जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

" कोंडलवण्णनै कोवळनायवैने उंडवायनीं उळ्ळंगबंदाने अंडकुणणी अणंगनिन्नमुदिने अंडकण्गणै कुणबिणीकाणावै----"

>> अगदी अगदी.. मलापण चैए च आठवला. आणि नवर्‍याने उचलुन घ्यायचं असतं हे माहित नव्ह्तं. आता जायलाच हवं. Wink

होणार सून आणि रेशीमगाठी चा महा संगम एपिसोड …।
मेघना चा डोकं आपटून तिची मेमरी format होते आणि ती परत फाटक्या चड्डी वाल्याच्या प्रेमात पडते

सत्यजित मुधळखोर | 17 June, 2014 - 14:45 नवीन

होणार सून आणि रेशीमगाठी चा महा संगम एपिसोड …।
मेघना चा डोकं आपटून तिची मेमरी format होते आणि ती परत फाटक्या चड्डी वाल्याच्या प्रेमात पडते
<<<

मुधोळकर, ह्या मालिका पाहून पाहून तुमची एरवीची कल्पनातीत कल्पनाशक्ती थिटी पडू लागली आहे. महासंगम असा कसा होईल दोन मालिकांचा?

रात्री झोपेत मेघनाच्या डोक्यावर डोके आपटल्यामुळे आदेचा मेमरी लॉस होईल व त्याला रस्ता क्रॉस करायला आधीच हेलपाटलेले जानूबाळ मदत करेल. ते दृष्य पाहून मत्सर आणि निराशा ह्या दोन विकारांनी ग्रस्त झालेले श्री बाळ जेजुरीला जाऊन सर्व काही नीट व्हावे अशी प्रार्थना करत असताना अचानक त्याचा एका पायरीवरून पाय घसरेल व ते श्रीबाळ पडू नये म्हणून (का कोनास ठाऊक तेथे आधीच आलेली) मेघना त्याला सावरेल व दोन्ही हातांत उचलून पायर्‍या उतरून सुखरूप खाली येईल.

हे सगळे झालेले ऐकून आई आजी आणि माई दोघी आपापल्या घरात घेरी येऊन पडतील. आर जी आणि गिरिश ओक हमरीतुमरीवर येतील. आपटे खारे शेंगदाणे खात बसस्टॉपवरच्या प्रौढेला छेडेल! जानूबाळाचे तीर्थरूप बाबाजी बाबाजी म्हणून आक्रोशू लागतील. अर्चू फ्रस्ट्रेटेड बेबीला योगा शिकवू लागेल. जानू बाळाची आई अत्यानंद लूटालूट केंद्र काढेल.

......आणि पिंट्या नावाचे एक नवीनच पात्र कथेत घुसडण्यात येईल.

>>>>>>>>>>तेवढ्यात एक बालक त्या खोलीत येते व ते तेथेच झोपणार असल्याचे जाहीर करते.
.
ते पोरग झोपायला आल्यावर त्या गाण्याचे Sad version लावले होते काय ?
असापण गाणे वाढवत घेतलेय …. काहीतरी पादले पादले पा पा म्हणून नवीन कडवे टाकलेय

आदे उपाशीच राहणार शेवट पर्यंत >>>> आदित्य देसाई मरणार आहे मालिकेत ( बहुदा उपाशीच ) आणि दुसरा कोणीतरी आदित्य येणार आहे.

असंही वर्जन:

आदित्य: तुझी जागा इथे नाही इथे (पलंगावर) आहे... (काही दिवसापूर्वी हे वाक्य ऐकलं होतं त्याच्या तोंडी)
मेघना: ला ला ला ला लाजते...

आदित्यच्या आयुष्यात अच्छे दिन (आणि अच्छी राते) येणार असतात... इतक्यात त्याच पलंगावरून मेघना खाली पडते... आणि तिला तिचा पूर्वजन्म (त्या तिकडे स्मृतिभ्रंश झालाय म्हणून इकडे पूर्व जन्मीची स्टोरी) आठवतो...

ती मागच्या जन्मीची जानु असते...

आता तिला श्री आवडायला लागतो...

आदित्य पुन्हा वाट पाहातो .... Lol

आता तिला श्री आवडायला लागतो...

>>>

श्री नाही आपटे Proud

बरं होईल. या मेघनाला आपटेसारखाच मिळायला हवा एखादा Angry

>>>>>>>>>>>>>आदे उपाशीच राहणार शेवट पर्यंत >>>> आदित्य देसाई मरणार आहे मालिकेत ( बहुदा उपाशीच ) आणि दुसरा कोणीतरी आदित्य येणार आहे.
.
अरे बापरे … तो मेला तर त्याचा काकस्पर्श पुढे कोणी नवीन आदित्य येईल त्याला लागेल ….
मेघना रेशीमगाठी जुळवता जुळवता म्हातारी होऊन जाईल …
आता फक्त बाप्पाजी यातून मार्ग दाखवू शकतात

जान्हवीचा आवाज फार लाऊड वाटतो शिवाय तिचं ते सुप्रसिद्ध हसू. त्यापेक्षा मेघनाचा वावर प्लेझंट वाटतो.

कथा प्रेडिक्टेबल असली तरी अजूनतरी प्रसंग चांगले रंगवत आहेत. मात्र गेले दोन-तीन त्यांच्यातले जे रोमँटिक प्रसंग दाखवत आहेत त्यात केमिस्ट्री कमी वाटते दोघांत, बळंच रोमँटिक बोलतात असं वाटतं मधूनच. शिवाय क्वचित आदित्यचे एक्स्प्रेशन्स थोडे व्हिलनिश नाही वाटले का कुणाला ? ( मालिकेत तसं अभिप्रेत नाहीये, त्याच्या अ‍ॅक्टिंगचा दोष ! )

अगो, मला मेघना पुढे त्याचे एक्सप्रेश्न सॉलिड सुखद वाटतात.

तिला कोणी चिडवतं तेंव्हा ती जे ह्म्म म्हणते ना ते असलं डोक्यात जातं ना Angry वाटतं एक खाडकन मुस्काडात ठेवून द्यावी Angry

आणि आदित्य चिडवतो तेंव्हा तिचं ते आदित्य्य्य्य्य्य्य्य!
आणि मागे ते तनन नन्ननननननन तानानिनिनि ताना नन न Angry

मेघना आणि जान्हवी यातली कोण सगळ्यात जास्त आवडते आणि कोण डोक्यात जाते? आपापली अमुल्य मते द्या कृपया. मला जाणून घ्यायची उत्सुकता आहे.

यातली कोण सगळ्यात जास्त आवडते आणि कोण डोक्यात जाते? आपापली अमुल्य मते द्या कृपया. मला जाणून घ्यायची उत्सुकता आहे.<<<

दोघी एकाच ठिकाणी, म्हणजे डोक्यात गेलेल्या असल्याने सांगता येत नाही आहे. बाहेर आल्या की कळवण्यात येईल, खात्री असावी.

तशी जानु मला उलिशी आवडते मेघनापेक्षा.:इश्श: पण दोघीही काही वेळा डोक्यात जातात.:राग: सारख्या झिपर्‍या मिरवतात. किचनमध्ये केस सापडत नाहीत का अन्नात्?:अओ:

मालिकेच्या शीर्षकाप्रमाणे आदे आणि मेदे या दोघांच्या गाठी (गुंता) एकदाच्या जुळल्यामुळे मुळ मालिकेतली कथा संपली आहे. आता मालिका पुढे चालू ठेवण्यासाठी 'आदे मरणार' सारखा एखादा ट्विस्ट आणणे गरजेचे आहे. एकदा (आधीच पाणी घालुन वाढवलेली) मुळ कथा संपल्यावर आता आणखी पाणी घातल्याशिवाय मालिका कशी चालू रहाणार? तिकडे त्या जानूचा मेमरी लॉस आणि इकडे हे. चालु द्या…

यातली कोण सगळ्यात जास्त आवडते आणि कोण डोक्यात जाते? आपापली अमुल्य मते द्या कृपया. मला जाणून घ्यायची उत्सुकता आहे.<<<

मला स्टार प्लस प्लस वरची श्रेनु पारीख आवडते …। सिरियल म्युट करून पाहत असल्याने सिरियल चा नाव नाही माहित

Pages