जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल चुकून थोडावेळ बघितला. मीनाक्षी म्हणाली तेच मी नवऱ्याला म्हणाले की उपासाला उष्ट चालत नाही, खरं म्हणजे मोडला दोघांचा उपास.

आता प्रेमाच्या नव्याने पारन्ब्या फुटल्या ना वडाला.:फिदी: मग उष्ट माष्ट चालणारच की आदे-मेदेला.

आदेचा राजेश खन्ना झालाय आणी मेदेची टिना मुनिम.:खोखो: दोघे नाही का पत्रकाराना सान्गायचे की आम्ही एकच टुथब्रश वापरतो वगैरे वगैरे.:फिदी:

>>>>>>>अर्चुची आई... लाड लाड बोलणारी

अगो बाई ….
सुमो म्हणतात ग काय मला …।
लहानपणी ना …। …। …. खूप मोठी गोष्ट सांगायचे म्हणून सुमो म्हणायचे

प्रत्येक वेळी पडणारा प्रश्नः
हिरोईन झोपल्यावर नेमकी तिच्या चेहर्यावर केसांची बट कशी येते? आणि ती हिरोलाच बाजुला सारावी लागते का?........... जवळपास प्रत्येक सीरीयल आणि पिक्चर मधील प्रसंग!

Rofl

पण आता जाडा म्हणजे थन्डीचे दिवस नाहीयेत, तर पाण्यापावसाचे दिवस आहेत. तिकडे जानु आणी श्री बाळ बघा कसे पावसात अत्यानन्दाने बागडातायत.:फिदी:

बरसातमे ताकधीनाधीन असे गाणे हवे तिथे.

ह्या! मग सगळ्यान्ची झोपमोडच होईल. आणी माई हसून आदित्यला म्हणतील " लब्बाडा, तुला आणी मेघनाला इतके चान्गले गाता पण येते हे माहीत नव्हते, चल आता तू मेघनाबरोबर गाण्याचा क्लास लाव.:फिदी:

ह्यांचे ऐन उमेदीचे दिवस क्लासच्या फिया भरण्यात आणि वडाला पिळवटण्यातच जाणार!

एका निर्व्यसनी ब्राह्मणाचा शाप आहे हा! समस्त रसिकांना कंटाळा आणण्याबद्दल!

सिरिअल डोक्यावर आपटून तिचा कपाळमोक्ष झालेला आहे.

आज घरातील सर्वजण बाहेर गेलेले असताना आदित्य मेघनाच्या स्त्रीसुलभ हालचाली पाहण्यात रमला होता. त्यानंतर त्यांच्यात प्रणयचेष्टा होणार असे वाटताच मेघना पळून गेली. पण पळून जाण्याच्या आधी एक भयंकर डायलॉग टाकला तिने:

"मला आपल्या नात्यात पूर्ण खरेपणा आवश्यक वाटत होता. त्यामुळे माझा निर्णय व्हायला इतका वेळ लागला."

आदित्यचा डायलॉग काय? तर म्हणे तुला निर्णय घ्यायला इतका वेळ लागला ह्याचा अर्थ तुझा निर्णय खरा असणार हे नक्की!

ही दोन वाक्य ऐकून घेरी येऊन पडायची इच्छा झाली होती.

त्यानंतर अर्चू आणि मोठी जाऊ लहान मुलांसमोर 'फक्त प्रौढांसाठी' सदरातील विनोद करून खूप वेळ हासतात. मुलांना ते विनोद अगदीच सुमार वाटल्यामुळे मुले आयांची कीव येऊन तुच्छपणे हासतात. अभ्यासाच्या वेळी आयांनी भलत्यासलत्या विषयांकडे लक्ष वळवल्याचा मोबदला म्हणून आईसक्रीम तेवढे मागतात.

त्यानंतर मेघना सासूबाईंकडे जाते. त्याही स्वतःच्या हातांनी स्वतःचे कपाळ दाबत असतात. एवढे एकच साधर्म्य टीव्हीच्या आतल्या आणि बाहेरच्या लोकांमध्ये मला आढळले. मेघना त्यांच्यासमोर उभी राहून चुळबुळ करते. ते पाहून त्या तिला म्हणतात की तू अवघडल्यासारखी का वाटतीयस! बोंबलायला आडात नाही ते पोहर्‍यात कुठून येणार हे त्या माउलीला काय ठाऊक! इतके दिवस आदित्यच अवघडला होता हे सासूबाईंना समजले तर त्यांच्या मनावर आघातच होईल.

त्यानंतर दोघे रात्री आपल्या कक्षात असताना अचानक मेघनाच्या चेहर्‍यावर आदित्यला कमालीचा ताण दिसतो. स्पष्टीकरण विचारल्यावर ती जे काही बोलते ते ऐकून आदित्यचे जाऊचदेत, माझ्याच पोटात गोळा आला. काय तर म्हणे ह्या घरात सगळेजण एकमेकांशी प्रामाणिकपणे वागतात आणि मी आजवर सगळ्यांना फसवत होते. हे मला शोभत नाही. तेव्हा आता मी सगळ्यांना काय ते खरे सांगणार आहे. सुहास शिरवळकरांच्या भाषेत आदित्यच्या कपाळात गेल्या असतील. तेवढ्यात एक बालक त्या खोलीत येते व ते तेथेच झोपणार असल्याचे जाहीर करते. आदित्यच्या नशिबातील शोषण आणि कुचंबणा पाहून मला आता संयुक्ताच्या धर्तीवर पळपुक्ता ग्रूप काढावासा वाटत आहे.

त्यानंतर दोघे जेजुरीला गेले. मायबोलीवर मागच्या भागातील 'खोट्टी खोट्टी गाडी' ही थट्टा वाचलेली असल्याने ह्यावेळी चक्क शोफर ड्रिव्हन कार दाखवली आहे. मागच्या सीटवर दोघे बसून एकमेकांचे हात धरत किंवा सोडत असतात. शेवटी जेजुरीच्या पायर्‍यांवरून आदित्य मेघनाला उचलून नेऊ लागतो. वर पोचल्यावर मेघना नावाचे निरागस बालक म्हणते की मला आजच आपले लग्न झाल्यासारखे वाटत आहे.

ह्यानंतर मी माझे दोन शब्द संपवतो. आज आपण सगळे इथे जमलात आणि कार्यक्रमाला शोभा आणलीत ह्यासाठी सर्वांचे आभार!

-'बेफिकीर'!

त्यानंतर मेघना सासूबाईंकडे जाते. त्याही स्वतःच्या हातांनी स्वतःचे कपाळ दाबत असतात. एवढे एकच साधर्म्य टीव्हीच्या आतल्या आणि बाहेरच्या लोकांमध्ये मला आढळले. >>>>>>आईग!:हहगलो:

मायबोलीवर मागच्या भागातील 'खोट्टी खोट्टी गाडी' ही थट्टा वाचलेली असल्याने ह्यावेळी चक्क शोफर ड्रिव्हन कार दाखवली आहे. >>>अगदी अगदी मलापण तस्सेच वाटले.

त्याही स्वतःच्या हातांनी स्वतःचे कपाळ दाबत असतात. एवढे एकच साधर्म्य टीव्हीच्या आतल्या आणि बाहेरच्या लोकांमध्ये मला आढळले.>>> Rofl

बेफिकीर, तुम्ही हि मालिका संपेपर्यंत बघावी आणि असेच मस्त अपडेट्स द्यावेत अशी तुम्हाला कळकळीची विनंती __/\__

भक्तीगीत..नि बेफींचे प्रतिसाद Rofl
बेफिकीर, तुम्ही हि मालिका संपेपर्यंत बघावी आणि असेच मस्त अपडेट्स द्यावेत अशी तुम्हाला कळकळीची विनंती
__/\__ >> +१

Lol
दोघं देवळात पोचल्यावर माझी १०वर्षीय संगीत शिकणारी भाची गायलीच " कोंडलवण्णनै कोवळनायवैने उंडवायनीं उळ्ळंगबंदाने अंडकुणणी अणंगनिन्नमुदिने अंडकण्गणै कुणबिणीकाणावै----"

हो झंपी,
पहिल्या सात पायर्‍या तरी नेतात उचलून.
कायम बायकांनीच सात जन्माची शिक्षा नवर्‍याला का द्यावी?
कधी कधी 'शिकार खुद यहा शिकार हो गया' असेही व्हावे म्हणून ही प्रथा पडली असावी Proud

जेजूरीत खरीच अशी प्रथा आहे ़काय की बायकोला उचलून नेतात?ं<<< हो. नवीन लग्न झालेले नवरा बायको असतील तर नक्कीच. अगदीच झेपलं नाही तर पहिल्या सात पायर्या. पण आम्ही गेलो होतो तेव्हा एक पट्ठ्याने पूर्ण बायकोला पूर्ण पायर्‍या उचलून नेलेलं पाहिलं.

मी ऐकलेल्या अफवे प्रमाणे, आदित्य देसाई नावाचा माणुस ( पात्र ) मरणार आहे आणि त्याच्या जागी कोणीतरी दुसरा कोणीतरी आदित्य येणार आहे.

बाकी ह्या मालिके बद्दल काहीच माहीती नाही.

Pages