे >>>> तिने अशी काय अक्कल पाजळली ब्वा? इथे मेघनाने सिद्ध केल ना तिच विकीपिडियात्व... "I know everything" जानुने काय केल? Uhoh

दोन्ही धागे हीट आहेत. बरीच मंडळी नव्याने जोइन झालेली दिसतात.
एकाहून एक प्रतिसाद वाचायला मिळताहेत.
आदित्यच्या पाठीत उसण भरणार नाही तर काय . इतक्या दणदणीत मेघनाला उचलून वरती त्या पायर्या चढायच्या म्हणजे खायचं काम नोहे .पूर्ण घामानी ओला गच्च झालेला असेल शेवटच्या पायरीवर Happy

नविन प्रोमो - अमित आदित्य आणि मेघनाला ज्वेलरी बॉक्स बघयला मागत आहे आणि मेघनाने तो नवीन आणलेला बॉक्स दाखवला आहे तर अमित म्हणत आहे कि हा तो बॉक्स नव्हे ! आदित्य आणि मेघना इतके बावळट आहेत कि त्या बॉक्स मधले समान त्यांनी अजून जपून ठेवले आहे !

आदित्य आणि मेघना इतके बावळट आहेत कि त्या बॉक्स मधले समान त्यांनी अजून जपून ठेवले आहे !<<<

सगळं जपून ठेवण्यातच तर मालिका संपत आलीय

आदे चा उपास आजपण नाही सुटला
तो बहुतेक उपाशीच राहणार
एक तर आदे मरेल किंवा मेदे ला पत्र प्रकरण नंतर हाकलून तरी देतील
आदे चा उपास सुटेपर्यंत रेशीमगाठी चा गुंता काही सुटत नाहीये
सुमो चालायला इतकी उतावळी का झाली होती , आदे च्या पाठीवर चालली असती तर त्याची पाठ आणि हिचे पोट दोन्ही साफ झाले असते

सिंडी, मालिका सुरू झाली तरच संपते. येथे संपणे हाच आरंभ आहे, त्यामुळे फार तर आळंदीला जाणे राहिलेले असेल.

मालिका संपत बिंपत काहीही आलेली नाहीये. मागच्या नोव्हे. मध्ये तर सुरु झालीय एवढ्यात कशी संपेल ? अजून भरपूर पाणी ओतायच बाकी आहे.

मागच्या नोव्हे. मध्ये तर सुरु झालीय एवढ्यात कशी संपेल ?<<<

आशानाम मनुष्याणां काचिदाश्चर्य शृंखला
बद्धा यया प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पंगूवत्

Pages