Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता हे राव हुश्श करताहेत तोवर
आता हे राव हुश्श करताहेत तोवर एकटीच लोळणफुगडी घालतेय पलंगावर कठीणे!!! आता याची पाठ धरलीये.. (गुलाबी गवनीतली गुळाची ढेप उचलणे लयीच म्हागात पडलीया)>>>>:हहगलो: बापरे, अरे या धाग्याची लिन्क पाठवा त्या जाड्या रड्याना.( आदे नी मेघना ).
how to watch zee Marathi
how to watch zee Marathi serials online? all episodes are not available on Youtube
>>>
Lucky you
सीरीयल अज्जिबात बघत नाही.
सीरीयल अज्जिबात बघत नाही. इथेच फुल्ल एन्टरटेनमेण्ट.
how to watch zee Marathi
how to watch zee Marathi serials online? >> पेशन्स चा एक क्रॅश कोर्स करून भागणार नाही. अनेक करावे लागतील तेव्हा कुठे तुम्हाला आमच्यासारखी पाचन शक्ती लाभेल
देव तुमचं कल्याण करो.
(ठाणे मुंबई ऑलरेडी झालं असेलच)
आदे अजाबात आवडत नाय सध्या...
आदे अजाबात आवडत नाय सध्या... जामच चेकाळल्यासारखा करतोय... तो विव्हळ दर्द चेहर्यावर पांघरायचा तेच बरं वाटायचं... काय ते लाडे लाडे... >>++१००००००
हसताना तर हल्ली बिलकुल नाही आवडत. रडकाच चांगला वाटायचा....
>>>>>>>>>आता हे राव हुश्श
>>>>>>>>>आता हे राव हुश्श करताहेत तोवर एकटीच लोळणफुगडी घालतेय पलंगावर कठीणे!
फुटबॉलचा वल्डकप चालू आहे न
घालत असेल लाथा
अरे मातोश्री आहेत ना पुढ्यात
अरे मातोश्री आहेत ना पुढ्यात तुमच्या? कस्ले पाचकळ विनोद करताहात!! >>> ड्रिमा, शेवटी किती बांध घातला तरी पाट भरला की पाणी ओसंडून वाहणारच त्याच्या मनाची आवस्था नेमकी तशी झालिये. भावनांना आवरण आता कठीण झालय त्यामुळं शब्दांचं पाणी आता बांध ओलांडणारच. भगवतगीता चालेना आता निदान मदहोशी की सुरस कथाये तरी लिहून बघू. असा विचार केला असणार लेखकाने. जाऊदे आता मी या मालिकेवर काहिही बोलणार नाही. आज बोललं की उद्याचा भाग बघावा लागतो. गट्टी फू. फू तर फू... फू बाई फू वगैरे कुणी टाकू नका.
जाऊदे आता मी या मालिकेवर
जाऊदे आता मी या मालिकेवर काहिही बोलणार नाही. >> हबा तू कशाला तुझ्या भावनांना आवर घालतोस??? बोलू नकोस... प्रतिसादात लिहून तुझ्या भावना मोकळ्या करू शकतोस
भावना मोकळ्या करू शकतोस>>> हा
भावना मोकळ्या करू शकतोस>>> हा शब्द फार फार महत्वाचा आहे. एकदा मोकळं झालं की कसं प्रसन्न वाटत. मी या मालिकेबद्दल लिहून हाच अनुभव घेतोय. असाच मोकळं होण्याचा आनंद आदेला ही मिळेल पण माईनी आपल्या मायाळू हातानी शेक दिला तरच तो उसनीतुन मोकळेपणाचा आनंद घेऊ शकेल. असो. त्याला मनात साठवून ठेवायची सवयच आहे.
हब्या हसवून हसवून मारशील
हब्या हसवून हसवून मारशील
रीया....
रीया.... http://www.tvforumonline.com/Guide.aspx?c=One
इथे रोजचा तपशील बघता येतो.. अगदीच बघायचा असेल तर..
आणि बाकी कटकटी नाहीयेत...
गोगा, मला नाही बघायचं एकदा
गोगा, मला नाही बघायचं
एकदा टिव्हीवर पहाते ते पुरेसं आहे
रायगड्ला हवंय बहुदा
आदित्य म्हणजेच ललित बद्दल
आदित्य म्हणजेच ललित बद्दल थोडेसे - तो प्रायोगिक रंगभूमीवर तयार झालेला कलाकार आहे , त्याला भारत सरकारची तरुण कलाकारांना वाव मिळावा यासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्याने प्रायोगिक नाटक द इनव्हिजीबल सिटी हे नाटक दिग्दर्शित केले आहे . तो कॉम्पुटर सायन्स पदवीधर आहे . याधी त्याने जिवलगा गंध फुलांचा गेला सांगून या मालिकांत काम केले आहे .
आणि तो स्मार्ट आणि हंड्सम आहे!!
दक्षिणा ताई, तू चूक काढलीस
दक्षिणा ताई,
तू चूक काढलीस म्हणुन मि खास कालचा एपि पाहिला,
अग ति रात्रि डावि कडे झोपलेलि दिसलि कारण ते शूटिंग आरशातल होत..ति उजवि कडेच झोपलि होति....
कोण मेला डायरेक्टर आहे तो....एक तर ति १०*१० चि खोलि,त्यात ते भरीव आणि हेवि फर्निचर ठेवलय...त्यात ह्याचे कॅमेरा चे बकवास अँगल्स.....
नह् तो गोन्धल सीन आरशातुन
नह्
तो गोन्धल सीन आरशातुन घेतल्यामु ळे झालाय. कधी आरशातून कधी डायरेक्ट. त्यमुले मेघना पलंगच्या या बाजुला तर क्धी त्या बाजुला आहे असे वाटते. ती. आरशाच्या बाजुला तर आदे कपाटाच्या बजुला झोपल्ले असतात
मी पुढचं पान वाचन्य आधीच
मी पुढचं पान वाचन्य आधीच प्रतिसाद दिला. गोपिका यांनी तेच लिहिले आहे
ड्रीमगर्ल, ह.बा. : __/\__
ड्रीमगर्ल, ह.बा. : __/\__
तरुण कलाकारांना वाव मिळावा
तरुण कलाकारांना वाव मिळावा यासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती मिळाली आहे. >>> विना शिष्यवृत्ती ह्याला स्वतःच्या घरातही वाव मिळणार नाही ह्याची जाणीव झाली असणार त्याना. (आमच्या इथल्या एका पोराला दहावीत ८१.२० % मार्क्स मिळवले म्हणून गोदाबाई साळी आदर्श विध्यार्थी शिष्यवृत्ती मिळालेली. पदवीपर्यंत. महिना ३०० रु. पण साध्या दारुलाही पुरत नव्हते त्याला ते पैसे. स्कॉलरशीप कमी पडली म्हणून बारावीला नापास झाला.)
त्याने प्रायोगिक नाटक द इनव्हिजीबल सिटी हे नाटक दिग्दर्शित केले आहे. > बघितले नसल्याने नो कमेन्ट्स.
तो कॉम्पुटर सायन्स पदवीधर आहे .>>> अलिकडे पदव्युत्तर पदवी नसेल तर कुणी उभा करत नाही दारात.
याधी त्याने जिवलगा गंध फुलांचा गेला सांगून या मालिकांत काम केले आहे. >> बघितले नसल्याने नो कमेन्ट्स.
आणि तो स्मार्ट आणि हंड्सम आहे!! >>> यात कसलीच शंका नाही. अश्या रुपवान कलाकारांची मराठी कलाक्षेत्राला खूप गरज आहे.
पोटसुटे, ढेकुणछाप मिशीचे, आचकट विचकट हावभाव करणारे, कुचंबून कुचंबून मालिकेत आलेले, वाकड्या नाकाचे, फेंगडा डान्स करणारे सगळे बघताना हे चुकून गेलेत की मराठी माणसाची जडण घडणच अशी आहे असा प्रश्न पडतो. पिळदार शरीरयष्टीचा, नीट नेटक्या कापडातला, अभ्यासू आणि आत्मविश्वासानं वावरणारा मराठी तरूण/माणूस बघितला की खूप बरे वाटते. यातला आत्मविश्वासाने वावरणारा एवढाच शब्द जरी एखाद्या व्यक्तिला लागू झाला तरी ते खूप आहे. पडद्यावर जे दिसत ते आपल्या समाजाचं प्रतिबिंब असेल तर आपला समाज एवढा शेपलेस का आहे?
आता त्याला ज्येष्ट कलाकारांसाठीची शिष्यवृत्ती लवकरच मिळू नये ही मनापासूनची इच्छा!!!
शर्मिष्ठा राऊत बद्दल
शर्मिष्ठा राऊत बद्दल थोडंसं... म्हणजे अगदी थोड्डसंच बर्का..एवढंच पुरेसं आहे
https://www.youtube.com/watch?v=0jjNVfJDLog
खुपते तिथे मधे हिच्या
खुपते तिथे मधे हिच्या खिंकाळण्याची झलक पाहिली होती
शर्मिष्ठा राऊत बद्दल
शर्मिष्ठा राऊत बद्दल थोडंसं... >>> हे थोडसं एखाद्या हालक्या काळजाच्या माणसाचा जीव घ्यायला पुष्कळ आहे. माझी बायको अशी हसली तर मी तिच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची केस घालीन. असुदे पण फार काही टेंबडा नाही दाखवत ती.
उपाशी आदे कुठेतरी बाहेर
उपाशी आदे कुठेतरी बाहेर चाललाय … आता तो गायब होणार , मरण्याच्या न्यूज सोबत ….
दोन घराचा पाहुणा उपाशी याचे उत्तम उदाहरण म्हणजे मेदे …. (फाटक्या चड्डी वाल्याने काही केले नसेल हे गृहीत धरून )
kahi comments farach annoying
kahi comments farach annoying hotayet
sorry but rahavaval nahi
ललित, गंध फुलांचा गेला सांगून
ललित, गंध फुलांचा गेला सांगून मध्ये व्हिलन होता पण तिथे तो एकदम सुकड्या वाटत होता, मी एक दोन एपिसोडच बघितले, तेव्हा मला नाही आवडला तो पण रेशीमगाठीमध्ये आवडला पण ती हिरवीण आवडत नाही मला म्हणून मी मालिका बघत नाही.
काल काय झालं ते सांगा कुणी
काल काय झालं ते सांगा कुणी तरी.
रोज एक अपत्य या जोडप्याच्या
रोज एक अपत्य या जोडप्याच्या मध्ये झोपायला येतेय …
मग कमेंट तरी कशा बद्दल टाकायच्या ?
रोज एक पोर आईशी भांडताय , का तर मध्ये झोपायला पाठवायचं
याना नक्की काय दाखवायचे आहे … मारून टाका ना त्याला एकदाचा
आज एपिसोड मध्ये फालतू विषयावर
आज एपिसोड मध्ये फालतू विषयावर वेळ घालाव्याबद्दल पाच मिनिटे शिल्लक असताना चानेल चेंज केला … उद्या दुपारी राहिलेली पाच मिनिटात काय झाले ते पाहण्यासाठी प्रोग्राम पाहण्यात येईल
चिंता नसावी
(फालतू विषय ।…। पोरीला बेंच बदलायला लावला यावर पंधरा मिनिटे चर्चा )
खुपते तिथे मधे हिच्या
खुपते तिथे मधे हिच्या खिंकाळण्याची झलक पाहिली होती>>मीसुद्धा तिथेच पाहीली... पण या इस्टाईलची झलक कॉलेजात असताना पाहीली होती... माझी रूममेट अशी अखंड उचक्या देत हसायची...
फालतू विषय ।…। पोरीला बेंच बदलायला लावला यावर पंधरा मिनिटे चर्चा>> अगदी
या वेळेसही अर्चूचा राग आला... या दोघी भोचक भवान्या स्वतःला हव्या तश्या बागडतात, नाकं खुपसतात, पांचट जोक्स मारून खिदळतात, परस्पर बिलं पळवतात, वर नवर्यांना ज्वेलरी बॉक्सची जासूसी करायला लावतात आणि त्यांच्याच आगाऊ कार्ट्यांना ही मेघना समजावून सांगते ते ही ती कार्टी काकू काकू करत लोंबकळायला येतात तेव्हाच तर या तिलाच झापतात? सुमो त्या दिवशी सारखी लेडी गब्बर होऊन फेर्या का मारत नै ये... कितनी औरते थी... मग गिओ म्हणतील दो सरकार... ये एक और वो दो? लयच नाईन्साफी!
बाकी मेघना फारशी आवडत नसली तरी मनापासून वाटतेय की बोल अगं बये फाडकन एकदा... तुम्ही माझ्या संसारात नाकं खुपसणं सोडा आणि स्वत:च्या आगाऊ कार्ट्यांना स्वतःच सांभाळायला शिका, मगच झापायला या.. मी काही ठेका नाही घेतलाय तुमच्या अती लाडावलेल्या आगाऊ पोरांचा आणि स्वतःच्याच कुशीत झोपवा पोरांना... आम्ही आमच्या मुलांना जन्माला घालून त्यांचे गहन प्रश्न कधी सोडवणार बरं???
आणि मेघनाला आलेल्या कुरिंयरचे
आणि मेघनाला आलेल्या कुरिंयरचे काय झाले? नुसते ज्वेलरी बॉक्स चे गिरण चालले आहे नाहीतर parenting चे बाळकडू पाजणे सुरु आहे…
आज मोरे मेला … परवा पिंगळे
आज मोरे मेला … परवा पिंगळे मेला होता
उद्या आदे मरेल
। पण जेवताना सॉलिड आणि पंधरा मिनिटे चर्चा संपणार नाही
Pages